Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम.

Hitguj » Culture and Society » गीत - संगीत » शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम. « Previous Next »

Visoba_khechar
Saturday, March 17, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरंभ: १९/०३/२००७ - १७:३०
समाप्ती: १९/०३/२००७ - १९:३०
ठिकाण: सहयोगमंदीर सभागृह, घंटाळी, ठाणे(पश्चिम)
माहितीचा स्रोत: रोटरॅक्ट व ग्लिटरइट संस्था, ठाणे.
नमस्कार,

रोटरॅक्ट या संस्थेने राबवलेल्या नेत्रदान मोहिमेच्या प्रचारानिमित्त, या संस्थेने येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी शास्त्रीय संगीतातील बंदिशींचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.

गुढीपाडव्यापासून वसंत ऋतुचे आगमन होत आहे. या कार्यक्रमात वसंताचं स्वागत करणाऱ्या काही बंदिशींचे गायन होईल. बंदिशींमध्ये काही जुन्या पारंपारिक, तसेच अलिकडील काळातील काही बंदिशींचा सहभाग असेल. त्यात सौ धनश्री लेले व संस्कृतपंडित श्री अशोक गोडबोले यांनी शब्दबद्ध केलेल्या बंदिशींचा समावेश असेल.

धनश्री लेले व अशोक गोडबोले यांच्या बंदिशी, किराणा गायकीचे अभ्यासक श्री तात्या अभ्यंकर यांनी रागदारी संगीतात बांधल्या आहेत.

-- ऋतुबसंत --

आयोजक : १) रोटरॅक्ट व ग्लिटरइट संस्था, ठाणे. २) स्वानंदी परिवार, ठाणे.

गायक कलाकार : रघुनंदन पणशीकर, वरदा गोडबोले.

साथसंगत : समय चोळकर (तबला), अनंत जोशी (संवादिनी)

सुसंवाद व निरुपण : धनश्री लेले.

संकल्पना, सूत्रधार : तात्या अभ्यंकर.

सर्व इच्छुक मायबोलीकरांनी सदर कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे ही विनंती.

आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.

"बसंतचं लग्न" ही रागदारी संगीतावरची माझी ११ भागांची लेखमालिका इच्छुकांनी कृपया,

http://tatya7.blogspot.com/search/label/%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%82%20%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%20%28%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%29

येथे वाचावी.

अजूनही या मलिकेच्या पुढील भागांचे लेखन सुरू आहे.

धन्यवाद!



Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators