Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आवाहन

Hitguj » Culture and Society » सामाजिक » आवाहन « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 29, 200520 12-29-05  7:10 am

Ekanath
Thursday, December 29, 2005 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी महोदय,
मी भानू काळे यांना ई-पत्र पाठवतो आहे. त्यांचे उत्तर आल्यास तुम्हाला कळवीनच. तत्पूर्वी, प्रशासकांनी दिलेल्या पत्त्यावर पत्र पाठवून विचारणा केलीत, तर नक्कीच प्रतिसाद मिळेल.
भानू काळे अंतर्नाद ची माहिती होण्याकरेता, इच्छूक व्यक्तीला अंतर्नादची एक प्रत मोफत पाठवतात. तुम्ही तशी प्रत मागवू शकता.


Ekanath
Tuesday, January 03, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Reply from Mr. Bhanu kale.


Dear Sir,

Thank you for your email. We are pleased to know that you would like to subscribe to Antarnaad. The subscription for one year (January 2006 till Nov-Dec joint Diwali issue of 2006) is Rs 360. For two years it is Rs. 720. For outstation cheque kindly add Rs 30 towards Bank Charges. The draft should be in the name of Antarnaad and sent to: C2, Garden Estate, Near Wireless Colony, Aundh, Pune 411 007. The issue for a given month is always posted from Pune on the 24th of the previous month.

For Airmail subscription, kindly add Rs 500 per annum towards the postage. But please make the cheque payable in Indian Rupees since we cannot accept payment in other currencies. Alternatively, someone in India can pay on behalf of the overseas subscriber.

We trust that you will enjoy reading Antarnaad.


With best regards,


Bhanu Kale

Editor,
Antarnaad.


Dakshina
Wednesday, July 05, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय मायबोलिकर,

लता मोहिते या 'मासूम' या संस्थेमधे "रानपाखरं" या Project साठी 'साथी' म्हणून
'परिंचे' या छोट्याश्या गावात काम पहातात.

त्या घटस्फोटीत असून त्यांना एक विवाहीत मुलगी आहे.

लताताई ४७ वर्षाच्या असून त्यंच्यावर Open Heart Surgery करावी लागणार आहे. ( Volve Replacement )
त्यासाठी एकूण दीड लाख रुपये खर्च येणार आहे, त्यापैकी ५० हजार रुपयांची जोडणी त्यांच्याकडून होत नाही आहे.
त्यासाठी आपण इच्छूक असाल तर सढळ हाताने मदत करावी.

अधिक माहीतीसाठी संपर्क - सीमा (मासूम) - 26995625 / 26995633



Ssbhave
Wednesday, February 21, 2007 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीच्या सदस्याना नमस्कार

एक निवेदन करायचे आहे. मला वाटते की तुम्ही सगल्यानी पारधी पुस्तक अथवा त्याच्याबद्दल वाचले असेल. श्री ग़िरिश प्रभुणे यानी ते लिहिले आहे.
ग़िरिश प्रभुणे पारधी समाजासाठी काम करतात.

पारध्यान्च्या सुमारे ६० मुलाना चिन्चवड इथे आणुन त्यानि गुरूकूल सुरू केले आहे. मी जसा जसा वेळ मिळेल तसा तिथे जाऊन त्या मुलाना कहितरि शिकवण्याचे काम करत असतो. तसेच त्याना कहि ना कहि मदत करण्याचा प्रयत्न करतो.

तुम्हा कोणाला तिथे काही मदत अथवा काम करण्यात रस असेल तर क्रुपया मला सम्पर्क करावा.

माजा सेल नम्बर ९८५०५६४६५७.


Sayalimi
Tuesday, May 01, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Click on following link and protest against It
"Undergarments with images of Hindu Deities!"

http://www.hindujagruti.org/denigrations/index.php?id=5

Zakki
Tuesday, May 01, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या दशकात हिंदू देव देवतांचे अपमानकारक चित्रण करण्याचे प्रमाण खूपच वाढलेले दिसते आहे. इथे मागे, चपलेत जिथे आपण पाय ठेवतो, तिथे हिंदू देवतांची चित्रे!

बीभत्स रस असतो मान्य आहे, पण त्या साठी हिंदू देव देवताच का सापडतात? मुद्दाम चित्रे काढून त्याच्या खाली हिंदू देव किंवा देवतांचे नाव द्यायचे!

ही कार्टून काढणारी बया, तो कोण हुसेन होता त्याची शिष्या दिसते आहे. कमाल आहे, हिंदू देव देवतांच्याबद्दल या लोकांच्या मनात 'हे' येते? त्यांना 'असे' वाटते? ही 'असली' चित्रे काढण्यात त्यांना काय बरे interest असावा?

मला माहित आहे मी फार संकुचित् विचारांचा आहे. पण मला नाही आवडली ही चित्रे. माझ्या मते तरी विकृतच म्हणायला पाहिजे यांना!




Mahe
Friday, May 25, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संजय भावे नमस्कार

मला आपण मेल पाठवुन जरा ह्या गुरुकुलाबद्दल माहिती द्याल का?
धन्यवाद

भाग्यश्री


Karadkar
Tuesday, May 29, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

भाउ धोत्रे, एक मरठी मुलगा. पोलिओवर मात करुन पुढील शिक्षण घेउ पहतोय.

त्यांची गोष्ट आपण खालील ठिकाणी वाचु शकाल.

http://m.request.googlepages.com/home

Ajjuka
Wednesday, June 13, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
आपण नाट्यप्रेमी आहात. व्यावसाइक रंगभूमीपेक्षा वेगळे आणि महत्वाचे काम करणारी समांतर अथवा प्रायोगिक रंगभूमी हि देखील महत्वाची असते हे आपण जाणताच.
आज मुंबईत समांतर रंगभूमी, बालरंगभूमी यांना हक्काचे नाट्यगृह नाही. माटुंगा येथे जे नात्यसंकुल उभारले आहे ती जागा मुळात समांतर रंगभूमी, बालरंगभूमी यासाठी दिली गेली होती पण आता तिथेही समांतर व बालरंगभूमीला स्थन नहि. येथे जागा मिळण्याच्या दृष्टीने अनेक वेगवेगळ्या अडचणी नाट्यपरीषदेकडून समोर आणल्या जात आहेत. मराठीतील ज्येष्ठ रंगकर्मी दामू केंकरे आणि मोहन जोशी यांमधे झालेले मतभेद आपण वृत्तपत्रांमधून वाचले असतील असे वाटते. नाट्यपरीषदेच्या धोरणाला लोकशाही पद्धतीने विरोध करण्या साठी आणि यशवंत नाट्यसंकुल येथे समानतर व बालरंगभूमीला हक्काचे घर मिळावे यासाठी १४ जुने २००७ रोजी सायंकाळी ६ वाजता आम्ही समांतर रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी निदर्शने करणार आहोत. आम्हाला सक्रीय पाठिंबा द्या.
समांतर रंगभूमीवर कार्यरत असणार्‍या माझ्या सर्व सहकार्‍यांना हे निवेदन की या वेळेला आपण भेटलो नाही तर कदाचित परत कधीच आपल्याला भेटायला जागा उरणार नाही.
नीरजा पटवर्धन

Ajjuka
Friday, June 15, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही तिथे पोचलो. फलक आणि घोषणा होत्याच. निषेधाचे काळे झेंडे फडकवले गेले. दामू केंकरे, अरूण काकडे, सुलभा देशपांडे, विजय तेंडुलकर, प्रेमा साखरदांडे, आशा दंडवते, जब्बार पटेल, वामन केंद्रे, विनय आपटे, शफाअत खान, चेतन दातार, राजन भिसे, विजय केंकरे असे अनेक रंगकर्मी तिथे होतेच. जयंत पवार, कमलाकर नाडकर्णी, अशोक राणे, पुष्पा भावे इत्यादी पत्रकार पण होते. नाट्यपरीषदेने पहिल्या पासूनच समांतर/प्रायोगिक आणि बालरंगभूमीकडे तिरप्या नजरेनेच पाह्यले आहे. आणि आता वेळ आली आहे समांतर रंगभूमीचे अस्तित्व पटवून देण्याची असं पुष्पा भावे म्हणाल्या. मुळात २० वर्षापूर्वी ही जागा समांतर व बाल रंगभूमी ला देण्यात आली होती. ती नंतर नाट्यपरीषदेने घेतली आणि समांतर/बाल रंगभूमी साठी एक वेगळा विभाग करायचे ठरले. आणि मग नाट्यसंकुल उभे राह्यले. आता समांतर साठीची जी जागा होती ती मातोश्री बिल्डर्स ला भाडेतत्वावर मॊलसाठी देण्यात आली आहे. ह्याचा विरोध अखेरपर्यंत केला पाहिजे हे सुलभा देशपांडे व इतर अनेकांनी सांगितले. हे सगळं चालू असताना जोरदार पावसाची सर आली तरीही कुणावर काहीही फरक पडला नाही. मोहन जोशीं छद्मी पणे हसत आले आणि त्यांनी निर्लज्जपणे तेच उत्तर दिलं आणि पळून गेले. हिंदी व इंग्रजी नाट्यजगतातले अलेक पदमसी, नादिरा बब्बर, फिरोझ खान (बॊलिवूड वाला नव्हे) दिनेश ठाकूर असे अनेक ज्येष्ठ रंगकर्मी आले होते. मराठी रंगभूमी विशेषतः मराठी प्रायोगिक रंगभूमी ही भारतीय रंगभूमी चं पहिलं पान आहे. आन-बान-शान आहे. तिच्यासाठी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. एक हाक घाला आम्ही येऊ. असं सर्वांनी सांगितलं.

पुढची मिटींग आविष्कार मधे आहे २३ तारखेला.

Bee
Friday, June 15, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहितीबद्दल धन्यवाद आणि इथे आम्हाला कळवत रहा काय होते शेवटी ते.

बरेच कसलेले कलाकार होते काल म्हणजे..


Asami
Friday, June 15, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज परीषदेच्या कार्यकारी समितीने हा ठराव मंजूर केला म्हणे ? कायदेशीररित्या जागा कोणाच्या मालकीची आहे ग ?



Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators