Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Returning to India.....

Hitguj » Looking for » General » Returning to India..... « Previous Next »

Ek_mulagi
Tuesday, December 19, 2006 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहा महिन्यांनी भारतात दोन मुलांसोबत्- वय ३ आणि ९- परत जातोय( for good )., जून-आॅगस्ट २००७.

USA मधून काय्-काय घेवून जायला पाहिजे?
कुठल्या गोष्टी भारतात मिळतात?
कुणाचे काय अनुभव आहेत?

Please मदत करा.


Kalandar77
Tuesday, December 19, 2006 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

EM, Google आणि MSN वर R2I चे groups आहेत, ते पाहीले का? त्याच्यावर बरीच माहीती मिळेल.

Kedarjoshi
Tuesday, December 19, 2006 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

EM अभीनंदन.
खरच सांगतो काहीही घेऊन जायची गरज नाही. तिथे सर्व मिळते.

फक्त मनाची(च) तयारी जास्त महत्वाची आहे नी तुलना करायची नाही असे ठरव.


Sherpa
Wednesday, December 20, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ३ वर्षापुर्वी परत आलो आहे माझे काही अनुभव असे

तुम्ही सामान Ship ने पठवणार का नाही त्यावर बरेच depend करेल जर तुम्ही ship करणार असाल तर

१. NO electronics except selected few items like Plasma TV or Bose system. हे इकडे अजुन खुप महाग आहेत. NO microwave no cost advantage plus service issues

२. few toys from fischer price or learing games हे इकडे मिळतात पण थोडे महाग आहेत. पण शेवटी किती आणणार हा पण एक भाग आहे असो..

३. Cotton Socks, Light winter Jackets for kids

४. केशर

५. branded sport shoes

मला वटणारी list प्रत्येकाचे मत वगळे असेल चु.भु. समजुन घ्या...

अजुन काही specific info हवी असेल तर जरुर कळवा..

भारतात परत येण्यासाठी Good Luck


Rahulphatak
Wednesday, December 20, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरची तिन्ही उत्तरे वेगवेगळ्या अर्थाने परिपूर्ण आहेत :-).. अजून काही मदत लागली तर तुम्ही इमेलने किंवा इथे विचारू शकता. आम्हीही USA मधे सव्वापाच वर्षे राहून स्वेच्छेने ( !!! :-)) परत आलो मागच्या वर्षी.
तुम्हाला शुभेच्छा !


Shonoo
Wednesday, December 20, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहितीत US मधे दहा बारा वर्षे राहून दोन मुलींना घेऊन फक्त आठ बॅगा घेऊन गेलेले कुटुम्ब आहे. आणि ३-४ वर्षे राहून सर्व घराला लागणारं सामान washing machine, dryer, air conditioner, furniture etc एक कंटेनर मधून शिप केलेला एकटा ( तेंव्हा) मुलगा आहे. दोघेही ही आता जवळपास ५-६ वर्षे भारतात आहेत आणि मजेत आहेत.

काय न्यावं आणि नेऊ नये हे व्यक्ति, स्थल आणि काल सापेक्ष आहे. वर नमूद केलेल्या आणि तसल्या इतर ग्रूप मधे वाचून स्वत: ठरवावे.



Ek_mulagi
Wednesday, December 20, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kalandar,Sherpa,Shonoo,Rahul,Kedar धन्यवाद.

आम्ही पुण्याला परत जातोय. पुढच्या आठवड्यात US ला येवून आठ वर्ष होतील. येताना ५ बग घेवून आलो होतो. आता अख्ख घर भरून सामान झालय:-))

Furniture /kitchen appliances नेण्याचा विचार नाही.

मागच्या आठ वर्षात भारतातल market बदलल.
पुणे आमच्यासाठी नवीन आहे.

मनाची तयारी झालीय, बस्स सामानाची आवराआवर चाललीय.


Sherpa
Thursday, December 21, 2006 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक गोष्ट लक्षात आली

एकडे परत आल्यावर forigneres registration करायला विसरु नका ( If your kids are US Citizens). Green Card साठी काय नियम आहे मला माहित नाही.


Limbutimbu
Thursday, December 21, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मुलगी, पुण्यात तुझ स्वागत हे! :-)

Limbutimbu
Thursday, December 21, 2006 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अनुभव नाही पण......
परदेशातुन परत भारतात येताना गाठीशी बक्कळ पैका बान्धुन घेवुन यावा!
इकडच्या (माझ्यासारख्या) लहानग्यान्ना वाटायला म्हणुन तिकडुन चॉकलेट्स आणायचे कष्ट करु नयेत, ती इथल्या इथे कुठेही सुपर मार्केट मधे सहजी उपलब्ध असतात!
कीचन मधिल आणि अन्य रोजच्या वापरातील अनेकानेक वस्तुन्वर जीव जडलेला असतो, टाकू म्हणुन टाकवत नाही की कुणाला विकत किन्वा फुकट देववतही नाही, तरीही त्यान्चा मोह सोडुन केवळ कपडे, नैमित्तीक दैनन्दीन गरजेच्या वस्तु केवळ बरोबर घ्याव्यात अन्य वस्तुन्ची योग्य विल्हेवाट लावावी कारण कीचन मधिल किन्वा अन्य इलेक्ट्रिकल गोष्टी परदेशातील व्होल्टेज आणि इकडिल यात तफावत असल्याने एकतर कुचकामी ठरतात किन्वा त्यान्च्याकरता पीन सॉकेटपासुन स्वतन्त्र व्यवस्था करावी लागते, त्याशिवाय त्यावर किती जबर ड्युटी भरावी लागेल ते देव आणि कस्टम जाणे!
त्यापेक्षा इकडे तुलनेत कमी किमतीत भरपुर नविन वस्तु घेणे जास्त परवडेल व नविन वापरल्याचे समाधानही
मात्र यायच्या आधी जिथे राहिलात त्या जागेच्या कानाकोपर्‍याचे फोटो काढण्यास विसरु नका!
तसेच तेथिल जागेची आठवण म्हणुन एखादी तुमच्या पसन्दीची वस्तु जरुर इकडे आणा!
आणिक काय? निघताना, ज्या वास्तुत राहिलात ती सोडताना तेथिल शेवटचा स्वयम्पाक करुन दहिभाताचा नैवेद्य तेथिल वास्तुदेवतेस जरुर दाखवुन मग ती वास्तु सोडावी
:-)

Gurudasb
Friday, December 22, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बुभाव , तुझ्या मनमोकळ्या सुचना मोलाच्या वाटल्या , पण शेवटच्या चार ओळीने भारावून गेलो . खरंच .

Limbutimbu
Friday, December 22, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुदास, खोटा नाय बोलत पण लहानपणी वडिलान्बरोबर खुप फिरलो तेव्हा धर्मशाळेत उतरायचो, एखाद दोन दिवस राहीलेली धर्मशाळा देखिल आपली आणि हविहविशी वाटायची, कदाचित लहानपणि नाविन्याबद्दलची उत्सुकता आणि जवळिक कारणिभूत असेल, पण ती ती प्रत्येक धर्मशाळा आजही नजरेसमोर उभी रहाते, तेथिल वास्तव्य आठवते, ती सोडताना तेव्हाही जीव हळवा झालेला, आज नुस्त्या आठवणीनेही तसच होत, तर मग आठ आठ वर्षे जिथे काढली ते ठिकाण, त्या वस्तू सोडताना काय बरे वाटत असेल?
वन कॅन इमॅजिन!:-)


Ek_mulagi
Friday, December 22, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT अगदी खर बोललात.

काॅलेज संपल्यावर होस्टेल सोडताना शेवटच्या रात्री मी वेड्यासारखी होस्टेलभर फ़िरले, त्या भिंतींशी बोलत बोलत त्यांचा निरोप घेत रात्र कधी संपली कळल नाही.
सकाळी जागरणाने (अन रडून ) लाल डोळ्यानी मी त्या वास्तूचा निरोप घेतला.

या घरात राहुन ५ वर्ष होतील.
हे आमच पहिल मालकीच घर.

बघायला आलो पहिल्यांदा तेव्हा पाय टाकल्याबरोबर प्रसन्न वाटल. घराने, त्या वास्तुने " या, बसा" म्हटल्यासारख.
५ वर्षातल्या ५ लाख आठवणी!

विकायचा बोर्ड लावताना कंठ दाटून आला होता.
त्याही रात्री मी असच घराशी बोलत बसले होते.
आता प्रत्यक्ष सोडून जाताना परत "जागरण" आहेच:-))

असच नात घरातल्या प्रत्येक गोष्टीशीही आहे.
ती वस्तू सोडताना,टाकताना म्हणून जड जात.




Zakki
Friday, December 22, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय माझ्या मित्राचा सल्ला विचारात घ्या. त्याच्या मते माणसाला सर्वत्रच काही काही प्रॉब्लेम्स असतात. तेंव्हा भारतात हे असे, नि अमेरिकेत तसे असले विचार करत बसू नका. जिथले प्रॉब्लेम्स सोडवणे जमेल तिथेच रहा. उगाच काही वाईट वाटून घेऊ नका नि दुसर्‍याला वाईट वाटेल असे बोलू नका. भारत काय नि अमेरिका काय, स्वतंत्र देश, त्यांना जसे वागायचे तसे ते वागणार. नशीब तुमचे, तुम्हाला पण स्वातंत्र्य आहे.

Gondhali
Saturday, December 23, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक्_मुलगी,

पुण्यात स्वागत काही माहिती पाहिजे असेल तर सांग


Nilyakulkarni
Saturday, December 23, 2006 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

L T अगदि खरे बोललास.... ज्या वास्तुत आपन राहतो.. त्या वास्तुवर खरचच खुप जिव जडतो
मी डोंबिवलीला घर घेतले..३ वर्शानी काही कारनानी ते विकले
पन त्या घरातुन जायचे या मुळे दोन दिवस झोपलो नव्हतो..
आजही जेव्हा मी त्या सोसायटी समोरुन जातो.. पटकन आत जाउन यावेसे वाटते
अजुनही कोनाला पत्ता सांगताना पटकन जुनाच पत्ता सांगितला जातो

आम्ही त्या घरातुन निघ्ताना एक नारळ दही भाताचा नैवद्य.. आनी पान्याची लोटी भरुन ठेवली होती.... ज्याना वीकली त्यानाही पेढ्याचा पुडा दिला होता...
एक्_मुलगी तुम्हीही तसेच करा


Mansmi18
Tuesday, January 09, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear Friends,

We are planning to go back to Pune(I am from Mumbai but studied in Pune just love it too much!). I am looking for settling in Pune. baner area. How is that area w.r.t schools, shopping malls, theatres, good neighborhood etc. I am looking for a decent place there.
any opinions/help will be greatly appreciated.

Thanks so much in advance

Radhe
Tuesday, May 08, 2007 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lt अगदी साध्या पण किती भारदार शब्दात मांड्तोस रे बाबा. मी औरंगाबाद्चे होस्टेल सोडले तेव्हाही मन असच भरुन आलं होतं.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators