Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गाण्यांच्या अनुषंगाने अधिक माहिती ...

Hitguj » Culture and Society » गीत - संगीत » गाण्यांच्या अनुषंगाने अधिक माहिती « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 08, 200325 01-07-03  2:35 pm
Archive through April 13, 200535 04-13-05  4:00 pm
Archive through December 30, 200525 12-30-05  6:44 am

Mbhure
Friday, December 30, 2005 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळ संगीतकार वसंत पवार आहेत. राम कदम हे त्यांचे त्याकाळी सहाय्यक होते. पवार ह्या चालीसाठी फारसे उत्सुक नव्हते पण गदिमांच्या आग्रहाखातर त्याने हो म्हटले आणि गाणे रेकॉर्द केले. ' हाय' ही मला वाटत आशाची addition आहे. जानकारांनी अधिक माहिती / दुरुस्ती सुचवावी.

तसेच कदमांनी त्यांच्या ' प्रतिमा आणि प्रतिभा' मधील मुलाखतीत सांगितले होते की त्यांची बरीचशी गाणी ही ' ग्यानबा तुकाराम, ग्यनोबा तुकाराम' च्या एकाच चालीवर आहेत. उदाः माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी, काय ग सखू...


Dineshvs
Saturday, December 31, 2005 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय हि खास आशाची देणगी.
हा सिनेमा मल्टीस्टारर होता.
जयश्री गडकर, सुलोचना, हंसा वाडकर, चंद्रकांत, सुर्यकांत, दादा साळवी असे कलाकार होते. जयश्रीचा हा पहिला सिनेमा. तिच्या पायात पहिल्यांदा चाळ, मी बांधले असे लिला गांधी सांगायची. या सिनेमाचे नृत्यदिग्दर्शनहि लिला गांधीनेच केले, शिवाय एका गाण्यात ती हंसा वाडकरची डुप्लिकेट म्हणुन नाचलीय देखील.
हे एक गाणे आशाचे असले तरि बाकिची अनेक गाणी आमच्या नातलग, मधुबाला जव्हेरी नी गायली होती. ( हंसा वाडकरहि आमच्या नातलगच म्हणायच्या. )
काल राती बाई मजसी झोप नाही आली,

केले तुका अन झाले माका गोष्ट त्याची सांगत्ये ऐका

चंद्र आणखी पृथ्वी यांची काय असावे नाते

झाली पहाट

अशी ईतरहि छान गाणी होती. सिनेमाची कथा पण वेगळीच होती. हंसाबाईनी लिहिलेल्या आत्मचरित्राला हेच नाव दिले होते, ते पुस्तक खुप गाजलेहि होते. पण हा सिनेमा त्यांच्या जीवनावर नाही.
या पुस्तकावर स्मिता पाटिल आणि नासिरुद्दिनचा, भुमिका सिनेमा येऊन गेला.


Pendhya
Sunday, January 01, 2006 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती नमूद केलेल्या, बुगडी माझी सान्डली ग.... चा " हाय " जसा आशाचा अविष्कार, तसाच,
लताचा एक अविष्कार होता, मधुमती चित्रपटातील, दैया रे दैया रे, चढ गयो पापी बिछुवा, ह्या गाण्यामधे गायलेले... ओय ओय ओय ओय ओय ओय ऽ ऽ ऽ ऽ


Moderator_7
Thursday, March 30, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Anaani, We, on maayboli, do not encourage use of such sites where one can come across potential copyright issues if any.

So, please avoid giving links to such sites.

I have deleted your post.

Zakki
Monday, April 03, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाण्याच्या अनुषंगाने ......
काल सा रे ग म प ची कॅसेट पाहिली! तर गाण्याबद्दल बोलायचा मला काहीच अधिकार नाही, पण अनुषंगाने बोलायचे तर तो जो कुणि होष्ट आहे तो गाणे ऐकताना सतत डावा पाय थरवरत नि मान सतत डोलवत असतो, तर हे असे का? हे कुणि सांगू शकेल का? एक भा. नि. प्र.




Zakki
Monday, April 03, 2006 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज 'सुंदर ते ध्यान' हे गाणे रेडियो वर ऐकले, त्याचे सुरुवातीचे संगीत, कुठल्या तरी हिंदी गझली च्या सुरुवातीच्या संगीतासारखे वाटले, बहुधा पाकिझा मधल्या! कुणि नक्की सांगू शकेल का?, उगीच आपली एक उत्सुकता. धन्यवाद

Abhijit
Monday, April 03, 2006 - 9:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"चलते चलते, यूॅंही कोई मिल गया था". दोन्ही गाणी यमनमध्ये असल्याने तसे वाटले असेल. पण "सुंदर ते ध्यान" मध्ये घंटा, टाळ वाजवले आहेत, "चलते चलते" मध्ये कव्वालीच्या टाळ्या आहेत!

Zakki
Tuesday, April 04, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजित, धन्यवाद. तसे मला सुरांचे ज्ञान अजिबात नाही, पण गाणी ऐकत बसतो, कधी काळी काहीतरी समजेल, नाहीतर ऐकायला बरे वाटतेच.



Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators