Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पद्य STY: कल्पना एक आविष्कार अनेक ...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव २००६ » STY » पद्य STY: कल्पना एक आविष्कार अनेक « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 28, 200620 08-28-06  8:47 pm
Archive through August 31, 200620 08-31-06  1:40 pm
Archive through September 05, 200620 09-05-06  5:51 am

Kedarjoshi
Tuesday, September 05, 2006 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस म्हणवुन घेण्यातच गौरव वाटेल तुला
आई म्हणाली,
का ग?. माझा ' गण ' तर देव आहे मी म्हणालो.

अरे गणांनी जर माणंस वागले असते
भांडन मग झालेच नसते
देश असे वाटल्या गेले नसते नी
माणस असे बाटल्या गेले नसते

गण बिन कुछ नही
दैवाचे चे ते दुसरे नाव
अरे वेड्या दैवावर विसंबला
त्याचे मिटले गेले नाव

आई म्हणाली

अरे सोन्या माझ्या बाळा
माझ्या घनश्यामा लडीवाळा
काम मात्र एक कर
नाव माणसांचे नेक कर

जातीचे ते नाव नको
नकोच ती जात नी नकोच तो घर्म
कर आता नेक ते कर्म
भेदभाव तो मिटवुन टाक
नी माणुसकीला जाग
रे बाळा माणुसकीला जाग


Vidyasawant
Wednesday, September 06, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सांगाव लागत आहे 'बाळा माणूसकीला जाग रे' कारण

माणूस हा माणूस राहिला नाही
कि त्यातली माणूसकिही राहिली नाही
स्वत्:साठी तो आता जगतो आहे
दुसर्‍यासाठी जगायच असत हेच
तो विसरत चालला आहे

तो स्वार्थासाठी जगत जाताना
परोपकाराची भावना पुसत चालला आहे
स्वार्थासाठी तो काहीही करायला तयार आहे
गरज वाटल्यास तो दुसर्‍याचा जीवही घेत आहे
त्याला फ़क्त स्वत्:च घर बांधायच आहे
स्वत्:च्या घरासाठी तो वीट न वीट जमा करत आहे
कमी पडल्यावर दुसर्‍याची भिंतही फ़ोडत आहे
तो शिखरावर चढू पहात आहे
पण.. वाटेत दुसरा आल्यास त्याला खेचू पहात आहे

'मी' पणा करताना तो आनंदित होत आहे
पण त्याचवेळी तो चुकिच्या पाउलवाटेने जात आहे

कोण त्याला सांगणार?
कोण त्याला समजावणार?
माणसातला माणूस परत केव्हा येणार?
आणि आला तरी माणूसकी किती उरणार?

विद्या.


Rupali_county
Wednesday, September 06, 2006 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि आला तरि माणूस किती उरणार?
उरुण तरि माणूस करणार काय?
करून तरि माणूस करणार काय?

जगन्या पाइ सरकारा ला जन्म दिला
आता हे सरकार करणार तरी काय?
भाण्डण, घोटाळा, लबाडी, आणि त्यात भर म्हणून काळाबाजार

शेवटी एकच म्हणन, लाव अक्कल देवाने दिलेलि
मग स्वतहा च मनातल्या मनात पुटपुटने
नको ते सरकार, नको तो खोटा कायदा
कायदा करुन करणार काय?
माणसाला त्याचा फ़ायदा च काय?

आता तूम्ही च बोला ह्या माणसा च करायच तरी काय?






Vidyasawant
Wednesday, September 06, 2006 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तुम्हीच बोला ह्या माणसाच करायच तरी काय?
त्याला काही समजत नाही मग समजवायच तरी काय?

प्रत्येक ठिकाणी वर पोहचायच आहे त्याला
शोधावर शोध लावायचे आहेत त्याला
प्रत्येक क्षेत्रात कुरघोडी करायची आहे त्याला
एकमेकांना नीच दाखवायच आहे त्याला
पाताळात जाउन आला
आता सौरमंडला बाहेरही पडू पहातोय
भूतलावर आजुबाजुस नजर मात्र फ़िरवत नाही आहे
दुसर्‍याकडे स्वार्थी नजरेने पहातो आहे
समोरच्याला खाऊ की गिळू करतो आहे

अस असुन सुद्धा
माणुसकी थोडाफ़ार ठेवून आहे
संकटाच्या वेळेस धावून येत आहे
मनापासुन मदतीचा हात देत आहे
पण दिवस सरताच समोरच्याची ओळख पुसून टाकत आहे

विद्या


Prasad_shir
Wednesday, September 06, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज या STY चा शेवट करायला हवा... कोणाला अजून इथे कविता पोस्ट करायच्या असतील तर कृपया कराव्यात.

भा. प्र. वेळेनुसार रात्री १० वाजता इथे जी कविता असेल त्यावर आधारित अशी concluding कविता मी पोस्ट करीन...


Prasad_shir
Wednesday, September 06, 2006 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवस सरताच समोरच्याची ओळख पुसून टाकत आहे
पण रात्र होताच एकटेपणाचं आभाळ माझ्यावर वाकत आहे

दिवसा तसे बेभान असतात, माझे श्वास... माझे भास
माझा मी मिळवत असतो माझ्यापुरते चतकोर घास
भासांपोटी, घासांसाठी ऊर फुटून धावत आहे
अन रात्र होताच एकटेपणाचं आभाळ माझ्यावर वाकत आहे

जगत जरी आहे असा, जगत आहे कशासाठी?
धावत जरी असलो इतका, धावत आहे कोणासाठी?
कशासाठी, कोणासाठी... उत्तरं सारी शोधत आहे?
तसंही रात्र होताच एकटेपणाचं आभाळ माझ्यावर वाकत आहे

प्रश्न मनात येतात तेंव्हा, उत्तरं सोपी वाटत रहातात
उत्तरं समोर दिसतात तेंव्हा प्रश्न अवघड बनत जातात
प्रशात उत्तरं, उत्तरांत प्रश्न, कशात काय गुंफत आहे?
तसंही रात्र होताच एकटेपणाचं आभाळ माझ्यावर वाकत आहे

एकटेपणाचं आभाळ असं दूर कितीही करू म्हटलं
आभाळाचं अनंतपण मनात माझ्या भरू म्हटलं
अनंतपण आभाळाचं शून्य बनून उरत आहे...
अन पुन्हा रात्र होताच एकटेपणाचं आभाळ माझ्यावर वाकत आहे

समाप्त


Kedarjoshi
Wednesday, September 06, 2006 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद ह्या STY च्या कल्पनेसाठी तुला धन्यवाद.

Ashwini
Wednesday, September 06, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, मस्तच रे. समर्पक शेवट केलास.

Maitreyee
Wednesday, September 06, 2006 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच प्रसाद! हे sty एकदम सही झालं! भाग घेणार्‍या सगळ्यांनाच श्रेय आहे..

Limbutimbu
Thursday, September 07, 2006 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा! मजा आली! :-) ..

Deepstambh
Thursday, September 07, 2006 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद मस्तच रे.. ..

Vidyasawant
Thursday, September 07, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद एकदम सही.
भावना खुपच मनातुन आल्यासारख्या आहेत.


Manishalimaye
Thursday, September 07, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.....................
.....................
......................
......................
......................
.......................
......................thanks. thanks a lot.

मनिषा




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators