Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
स्वरचित आरत्या ...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव २००५ » स्वरचित आरत्या « Previous Next »

Prasad_shir
Wednesday, September 07, 2005 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतरात आमच्या...

अंतरात आमच्या गणेश नांदतो
मार्ग आमुचा अम्हा गणेश दावतो

सागरात एकटीच नाव आमुची
वादळात नाव ही गणेश तारतो

जे तुम्हास पाहिजे, तुम्हास ते मिळेल
प्रार्थना तुम्ही करा, गणेश ऐकतो

करेन मी सदैव फक्त कर्म आपुले
कर्म पाहुनीच हे गणेश तोषतो!


Kshipra
Thursday, September 08, 2005 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वंदन करूनी गणरायाला
शुभकार्या आरंभ करू
सुखकर्त्याचे नाव घेऊनी
भवसागर हा पार करू
जय लंबोदर गजानना
जय शिवसुत जय विनायका || ध्रु ||

दे आम्हांसी विपुल मती
आणि असू दे ती सुमती
तारक होऊनि तारून ने तू, तव पदस्पर्शे आम्ही तरू
जय लंबोदर गजानना
जय शिवसुत जय विनायका || १ ||

कर्तव्याची धरू दे कास
ने आम्हां तू पैलतीरास
विघ्नेश्वर तू मंगलमूर्ती, तव चरणी प्रणिपात करू
जय लंबोदर गजानना
जय शिवसुत जय विनायका || २ ||

सर्व सिध्दीचा कारक तू
रिध्दीसिध्दीचा नायक तू
चित्त जडू दे तुझिया पायी, तू आम्हांसी कल्पतरू
जय लंबोदर गजानना
जय शिवसुत जय विनायका || ३ ||

गणपती बाप्पा मोरया
सगळी विघ्ने दूर करा


Prasad_shir
Thursday, September 08, 2005 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपतीची बडबड आरती

(चाल : आओ बcचो तुम्हे दिखाये!)

गणपती बाप्पा माझ्यासाठी
एवढं तरी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

मनिमाउचे मौ मौ शेपुट
चिवचिवणे चिउताईचे
माकडदादाचे ते हुपहुप
गुरगुरणे वाघोबाचे
मला सांग तू या मित्रांशी
दोस्ती माझी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

बाबा गेले ऑफिसात अन
आई गेली भूर कुठे
एकटाच मी घरात आणि
सगळे गेले दूर कुठे
उशीर त्यांना झाला तर तू
धम्मक लाडू देशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

मला वाटते तेंव्हा होवो
घणघण घंटा शाळेची
अभ्यास सारा पटपट संपुन
मधली सुट्टी खेळाची
कितीही खेळलो तरी मला तू
पहिला नंबर देशील का?
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...


Sukhada
Friday, September 09, 2005 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री राम जय राम
जय जय राम
दर्शनाची आस मज
मनी तुझे नाम

असू दे सदा मुखी रामनाम
घुमू दे या मनी तुझे नाम
पाश सारे तोडी रामनाम
विरवी देहबुद्धी तुझे नाम

श्री राम जय राम जय जय राम

दुःखात बळ देई रामनाम
आधार संकटी तुझे नाम
मन निर्मळ करी रामनाम
षड्रिपूस हरवी तुझे नाम

श्री राम जय राम जय जय राम

एकाचा अंत करी रामनाम
निर्गुणाकडे नेई तुझे नाम
आशीर्वच देई रामनाम
भवसागरी तारी तुझे नाम

श्री राम जय राम जय जय राम


Prasad_shir
Friday, September 09, 2005 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे शिवनंदन, करितो वंदन

हे शिवनंदन, करितो वंदन
विघ्नांचे करुनी निर्दालन
सुख शांती दे अम्हा चिरंतन

गगनी भरल्या रंगांमधुनी
अन फुललेल्या कुसुमांमधुनी
तव रूपाचे होते दर्शन
हे शिवनंदन, करितो वंदन

कोसळणार्‍या धारांमधुनी
सळसळणार्‍या वार्‍यामधुनी
तव सूरांचे होते गुंजन
हे शिवनंदन, करितो वंदन

श्वासांमधुनी तुला पूजितो
देहाचे या फूल अर्पितो
स्पंदांतुनही तुझेच कीर्तन
हे शिवनंदन, करितो वंदन
विघ्नांचे करुनी निर्दालन
सुख शांती दे अम्हा चिरंतन


Pama
Friday, September 09, 2005 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री गणेश नामावलीतील काही नामे घेऊन केलीय...


जय देव जय देव जय श्री गणराया,
भक्त घालती साद, यावे सत्वर ताराया.


देवांचा ही देव तू विद्याप्रदायका
लंबोदर तू वक्रतुंड तू बुद्धीदायका
सर्व सिध्दीच्या नायका, तू धनदायका,
भक्त घालती साद यावे सत्वर ताराया.

कार्यारंभी गणाधिपा तू इcछित फलदाता,
विघ्नविनाशक शंकरनंदन, तू सुखदायका,
भक्तिमुक्तिच्या प्रदायका, तुज नमितो शिवात्मजा,
भक्त घालती साद यावे सत्वर ताराया.

प्रियदर्शना सर्वज्ञा तू वरदायका,
शरण आलो तुजला देवा तू गणनायका,
तुझ्या कृपेचा हस्त असू दे, हे क्षमायुक्ता,
भक्त घालती साद, यावे सत्वर ताराया.
Itsme
Sunday, September 11, 2005 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव गजानन
शिव गौरी नंदन
गजमुख साज़िरे
मनी वसते

चांदीचा पाट
सोन्याचे ताट
मोत्याची माळ
गळा शोभते

दुर्वांची रास
फुलांची आरास
मोदक नैवेद्या
भक्त देतसे

चंदनी मखर
जरी पितांबर
माणिक मुकुट
शोभा वाढवी

सजली स्वारी
संतोष भारी
गणांच्या मनी
दाटुन येई

मनीcई आस
सांगे गणेशास
सदबुध्दी दान
नित्य मीळुदे

!! जय गजाननPrasadmokashi
Monday, September 12, 2005 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आग्रह

घ्या ना गणपती बाप्पा
अजून एक मोदक खा
वाटल्यास उत्सवानन्तर
खुशाल dieting वर रहा

dieting पेक्षा मी म्हणतो
थोडा व्यायाम का नाही करत ?
उंदराला विश्रान्ती देऊन
काही दिवस पायीच का नाही फिरत

' पोहणे ' सर्वोतम exercise आहे
शिकायला हरकत नाही
म्हणजे दरवर्षी फिरुन असे
तुम्ही पाण्यात बुडणार नाही.

पण विचार करा...
पोट कमी झाले तर
भक्तांना चालेल का
लंबोदर म्हणून तुमचा
सांगा, महिमा राहील का

दहा दिवसांचे जाग्रण आहे
नीट काळजी घ्या
माझ्या आग्रहाखातर तरी
बाप्पा, अजून एक मोदक खा

~ प्रसाद :-)
Kshipra
Tuesday, September 13, 2005 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री गजाननाच्या चरणी श्लोकरूपी शब्दफुले

चुकले माकले तुझेच लेकरू
पोटाशी घेई रे नको राग धरू
तूच माझा बाप तूच माऊली रे
चला मोरयाला स्मरू रे स्मरू रे

नसे तुज आदि तुज नसे अंत
शुन्यात व्यापुनि राहे तू अनंत
निवारील चिंता तुझिया दर्शने
चला मोरयाला स्मरू रे स्मरू रे

मागते मी तुज हेचि दान देवा
पापण्यात दे रे आसवांचा ठेवा
दुखभार सारा तूच नित्य साहे
चला मोरयाला स्मरू रे स्मरू रे

चित्ती तुझे रूप मुखी तुझे नाम
आलिंगुनि प्रेमे तुजला पूजीन
तुझिया चरणी लीन आम्ही सारे
चला मोरयाला स्मरू रे स्मरू रे

प्रसन्ना होवोनि वर दे आम्हांसी
सुख शांती अवघी लाभू दे विश्वासी
ओंकार स्वरूपी तल्लीन होऊ रे
चला मोरयाला स्मरू रे स्मरू रे


Prasadmokashi
Tuesday, September 13, 2005 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलाखत

मी : काय गणेशा, या वर्षीचा गणेशोत्सव कसा वाटतोय
श्री : खड्ड्यांमुळे हाल झाले बाबा, अजुन गुडघा ठणकतोय.

मी : गणपती बाप्पा, या वर्षी एवढा पाऊस का हो पाडला
श्री : इंद्रावर माझा control नाही आता , त्याने वेगळा पक्ष काढला.

मी : दहा नंतर ध्वनीवर्धकावरची बंदी तुम्हाला आवडली
श्री : ठीक आहे तशी, पण माझी favorite गाणी ऐकायची राहीली.

मी : बाप्पा, तरुण पिढीला तुमचा काही संदेश वगैरे आहे का
श्री : मायबोलीशी एकनिष्ठ रहा, रोज एकदा तरी चक्कर टाका

~ प्रसाद :-)


Prasadmokashi
Wednesday, September 14, 2005 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरती

आरती गणराया
भक्त पडती पाया
सर्वसुख पखरण
तव कृपेची छाया धृ||
आरती गणराया

गजमुख पाहुनिया
वाटे मना आधार
जाई भव सागराच्या
नाव आपुली पार १
आरती गणराया...

ओन्काराचा अवतार
सृष्टी सर्व साचार
श्वासा नि भासात
वसे पार्वती कुमार २
आरती गणराया...

विद्या कला अधिपती
नाम तुझे गणपती
पूजीता मनोभावे
मना येई अनुभूती ३

आरती गणराया
भक्त पडती पाया
सर्व सुख पखरण
तव कृपेची छाया


~ प्रसाद


Peshawa
Wednesday, September 14, 2005 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this messageजय हो दयाघना हत्तीदेवा

झांज मन, ढोल मन, घुमा घुमा वाजे
उंदरावरती स्वार माझे गणराज आले ध्रु||

गुलालाची शीळ, वार्याच्या कानात
पाय घे फ़िरत उन्मादी तालात
वाजत गाजत सुख दारात हे आले
माझे गणराज आले

मोत्यापवळ्याची खाण, डोळ्यास गावते
तुझ्या नामाचा गजर, जिव्हा सुखात नाचते
मन आनंदाचा डोह आज काठोकाठ झाले
माझे गणराज आले

Peshawa
Wednesday, September 14, 2005 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेरंबा प्रारंभा
ओंकारस्वरूप आदिनादा
मुढशब्दाची ही वंदना
स्विकारा गौरीनंदना

रुपे अनंत, अनंत हेतू
अनंत अर्थ, तुझे आनंदसेतु
गौण मती माझी स्वयेतच दंग
जागवा जागवा तुम्ही धुम्रकेतु

उजळेल ज्योत, अंधक्कार गहनातले
पाशात भोग जिथे अंकुशले
एकुलेसे बिज चतुर्थाचे
लावियले मनमानसी गजानना रे

धन किर्ती वैभवी ओढ
ही गर्ता कळीकाळी खोल
भक्तिची दोर, जुळलेल्या हाती
द्यावी जागा चरणासी, गणाध्यक्षा!


Upas
Friday, September 16, 2005 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयदेव जयदेव जय जय गणराया
उदंड राहो तुमची भक्तावरी माया...

वक्रतुंडा लोभस तेजोमय मुर्ती
एकदंता तुमची त्रैलोकी कीर्ती
कार्यारंभ करती
वंदूनी तव पाया
उदंड राहो तुमची भक्तावरी माया...
जयदेव जयदेव जय जय गणराया

तुमचे गुण वर्णाया द्या आम्हा स्फूर्ती
अशीच राहो अमुची तुम्हावर भक्ती
संकटी धावून या देवा
आम्हा कलियुगी रक्षाया
उदंड राहो तुमची भक्तावरी माया...
जयदेव जयदेव जय जय गणराया

वैश्विक शांती राहो लाभो सुख सम्पत्ती
विद्या धन देउनिया देई मनशांती
आशिर्वच द्या आम्हा
तव महिमा गाया
उदंड राहो तुमची भक्तावरी माया...
जयदेव जयदेव जय जय गणराया 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators