Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नवरात्रीचे उपास ...

Hitguj » Looking for » Religion » नवरात्रीचे उपास « Previous Next »

Megha16
Tuesday, September 19, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नवरात्रीच्या उपासा बद्द्ल माहीती हवी आहे.

Moodi
Tuesday, September 19, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का गं उपास करुन डाएटिंग करायचे आहे का? नवरात्राचे नऊ उपास नको करुस, जमल्यास अष्टमीचा कर, नेमकी ती ३० सप्टेंबरला येतीय बहुतेक. आणि त्या उपासालाच जास्त महत्व असते. इतर दिवशी काही जण पूर्ण उपास करतात, काही जण दिवसातुन एकदाच उपास करुन संध्याकाळी सोडतात, त्याला एकभुक्त असे म्हणतात. बाकी सांगतीलच माहीत असेल तर नाहीतर मी सांगेन परत.

Chinnu
Tuesday, September 19, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, मी देवीला नऊ दिवस नैवेद्य दाखवुन मुडीने सांगितल्याप्रमाणे एकभुक्त उपवास केले आहेत. पण अमुक वेळेला उपवास सोडायचा असा काही नियम आहे कि नाही मला माहित नाही. मी मात्र नैवेद्य दाखवुन मग एकदाच जेवते. काहीजण फ़लाहार पण करतात. cbdg!

Megha16
Thursday, September 21, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks मुडी आणी चिनु.
माझ्या सासुबाई सकाळी फळ आणी संध्याकाळी खिचडी,किंवा वरई तांदुळाचा भात,धिरडे अस खाता. मला पण तसच करायला सांगीतल आहे. पण ९ दिवस माझ्या कडुन च होईल की नाही शक्यता कमी.
मुडी, अष्टीमीचा उपास केला तरी चालेल का ग?


Moodi
Thursday, September 21, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा मला वाटतय ते स्पष्टपणे सांगते. अष्टमीचाच उपास कर. कारण आता उन्हाळा संपत आलाय, थंडी सुरु झाली की जास्त भूक लागेल, ती तू कितपत सहन करु शकतेस ते बघ. मी माझे सोमवारचे उपास पूर्ण सोडुन दिले. उगाच तब्येतीला त्रास करुन घेऊन देवाचे करावे असे निदान मला तरी वाटत नाही. वाटल्यास एकच दिवस उपास कर पण तो श्रद्धेने कर.
कफ प्रवृतीचे लोक दूपारपर्यंत उपास सहन करु शकतात, पित्त आणि वात प्रकृतीचे नाही. उपासाचे पदार्थ आणि जेवण यात फरक आहे.
भारतातली गोष्ट वेगळी तिथे आता ऑक्टोबर हीट सुरु होईल, उन्हाळाच असेल, त्यामुळे तिथे चालते. बघ तुला मोडता नाही घालायचा पण तू तिथे एकटी आहेस हा विचार आधी कर. एवढा उपदेश दिल्याबद्दल सॉरी. पण सविस्तर सांगावेसे वाटले.


Megha16
Monday, September 25, 2006 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks मुडी.
अग मला पण तेच वाटत होत. कारण आधी कधी केले नाही उपास. लगना नंतर च केले ते पन शेवट्चे २ दिवस. म्हणुन घरी सासु बाई ना सगळ विचारुन वगैरे पाहिल तर शेवटी त्या पन हेच म्हणाल्या. की शेवटचे २ दिवस कर म्हणुन.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators