Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 29, 2006

Hitguj » Hitguj Diwali Ank: Aapli pratikriya ! » 2006 » Archive through October 29, 2006 « Previous Next »

Swaatee AmboLe
Thursday, October 26, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्च्या, मी फक्त लेखनाबद्दलच लिहीलं. तसं पहिल्या प्रतिक्रियेत अंक देखणा आणि श्रवणीय झाल्याचं म्हटलं होतं, पण त्याबद्दल सविस्तर लिहायचं राहूनच गेलं.

रुपेश, रचना, फ ( यांचे स्पेशल आभार.. कहाणी ' हिट' होण्यात यांच्या चित्रांचा मोठा वाटा आहे.), नीलू आणि प्रमोद, सर्वांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. सगळीच चित्रं, रेखाटनं मला खूप आवडली.

तसंच रांगोळी आणि प्रेमाचा रिंगटोन हे दोन्ही नवीन प्रयोगही छान.

या सर्व कलाकारांचं हार्दिक अभिनंदन!!


Deepali Deshpande
Thursday, October 26, 2006 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिप्राया बद्दल सगळ्यांना धन्यवाद !
रचना ,
काढ कि अजुनही वेळ मिळाला कि ते चित्रं ..
तुझ्या BB बर टाक आणि माझ्या article ची link दे:-)
मला खूप आवडेल पहायला !!
अजुन माझा बराचसा अंक वाचून झाला नाही ..
तरी
श्र ,
तुझी दीर्घकथा आणि फ चे चित्रं छान आहे . :-)
तसा END चा अंदाज आला होता तरीही तू portray केलेली characters आणि वातावरण निर्मिती मुळे वाचताना मजा आली .
अगदी डोळ्या समोर आली गोष्ट ( हिंदी तून ) घडताना !


SND
Friday, October 27, 2006 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा हा पहिलाच मेसेज आहे. अतिशय सुन्दर साईट आहे हि. दिवाळी अन्क तर उत्तमच आहे. अजून सगळा वाचायचा आहे.

मुखप्रुष्ट (चुकल लिहायला) तर फ़ार मोहक आहे.


Bee
Friday, October 27, 2006 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक, स्पर्धेसाठी जे साहित्य उत्तम ठरलं त्यात फ किंवा रचनाच्या चित्रांचा समावेश करणं पुर्णतः अयोग्य आहे. अशी चित्र काढली की स्पर्धा साहित्य आणखी देखण रुचकर होतं जे खर तर चुकीचं आहे. ही स्पर्धा आहे. इतरांची कणभर मदतही स्पर्धकांना मिळायला नको.. even after winning the competetion! ते साहित्य ज्या मुळ रुपात होतं तसच इथे मांडायला हवं होत. असो.. ह्या वेळी नाही तर पुढल्या स्पर्धांच्यावेळी ही बाब विचारात घ्या.


VJ SAWANT
Friday, October 27, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrs Mule yancha diwali ankatala lekh wachala. ek veglach anubhav ahe .....samajat khup kahi ahe ,sukh ,dukkha ,.....ya donhipalikadche hi je redlight area madhil shriyana prateek skhnala anubav lagtey .......samajala 'changlya SASKARACHI ' garaj ahe .......aapla samaj paise ,ezzat,manpan,shikshan ,samruddhi ...ya gostit jet chya speed ne challa ahe ....pan CHANGLE SANSKAR ....susaskrut samaj ghadvine ....ashkyaprai gost zaliye ............here i can tell due to illeteracy ---poverty.....population ....and changalwad ....gunhegari.....mag prostitution .......hi chain ahe .....jar literacy war bhar dila tar bakichya gosti apoap nasta hotil......karan literacy ani education samajala pahije aslel sagal kahi milun det ....bhawanic majbuti pan ..........ani ya madhe aaplya sarv tarun pidhicha hatbhar asne ek changlya samajache lakshan ahe ....... jyanche jeevan arthhin zaley tyana asheche kiran phakta hi janiv karun deil jevha tyanchi mule ,muli shikun mothe honyacha aatmviswas tyana milel ........

suhasini
Friday, October 27, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त मायबोलिकरांना दीपावली च्या हार्दीक शुभेच्छा!!!!

दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ केवळ अप्रतिम...लाजबाब आहे. रुपेश चे हार्दीक अभिनंदन!!! बाकी अंक वाचून व्हायचा आहे... देखण्या मुखपृष्ठानेच बाजी मारली आहे.



Jhuluuk B
Friday, October 27, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिप्राय देतेय दिवाळी अंकाचा... अजुन पुर्ण नाही वाचला... जितका वाचलाय त्याबद्दल..

मुखप्रुष्ठ अप्रतिम
भावशिल्प मधले हैदियाल गोधडी राजामणी खुप आवडले.
युद्धस्य कथा रम्या हा पण वेगळा लेख वाटला.
मायबोलीची कहाणी वाचताना मजा आली. त्यातील चित्रे अतिशय उत्तम रेखाटली आहेत.

_झुळूक




Snehal Mutalik
Friday, October 27, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज च दिवाळी अंक वाचायला घेतला...
मुखपृष्ठ सुरेख आहे... पाण्यावरचे तरंग लाजवाब!!!
फ आणि रचना अभिनंदन... जेव्हढी चित्र बघितली आहेत ती सगळीच आवडली आहेत... विशेष करून स्वातीच्या लेखातील...
प्रसाद, विडंबन छान च!!!
मिनोती, pottery वर सुंदर लिहिलं आहेस ग... सहा प्लेट कुठे पुरणार मायबोलीकरांना जेवायला बोलावल्यावर :-)
स्वाती, व्रताचे उद्यापन करणार का? :P


Poonam
Friday, October 27, 2006 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंध वाचून झालं.. सगळेच अनुभव अप्रतीम. एक वेगळं सदर होतं हे आणि अतिशय वाचनिय..
राजेशनी धमाल लिहिलय :-) आणि राधाचा कोरीयाचा अनुभाव फ़ार छान.. प्रथमच कोरीया बद्दल वाचलं!


Moderator
Friday, October 27, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/46/118633.html?1161945142

दिवाळी अंकात काय घेतले जावे, संपादन बरोबर आहे किंवा नाही आणि इतर 'प्रतिक्रिया नसलेली' पोस्ट्स वरील ठिकाणी हलवली गेली आहेत. कोणतेही पोस्ट उडवले गेलेले नाही. कृपया आपली संबंधित पोस्ट्स त्या ठिकाणी टाकावीत.

सहकार्याबद्दल धन्यवाद!


Sampadak
Friday, October 27, 2006 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी आणि इतर,

वर
या पोस्टमध्ये स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांचा उल्लेख आहे, त्यासंबंधी..

अंकातील सर्व रेखाचित्रे ही अंकाचे (प्रथम / द्वितीय) संपादन पूर्ण झाल्यावरच काढली जातात. याचा उद्देश असा असतो की जे साहित्य निवडले गेले आहे त्यासाठीच काम केले जावे आणि निवड न झालेल्या साहित्यासाठी रेखाचित्रे काढण्यात वेळ खर्च होऊ नये.

स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका या परिक्षकांनी दिवाळी अंक प्रकाशित होण्याआधी, त्यांच्या मूळ रूपात पाहिल्या / ऐकल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही रेखाचित्राची एखाद्या प्रवेशिकेला मदत होण्याची शक्यता नाही.

कोणतीही प्रवेशिका ही तिच्या मूळ गुणवत्तेवरच तपासली गेली पाहिजे याबद्दल संपादक मंडळास कधीही शंका नव्हती आणि नाही.

sarang
Friday, October 27, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वप्रथम जयश्री चे आणि स्वातीचे अभिनंदन...
जयश्री तुझा आवाज सुरेख आहे... खुप आवडलं ते तु माझी मायबोली... सहीच!!!
स्वातीची कथा फारच छान आहे...

real prise winning work by both of you! Congratulations!

आता माझ्या आवडत्या विभागाविषयी...अलगुज

१. देहमेणा :
या कवितेतले चित्र पिके ने म्हटल्याप्रमाणे सुरेख आहे!

२. उकल :
चांगली बाजू
अतिशय मोजक्या शब्दात त्यांचा संग अधोरेखित केला आहे!
शांत, शितल, सात्विक शब्दांचा वापर... हळूवार प्रेमाची अनुभूती!

वाईट बाजू
शेवटच्या कडव्यात वाईट जातीभंग... ( शेवटच्या कडव्यात दोन ओळींमध्ये सात अक्षरे )
त्यामुळे वाचताना सहजता शेवटच्या कडव्याच्या दुसर्‍या ओळीपाशी थांबते... :-(

थोडा बदल करावासा वाटला...

तृप्त असुनी जिवाची
कशी होई घालमेल
दवातल्या उखाण्याची
आता शोधते उकल!


आणि

दवातली ओल मग
उतरली पापण्यात


या ओळी काहीश्या दुर्बोध...

एकुण छान कविता!

३. अशा सांजवेळी :
चांगली बाजू
अतिशय उत्कट आसक्ती शेवटच्या कडव्यातून प्रतीत होते...
प्रेमरसात भक्ती डोकावल्याने एक सुरेख नजाकत येते!
वा!!!

वाईट बाजू
आठवणींची काळोखी... ही उपमा एकंदर तितकी समर्पक वाटली नाही...
किंवा कवितेच्या आवेगाला बाधा आल्यासारखे वाटते... जर आठवणींचा पाऊस, किंवा आठवणींची बरसात... अस जास्त छान वाटलं असत...
तसच पहिल्या चार ओळींमध्ये दुसर्‍या आणि चौथ्या ओळींमध्ये अनुक्रमे स्त्रीलिंगी आणि नपुंसकलींगी उल्लेख आल्यामुळेही काहीसा वाचताना अपेक्षाभंग होतो...

कविता एकंदर ठिक वाटली... शेवटच्या कडव्याने मजा आली!

४. अमृतशिंपण :
चांगली बाजू
पुर्वार्ध आणि उत्तरार्ध छान चित्र रेखाटतो...
वळिवाचा पाऊस आणि त्याने आणलेली भेट छान रंगवलेली आहे! ( वळिवाच्या पहिल्या... )

वाईट बाजू
सहजता नाही...
कडकडा कडाडून गेली आणि सडसडा सडाडून गेली या दोन्ही ओळी वेगवेगळ्या गोष्टींचे विशेषण सांगतात... अनुक्रमे वीज आणि पाऊस किंवा पावसाची सर...
त्यामूळे पहिल्या भागात अपेक्षा वाढतात आणि दुसर्‍या भागात अपेक्षाभंग होतो...
तसेच गरगरा ही गिरक्या घेत... कसं काय? गरगरा हा गिरक्या घेत असावं असं वाटलं... त्यामुळे सहजता गेली आहे...
कडकडा कडाडून गेली
माझा ऊर धडाडून गेली
वीज असा कल्लोळ ओकूनी तेजाळुन गेली!

असं काहीस अपेक्षित होतं...

एकुण कविता चांगली आहे.

५. गिफ्ट :
चांगली बाजू
गाभा फार छान!
गिफ्ट दाखव उत्सुकता ताणली आहे...
विशेष काही नाही गं एक कविता आणली आहे...
वा!!! सुंदर...
कवितेलाच कविता द्यायची म्हणजे काहरच आहे...!!!

कविता आपलं स्वतःच द्वयर्थीपण जपते हे महत्वाचं. ज्याला हवा त्याने तो अर्थ काढावा!
एक म्हणजे प्रेमकविता... सरळ सरळ
आणि दुसरा अर्थ म्हणजे... ती म्हणजे आपलं मन... रोजच्या ताण तणावात, जगण्याची मारामार होताना कुठेतरी आपल्याला काय आवडतय ते करण्याची धडपड... स्वतःला कविता करून बरं वाटत असेल म्हणून मग कविताच करायची आणि स्वतःला भेट द्यायची... रोज एक तरी! आणि त्यातच सुचते उद्याची गिफ्ट!!!
मग इथे जगातल्या अनेक भव्य दिव्य भौतीक गोष्टी छान उपमेतून येतात... उंची मायाजाल, झुंबरे, लामणदिवे वगैरे...
भौतीक सुखांचा सोस शरीरापेक्षा मनाला अधिक... म्हणून मग कवी खजील होतो हे सांगताना की त्याने एक कविता आणली आहे... वा! बेहद्द सुंदर!!
इतरांप्रमाणे आपलं मनही कुरबुर करेल ही भीती मनात आहेच!
तश्यात तू हात पुढे केलास... अपेक्षांच दुःख किती खुळं असतं हे दाखवण्याचा एक सुंदर यशस्वी प्रयत्न!
एक एक ओळ जळजळीत वास्तव वाटते ही जमेची बाजू धरावी...

वाईट बाजू
ते झुंबर, ते लामणदिवे... सगळं सगळं विसरलं...
गडबड आहे... उगाच पसरलं ला यमक म्हणून विसरलं आलय का? कोण विसरलं हे संदिग्ध आहे...

६. होतो तसाच आहे मी :
चांगली बाजू
वा! मतला फार आवडला!!
...वेडापिसाच आहे मी! वा! वा!! वा...!!!

वाईट बाजू
थकलो अताच आहे मी... म्हणजे एवढ्यातच किंवा इतक्यातच थकलोय अस म्हणायचय का? मग आत्ताच असं हवं.
मला असा बदल करावासा वाटला...
श्वास मोजतो उरलेले
थकलो बराच आहे मी
... किंवा खराच पण चालेल...
तरीही उभाच आहे मी... इथे एक मात्रा जास्त होते आहे... तरिही अस हवं. उच्चार तरी तसाच होतोय...

एकूण गझल छान!

७. न तू आज तेथे :
चांगली बाजू
प्रिया आज माझी नसे साथ द्याया... ची आठवण झाली!
सहज सुंदर भाव...!
भुजंगप्रयाताचा चांगला वापर!

वाईट बाजू
दुसर्‍या कडव्यात भुजंगप्रयात चुकला आहे...
न तो श्वास आरक्त, न तो स्पर्श ओला
ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा
आरक्त... इथे चूक आहे! क्त या जोडाक्षरामुळे र दीर्घ होतो...
वृत्त सांभाळायचं असल्यामुळे साध्या साध्या शब्दांचीही भलतीच ओढाताण झाली आहे... उदा. शशीचेहि, तूझा, नाहि... वगैरे... कऊपया काळजी घेणे

एकुण छान कविता!

८. बहुदा :
चांगली बाजू
वा! एक उच्च कविता!!
द्वयर्थी तर आहेच!
त्याचं आणि तिचं प्रेम हा पहिल अर्थ,
आणि... तो म्हणजे आयुष्य... ती म्हणजे आयुष्याला सामोरा जाणारा कोणीही... वा! सुंदर...!
असं आपापलं राहून... फार छान कल्पना...
तसे सगळेच एकएकटे असतात...
जिंदगी यूं हुई बसर तन्हा
काफिला साथ और सफर तन्हा...


टीप : मला तरी इथे कोणत्याही प्रकारचे विवाहबाह्य वगैरे संबंध आढळले नाहीत... हा चोरटे असावेत असे वाटते, पण ते लग्न न केलेल्यांचेही असतातच की! इथे आक्षेपार्ह तर मुळी म्हणजे मुळीच काही नाहीये हे आवर्जून सांगावसं वाटलं.

वाईट बाजू
गरज नसतानाही हिंदी शब्द वापरले आहेत...
धूंवाधार ऐवजी मुसळधारही चाललं अस्तं :-)
तसंच गुमसुम...

एकुण कविता उत्कऊष्ठ!

९. आभास :
चांगली बाजू
ठिक आहे...

वाईट बाजू
चांगली बाजू लिहिताना विचार करावा लागतोय...
कविता गंडली आहे असं माझ प्रामाणिक मत आहे...
मी समजावले मनाला... मग तरीसुद्धा प्रश्न कसले?


१०. रान :
चांगली बाजू
नादमयता हा गुण कवितेच्या नसानसात आहे!
शेवट फार छान आणि चटका लावणारा आहे...
कवयित्रीच्या हळवेपणाची जाणिव करून देणारा आहे...

वाईट बाजू
शेवटच्या कडव्यात वाईट जातीभंग...
असा बदल करावासा वाटला...
वणवा रानात
ठिणगी पानात
काहिली काहिली
माझ्याच मनात
... माझिया मनात असं ठेवलं असत तरी चाललं असतं.
काही उपमा असंबद्ध... जसे माधुरी पानात...
सारखं सारखं रानात, पानात आणि मनात काय आहे ते पहावं लागतं :-)

एकूण कविता खुप छान!

११. तुला पाहता :
चांगली बाजू
भुजंगप्रयाताचा अप्रतीम वापर!
कुठेही ओढाताण नाही... ( कलश अमृताचे सोडून )
प्रत्येक शेर एक सुंदर अर्थ घेऊन येतो...
गझल चुटपुट लावते ही सगळ्यात मोठी जमेची बाजू!

वाईट बाजू
मला मान्य प्रत्येक श्वासात लाटा
तुझ्या वादळाने उरी वावरावे...


हा शेर अर्थाच्या दृष्टीने थोडा जड आहे... नसता तरी चालला असता...

एकुण सुंदर गझल! मला विशेष आवडली...!!

१२. वाटचाल :
चांगली बाजू
विषय छान!
शेवटच्या दोन ओळीही छान आहेत...

वाईट बाजू
मध्ये सगळं गंडलयं. मांडणी पुर्णपणे चुकली आहे... विषय छान असुनही कुठेतरी वाचताना सारखं बाहेर टाकते कविता...
पहिल्या कडव्यातच फसगत आहे...
बाहेर उघड्या पडलेल्या आणि आतून आतून एकमेकांमध्ये... हे काहीतरी चुकतय...
कविता पिंपळाचं जिर्ण पान वाचकाच्या मनात उभ करत नाही... त्याला कल्पनेवरच तहान भागवावी लागते.
वाटचाल हे शिर्षक काही पटलं नाही.

एकुण कविता ठिक.

१३. वाट :
चांगली बाजू
शेवटची दोन कडवी वाचली तर एक छान कविता होते!

वाईट बाजू
पहिल्या कडव्याच आणि पुढच्या दोन कडव्यांचा संबंध लागत नाही...
कोणाला लवकर परत ये म्हणाले ते स्पष्ट नाही.

कविता ठिक आहे.

१४. लखलखता पाऊस :
चांगली बाजू
सुंदर! साधा सरळ अनुभव छान शब्दांत प्रभावीपणे मांडलाय!
कविता आवडली!

वाईट बाजू
चौथ्या कडव्यात वीज पडते असा उल्लेख नाही.... तो आवश्यक वाटला, आणि फोन या शब्दाची द्विरुक्ती वाचनास अडथळा आणते.
सातव्या कडव्यात एक गोष्ट चुकली आहे. पाऊस पडायच्या आधी आणि पाउस पडताना तारे कधीच दिसत नाहीत... मग हा कवी कुठल्या तारका मोजतोय? ११ व्या कडव्यात कवीही हेच म्हणताना दिसतो... चंद्रकिरणांचे ओझे... म्हणजे कवितेत विचार मांडताना विरोधाभास आला आहे. काळजी घ्यावी...

एकुण कविता आवडली! छान आहे!!

१५. कशाला हवी?
चांगली बाजू
भुजंगप्रयाताचा वापर छान!

वाईट बाजू
अर्थाच्या दृष्टीने दुर्बोध. कवयित्रीला काय म्हणायचे आहे माहित नाही...
पुसोनी कशा टाक आतील वाटा... यचा अर्थ काय? पुसून टाक, कसे! असं तर नाही म्हणायच कवयित्रीला? मग हा वापर चूक वाटतो.
त्यापेक्षा... पुसोनी अता टाक आतील वाटा... असा बदल करावासा वाटला.
बर्‍याच ठिकाणी भुजंगप्रयात चुकला आहे...
उदा : पहिल्या कडव्यातील शेवटची ओळ... जीवाला... जी दीर्घ नको ह्रस्व हवा. जिवाला असा...
दुसर्‍या कडव्यातली पहिली ओळ... ... राहू... हू दीर्घ नको. राहु असं हवं.
पुसोनी कशा टाक आतिल वाटा... इथे आतिल चुकले आहे... ते आतील असे हवे.

१६. ग्रहण :
हे हे हे... माझीच आहे :-)

१७. पुण्य :
चांगली बाजू
वा!!! सुंदर आहे कविता... विभत्स रसाचा सात्विक वापर अभावानेच आढळतो!

वाईट बाजू
काहीच नाही!

खुपच आवडली कविता!

१८. सम :
चांगली बाजू
वा हेम्स! खुप छान रंगवलीये तारुण्यातली खळबळ... खिशात दमडी नसतानाही जगावर मालकी सांगणारी ही तारुण्यातील अवस्था कवितेत छान प्रकटली आहे!
शेवटची द्विपदी तर खासच आहे!!

वाईट बाजू
काहीच नाही

खुप आवडली!

१९. || तमसो मा जोतिर्गमय || :
चांगली बाजू
एक नितांतसुंदर कविता!
जो जाणेना पण जाणे की तो जाणे ना काही
तो मनुष्य आहे शुद्ध त्यामध्ये सखा जवळचा पाही!
... असं वाटलं!
सुंदर मांडणी.
विषय जास्त आवडला की मांडणी हे सांगता येत नाही ही जमेची बाजू!
लहान पण खुप काही सांगणारी!

वाईट बाजू
काहीच नाही...

खुपच आवडली...

२०. तरी :
चांगली बाजू
कवितेचा आकृतीबंध छान!

वाईट बाजू
बराच विचार केला, खुप प्रयत्न केला कविला काय म्हणायच आहे याचा, पण छे! कवी दाद लागू देईल तेंव्हा ना...
काही कळली नाही! ( ती कविता खरच दुर्बोध आहे म्हणून )
आकृतीबंध छान असला तरी तो तसा मांडला गेला नाही...
ग्रेस यांच्या कविता कळतात. निदान त्यातली नादमयता तर कहर असतेच. पण ही काहीच कळतही नाही आणि नावाला सुद्धा नादमय नाही...
हे उदाहरण पहा...
कंठात दिशांचे हार
निळा अभिसार
वेळुच्या रानी..

हा आकृतीबंध आहे... पण शब्दांमध्ये लय, ताल, नाद पहावा.
असं काहीही तरी या कवितेत जाणवलं नाही...

एकुण फसलेली कविता!

२१ निळी वेलांटी :
चांगली बाजू
निळी वेलांटी, ही कल्पना छान आहे!
सैरभैर, रंगविरली आणि रंगबावरी रांगोळी!

वाईट बाजू
सैरभैर, रंगविरली आणि रंगबावरी या उपमांमुळे रांगोळीच वेलांटीपेक्षा जास्त भाव खावून जाते...
आणि रंगबावरी रांगोळी पहिल्या उपमांना पोषक वाटत नाही ही दुसरी खंत...

एकुण कविताही ठिक ठाक...

२२ नीळभुली :
चांगली बाजू
निळाईचा वापर जोरदार आहे...!

वाईट बाजू
निळाईचा वापर जोरदार आहे..., पण समर्पक नाही...
पहिल्या कडव्यात निळ्याई की निळाई?
निळे निळे अपचन झाले...

एकुण कविता ठिक आहे

सुचना : निळाई वरची बा भ बोरकरांची कविता वाचावी आणि तशीच काळ्या रंगावरची संदीपची...

२३. पाऊस फिरकला नाही :
चांगली बाजू
वा! एक सुंदर कविता... अष्टाक्षरी छान जमली आहे...
सुरेख मांडणी आणि सुरेख विषय ही सगळ्यात मोठी जमेची बाजू!!!
सुंदर कविता!

वाईट बाजू
फसलेली गझल वाटली...
पहिल्या कडव्यासारखी सहजता पुढे जाणवली नाही...

टीप : प्रकाशचित्र सुरेखच आहे!

ही कविताही खुप आवडली...

आता मला सगळ्यात जास्त आवड्लेल्या कविता म्हणजे... गिफ्ट, तमसो मा जोतिर्गमय, तुला पाहता, पुण्य, सम आणि पाऊस फिरकला नाही...
या सहाही कविता उच्च!!!

सगळ्यात शेवटी, चित्रकारांचे विशेष आभार... फार सुरेख चित्रे काढली आहेत त्यांनी या अंकासाठी!!!

टीप : प्रत्येकाला आपापले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे त्यामुळे इथे साहित्य प्रकाशीत झालेल्या कवी आणि लेखकांना माझी विनंती आहे की त्यांनी भल्या बुर्‍या दोन्ही प्रतिसादांसाठी तयार रहावे... आणि उगाच अगदीच निरर्थक वाटणार्‍या अभिप्रायांवर खुलासेदार चर्चा करु नये.
आणि ही बाजुही तितकीच महत्वाची की स्वातंत्र्याचा वापर कुणी किती करावा... हे ज्याचे त्याने ठरवावे पण उगाच समीक्षण देता देता दुसर्‍याला दुखवू नये... पटेल असेच लिहा... प्रतिक्रीयेमागे अभ्यास आणि प्रामाणिकपणा असू द्या... समीक्षणाला तटस्थता आवश्यक आहे! आणि हो... पिके म्हणाला वाचताना काही अपेक्षा असतात तर तसा पुर्वग्रह ठेवून कुणाचेच लेखन वाचू नये... काय खर ना?!

सगळ्या कविंना माझ्यातर्फे पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!!


Anand Gowande
Saturday, October 28, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या प्रतिक्रीया वाचून गम्मत वाटते. आपण एखाद्या गोष्टीतला भाव, बाह्य गुणदोष दूर सारून सहज का स्विकारू शकत नाही असा प्रश्न पडतो. प्रत्येकाने दिवाळी अंक वाचून प्रतिक्रीया द्यायलाच आणि त्यात सहित्याची, विशेषत्: कवितांच्या आकृतीबंधाची किंवा व्याकरणाची चिरफ़ाड करायची खरच काही गरज आहे का? त्यापेक्षा एक सुंदर कल्पना किंवा किमानपक्षी एक सुंदर प्रयत्न म्हणून त्याचा आनंद का घेऊ नये? अशा प्रतिक्रीयांनी वाद होण्याचीच जास्त शक्यता आहे. एकंदर गुणवत्तेवर काही परिणाम होतोय अस तरी नक्कीच जाणवत नाहीये.

Jayashree Ambaskar
Saturday, October 28, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोस्तांनो, इतक्या भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल.......... तहे दिल से शुक्रिया :-)

माझा हा नवा प्रयत्न तुम्हाला आवडला...... मला सगळं भरुन पावलं.

दिवाळी अंक मात्र अजूनही वाचून झाला नाहीये :-(


GS
Saturday, October 28, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कविता सोडुन इतर सर्व विभाग झाले वाचून.

मला शोनूची राजामणी ही कथा आवडली, खर तर एका दीर्घकथेचा आवाका आहे त्यात, त्यामुळे थोडे अजून विस्ताराने लिहायला, खुलवायला हवे असे वाटते.

दैव जाणिले कुणी सफाईदार शैलीत लिहिली आहे.

आधारमध्ये काय म्हणायचे आहे ते काही नीट कळले नाही मला. समोर दिसतो त्याहून काही अजून अर्थ असावा असे वाटते. लेखकाला वा इतर कुणाला जमल्यास खुलासा करावा.

मैत्रेयीची हैदी छानच उतरली आहे.

रचना, गिरी आणि सोनचाफाचे लेख आवडले. रुचाचाही एकदम सच्चा लेख, मात्र शेवट थोडा घाईघाईत गुंडाळला असे वाटले.

सईचा लेख फारच एकांगी वाटला. अशा विषयांवर लिहिण्यापुर्वी विषयाच्या दोन्ही बाजूचा, त्यातल्या तांत्रिक आणि आर्थिक खाचाखोचांचा पुरेसा अभ्यास असणे आवश्यक आहे असे मला वाटते. त्यातही संजय संगवईसारख्या पाकिस्तानचा पाहुणचार झोडुन आल्यावर ताबडतोब काश्मीरबद्दलचे पाकिस्तानी तुणतुणे मराठीतून वाजवणार्‍यांवर किती विश्वास ठेवायचा याचेही तारतम्य बाळगणे आवश्यक आहे असे मला वटते.

सामाजिक कार्यकर्त्यांनी जसे रिलायन्सच्या हातातले खेळणे न होण्याची काळजी घ्यायला हवी तशीच भारताच्या आर्थिक विकासाला खीळ घालण्याच्या कम्युनिस्टांच्या कटातले साथीदार तर अजाणता होत नाही ना याचीही खबरदारी घेतली पाहिजे.

जयावीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल.

मुखपृष्ठासहित सर्वच बाबतीत एक देखणा अंक काढल्याबद्दल संपादक मंडळ आणि सर्व लेखक, कवी, चित्रकार, नेमस्तक, ऍडमिन आणि प्रायोजक या सर्वांचे अभिनंदन.



zakki nagpuri
Saturday, October 28, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर मला 'वांगमया' तले काहीच कळत नाही. पण मी सगळा अंक वाचला. नाहीशी होणारी जमीन, इ.पण Interactive इ. चालू तंत्रज्ञान वापरून केलेला अंक हा नक्कीच इतर अंकांपेक्षा प्रगतीकारक आहे!

अंक वाचण्यापूर्वी,दुर्दैवाने ऑगस्ट महिन्यात येथिल (म्हणजे उत्तर अमेरिका खंडातील) एक प्रसिद्ध मासिक, जे कॅनडा हून प्रसिद्ध होते, पण अमेरिकेत त्याचे सद्ध्याचे संपादक आहेत, त्यांना भेटलो. त्यांच्या मते मायबोलीतले साहित्य वाचण्याजोगे नसते असा सरसकट शेरा दिला. नक्कीच संकुचित मनोवृत्तीचा माणूस. 'सगळेच' कसे टाकाऊ असेल? त्यांनी केला का कालानुसार मायबोलीसारखा प्रयत्न? त्यांच्या मते व्याकरण फार वाईट असते? हे आता कुणि ठरवायचे?? १७८० सालच्या मराठीचे नि आजचे या व्याकरणांत सुद्धा फरक असेल, मग?


rupesh r.talaskar
Saturday, October 28, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुखपृष्ठाला दिलेल्या भरभरुन प्रतिसादाबद्दल.......... सगळ्यांना धन्यवाद !

original post
http://rupeshtalaskar.blogspot.com/ ithe
aahe


Radhika
Sunday, October 29, 2006 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम आणि रचना बर्वे तुमच्या प्रतिक्रीयांबद्दल आभार.
पहिल्यांदाच लिहिल्यामुळे नक्कि काय करावे हे ठरत नव्हते.त्यामुळे आता बाकिचा अंक बघताना जाणवते की मी पण चित्रे टाकायला हवी होती. अर्थात माझ्याकडे खास अशी काहि चित्रे नाहीत पण जमवता आली असती. बघू पुढच्या वेळेस.....
पुन्हा एकदा आभार


vikram sawant
Sunday, October 29, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mr sarang ru professional in the this field ,? so many comments from u on each part .

Rahul Phatak
Sunday, October 29, 2006 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर तर अर्धवट प्रतिक्रिया (ह्याचा अर्थ 'अंक अर्धवट वाचून दिलेली प्रतिक्रिया' असा आहे. सोयीस्कर अर्थ कृपया काढू नये ! ) देणे बरोबर वाटले नाही कारण अजून फार काही वाचून झालेले नाहीये .. (आठवडाभर शहराबाहेर असल्याने) शिवाय अंक प्रसिद्ध होण्यापूर्वीही महिनाभर फ्रान्सला होतो त्यामुळेही वाचून व्हायचाय (ह्याचा खर तर 'अंक न वाचता येण्याशी' थेट संबंध नसावा पण मग असे 'सहज म्हणून' उल्लेख केल्याशिवाय मी परदेशात जाउन येउन असतो हे तुमच्या मनावर ठसणार तरी केव्हा ! )
असो. तर तरीही..

संपादक मंडळाचे अंक वेळेत प्रसिद्ध केल्याबद्दल अभिनन्दन ! त्यानी आणि स्वयंसेवकांनी घेतलेले कष्ट आणि दिलेला वेळ ह्याबद्दल कौतुकाची थाप (म्हणजे खरीखुरी) !

आवडलेल्या गोष्टी :

१. रुपेश ह्यांचे मुखपृष्ठ सुंदर आहे.. आकाशकंदीलाच्या चुटुक रंगांचा छान उपयोग केला आहे. काय म्हणायचे आहे चित्रातून ते छान व्यक्त होत आहे.

२. खूप बदलला नसला तरी अंकाच्या format मधला बदल सुखावह आहे. banner मधली रांगॉळी सॉलीड न घेतल्याने 'रांगोळीपण' टिकले आहे ! ( granular effect )

३. जयावी ह्यांचे 'तू माझी मायबोली' छान आहे. त्यांचा आवाज तर छान आहेच पण recording ही चांगले झाले आहे. फक्त yog ने म्हटल्याप्रमाणे break चा मुद्दा वाटला.. गीत संपल्यावर संतूर थोडे तुटक, लिंक तोडणारे, dull वाटते. हे गालबोट म्हणून. क्लिप गोंडस आहे म्हणून :-)

४. स्वातीची मायबोलीची कहाणी छान ( read: खट्याळ) आहे :-). एकदम मस्त !!! त्यातले फ चे पहिले चित्रही मस्त जमले आहे.

५. शिरीष कणेकरांची मुलाखत असल्याचे 'पाहून' छान वाटले. (वाचायला सुरुवात केली आहे. )

न आवडलेल्या गोष्टी :

१. कथा आणि ललित लेख एकाच विभागात टाकले ( read: समाविष्टले) आहेत

२. मुखपृष्ठाच्या इमेजचा आकार बदलणे सहज शक्य होते.. अजूनही 1024 resolution लाही किंचीत scroll bar येतो आहे.

३. काही काही पेजवर डाऊन ऍरो की / पेज डाऊन की चालत नाहीत त्यामुळे काही लोकांचा थोडा गोंधळ उडू शकतो.


लिहिण्यायोग्य वेळ न मिळाल्याने लिखाण पाठवता आले नाही ह्याची खंत / हुरहुर वाटते आहे.






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators