Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
शठम प्रतिशाठ्यम.. मुलांना हे शिकवावं ...

Hitguj » Views and Comments » General » शठम प्रतिशाठ्यम.. मुलांना हे शिकवावं का? « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 18, 200620 04-18-06  6:16 pm

Prasik
Sunday, July 16, 2006 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा! मुलाना ज़रुर शिकवावे
लहानपणी मी कधि मस्ती केली की माझे पप्पा चुक कोनाची आहे हे न बघता मलाच शिक्शा करायचे. म्हनुन मी सान्गतो मुलानो तुम्हाला जर का कधी कोनी मारले तर त्याला तुम्ही आजिबात सोडु नका. पुढे चान्स मिळेल किवॉ नाहि देव जाणे


Chaffa
Monday, October 16, 2006 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरच्या सगळ्यांच्या पोस्ट वाचल्या. खरं तर मला बोलण्याचा फारसा आधिकार नाही पण एकंदर सगळ्या पोस्ट वाचल्यावर लिहायची उर्मी दाबता आली नाही.
लहान असताना मी बर्‍यापैकी भित्रा होतो, आणी दर दोन दिवसाआड कुणाचा ना कुणाचा मार खाउन घरी यायचो. शाळेत तक्रार करायचो पण कधिकधी मारणार्‍या टगे मंडळींच्या धमकीने तिही नाही करता यायची. फार असह्य व्हायचे सगळे, माझे वडील एकदा सुटीवर आल्यावर हा प्रकार त्यांना कळला, मला जवळ घेउन त्यांनी विचारले की मी प्रतिकार का करत नाही.?? मी त्यांना माझे प्रॉब्लेम्स सांगितले ती मुलं वयाने मोठी आहेत, आणी मारामारी केल्यावर शाळेत शिक्षा होईल. असं बरच काहिकाही. पण मला तेंव्हा वडीलांनी एकच सांगितलं की आपल्याकडे दुसर्‍याला नेस्त्नाबुत करायची ताकद असेल तरच आपण आहिंसा शांती अशा भाषा वापरायच्या तु प्रतिकार कर आणी जर शाळेत बोलावले तर मी येतो बसऽऽ.???
दुसयाच दिवशी त्यांच्यावर ती वेळ आली. त्यांनी शाळेत येउन मुख्याध्याप्कांना आधिची कहाणी सांगितली. जी काय शिक्षा व्हायची ती त्या मुलांना झाली. आणी ती पुन्हा कधीही माझ्या वाटेला गेली नाहीत.
आता शेवटी ईतकेच सांगतो माझे वडील इंडीयन आर्मीत होते. आज मी कुठेही बिंधास्त असतो तो त्यांच्या या शिकवणी मुळेच.


Akhi
Wednesday, October 24, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या विषयावरच माझं म्हणन थोड वेगळे आहे. आपण मुलांना उलट मारायचा पण सल्ला द्यायचा नाही. आणी अहिंसावादी पण बनायला सांगायचं नाही. त्या पेक्षा आपली ताकद त्याचा हाथ धरुन दखवायची. कि मी तुला मारु शकतो पण मि अस करनार नाही.

Zakki
Wednesday, October 24, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यावर विवेकानंदांची एक गोष्ट आठवली. ते जेंव्हा शिकागो ला बोटीने चालले होते, तेंव्हा त्यांच्या बोटीवर एक दोन इतर धर्माचे लोक त्यांची नि हिंदू धर्माची खूप गलिच्छ भाषेत चेष्टा करत. त्यांच्या बोलण्याकडे विवेकानंद लक्ष देत नसत नि त्यांना उत्तरेहि देत नसत.

एकदा, कदाचित् दारू पिऊन असेल, पण त्यांनी विवेकानंदांना जोरात धक्का दिला. त्याबरोबर त्यांनी त्या माणसाची गचांडी दरली, नि त्याला बोटीच्या कठड्यावरून समुद्राकडे धरले नि म्हणाले, 'आज मी तुला काही करणार नाही. पण पुन: असे कुणि केलेत तर मात्र मी तुम्हाला एका झटक्यात बोटीबाहेर फेकून देईन!'

पुन: त्यांना त्रास झाला नाही!Akhi
Thursday, October 25, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा छान गोष्ट एकदम आवडली.

Savyasachi
Thursday, October 25, 2007 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तो जमाना राहीला नाही. आज सोडून दिले तर उद्या ते २ ४ जण एकत्र येऊन आपल्याला बोटीबाहेर फ़ेकून देतील हे नक्की.

Savyasachi
Thursday, October 25, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला इथल्या शाळेचे माहीत नाही. पण माझा पुतण्या शाळेत २रीत वगैरे होता. तो अंगाने आडदांड होता पण एकदम भोळा. जवळपास रोज घरी यायचा आज याने ढकलले त्याने मारले करत. प्रथम बाई, मास्तरांना सांगून झाले. त्यांना वाटायचे मुलं मुलं मारामारी करतात त्यातलाच प्रकार. समज देऊन सोडून द्यायचे. परत ये रे माझ्या मागल्या.
एकदा मी त्याला म्हटले अरे तू रडतोस काय? तू पण दे एक लगाऊन जो पहिला येईल तुला मारायला त्याला. त्याचे डोळे चमकले एकदम. हे काहीतरी नवीन होते त्याच्यासाठी. (मला त्याचा तो भाव आठवून अजून हसायला येते) मग मी त्याला मुठ कशी वळायची आणि प्रभावी बुक्का कसा, कुठे मारायचा ते शिकवले. नंतर तो कधी तक्रार करताना दिसला नाही आणि मी देखील विसरलो. काही दिवसांनी त्याचे मित्र आले होते त्यांनी त्याला मजेत आलोकभाई अशी हाक मारली. मला फ़ार मजा वाटली :-)
माझ्या मते साम आधी वापरून पहावा पुर्णपणे. पण त्याने उपयोग नाही झाला तर दंड वापरावाच.
आलोकने स्वत: कधी मारामारी केली नाही नंतरही. असा मारामार्‍या करण्याचा स्वभावच असावा लागतो.
पण त्याला एक आत्मविश्वास मिळाला आणि शाळेपुरता का होईना, त्रास बंद झाला.

माझ्या लहानपणी देखील असे प्रसंग २ ३ वेळा झाले. एकदा त्या मुलाला डोक्यावर उचलून आपटलेला भिंतीवर. एकदा एकाला धूळीत तोंड दाबून धूळ अक्षरश्: चारली होती. परत कधी वाट्याला गेले नाहीत.
पण तरी मी काही स्वत्:हून मारामारी करत नाही. किंबहूना भितोच. पण कायम त्रास सहन करणे वेडेपणाचे आहे.


Chyayla
Tuesday, October 30, 2007 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शठे प्रतिशाठ्यम याचा अर्थ असा नव्हे की नेहमी मारामारी करायलाच पाहिजे, कधी कधी ईतर मार्गानेही धडा शिकवता येतो माझ्या बाबतित माझे ज्यांच्याशी भांडण व्हायचे त्यांच्याशी मैत्री पण व्हायची.

किंवा दुसर्या मार्गाने प्रश्न सुटत असेल तर जरुर सोडवावा एकंदरीत तुमचा आत्मसम्मान कायम असायला हवा. अगदी त्यासाठी वेळ पडली तर मारामारी ही करता यायला पाहिजे पण तो शेवटचा उपाय व परिस्थितीवर अवलंबुन निर्णय घ्यायची क्षमता असायला हवी. मला वाटत प्रसंगानुसार योग्य निर्णय घेण्याची शक्ति घेउन न्याय्य बाजुसाठी कोणत्याही मार्गाने शठे प्रतिशाठ्यम व्हायलाच हवे यात दुमत नाही.

यासाठी मी भगवान कृष्णाचे उदाहरण देइल, वेळ पडेल तिथे कुटनितीचाही वापर करावा, गितोपदेश देउन योग्य मार्गही दाखवावा व तशीच वेळ पडली तर सुदर्शन चक्र हाती घेउन शतृचा विनाशही करावा. मला वाटत अश्या पौराणिक, एतिहासिक कथांमार्फ़त आपण लहान मुलाना योग्य संस्कार देउ शकु.
उदाहरणच द्यायचे तर शिवाजी महाराज व त्यांच्यावर मा जिजाउ, दादा कोंडदेव यान्नी रामायण, महाभारतातल्या गोष्टी सांगुन केलेले योग्य संस्कार. आपल्या कडे तर किती मोठा खजिनाच आहे जणु.


Ashwini_k
Tuesday, October 30, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लहानपणी आमच्या वाडीच्या अंगणात खूप खेळायचे. आमची मोठी गॅंगच वाडीभर खेळत असायची. पण माझे कुणाशी भांडण किंवा मारामारी होत नसे (अजुनही कोणाचा राग, अबोला मला झेपत नाही). माझा भाऊ माझ्यापेक्षा ३ वर्षानी लहान. त्याला बाळदमा असल्याने त्याला आई खेळायला सोडत नसे. तो घरीच खेळे. एकदा आईने परवानगी दिल्याने तो अंगणात येऊन खेळू लागला व मी दुसर्‍या मजल्याच्या जिन्याच्या कठड्यावर टांग मारून त्याच्यावर लक्ष ठेऊ लागले. तेवढ्यात एका मारकुट्या मुलाने भावाला त्याच्या बारीकपणावरून चिडवून ढकलले. एरव्ही मारामारीशी वाकडे असलेल्या मला काय झाले माहीत नाही! मी दणादणा जिना उतरून अंगणात धाव घेतली व माझ्या भावाला फ़िदीफ़िदी हसणार्‍या मुलाचे केस धरले व भिंतीवर त्याचे डोके एकदाच आपटले. माझ्या हल्ल्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. त्याने भोकाड पसरले आणि आईSSS करत घरी गेला. इकडे माझे मलाच आश्चर्य वाटले कि आपण कोणाला मारलं!! पण झाले हे बरे झाले नाहीतर माझा भाऊ घाबरून कधीच खाली खेळायला आला नसता. आज माझा भाऊ चांगला धष्ट्पुष्ट असून चार्टर्ड व कॉस्ट अकाऊंटंट आहे व तो माझे रक्षण करू शकतो.

म्हणजेच शठं प्रतिशठ्यं हे नेहमीच शिकवावे लागते असे नाहि कधीकधी ते उत्स्फ़ूर्त्पणे येते.


Daad
Saturday, November 03, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय विचार करायला लावणारा विषय आहे. आम्ही लेकाला हेच शिकवल की
शाब्दिक मार कानाआड करण्याचा patience हवा. आपण चिडलो तर चिडवणारे जिंकतात. एका विशिष्ट मर्यादे पलिकडे मात्र शिक्षक वगैरेंकडे तक्रार करायलाच हवी.
मात्र शारिरिक harm करण्यापर्यंत गोष्ट आली तर मात्र त्या मुलाचे (मुलीचे) हात धरून ठेवण्याइतकी ताकद, हिंमत हवीच हवी.

तो बारा वर्षांचा असताना, वर्गातल्या एका मुलाने काही दिवस एक विचित्र घाणेरडं नाव ठेवून त्याला चिडवलं. (त्या कळत्या-नकळत्या वयात मुलं मजेशीर "ज्ञानाने" समृद्ध असतात) ते शिक्षकांना, किंवा आम्हाला घरातही सांगण्याचीही त्याला लाज वाटली असावी.

एक दिवस त्याने त्या मुलाला शाळा सुटल्यावर अडवून, त्याच्या आई देखत confront केलं. ते घाणेरडे शब्दं न उच्चारता नुसतच - "तू मला असलं घाणेरडं चिडवायचा थांबला नाहीस तर माझ्या आई-बाबांना उद्या शाळेत घेऊन येतो" एव्हढच सांगितलं. त्या मुलाला आपल्या आईसमोर काहीच करत आल नाही.
अर्थात तो मुलगा तिथेच थांबला. आईने कदाचित जातीने "विचारपूस" केली असावी.

हा प्रकार माझ्या लेकाने जवळ जवळ चार्-सहा महिन्यांनी अगदी casually "त्या" शब्दासकट सांगितला. मला वाटतं तोपर्यंत तो प्रकार त्यालाच "पचला" असावा.
(तो मुलगा आता त्याचा मित्र आहे.)


Daad
Saturday, November 03, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसाच एक मजेशीर प्रसंग्- भारतात जायचो दीरांकडे. त्यांच्या बिल्डिंगमध्ये खाली अंगणात सगळी पोर जाम खेळायची. एक जरा "दादा" होता. नुसताच त्रास द्यायचा येऊन. तो आला की बाकीची जरा दबून असायची. उगीच भांडण नको म्हणून मोठी माणसही थोड दुर्लक्ष करायची.
त्याने माझ्या पुतणीची सायकल हिसकावून घेतली. ही माझ्या लेकाची "एकुलती एक भईण". शिवाय त्याच सुट्टीत जरा भाऊबीज, राखी वगैरेचे अर्थ कळले होते.
मग काय, ह्याने जाऊन त्या दिढीच्या अंगलटीच्या दादाला आधी सायकलवरून खाली पाडला आणि नुसताच शर्ट धरला गळ्याकडे.
त्याला हे अगदीच अनपेक्षित असाव... "परत माझ्या भैणीला त्रास दिलास तर याद राख..." वगैरे डायलॉग मारून सायकल हिसकावून घेऊन वीर आले बहिणीकडे.
तिकडे "दादा"साहेब रडायला लागले होते. लागल्यापेक्षा, अपमानाने जास्तं. बाकीच्या पोरांना आता जोरच चढला होता. त्याची आई आल्यावर आजवरच्या सगळ्या कागाळ्या सांगितल्या.
त्यात आम्ही बिल्डिंग बाहेरचे त्यामुळे पाहुण्याकडून विंचू मारला गेल्याने सगळेच खूष होते.
त्याचे काका, काकू, आज्जी सगळेच कौतुक करत होते, बहिणाई तर हात सोडत नव्हती... त्यामुळे 'अरे असं एकदम हातघाईवर येऊ नये" वगैरे माझं बोलणं सांडलच कुठेतरीच...
मजेची गोष्ट म्हणजे त्या दादा सकट अख्खी गॅंग एकत्र डबा ऐसपैस खेळत होती दुसर्‍याच दिवशी.


Peshawa
Sunday, November 04, 2007 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते कुठला प्रसंग शठंप्रतीशाठ्यं वापरायला योग्य आहे हे मुलाना शिकवणे जास्त महत्वाचे आहे. ह्याचे कारण (देशत्तरी) शठंप्रतीशाठ्यं उपयोगी पडतेच असे नाही. ज्याना ग्यांग्सचा अनुभव आहे ते मी काय म्हणतोय हे समजू शकतील. एका विशीष्ठ वया नन्तर अरे ला कारे हे उत्तर हौ शकत नाही जत कारे चे परीणाम भोगायची तयारी नसेल तर.

मला वाटते शठंप्रतीशाठ्यं हे शिकवाव. पण त्याच्या मर्यादापण शिकवाव्यात...

Manuswini
Sunday, November 04, 2007 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी भाचीचा एक अनुभव खुप मला आजच्या मुलांबद्द्ल सांगून गेला.
माझी भाची खुप बोलकी आहे. नी कमालीची भोळसर. आणि friends म्हणजे जान का प्राण. बहीणीला तीचे वात्रट friends पसंद न्हवते, आणि जवळपास सगळे वात्रटच मग खेळयला दुसरे कोणी नसल्याने चारा न्हवता म्हणून एक दोनदा तीने बोलून दाखवले होते भाचीला नी त्यांना avoid करायला सांगीतले नी बहुधा हीच तीची(बहीणीची) चुक. कारण friend जीव का प्राण अणि त्यांने जर काही जरी त्रास दीला तर मग mom ला लगेच prove करता येईल म्हणून बर्‍याच गोष्टी ती सांगायची नाही जसे डब्बा खाल्ला, Water bottle मधले पाणी संपवले, तीचा color box वापरून लपवायचा. "(हे नी बरेच प्रकार नंतर उघडकीस आले).

एक्दा कहर म्हणजे swimming करताना तीला मागून जोरात पान्यात ढकलले, मी नेमकी तिथे तीला न्यायला आलेले. हा प्रकार पाहील्यावर आधी भाचीला बाहेर काढून चेक केले की बरी आहे ना मग त्या कारट्याला पकडून विचारले, why did you do this? I want you to call your mom here right now. तो पर्यन्त बर्‍याच बाकीच्या मुलांना गोळा करून witness म्हणून तयार केले, भाचीचा रडून गोंधळ की सोडून दे, i will not friends to play with if you do this etc . त्या मुलाच्या आईला Explain करून सांगीतले मग माफ़ी मागायला लावून सोडले. ह्या प्रकाराने बाकी मुलांना पण आळा बसेल हा हेतु.
मग भाचीला situation explain केली की हे का जरूरी आहे. I promised her Mom wont say anything to her. बहिणीला सांगीतले की कसे काय करायचे.
दुसर्‍या दिवशी सगळ्या मुलांने त्याच्यावर boycott केला. मग सोनुनेच त्याला खेळायला घ्या म्हटल्यावर हा एकदम dailogue मारत sonu I am thankful to you! वगैरे. bottomline एकदम भोळसट बनवून पण चालत नाहे मुलांना. ना हिंसक सुद्धा. explain the need to handle the situation .


Meghdhara
Friday, November 30, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशव्यांना अनुमोदन.

माझा मुलगा दहावीत आहे. इतक्यात काही दिवसांपुर्वी त्याला क्लासहुन घ्यायला गेले तेव्हाची घटना.
मी खाली कारमधे बसुन प्रथमेशची वाट पहात होते. हातात काहीतरी वाचायला होतं. सहज बाजुला लक्ष गेलं म्हंटलं ही कुठली मुलं क्लास जवळ दिसतायत? तेवढ्यात याचा एक मित्र क्लासमधुन दुसर्‍या मजल्यावरून खाली आला. आणि ही बाजुची मुलं एकदम पुढे गेली. आता काहीतरी होणार आहे असं वाटतय न वाटतोय तोच त्या पैकी एकाने या हिमांशूला तीन चार कानाखाली ठेवून दिल्या.. 'अरे ये क्या कर रहे हो' हे मी म्हणतेच तोपर्यंत 'नही आंटी आपको मालुम नही इसने क्या किया है' वैगरे बोलत अगदी अर्वाच्य शिव्या देत उरलेले दोन जणही पुढे झाले. त्यांना जरा टीचरच्या टोनमधे रागवून होतय तोच प्रथमेश आणि बाकीचे मित्र धडधड जीना उतरून खाली आले. आणि प्रथमेश सकट सगळे अगदी समोरच्या ग्रुपला अगदी मारायच्या आवेशात होते. हे सगळं इतकं वेगाने चाललं होतं. तिथुनच मी सरांना हाका मारायला लागले. आणि हिमंशू सकट सगळ्यांना अगदी जबरदस्तीनेच वरती पाठवलं. मग दोन मिनिटात सर आले. त्या मुलांच्या आई बाबांना नंतर सर भेटायला गेले.
पण इथे घरी आलो तर प्रथमेशचं सुरू झालं 'काय आई? तु त्यांना नुसती रागवलीस? दोन ठेवून द्यायच्या होत्या.. वैगरे..' मला हा अगदी धक्का होता. हिमंशू हा वर्गात दुसरा येणारा मुलगा. आणि एकुणच हा ग्रुप तसा सरळ. पण प्रथमेशचं हे नवीनच रुप मी पहात होते. आपल्या मित्राला कोणीतरी येऊन मारलं आणि आपण काहीच करु शकलो नाही याचा त्याला प्रचंड राग येत होता. 'म्हणजे कोणी मारलं तर आपण मार खाऊन गप्प बसायचं? आई आता हे असं चालत नाही.' असं काही काही मला बोलत राहिला.
मग मी अगदी विचारलं 'बरं तुम्ही उद्या त्यांना मारलं आणि परवा ती आणखीन गुंड पोरांना घेऊन आली म्हणजे? अरे असली प्रकरणं वाढवायची नसतात. संपवायची असतात. आणि जी मुलं शाळेबाहेर येऊन मारु शकतात, गाड्या घेऊन फिरतात त्यांच्या मारण्याच्या व्रुत्तीला गुंडगिरीच्या व्रुत्तीला तुम्ही किती पुरे पडणार? नी आपल्याला यात अडकायचं आहे का वैगरे
पण त्या दिवशी, पेशव्याने सांगितल्या प्रंआणे, हा किती सेंसिटेव आणि डेंजरस इशु आहे ते जाणवलं.

लहाणपणापासुनच आक्रमक व्रुत्तीला खतपाणी दिलं तर यांच्या रागाल(बर्‍याचदा आवास्तव) पुढे समजावणं नी सांभाळणं कठीण होऊन जाईल.

इथल्या माझ्या एक मराठी मैत्रीणीने मुलाला (मुलगा दुसरीत) सांगुन ठेवलय 'कुणी मारलं ना की काही नाही जमलं तर निदान चावून यायच..?? :-( बाप रे!

मेघा


Ameyadeshpande
Friday, November 30, 2007 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लंपन आणि जंब्या कटकोळची गोष्ट आठवली इथले किस्से वाचून :-)

Itgirl
Saturday, December 01, 2007 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..निदान चावून यायच..?? ...

निदान???? कठीणच आहे!! :-(


Manalim
Thursday, January 24, 2008 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Other part of the story is not direct/physical bullying but some kids are very much dominating and try to control other kids.

Maze observation ase ahe ki ji mule swabhavane garib astat tyana dominating mulanche khup attraction aste. so dominating mulani direct bully nahi kele tari they try to control this bholi-bhabdi mule. so asha situations madhe kay karave? karan kadhi kadhi mulana dominating mulanchech sagle khare vatte and they blindly follow them.

Varsha11
Thursday, March 06, 2008 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मुलगी दहा वर्षांची आहे. मी जेव्हा तिच्या शाळेत जाते तेव्हा तिची टिचर तीला Good girl, helpful child म्हणते. कायम सगळ्यांना मदत करायला तयार. गेल्या महिन्यात गेले शाळेत तर माझ्याकडे भरपुर complaints केल्या टिचरने १) ही सगळ्यांशी खुप भांडते. २) Dominating आहे. ३) work incomplete असते.

मला कळेना असे कसे झाले. माझे नोकरीमुळे दुर्लक्ष होते आहे का? मग मुलीला विचारले तेव्हा कळले की तिचे एकाच मुलीशी भांडण होते आणि काही झाले की ती लगेच टिचरकडे complaint करते आणि टिचर हिलाच ओरडतात. मग सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी कळल्या मग मी लेकीला सांगितले की भांडायचे नाही, ती मुलगी वर्गात हिच्या पुढच्या बाकावर बसते आणि board वरचे दिसत नाही म्हणुन उभी राहते मग मागच्यांना दिसत नाही मग आमच्या बाइसाहेब लगेच भांडायला तयार सगळ्यांच्यावतीने. मी तिला सांगितले की तु त्या मुलीला सरळ दोन तिन वेळा सांग की खाली बस नाही ऐकले तर तिला विचार तु खाली बसतेस कि मी टिचरला सांगु. आता बहुदा problem मिटला असावा.

कालच माझी लेक सांगत होती की "आता टिचरने जागा बदलल्यामुळे मी त्या मुलिच्या पुढे बसते आणि मी पण तिच्यापुढे मुद्दाम उभी राहिले दिसत नाहि म्हणुन मग ती लागलि ओरडायला मग मी तिला जोरतच सांगितले की आता कळले का मी का सांगत होते खाली बसायला ते, टिचरपण बघतच बसली काही बोलली नाहि."

work incomplete बदल बघितले तर एकच वही अपुर्ण होती आणि म्हणे सगळ्या वह्या अपुर्ण. आता तर टिचर कोणचे काही भांदण झाले की माझ्या लेकिलाच ओरडतात. मला माहित आहे की माझी लेक काही अगदी साळसुद नाहि आहे, तरीपण मला कळतच नाहि की आता मी तिला कसे समजावु,


Zakki
Thursday, March 06, 2008 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग तुम्ही मुख्याध्यापकाकडे जाऊन तक्रार का करत नाही?

Bee
Friday, March 07, 2008 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आता टिचरने जागा बदलल्यामुळे मी त्या मुलिच्या पुढे बसते आणि मी पण तिच्यापुढे मुद्दाम उभी राहिले दिसत नाहि म्हणुन मग ती लागलि ओरडायला मग मी तिला जोरतच सांगितले की आता कळले का मी का सांगत होते खाली बसायला ते, टिचरपण बघतच बसली काही बोलली नाहि." >>>

वर्षा, तुझी मुलगी हुशार दिसते :-)

तू खरच मुख्यध्यापकांशी जाऊन भेट. तक्रार नको करूस, पण त्यांचा सल्ला घे.Varsha11
Friday, March 07, 2008 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद झक्की आणि बी.
मी बोलेन मुख्याधापकांशी. मी तिच्या टिचरशी बोलले त्या म्हणाल्या आता ती भांडत नाही. पण आता वेगळाच problem आहे. आता माझी लेकिने असा समज करुन घेतला आहे की तिच्या सगळ्या freinds ना ती आवडत नाही. आणि आता म्हणते की मी सगळ्यात मागेच राहते कोणाला माझ्यामुळे problem नको. अशाने तिचा आत्मविश्वास कमी होईल असे वाटते.


Bee
Friday, March 07, 2008 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे.. इतका विचार करते ती! वर्षा खरच, तू तिची ही विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न कर. आत्मविश्वास नाही होईल कमी पण आपण कुणाला आवडत नाहीहोत ही भावना खूपच दुःखदायक असते.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोतीTopics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators