Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 02, 2006

Hitguj » Views and Comments » General » मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा » Archive through April 02, 2006 « Previous Next »

Gajanandesai
Wednesday, December 21, 2005 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुभाशीष, वर माझी एक पोस्ट आहे सातवीतल्या पहिल्या धड्यावर. तोच होता का पहिला धडा? त्याचे नाव नाही आठवत...

P_para2
Tuesday, February 07, 2006 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

desai ji
"lala" ha dhada mala watate " 9th" lach hota. tyat "rupali" aani "sonali" ase patra yetat. mala nakki aathwat nahi pan "rupali" he nav Kutrila dile hote????????? kay ki?

Nakkii aathawanyache karan mhanaje "rupali" nawachich ek mast mulagi 9th la aamachya wargat aali hoti. aani nantar aamachya group la join zali.

Amitpen
Tuesday, February 07, 2006 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'सोनाली' हि सिंहीण होती... नंतर पेशवेपार्क मध्ये ठेवली होती...ती पाळणार्‍या डॉक्टरांचे नाव विसरलो.....

मला एक समुद्र आणि झरा' धडा आठवतोय


Dineshvs
Wednesday, February 08, 2006 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते डॉ. पुर्णपात्रे ना ?
त्या सोनालीला गुलाबजाम खुप आवडायचे पण ती अति माणसाळलेली होती.
असाच एक प्रयत्न डॉ प्रकाश आमटे यांच्या नेगल पुस्तकात आहे.


Swapnil_khole
Wednesday, March 29, 2006 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला "कोलंबसाचे गर्वगीत" ही कविता आठवते आहे का??१० वीतील कविता.

कवी कुसुमाग्रज.

चल उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती,
किनारा तुला पामरला

आणि एक खूपच छान कविता होती.
बहुधा कुसुमाग्रजान्चीच..

पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला,
मोडलो असलो मनाने तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवूनी नुसते लढ म्हणा.

कोणी नाव सान्गेल काय कवितेचे???


Moodi
Wednesday, March 29, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्निल हा बीबी बघ रे साहित्याचा.

/hitguj/messages/103385/334.html?1141727850 .

ithe aahe re tee kavitaa. haLuuvaar aahe naa tee?

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=4977#POST4977>

Ameyadeshpande
Wednesday, March 29, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मला कुसुमाग्रजांची " सागर " ही कविता कित्ती दिवसांपासून हवी आहे... इंग्रजी माध्यमाच्या मराठी च्या पुस्तकात होती बहुतेक ७ वीत किंवा ८ वीत...मला शेवटच्या २ ओळी आठवतात फ़क्त.

तूफ़ान जेव्हा भांडत येते...सागर ही गर्जतो...
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो...

माहिती असली कुणाला तर टाका इथे.


Dha
Wednesday, March 29, 2006 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे,स्वप्निल त्या कवितेचे नाव "कणा" आहे.



Swapnil_khole
Thursday, March 30, 2006 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मूडी,अमेय,वसुधा,

कणा ही कविता पाहिली आणि खरेच बरे वाटले. किती दिवसापासून तडफ़डत होतो.
कोणाला भिमाचा धडा आठवतो आहे का
जो पैलवान असतो. आणि मढी उकरुन त्याच्यातले सोने नाणे विकुन पैसा कमवत असतो. मग एक दिवस त्या मढ्याच्या दातात त्याची बोटे अडकतात. असाच काहीतरी तो धडा होता. नाव आठवते कोणाला??लेखक कोण होते बहुधा ९ वी ला असावा.


Ameyadeshpande
Thursday, March 30, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे स्वप्नील मला धन्यावाद का? आणि त्यपेक्षा ती कविता देतोस का बघ मी वरती लिहिलेली...

Gajanandesai
Thursday, March 30, 2006 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amey, ती 'सागर' ही कविता चाफ्याने लिहिलीय वरच्या आर्काईव्ह मध्ये आहे. Click here:-
सागर

स्वप्नील, तो धडा(भिमाचा) 'स्मशानातील सोनं' लेखक अण्णा भाऊ साठे.

Ameyadeshpande
Thursday, March 30, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन, चाफ़ा तुम्हाला उदंड आयुष्य लाभुदे :-)

Amrutabh
Thursday, March 30, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नील,त्या धड्याच नाव स्मशानातील सोने असे आहे..आणि त्याचे लेखक अण्णाभाऊ साठे आहेत.
कुणाला धुण हा धडा आठवतोय का? त्यात सासू आणि सुनेच्या नात्या बद्दल फार छान लिहिले आहे.


Swapnil_khole
Thursday, March 30, 2006 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा एकदा धन्यवाद सर्वाना,

धुणं धडा आठवतो आहे. सासू खुपच प्रेमळ असते, तरीही खोटा आव आणून सुनेला छळायचा प्रयत्न करते ई.ई.

"असं बघत काय बसलीस माझ्याकडे तुम्बलेल्या म्हशीवानी???" हे एकच वाक्य आठवते आहे कारण त्या वेळेला ते वाक्य खूप हसवून जायचे.



Zakki
Thursday, March 30, 2006 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला, शाळेत असताना जेंव्हा वाचायला पाहिजे होते ते धडे, तेंव्हा उनाडक्या करत होतात, नि आता कशाला चर्चा करताहात? मार्क वाढवून मिळायचे नाहीत आता!!


Swapnil_khole
Friday, March 31, 2006 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके,

झक्की काकानी सान्गितले की काम झाले.
ठीक आहे झक्की काका, नो मोअर डिस्कशन.
पण झक्की काका, हे डिस्कशन मूळात मार्कान्साठी नाहीच आहे, ते आहे जुन्या आठवणीना उजाळा देणेसाठी. आम्ही पाठ्यपुस्तकातले प्रश्न आणि उत्तरे कोणती, किन्वा काय लिहिल्यावर जास्त मार्क्स मिळतील यावर चर्चा नाही करत आहोत. छान कविता आणि धडे कुठले होते, लेखक किती छान लिहीतात यावर ही चर्चा आहे. हे धडे,कविता आजही वाचण्यासारखे आहेत.




Manali_frd
Saturday, April 01, 2006 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला ती कविता आठवतेय का बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडु नये.
मला ही ओळ फ़ार आवडायची कदाचित अनुप्रास अलन्कारामुळे.
" फ़टका " असा काव्यप्रकार होता का तो??
मॉडेलिन्ग आणि मी मधलं वाक्यं पेस्टल शेड डेलिकेट डीझाईन ....
वीज चमकली साठी दीम्डु धन्यवाद. :-)



Zakki
Saturday, April 01, 2006 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की काकानी सान्गितले की काम झाले.
ठीक आहे झक्की काका, नो मोअर डिस्कशन.
काम कसले झाले? नि मी गमतीत लिहिले होते. तुम्ही चालू ठेवा चर्चा. मला स्वत्:ला एक पण धडा आठवत नाही, तेव्हढा अभ्यासच केला नाही. पुण्यात राहून वर पुस्तकातून काय मराठी शिकायचे?!

Swapnil_khole
Sunday, April 02, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाली,

ती कविता १० वीला ६ असावी. त्याचे कवी अनंत फ़ंदी होते.
अगदी बरोबर, तो काव्यप्रकार फ़टका हाच होता. आणि त्या कवितेचे नावही फ़टका हेच होते. मला सगळी कविता नक्कीच कुठेतरी मिळेल. मिळाली की पोस्ट करेन.


Dha
Sunday, April 02, 2006 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाली, त्या कवितेचि पुढची एक ओळ आठवतेय,

बिकट वाट वहिवाट नसावी,धोपट मार्गा सोडु नको,
संसारामधे ऐस आपुला उगाच भटकत फिरु नको.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators