Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कंन्टाळवाने ऑफीस

Hitguj » Looking for » Career/profession/work related » कंन्टाळवाने ऑफीस « Previous Next »

Raahul80
Tuesday, January 17, 2006 - 8:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शपथ... दिवस संपायला आलाय पन सकाळधरन एक कन काम नाही केले, काम आहे पन करायची ईच्छाच होत नाहीय... मग उगाच आपन फुकटचे पैसे घेतो (ते पन $ मधे) अशी अपराध्याची भावना येते... पन तरीदेखील काम करवत नाहीय... नुसती चलबिचल...

ह्यावर काही उपाय?

माला असे वाटते की त्याच त्याच लोकांचा, किवा कामाचा मला विट आला असावा


Chinnu
Tuesday, January 17, 2006 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, आधी अपराध्याची भावना मनातुन काढुन टाक. काही काही दिवशी आपण खुप मेहनतीने पण कामे केलेली असतात. तेव्हा जास्त work load नसतांना आअरमात उरकली कामे तर काही वाईट वाटुन घ्यायचे कारण नाही.
भोवतालची लोक कधी कधी वीट आणतात. पण आपण त्यांन बदलवु शकत नाही. तर आपणच त्यांच्याशी वागणुक बदलली पाहिजे. कधी कधी आवडते छंद जोपासायला सुटी घेतली तर मन प्रसन्न होते. बघ, पटतय का.




Milindaa
Wednesday, January 18, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठीक आहे, येथे बरेच लोक आहेत जे दिवसात काहीच काम करत नाहीत आणि तरीही त्यांना काहीही वाटत नाही. तेव्हा तू स्वतःला बदलणे हा एकमेव पर्याय आहे

Mahen_water
Thursday, January 19, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचे office च्या meeting म्हनजे एक अफलातुन प्रकार असतात
भान्डनाचे एक एक नमुने पहायला मिळतात
म्हनजे फक्त भान्डन


Champak
Thursday, January 19, 2006 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, JRD Tata नी म्हटले होते कि, मी टाटा कडुन पुर्ण आयुष्य भराचा पगार फ़क्त एक गोष्ट केल्याने च घेतला असता, तरीही वावगे वाटले नसते.. अन ती गोष्ट म्हंजे श्री सुमंत मुळगावकर ह्यांना टाटा मध्ये नोकरीला आणणे :-)

अर्थात.. जर तु कंपनीत एखादी concept किंवा product दिले असेल कि जेणे करुण कंपनी पुढे भरपुर नफ़ा मिळवणार असेल.... अश्या वेळी day to day business मध्ये एखादे दिवशी तु काही ही केले नाहीस तरी वावगे ठरत नाही.


Raahul80
Thursday, January 19, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यावाद भरत,

तो नवनविन गोष्टी शोधन्याचा उत्साह जेव्हा मी एका छोट्या company मधे होतो तेव्हा खुप होता, रोज नविन कल्पना यायच्या पन पैशाअभावी त्या कधी प्रत्यकक्षात आनता आल्या नव्हत्या...

आता मजल दरमजल करत wall st. पोचलो, पन का कोन जाने, त्या कल्पना अता मनात येतच नाही

त्यात, आम्ही बिगारी लोक (consultant) त्यामुळे बोलुन चालुन आमच्या मताला ईतकासा प्रतिसाद मिळत नसतो. बर इथे company सोडने पन सोपे नसते, आणि कोनास ठाउक पुढिल company चांगलीच असेल.


Zakki
Friday, January 20, 2006 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेन वाटर, तू मिटींग रूम मधे एक बोर्ड लाव. "If you sleep, do not snore. You may wake up others."

Zakki
Friday, January 20, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, अरे पूर्वी IBM मधे काही लोकांना भरपूर पगार देऊन ठेवले होते. काम काही नाही, म्हणजे काही काम करायचे नाही, असा त्यांना हुकुमच. कारण नाहीतर ते प्रतिस्पर्धी कंपनीत जातील म्हणून. तसेच तुझेहि काहीसे असेल. निदान कुणि म्हणाले काम का करत नाहीस, तर त्यांना तसे सांग.

Zakki
Friday, January 20, 2006 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तुम्हा लोकांना यात काही वावगे का वाटते? मी अकरा वर्षे निरर्थक मीटींग्ज नि काहीही काम न करता काढली. मधे एकदा मी freecell खेळत असताना माझा बॉस आला. त्याला मी सांगीतले की windows 98 मधे Microsoft नी मूद्दाम हे software दिले आहे. ते एकदोनदा रन केले म्हणजे तुमची हार्ड डिस्क, मेमरी वगैरे सर्व ठीक आहे हे कळते. तेंव्हा तोही लगेच परत गेला. नि दोन मिनिटात परत आला नि म्हणाला, something is wrong! I get the message you lost! . मग मी जाऊन त्याचा computer 'fix' केला! त्याने मला अनेक धन्यवाद दिले. केव्हढे महत्वाचे काम हे!

Milya
Friday, January 20, 2006 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पूर्वी IBM मधे काही लोकांना भरपूर पगार देऊन ठेवले होते. काम काही नाही,>>>>म्हणजे झकी आता IBM मध्ये काम असते का? ऐ.तें. न.

तुम्ही होतात का IBM मध्ये?

Zakki
Friday, January 20, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता कुठेच काम नसते म्हणे. मी नव्हतो IBM मधे, पण तसल्याच मोठ्या AT&T मधे consultant होतो. त्यामुळे मला काहीच काम नव्हते. फक्त कुणितरी काहीतरी केले पाहिजे असे Corporatese मधे सांगीतले की लोक वा वा म्हणायचे!

पण पूर्वी अमेरिकेतल्या बर्‍याच कंपन्यांमधे काम असे. आताशा, काम म्हंटले की भारतात पाठवा म्हणतात. मग भारतातले लोक मिशीला तूप लावून जगभर सांगत सुटतात की आमच्या शिवाय अमेरिकेचा कॉम्प्युटर चा धंदा बंद पडेल. आता भारतीयांनी स्वतच्या देशातले काही काम काढावे, कारण अमेरिका लवकरच सगळे काम चीन ला पाठवणार. भारतीयांनीच चिनि लोकांना सगळे शिकवायचा धंदा काढला. मग शंभर वर्षानी पुन भारतीय म्हणतील की एकेकाळी भारतातले लोक कॉम्प्युटर मधे फार पुढे गेले होते!

"sic transit gloria mundi!"

Raahul80
Friday, January 20, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"If you sleep, do not snore. You may wake up others" हे उत्तम, वाक्य भारी आवडले.

माझ्या मते मानसाला एकाच कामामधे एक ते दिड वर्षा पेक्षा जास्त काळ ठेउ नये, नाहीतर त्याच त्याच गोष्टीची पुनरुक्ती होते व मानुस कंटाळतो.

ऑफीस मधे पाय ठेवल्यापासुन जांभया द्यायला सुरवात होते ओ, पन गेल्या वर्षी गोष्ट वेगळी होती... कधी एकदा ऑफिस मधे जातो आणि आमुक आमुक काम संपवतो असे होते... म्हनुन साहेबाने खुश होउन माला आजुन एक वर्ष काम करायची मुभा दिली, आणि काय माहीत तेव्हापासुन काम करायची ईच्छाच मेलीय...

कधी कधी वाटते, द्यावे सोडुन संगनकाला आणि दुसरे काहीतरी करावे... पन लगेचच कळते, की ते आपल्याला जमनार नाही, शांतपने बसुन, जास्त बडबड न करता, लोकंची मनधरनी न करता पैसे कमवायची सवय झालीय, ती मोडने दिसते तितके सोपे नाही.

मग कधी कधी वाटते, की भारतात परत जावे, पन तो निर्नय पन लगेच घेता येत नाही... मधे ह्यावर एका मानसाने सांगीतले होते "it takes a lot time to pull the plug"


Moodi
Friday, January 20, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझी रास माझ्यासारखी कर्क तर नाही ना? वाटत नाही तसे. पण आम्ही कर्क वाले खेकड्यासारखे तुरतुर पळतो ना. एका जागी बसण्याचा कंटाळा रे. चल छोटासा ज्योक, रागवू नकोस.

नशीबवान आहेस, सारखी फिरतीचे नोकरी नाही तुझी MR सारखी. संगणकवाल्याना इतरांसारखे ९ ते ६ ऑफिस नाही हे मान्य आहे, कारण ऑफिशियली तसा टाइम असला तरी वेठबिगारासारखी अवस्था असते. बिलभावने तसा उद्योगच केलाय ना.

कंटाळा आला की चहा घेणे, मधुनच चेहेर्‍यावर अन डोळ्यावर पाणी मारुन जाऊन फ्रेश होणे असे करुन बघ. काही गोष्टीना इलाज नसतो. कारन दुसर्‍या जागी नेमके आणखी विचित्र प्रॉब्लेम असु शकतात. for example bank मध्ये १ ते १० तारखे पर्यंत पगारासाठी अन इतर गोष्टींसाठी लाईन, गर्दी.

शाळा कॉलेजात पोरांचा पोरींचा हैदोस, दंगा जसा आम्ही हुसैनच्या बीबीकडे घातला तसा) वरुन त्यांच्या परिक्षा, पेपर तपासणी, Gathering चा गोंधळ.

दवाखाना हॉस्पिटलमध्ये लोकांची आजारपणाकरता भरती, त्यांच्या नातेवाईकांची धावाधाव, नर्सची लगबग, औषधांचा वास लै झ्याक रे भो), आपल्या डोक्याला डॉक्टर म्हणुन वेगळाच ताप. त्यातुन तो पेशंट लवकर बरा नाय झाला तर त्याचे नातेवाईक डॉक्टरला धरुन हाणतात ते वेगळे.

कारखान्यात किंवा garage मध्ये हात काळे, कामगारांचे संप, कंपन्या बंद.

रेल्वे, विमानात नोकरी करावी तर सारखी रात्रपाळी, बदली, खाणे पिणे, झोपणे याचा खुर्दा.

मिलिटरीत, नेव्हीत जावे तर सारखी परेड अन समुद्रावर हेलकावे खायचे. बघ काय आयुष्य आहे.

दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है.

पाहिजे तर एखाद्या w/e ला बाहेर जा फिरायला, नवीन छंद जोपास, मायबोली आहेच आपली.

कविता कर, फोटो काढ, नवीन सदरात लिही. ऑफिस कंटाळवाणे कधीच वाटणार नाही. तू तुझे काम जर प्रामाणीक पणे करतोस तर मग ते मनात असे का आणतोस? या भावनेने तुलाच ताप होईल. बघ पटतय का.

अन हो रागवु नकोस या सल्ल्याबद्दल.


Raahul80
Friday, January 20, 2006 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे वसुमती...

खाडकन डोळे उघडावे तसे काहीतरी झाले एकदम माझे. गम चे किती ते प्रकार... त्यापेक्षा मझा गम बरा आहे, मला चांगलेच चिकटऊन ठेवले आहे त्याने.

मी मिथुन राशीचा, कर्क पेक्षा थोडा जास्तच चंचल.

हो विचार करतोय एक फॉटोग्राफीचा कोर्स लावावा म्हनतोय, बघुयात.

अरे हो, अत्ता नेट सर्फ करता करता हा एक दुवा सापडला ह्या विशयावर, भेट द्या.
http://niveditajagtap.blogspot.com/2006/01/diagnostics-of-boredom-routine-routine.html

Mahen_water
Saturday, January 21, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि सल्या बद्दल आभार
कदाचित पुधच्या meeting ला
त्याचा उपयोग होइल
तसे माझे काम office कमि आनि site जास्त
आज इथे तर उद्या कुठे माहित नाहि


Mahen_water
Saturday, January 21, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे मी कुठे तरि एकले आहे कि
जगातलि ९५ लोक असे काम करतात कि त्या कामात त्याना काहिच मानसिक समाधान लागत नाहि
फक्त जगन्या साठि काम करतात


Zakki
Saturday, January 21, 2006 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय असे आहे की जर पोटापाण्यासाठी, किंवा जास्त पैसे मिळवण्यासाठी काम करणे आवश्यकच आहे, तर ते आणखी मनोरंजकहि असावे हे कठीणच. कधी कधी, म्हणजे अनेक वर्षांपूर्वी, मी कामात खूप लक्ष घालून जास्तीत जास्त चांगले काम करत असे. तेंव्हा पासून माझे काम लवकर आटपे, मग इतर गप्पा टप्पा करायला वेळ मिळे, नि Office चा कंटाळा येण्याचे थांबले. त्याचा दुसरा फायदा म्हणजे उत्तम काम करणारा म्हणून १५ वर्षांपूर्वी माझी प्रसिद्धी झाली. मग काय? मज्जाच मज्जाच अन काय? मी म्हंटले मला जकार्ताला पाठवा, माझा तीस वर्षा पूर्वीचा दोस्त आहे तिथे, त्याला भेटायला जायचे आहे. तर एक महिनाभर जकार्तात! काम ना धाम. मुख्य म्हणजे जवळपास १२ तासाचा time difference असल्याने सकाळी office ला गेलो की झोपच यायची. मग झोपायचे!
नंतर एकदा म्हंटले मला ऑस्ट्रेलिया ला जायचे आहे, बघायला. तर तीन महिने ऑस्ट्रेलिया!
एरवीहि इतर लोक जिथे ज्या project वर जात नसत, कारण तिथे challenge नाही, तिथे मी हौसेने जात असे. शिवाय project manager लोकांना कित्ती भयंकर काम नि जबाबदारी असते नाही का?
मग कशाला कंटाळा येईल कामाचा! म्हणून तर आरामात retire होऊन घरी बसलो आहे, मायबोलीकरांना छळायला!



Vaishali_hinge
Tuesday, January 24, 2006 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच आहे प्रत्येक ठिकाणी नवीन प्रोब्लेम असतो मला मात्रा काम नाही म्हनुन खुप वाइट वाटते आला दिवस वाया गेला असे वाटते माझ्या नोकरिची खुप्पच आठवण येते, मिही कर्क राशीची असल्याने असेल

Maanus
Wednesday, January 25, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशी रे अशी ही कचेरी कचेरी..
सदा लोक येथे मजेच्या विचारी

मिटींगा मिटींगा कितीवेळ केल्या..
समस्या तरीही उभी नीत्य दारी

पगारास येथे कधी वाढ नाही..
चिडूनी वदाया परी तोंड नाही

स्वतःचेच डोके अम्हाला नसे ते..
करु शुभ्र साहेब सांगेल ते ते

जगाच्या मनी तो असे नीत्य हेवा..
परी आमुचे दुःख अम्हास ठेवा
-----------------------
मनोगत वरुन ढापलीय


Zakki
Thursday, January 26, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस, गुरुवारी रात्री ९:३० वाजता NBC वर office नावाची सिरिअल असते. दोन तीन वेळा पाहिल्यावर त्यातल्या characters कळायला लागतील, मग तुला ती सिरिअल आवडेल असे वाटते. तसेच Dilbert नावाचे कॉमिक्स पुस्तक वाच. म्हणजे बरे वाटेल

Rishikesh01
Saturday, February 04, 2006 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It may Seems We take for granted.As thebusy days go past.the good and faithful friendship that we"r counting onto last,But theres a Special Language understood by You & Me And though ur Heart already knows Sometimes I Like to say , you've made my Worldmore beautiful- I m glad You came MY WAY-

Yours Friend
Rishikesh Deshmukh
Mumbai


Rishikesh01
Saturday, February 04, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My ZODIAC Sign Is cancer, i THINK cANCERIAN ARE VERY UNSTEADY .

Tanu
Wednesday, February 15, 2006 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Friends, Mala kuni help karal ka ? Oracle-D2k madhe freelance projects miltat ki nahi ? jar opportuinities asle tar mala tya websites che address/information denar ka ?

Ukdhamal
Tuesday, February 28, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala koni Graphic Designing che freelace kam dewu shakel ka??..... Flash madhe jar kahi kam karun have asel tar samparka sadha.
ulhaskadam@hotmail.com

Nayana
Tuesday, February 28, 2006 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

malaa koNee puNe, <Bangalore> yethil < recruiter> chee naave miLateel kaa?

Zakki
Tuesday, February 28, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंगलोर Infosys मधे हृषिकेश नावाचा एक रिक्रुटर आहे. त्याचा फोन ८० ३९८२ २२२२ असा आहे. त्याचा मला न्यू जर्सीत फोन आला होता. त्याला माझी माहिती पाठवली आहे. भारतीय पद्धतीप्रमाणे आता एक दोन महिन्यांनी चौकशी करीन, काय झाले त्याची. त्याच्या आधी उत्तर देण्याची भारतीयांची पद्धत नाही. त्यांची dignity कमी होते. After all, you is the one who want to serve us, not we, you are very rude asking us. we are busy अशी उत्तरे ऐकायला मिळतात. ( स्वानुभव ) .

Nayana
Wednesday, March 01, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zakki त्याचा email id मिळेल का?

Zakki
Wednesday, March 01, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नयना, नयना, नयना. तुझे लक्ष वेधून घेण्यासाठी असे लिहिले.
email address is :
preeti_21182@infosys.com

अहो ऍडमिन, परत माझी तक्रार. कंटाळवाणे ऑफिस या BB वर नयनाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला गेलो, तर खाली माझे उत्तर लिहायला काही रिकामा बॉक्स दिसतच नाही! म्हणून इथे लिहावे लागले.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators