Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 23, 2005

Hitguj » Looking for » माहितीची देवघेव » Archive through December 23, 2005 « Previous Next »

Dakshina
Monday, November 28, 2005 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Photography च्या Tips साठी इथे वेगळा BB आहे का? मी बराच शोधला पण मला मिळाला नाही.



Nalini
Monday, November 28, 2005 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,
/hitguj/messages/35/4342.html?1132639251 इथे बघ.

Dhumketu
Monday, November 28, 2005 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला यू.एस. वरून काही जड सामान भारतात पाठवायचे आहे. मी असे ऐकले आहे की शिप केले तर खूप स्वस्त पडते. कोणाला अशा सर्विस बद्दल माहीती आहे का?
अंदाजे कीती रेट पडतो ही माहीतीही मिळाली तर उत्तमच.


Dakshina
Tuesday, November 29, 2005 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी,
तुझे खूप खूप आभार.


Prajaktad
Tuesday, November 29, 2005 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

front facing car-seat कुठलि घ्यावि?ढिगभर साईट बघितल्यात, babyrus वैगरे बघुन झालेय.सगल्याच चांगल्या वाटतात आणी confusion होतेय कुणि सध्या use करतय आणी चांगला अनुभव असेल तर brand सुचवा.. carseat किति वयापर्यंत वापरावि लागते?

Madhura
Tuesday, November 29, 2005 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Carseat simple ani sutsutit asavi. Khup bharabhar features (e.g. kaahii seats na pudhe yeil asa ek table sarkha pasarat bhag kinva danda asto.)Ase shakyto nakoch. Sutsuti asli ki mag mule pan chan bastat.
Shakyato evenflo kinva tsahach ekhdyaa namankit companychi ghyavi.
Car seat bahutek 5 years paryant vaaparaavi lagate. cbdg.

Ek_mulagi
Wednesday, November 30, 2005 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक state मध्ये नियम वेगवेगळे आहेत. पण आपल्या सुरक्षेसाठी carseat साधारण ८ वर्षापर्यन्त वापरावी. साधारण ४ पर्यन्त front facing नंतर booster seat पुढचे ४ वर्ष.

Bsa
Wednesday, November 30, 2005 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ह्या वेबसाइट बद्दल थोडी माहिती हवी आहे,

http://usatoindia.t--global.com

कोणी ही वेबसाइट use केली असेल तर त्याबद्दलचे बरे/वाइट अनुभव share करा.
आभारी आहे.




Ajay
Wednesday, November 30, 2005 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ती वेबसाईट वापरलेली नाही पण तिथे लिहिलेला हा मजकूर पहा Using the latest technology you too can make unlimited phone calls, 24/7 to and from India. No more having your friends and relatives pay crushing monthly bills just to keep in touch. Best of all, you will be talking on a regular telephone, not using phone cards or complicated computer hookups. All you need is a DSL connection in India and the digital phone adapter which you'll be sent for free and you're ready to go.
भारतात जिथे फोन करायचा तिथे DSL हवे असे दिसते.


Shonoo
Thursday, December 01, 2005 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जानेवारीच्या ६ आणि ७ तारखेसाठी फ़ोर्ट आग्वाड मधे रूम ( GOA) हवी आहे. कोणाची ओळख वगैरे आहे का? वेबवरून किंवा मुम्बैच्या ट्रव्हल एजन्सी कडून काही मिळत नाहिये

या २-३ दिवसांकरता गोवन्/पोर्तुगीज पद्धतीची रेस्टाॅरन्ट्स कोणी सुचवील का? पंच तारांकित जागी फक्त रहायचा विचार आहे. जेवण खाणासाठी पर्यटकांसाठी नसलेल्या जागीच जायची इच्छा आहे.



Mumbhai
Saturday, December 03, 2005 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी / हिंदी गाणी download करण्यासाठी कोणती Legal आणि safe/reliable site माहिती आहे का?
paid sites are also okay


Sami
Saturday, December 03, 2005 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

desiest.com
paid साईट आहे. पण चांगलं collection आहे आणि speed पण चांगला आहे.

Ramachandrac
Monday, December 05, 2005 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोथरुडमध्ये स्पेषल ट्युशन ईग्लिश मीडियम ५वि साठी घेणारे कोणी माहिती आहेत का? सर्व विशयासाठी, तसेच कोणी जिम आणी स्पोर्ट ट्रेनर आहे का?

Amitpen
Monday, December 05, 2005 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम, जिम आणि स्पोर्टस ट्रेनर चैतन्य मध्ये मिळेल की.....किंवा अजुन पण जिम्स आहेत....

Priya
Tuesday, December 06, 2005 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rhapsody.com किंवा iTunes मध्येही हिंदी गाणी विकत घेता येतात. Rhapsody चा संग्रह चांगला वाटला. शेकडो गाणी आहेत, आणि जुनीही गाणी भरपूर आहेत. iTunes मध्ये हिंदीच काय - मराठी गाणीही आहेत.

Rhapsody ची माझ्या माहितीप्रमाणे महिन्याची membership २० डॉलर आहेत. यात तुम्ही महिनाभर कोणतेही गाणे कितीहीवेळा ऐकू शकता. एक गाणे विकत घ्यायला साधारण ७९ सेंटस पडतात. iTunes मध्ये ९९ सेंटस पडतात, membership बहुधा नाही.


Milindaa
Tuesday, December 06, 2005 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

www.indianscreen.com वरुन गाणी डाउनलोड करता येतात, पूर्णपणे लीगल आहे.

Pinku
Wednesday, December 07, 2005 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगा १३ महिने नुकताच चालायला शिकला आहे. मला त्याच्यासाठी shoes विकत हवे आहेत. इथे US मध्ये कुठे चागले मिळतील? (फार महाग नको आहेत.. कारण त्याला मोजे सुद्धा आवडत नाहित, सारखे काढुन टाकतो :-() }

Jo_s
Saturday, December 10, 2005 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या इथे जे युनीकोड लिहीत आहोत तस वर्ड मधे लिहीता येत का? माझ्याकडे असे २,३ फ़ॉट आहेत. पण ते सिलेक्ट केले तरी इंग्लीश अक्षरच उमटतात.

Deepanjali
Saturday, December 10, 2005 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्या मधे कुठे 'Nail Salons/Nail Bar' असतील तर details द्याल का please कोणी, खूप शोधली पण सापडली नाहीत :-( .

Seema_
Saturday, December 10, 2005 - 9:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dj अस खास इथे असत तस nail salon माहित नाही मला पण deccan वरच sheela's आणि कोरेगाव पार्कातल VLCC ( वंदना अस काहीतरी नाव आहे owner च ) मध्ये करुन देतात nail art


Deepanjali
Sunday, December 11, 2005 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा,
Sheela's आणि वंदना लुथ्रा कडे Nail art करतात पण acrylic set (nail extention ) नाही करत ग:-(
Anyways, मुंबई मधे आहेत Nail Bars , तिथे चक्कर मारायला वेळ झाली तर ती एक option आहेच!.


Vinayak
Monday, December 12, 2005 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

marazI dvds imaLNaarI website maahIt Aaho ka kÜNaalaaÆ

Prajaktad
Thursday, December 15, 2005 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिंकु! WALMART मधे मिळतिल स्वस्त shoes .खरतर लहान मुलांना फ़ार महाग shoes घेवु पण नये.
कारण मुल पट्पट वाढतात. फ़ारतर, २ महिन्यात नविन कपडे, shoes घ्यायचि वेळ येते.


Maitri
Saturday, December 17, 2005 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kuni punyat 2 divas rahanyasathi ekhad changala hotel sangu shakel ka?
punyachi mala vishesh mahiti nahi. 2 kinva 3 divsasathi rahta yeil ani shivay jevan sudhha available asav.

Priya
Monday, December 19, 2005 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्री, श्रेयस चांगले आहे पुण्यात राहण्यासाठी असे म्हणतात - मी कधी राहिलेली नाही, घर पुण्यात असल्यामुळे. श्रेयसमध्ये आपले महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण मिळते आणि छान असते.

Dakshina
Tuesday, December 20, 2005 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निसर्गोपचारांबद्दल कोणाला काही माहिती आहे का? परवा मी पेपर मध्ये जाहीरात पाहीली,
त्यात त्यांनी निसर्गोपचारांनी १० दिवसात ४ किलो वजन कमी होते असे लिहीले होते...
कोणी सांगू शकेल का? यात कितपत तथ्य आहे?


Dakshina
Tuesday, December 20, 2005 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्री,
तुला जेवण कशा पद्धतीचं हवं? दिवसाचं साधारण बजेट काय आहे?

श्रेयस खरंच चांगलं आहे, तिथले रेटस पण Reasonable आहेत,
महाराष्ट्रियन जेवण आहे, शिवाय शहराच्या मध्यवर्ती असल्याने सगळं जवळ आहे तिथून.


Iravati
Tuesday, December 20, 2005 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही महिन्यापूर्वी आपल्या एका मायबोलीकराने लता मंगेशकर यानी संगीतबद्ध केलेली गाणी ज्या काही पाश्चात्य गाण्यावरुन घेतली आहेत त्या गाण्याच्या वेबसाईटचा address दिला होता. कुणाकडे आहे का तो?

Divya
Tuesday, December 20, 2005 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा माझा निसर्गोपचाराचा आभ्यास झाला आहे, मी थोडे दिवस निसर्गोपचार केन्द्रांमधे काम पण केले आहे. वजन कमी किती होइल हे आधीच सांगणे अवघड आहे. पण होइल नक्की. १२० किलो च्या आसपास असणार्याच ज्या प्रमाणात कमी होइल त्याच प्रमाणात ७०-८० किलो असणार्याच होइलच अस नाही. यात सलग लंघन दिले जाते, लंघन संपल्यावर हळुहळु ज्युसेस नी सुरवात करुन पुर्ण जेवणावर आणले जाते. हे निसर्गोपचार केन्द्रातच राहुन करावे लागते साधारण १५- २० दिवस तरी राहिलेच पाहिजे. १० दिवसात ४ किलो वजन कमी होउ शकेल पण तिथे राहायचा कालावधी मात्र १० दिवसा पेक्षा जास्त नक्कि. आणि अगदी १००% वजन कमी होते.

Bkashish
Wednesday, December 21, 2005 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या,
१००% वजन कमी झाल्यावर दक्षिणा साध्या डोळ्यानी दिसणारच नाही.

कृपया हल्के घे.


Moodi
Wednesday, December 21, 2005 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा एक विचारते अन सांगते रागवु नकोस पण जर निसर्गोपचाराच्याच मार्गाने जायचे आहे वजन कमी करायला तर चालण्यासारखा सोपा अन नैसर्गीक मार्गोपचार दुसरा नाही.
माझ्या शेजारच्या दोघीजणींचे वजन चालण्यामुळे २० ते २५ टक्क्याने कमी झाले. माझ्या वडिलांचे सुद्धा चालुनच वजन कमी झाले. साधा योग्य आहार, भरपुर पाणी पिणे अन चालणे हाच योग्य सोपा उपचार. पित्त प्रकृतीवाल्याना लंघन सोसेल का?
विनोबा भावेंसारखे चाला असे नाही सांगत पण चाला.
अर्थात भारतात याचा फायदा जास्त.


Dakshina
Thursday, December 22, 2005 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी,
तु म्हणतेस ते खरं आहे.


Manmouji
Thursday, December 22, 2005 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी समजाउन घेण्यासाठी विचारतो आहे की, पाणी पिण्याचा आणि वजन कमी होण्याचा काय संबंध आहे?

Moodi
Thursday, December 22, 2005 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनमौजी जेवणादरम्यान जर थोडे थोडे पाणी प्यायले की पोट भरल्याने २ घास कमी खाल्ले जातात. त्यामुळे आपोआप नियंत्रण होते. अन आहार दिवसातुन ३ वेळा विभागुनच खावा.
दुसरे असे की सध्या हिवाळ्यात आपले शरीर थंडीने कोरडे होते, त्यामुळे आपण ती उर्जा अन शरीराला आतुन तेलाचे वंगण यासाठी तीळ, बाजरी, सुकामेवा, डिंक, मेथ्या अन असे अनेक उर्जायुक्त पदार्थ खातो, त्यामुळे शरीर ती उर्जा अन ते वंगण पुढील काळासाठी साठवुन ठेवत. पण हाच निसर्गाचा समतोल जर आपण लंघन वगैरे करुन बिघडवला की शरीरावर त्याचा उलट परिणाम होतो.
म्हणुन निसर्गोपचार घ्यायचेच असतील तर ते साधारण फेब्रुवारी अन मार्चच्या दरयान घ्यावेत, कारण त्या वेळी आपल्याला उन्हाळा सुरु झाल्याने भुक जास्त लागत नाही, तहान जास्त लागते अन याच वेळी मग आपण पाणी, ज्युस, नारळ पाणी, ताक अन कुठलाही हलका आहार यावर राहुन शकतो मग वजन नियंत्रणात येऊ शकते.
अरे देवा खुप बोलले... दक्षिणा अन मनमौजी आता तुम्ही सांगा हे बरोबर का चुक.
अन प्रत्येकाने अपली प्रकृती तपासुन मग लंघन करावे. पित्त वाल्याना भुक सहन होत नाही पण कफ प्रवृत्तीवाले थांबु शकतात. हे तपासुन मग उरळी कांचन या चांगल्या ठिकाणी जायला हरकत नाही.


Gajanandesai
Friday, December 23, 2005 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाळेत पहिली ते सातवीतल्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून देता येतील अशा पुस्तकांची(मराठी) नावे हवी आहेत. या वयोगटासाठी तुम्ही कोणत्या पुस्तकांची नावे सुचवाल? Ìप्या इलह.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators