Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
2005

Hitguj » Hitguj Diwali Ank: Aapli pratikriya ! » 2005 « Previous Next »

**********************
ihtgauja idvaaLI AMk 2005
**********************

  Thread Posts Last Post
Archive through November 13, 200535 11-13-05  5:36 pm
Archive through November 16, 200535 11-16-05  6:20 am
Archive through November 28, 200535 11-28-05  6:34 am

Neeraja
Monday, November 28, 2005 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंकातल्या सर्व गोष्टींवर प्रतिक्रिया नोंदवून झाली. यावर्षी अंकात काही साहित्य देता आले नाही पण अंकातल्या प्रत्येक वस्तूवर प्रतिक्रिया द्यायचीच असे ठरवले होते. ते झाले.
आधी म्हणल्याप्रमाणे, ही माझी प्रामाणिक मते आहेत आणि कुणीही माझे सगेसोयरे नाहीत की शत्रूही नाहीत.
आता मिलिंदाच्या ' अज्जुका बोलली' या उक्तीबद्दल. प्रत्येकवेळेला गोड गोड प्रतिक्रिया देणं मला जमत नाही, पटत नाही कारण ते खरं नसतं. सतत छान चान म्हणून ख़ुणाचीच प्रगती संभवत नाही. मी genuine प्रतिक्रिया दिल्या आहेत व देते. पण वरील वाक्यामुळे उगाचच काही नवीन लोकांच्या मनात माझ्याबद्दल चुकीचा ग्रह होऊ शकतो आणि त्यामुळे माझ्या प्रतिक्रियांबद्दलही. ही कोण आमच्या लिखाणावर असे बोलणारी ढुढ्ढाचार्य! असे वाटू शकते. मी कोणीही फार मोठी नाही पण माझ्यामते माझे वाचन, कलाक्षेत्रातला अनुभव, creative व्यक्तींशी असलेला सततचा संपर्क या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या प्रतिक्रिया अगदीच टाकून देण्यासारख्या नसाव्यात. नसतात असे अनेकांचे म्हणणे आहे. तसेच प्रतिक्रिया देताना personal attack मी करत नाही. झालाच तर पुढच्या लेखनाला काहितरी उपयोग व्हावा असाच या प्रतिक्रियांचा हेतू असतो.


Ashwini
Wednesday, November 30, 2005 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुस्तकाचा परिचय म्हणजे गोष्टच. लेखकाची शैली, लेखनाची रचना, लेखकाचे statement या व अश्या इतर गोष्टींवर लिहायचे असते तर त्याला परिक्षणच म्हंटले असते ना!

माझे वाचन बहुधा फारसे नसावे, कलाक्षेत्रातला मला विशेष अनुभव नाही आणि creative लोकांशी माझा मुळीच संपर्क नसतो. त्यामुळे परिक्षण, समीक्षा, टीका असल्या भानगडीत मी पडत नाही. एक साधीसुधी गोष्ट वाचली, आवडली. संपूर्ण अनुवाद करणं दिवाळी अंकाच्या कक्षेबाहेरच होत म्हणून मनात आल की याचा सारांश लिहावा. चार दिवसांच्या सहवासावर कुणी अवघ आयुष्य कसं काढू शकतं ही कल्पना मला खूप thrilling वाटली. सगळ्यांनाच वाटावी अशी अपेक्षा नाही. ज्याची त्याची कुवत वेगळी असते.

या कादंबरीबद्दल आणखी एक रेफरन्स द्यायचा झाला तर...

The 171-page hardcover novel written by Robert James Waller has been translated into 25 languages and over 12 million copies have been sold worldwide! On the New York Times Best Seller list for 3 years (and number 1 for 38 weeks), it topped Gone with the Wind in 1995 as the best-selling fiction book of all time
अधिक माहितीसाठी,
http://www.madisoncounty.com/novel.html

औस्करची सहा नामांकन मिळालेल्या चित्रपटासाठी या कथेचा वापर करावासा वाटला यावरून Mills & Boons च्या थोडस वरच असेल हे पुस्तक अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

असो. पुस्तक वाचावेसे वाटते की नाही हा निर्णय घ्यायला प्रत्येकजण मुखत्यार आहे. त्याच अनुषंगाने प्रतिक्रिया टाकून देण्यासारखी आहे की नाही हा निर्णयही वाचकांवरच सोपवलेला बरा.


HDA Sampadak
Thursday, December 01, 2005 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, हे आपलं नेहमीप्रमाणे ' वराती मागून आलेलं घोडं ' .

यंदाचा अंक pdf स्वरुपात खालील लिंकवर उपलब्ध आहे.


हितगुज दिवाळी अंक २००५ -PDF स्वरुपात

Prasad Mokashi
Friday, December 02, 2005 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा संपादक, मस्त काम केलत. धन्यवाद

SUMATI WANKHEDE
Tuesday, December 06, 2005 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या लिखाणावरील सर्व चान्गल्या वाईट प्रतिक्रियान्बद्दल मी सगळ्यान्ची अत्यन्त आभारी आहे. तरीही... माझ्या दोन्हीही कलाकृती निकृष्ट दर्जाच्या आहेत असे मला मुळीच वाटत नाही. स्वानुभव म्हणजेच सगळे काही नव्हे... इतरान्च्या अनुभुतीशी समरस होणेही तेवढेच महत्वाचे... तसे नसते तर ययाती, मृत्युन्जय, युगन्धरा यासारखी दर्जेदार पुस्तके किन्वा इतर ऐतिहासिक कलाकृती जन्माला आल्याच नसत्या. अर्थात मी स्वतःला तेवढी श्रेष्ठ लेखक मानतही नाही. आत्ता कुठे सुरवात झालेली आहे. पण मी नवोदित आहे असेही नव्हे.. 'भय इथले सम्पत नाही'बद्दल बोलायचे झाल्यास लोकप्रभाचे काही अन्क तसेच काही वर्तमानपत्रे वाचल्यानन्तरच मी हा लेख जबाबदारीने लिहिला आहे.तरीही... पुढल्या वर्षी हितगुजचा दिवाळी अन्क अधिक दर्जेदार निघण्याच्या दृष्टीने काही सुचना कराव्याशा वाटतात... एकतर वर्षभर येणार्‍या साहित्यातूनच योग्य वाटलेले साहित्य उचलणे किन्वा मायबोली'च्या माय बाप सम्पादक मन्डळाने नीरजासारख्या जेष्ठ समिक्षकान्ची समिती नियुक्त करून त्यान्च्या सल्ल्यानुसार दिवाळी अन्क काढणे. असे केल्यासच मायबोली'ला भरती' येइल अन्यथा ओहोटी' लागण्याचीच सन्भावना अधिक आहे.
पुनश्च धन्यवाद.


Milyaa
Thursday, December 08, 2005 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक : खूप खूप धन्यवाद

प्रतिक्रिये वर प्रतिक्रिया
अज्जुके तुझ्या प्रतिक्रीया वाचल्या... तूझी प्रामाणिक मते वाचुन छान वाटले आनि तुझे कौतुकही

सहसा हितगुजवर कोणी negative feedback द्यायच्या भानगडीत पडत नाही.. आवडले तर लगेच स्तुती करतात पण नाही भावले तर गप्प बसणे पसंत करतात. (त्यांचेही बरोबर असते कारण अशी किती लोक असतात जी टीका सहन करु शकतात?)
पण त्यामुळे लोकांना आपण लिहिलेले नक्की का आवडले नाही हे कळायला मार्ग उरत नाही.

बाकी गाढवा विषयी तू जे लिहिले आहेस त्यावर भेटलो की नक्की बोलुयात


Meggi
Saturday, December 17, 2005 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am not able to access the HG Diwali Ank link.

Meggi
Saturday, December 17, 2005 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am not able to access HG Diwali ank - PDF link.

Sampadak
Saturday, December 17, 2005 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

That website (pdf link) is in maintainance/upgrade mode. Please try on Monday December 19th.

Shilpa Choudhari
Tuesday, June 13, 2006 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिश सोनारांची जेलची हवा छान आहे.
माझी एक मैत्रिण एरोडा जेलच्या जवळच म्हणजे १० - १५ मिन. वर रहाते. तिच्याकडे पहिल्यांदा गेले होते तेव्हा मुद्दामून जेल बघायला गेलेलो. त्या दिवशीच कुठलातरी कैदी सुटणार होता. आम्ही समोरच्या पारावर बसलो होतो तर एक हवालदार येऊन आम्हाला म्हणतो तुमचा कोणी कैदी सुटणार आहे का आता. माहीत नाही का पण आम्ही धुम चकाट पळालो.:-)


Deepak R. Kulkarni
Friday, August 04, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi all of u,

I know it's to late but when i gone through
"Hitiguj 2005" i found that it is very nice.

All u guys are really great. I must say that u have done very good job.

Now I would like to about Sumati's "Bhai ithle sampat..."

Do u know who was MANU???? as it is mentioned in 3rd part please provide me some info. about him any kind of books / links any thing.

and i am still waiting for your reply on Saniya's e-id / ph. no etc.

bye tk cr

deep



Add Your Message Here
Post:
Username: Posting Information:
This is a private posting area. Only registered users and moderators may post messages here.
Password:
Options: Automatically activate URLs in message
Action:

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators