Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
घरकर्ज (homeloan)

Hitguj » Looking for » General » घरकर्ज (homeloan) « Previous Next »

Dhumketu
Wednesday, September 05, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी घरासाठी कर्ज घेण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मी काही बॅंकांकडे चौकशी केली.
बॅंक ऑफ़ ईंडीया चा रेट कमी आहे.. पण त्या बॅंकेचा अनुभव असलेला मला कोणीही भेटला नाही. तुमच्या पैकी वा तुमच्या मित्र-मैत्रीणीपैकी कोणी बॅंक ऑफ़ ईंडीया कडुन घरकर्ज घेतले आहे का? त्या बॅंकेचे अनुभवही नेटवर मिळाले नाहीत.

बॅंक ऑफ़ ईंडीया आणी बाकिच्या बॅंकेमध्ये PLR वेगळा असल्यामुळे त्यांचे रेटस वेगळे आहेत. उदाहरणार्थ HDFC :१४% आणी BOI :१३.२५% . हा PLR कसा ठरवतात? HDFC आणी BOI मधला हा ०.७५% चा फ़रक भविष्यात नेहमीच सारखा राहिल का?


Ashbaby
Tuesday, October 23, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही घरकर्ज घ्यायचे आहे. सध्या राहात असलेल्या घराचे कर्ज एचडिएफ़सी कडून घेतले होते, पण आता दुस-या घरासाठी दुसरीकडून घ्यायचा विचार आहे. स्टेट ब्यांकेचा सध्या फ़ेस्टिवल रेट १०.२५% दहा वर्षासाठी असे वाचले.
कुठची ब्यांक बरी असे आपल्याला वाटते?आणि फ़िक्स रेट घ्यावा की फ़्लोअटिंग?
साधना.


Prashantkhapane
Thursday, October 25, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Desai,
the problem with BOI/SBI is they are generally slow to work with. The same is true of ICICI/HDFC but builders have good contacts with the agents/people working in these banks.

PLR mhanje Floating RI ka? It never remains the same. I took loan at 9.25% and now paying around 12%. If you get a good offer with fixed then you should go for it.

Dhumketu
Thursday, October 25, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I applied in HDFC. Builder did not approve the project from HDFC and so I have to take that process as well. What I saw is, both nationalized & private banks take same time to approve projects.
These builders have approval from HDFC & ICICI and so that time is saved as compared to nationalized banks. And for the same reason, we see them as slower.
Now Nationalized banks are also giving approval to projects, so that they can speed up the process. If the project is approved already, bank just need to check buyer's eligibility.

PLR shall change.. But my question was whether the difference between PLRs of 2 banks remain constant or not. I got the answer. It does not. Everybody has different PLR based on their position in market.

Pillu
Tuesday, October 30, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला माझे घर मॉरगेज करुन कर्ज हवे आहे पन प्रॉब्लेम असा आहे कि माझी जागा एन ए नाही आणी गुंठेवारी पण नाहीये. माझ्या घराची बाजार भावाने किंमत २५,००,०००/- आहे आणी मला फक्त १०,००,०००/- हवेत कुनी मद्त करेल का?

Zakasrao
Tuesday, October 30, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिल्लु जर NA नसेल तर एकही बॅन्क कर्ज देत नाही.
माझा अनुभव आहे हा. २ महिने ट्राय केला होता.
मग शेवटी पर्सनल लोन काढले. :-(
पण माझी गरज कमी होती त्यामुळे चालुन गेले. तुम्हाला जर तुमच्या पगारावर एखादी बॅंक पर्सनल लोन देते का बघा.
पण १००००० मिळण जरा जास्तच कठिण आहे.
त्याला पगार पण तेवढा हवा. आणि पर्सनल लोनच १५% च्या आसपास व्याज भरण्याची तयारी हवी


Pillu
Tuesday, October 30, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद झकस राव तुमच्या सल्याबद्दल

काय झाले की मला एका नामवंत बेन्केने फसवले मी प्रकरण दाखल केले एजेन्टा मार्फत ते मंजुर ही झाले, पण बेन्केच्या सल्या प्रमाणे मला काही बांधकाम करणे आवश्यक होते मला ४ टप्प्यात पैसे मिळ्णार होते, त्यांचे अधिकारी वर्ग जागा पाहुन ओ के म्हणुन शेरा मारुन गेले आणि त्यांनी सागितल्या प्रमाणे मी माझे रहाते घर पाडुन बांधावयास सुर्वात केली. माझे जवळ जवळ काम संपत आलेले आणि तरीही बेन्क पैसे देन्याचे नाव काढेना. मी अक्षरश्: व्याजाने पैसे घेतले आणी बांधकाम चालु ठेवले नंतर त्या बेन्के कडुन पत्र आले की आमची चुक झाली आहे आम्ही तुम्हाला कर्ज देवु शकत नाही.


मी आता कर्जाखाली पुर्ण बुडालो आहे. लोकांचे मागणे सुरु आहे आणी मी तोंड तरी कीती दिवस चुकवणार आहे. मी पोलीसामधेही गेलो पण ऊपयोग झाला नाही.


Zakasrao
Tuesday, October 30, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म, पिल्लु तुम्ही फ़ारच कठिण परिस्थितित आहात म्हणजे. पण तुमचे आताचे रहाते घर बांधताना तुम्ही परवानगी घेतली नसणार हे उघडच आहे. असो तो एक वेगळाच विषय आहे.
अशावेळी एखादी सहकारी बॅंक किंवा पतसंस्था पैसे पुरवते का बघणे घराच्या तारणावर हा एक उपाय आहे. पण तुम्हाला खुपच मोठी रक्कम हवी आहे. तरिही प्रयत्न करुन बघाच. सहकारी बंकेत जर काम नाही झाले तर एखाद्या पतसंस्थेत नक्कि होइल पण पारत एकदा तेच जास्त व्याज दर भरण्याची तयारी हवी.
आणि जर फ़ार हफ़्ते (फ़ार हप्ते ही कंसेप्ट प्रत्येक पतसंस्थीत बदलत जात असेल कदाचित) चुकले तर अशा पतसंस्था ह्या राजकिय नेत्यांच्या हातात असल्याने ते दमदाटी करुन तुमचे घर विकुन टाकतील. तेव्हा हा व्यवहार संभाळुन करा.


Ashwini_k
Wednesday, October 31, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पिल्लू, एक देणे फ़ेडायला दुसरे अव्वाच्यासव्वा व्याजाने कर्ज काढायला गेले तर हे चक्र संपत नाही. त्यापेक्षा घरातल्यांना विश्वासात घेऊन सोनेनाणे विकून (भाव हि वाढलेला आहे) जितक्यांचे देणे देता येईल त्यांचे priority पाहून देऊन टाकणेच योग्य असे मला वाटते. सोनेनाणे काय नंतरही सवडीने घेता येते. पण जिवाचा घोर तर जाईल!

एकीकडे प्लॉट आणि घराच्या कायदेशीर बाबी at the earliest पूर्ण करायचे बघावे.

हे फ़क्त माझे मत आहे. राग नसावा.


Pillu
Wednesday, October 31, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्विनी राग नक्की नाही आला तुम्ही सर्व मला किमान शाब्दिक आधार तरी देत आहात त्या मुळे खरच बरे वाटतेय. असो माझ्या घरात मीच मोठा आहे आणी घरात पत्नी व दोन लहान मुले आहेत. त्यांना ही परीस्थीती माहित आहे. दुसरा पर्याय ही करुन झाला आहे.

Savyasachi
Wednesday, October 31, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास म्हणतो त्याप्रमाणे पतसंस्थेमधे काम होऊ शकते. कुठलीही बँक ते कर्ज देईल असे वाटत नाही. (त्या पहिल्या बँकेने ४ पैकी काहीच हप्ते दिले नाही का ? मग तुम्ही कशाच्या जोरावर काम चालू ठेवले ? असो.)
घर मोठे असेल तर काही भाग भाड्याने देता येतो का बघता येईल.


Ashwini_k
Thursday, November 01, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो पिल्लू, सव्यसाची म्हणतो ती देखिल छान idea आहे. थोडा भाग भाड्याने देऊन त्या भाड्याचा हप्ता लाऊ शकता. तसेच ठराविक period चे Leave and Licence चे agreement केले तर डिपॉझिट मिळेल ते देखिल तात्पुरते वापरा व जमेल तसे लवकरात लवकर परत जमवून ठेवा. सर्व सरळ मार्गाचे प्रयत्न चालू ठेऊन "घोरकष्टोध्दरण स्तोत्र" जमेल तितके वेळा म्हणत रहा (तुम्ही स्वामीभक्त आहात म्हणून सांगत आहे).

Pillu
Thursday, November 01, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, सव्यासाची खरे म्हणजे मी सर्व प्रयत्न करुन थकलो आहे, आणि भाड्याने जागा द्यायची याच हेतुने मी बांधकाम केले आहे ( सुरवातीला घर पत्र्याचे होते आता स्ल्याब टाकला आहे.) पण बेन्केने फसवल्या मुळेच मला काम पुर्ण करता आले नाही जे काम झाले आहे त्यात भाड्याने देण्या सारखे काहीच नाही. माझी ही परीक्षा आहे. आणी अश्विनी तु सांगण्या आधिच मी स्तोत्र पठण चालु केले आहे. ( या बद्दलच्या काही गोष्टी ईथे देता येत नाहीत नाही तर अनिस वाले लगेच पिच्छा पुरवतील ) =:-) मी पत संस्थेच्या शोधात आहे. तेही त्यांच्या मर्यादे पलीकडे जाऊन कर्ज देउ शकत नाहीत.

Aaftaab
Thursday, November 01, 2007 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिल्लु (धनंजय)
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कसल्याही परिस्थितीत हार न मानणे आणि जास्त tension न घेणे. तुम्ही म्हणता तशी ही एक परीक्षाच आहे..
१. जर मूळच्या बांधकामापेक्षा वेगळे, कमी पैसे लागतील असे बांधकाम लवकर करून पूर्ण होणार असेल तर तसे पहावे.
२. काही गोष्टी विकून थोडेसे कर्ज तरी कमी करावे. हे खूप जरूरी आहे. त्यातल्या त्यात जास्त मागे लागलेल्याला त्याचे पैसे परत करावे.
३. स्वत: दुसरे छोटे घर भाड्याने घ्यावे आणि हे नवीन घर चांगल्या प्रकारे भाड्याने द्यावे. त्याच्या deposit चा सुद्धा उपयोग होईल.
४. काहीतरी कायदेशीर जोडकाम करून पैसा मिळवता येईल असे पहावे. डबे देणे, खाणावळ, शिकवण्या वगैरे...
तुम्हाला शुभेच्छा...


Kedarjoshi
Thursday, November 01, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिल्लू हे ही दिवस जातील. पण तु जमीन NA करु शक्त नाहीस का. सावकारी व्याजात पडु नकोस. माझ्या जवळच्या मित्राला उद्वस्त होताना पाहीलय.

Savyasachi
Thursday, November 01, 2007 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exactly, can you not make it NA? whatever the means may be.

Gondhali
Friday, November 02, 2007 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिल्लु,

तुम्हाला ज्या बंकेने कर्ज मंजूर करुन फसवले, त्यांचे details पुण्याच्या 'सकाळ' मध्ये प्रसिद्ध करा. काहि तरी फायदा होईल


Pillu
Tuesday, November 06, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांचे मन्:पुर्वक आभार खरेच सर्वांचे खुपच चांगले विचार आहेत जी आपण मदत करित आहात याने किमान माझ्या मनावरील ताण कमी झाला आणि आपण एकटे नाही आहोत ही देखील जाणिव झाली. मी आता अश्या एक माणसच्या शोधात आहे की पहीला मजला त्याला काही अटीवर देउन तो बांधकामही करील आणी माझा भारही हलका करील माझ्या ईथे क्लासेस खुप जोरात चालतात जागा मिळत नाही आणी भाडे तत्वावर( कॉट बेसीस वर ) खोल्याही खुप जातात खरा तर माझा हाच ईरादा होता असो सर्वांचे पुन्हा एकदा आभार फक्त एक विनंती आहे की जर कोणी अशी व्यक्ती असेल तर क्रुपया माझ्याशी संपर्क साधा.

Pillu
Tuesday, November 13, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाणीपुरी मला तुमची मेल आली आहे आणी मी त्याला उत्तरही दिले आहे क्रुपया माझ्याशी संपर्क साधा खुप आतुरतेने वाट पहात आहे.

Maanus
Tuesday, November 13, 2007 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म्म interesting stuff

http://en.wikipedia.org/wiki/Indian_property_bubble (what are people thoughts on this?)


http://en.wikipedia.org/wiki/2007_Subprime_mortgage_financial_crisis (well people in US have already started to see effects of this... many layoffs going around)

http://en.wikipedia.org/wiki/Subprime_crisis_impact_timeline


any idea how this thing works? http://www.reuters.com/article/bondsNews/idUSN0141922220071101

Kedarjoshi
Wednesday, November 14, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Indian property bubble - (link) tells the half truth. It is agreed that the properties are growing at 100% every year but that does not mean it will be a bubble and once the bubble bursts everything will come down to earth and you will start getting Row house for 10 lakhas again that expectation is simply untrue, not valid.

The author blames it on the NDA govts interest rate cut. But he ignores the fact that because of that rate cut millions of Indians was able to get their own dream home. Nobody was affording 15 to 16% of interest. It was like “savakari pash”. Where you will have to repay the damn interest for the first half of your lifetime and the next half start repaying the principal.

NDA govt and the following congress Govt gave the opportunity to common Indian to start thinking of the progress, buying a new home, taking a vacation for that matter. It all started from 2001 and from 2004 people realized that they can afford good homes. The rate during 2004 was 7% for flexible interest. The rate now is 12%, so we should see the reverse effect per that authors view but no, the market is still booming.

We should not take only the rate into consideration but we have to take the opening of economy. That started the job market of India. Money started flowing and the interest rates just ignited it after 2004. ( but remember in 2007 we are paying 12% and still people are buying houses, the market is down).

The sub prime rate situation of advanced nations will not come to India because we still need various “Proofs” for getting loan, we are still not that economy where you get few hundred thousands over the phone and probably we will never be those nations, so the sub prime rate situation will not occur in India.

The author has given another example of Taj, Lila etc. I remember paying 7000 Rs for a suite in Taj at Mumbai in year 2002 and I also remember I paid 4000 Rs in Orchid in 2000 just for a night, so comparatively the rates of those days are not big enough for the % of income I earned in 2000 and rates of today (equal to 300 to 400 $) are not high in % of income I am earning in 2007. We have to take into consideration the % and not the absolute values of it. (Also for that matter, we cannot compare Taj / Lillas rate for housing market)

If you go to smaller cities the rates are NOT changed drastically because the income earned there will not justify the higher price so no increase there. Not ALL INDIA is affected by the housing problem. (So sub prime will not affect to India as of now).

So what is fueling the prices of home? As I said earlier it’s the money we are getting from overseas, the call center boy gets 20000 salaries, and he is bound to get a flat of 2000000. Our fathers got salary of 10000 and they still managed the house of 300000 so this is the same case. If you apply the cost of living index (1981 = 0) then you will not be surprised that much. It just the old theories of demand supply being applied in few markets and that’s it.

- Do I justify the rates, No. But we have to look the bigger picture. People want money and they don’t want to spend that much was the OLD mantra. Today in bigger cities we are spending tomorrow’s income for today’s pleasure.

Per my opinion rates in Pune and Bangalore or for that matter only in few big cities will not come down drastically, it will settle down before taking a leap. So do not expect the housing market to come down right away or in coming 2 years.


( My apologies for english)

Maanus
Thursday, November 15, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगली माहीती पुरवल्याबद्दल मंडळ आभारी आहे :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators