Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 26, 2006

Hitguj » Hitguj Diwali Ank: Aapli pratikriya ! » 2006 » Archive through October 26, 2006 « Previous Next »

Shilpa Choudhari
Thursday, October 26, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, तू delete का केलीस तुही post ?

होश्शियार कंपनी सरकार आ रहे है... एक उत्कृष्ट लेख.... खुपच माहितीपुर्ण...
SEZ बद्दलची बरीचशी माहीती मिळाली.

युध्हस्य रम्या कथा पण छान...

ये कहां आगये पण सुरेख़ लेख आहे...


Shilpa Choudhari
Thursday, October 26, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देहमेणा, ग्रहण... दोन्ही उत्कृष्ट कविता...

देहमेणा ही कविता दोन्ही अर्थानी आवडली. म्हणाजे एक भक्त देवाशी बोलत आहे अशा अर्थाने आणि एक आयुष्याला थकलेला, अनंत यातना कष्ट सोसत असलेला माणूस देवाशी बोलत आहे या अर्थाने पण.

ग्रहण मधली विटाळलेली मनं.... सुरेख चित्रण केलय आपल्या परंपरागत रुढींच आणि सोयिस्कर रित्या ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलय त्याच पण... प्रत्येकालाच असे प्रश्न पडत असतील नाही?? पण कुणीच वाकडी वाट करुन विचार करत नाही यावर आणि विचार केला तरी ते प्रगट करत नाही.

तमसो मां ज्योतिर्गमय सुरेख जमलिय.


Shilpa Choudhari
Thursday, October 26, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्य ही कविता देख़िल सुरेख़ जमलिय.

संपादक मंडळीना माझा एक प्रश्न आहे परदेशातील अनुभवांच जे पान आहे त्याला मृदगंध असं नाव का दीले आहे?? याचा अर्थ काय होतो... bb चुकला तर नाहीये ना माझा??

प्रत्येक विभागाला दिलेली नावं छान आहेत:-)


maitreyee
Thursday, October 26, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना धन्यवाद. राधा, तू लिहिलेस तसेच मलाही हैदीकडे पाहून नेहमी असच वाटत आलय, की परक्या ठिकाणी रहाताना आपलं अस्तित्व जपायला आपण त्या मानाने काहीच करत नाहीय!
पूनम, हैदी खरोखरच आहे माझ्या ओळखीत. फ़क्त शब्दांकनाचेच श्रेय मला :-)
बाकी गिरी म्हणतो त्याप्रमाणे बरेच लोक छान detail समीक्षा करत आहेत ते चांगलेच आहे! ( healthy )टीका, समीक्षांचे स्वागत च आहे!


maitreyee
Thursday, October 26, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा, मृद्गन्ध चा अर्थ मातीचा सुगन्ध असा आहे, त्या अर्थाने, वेगवेगळ्या देशातील मातीचा गन्ध असे अपेक्षित आहे तिथे..

Shilpa Choudhari
Thursday, October 26, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. धन्यवाद मैत्रेयी :-)

prasad Chaphekar
Thursday, October 26, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिरीष कणेकरांची मुलाखत खुपच छान आहे.मला शिरीष कणेकरांचा e-mail address मिळू शकेल का??

Milind Agarkar
Thursday, October 26, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकप्रभा मध्ये कणेकरांचा लेख आहे त्याखाली आहे त्यांचा इमेल पत्ता

Nishaad
Thursday, October 26, 2006 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry for my english writing!!!

I used to read all Vaibhav (J)'s poems. He is too good. Am very fond of him as poet.
As I was going through the responses for this Diwali Ank & there were 2-3 negative remarks about his poems or rather subject of his poems.
Vaibhav, I think , I guess it correctly that your poem "Prem" was directed towards such remarks.
And am more suprised by the response given by you in this way.

Would like to add more over here, but after your confirmation that purpose of "Prem" indeed was what I guessed.

Waiting for your response eagerly.

Nishaad

Medha Pai
Thursday, October 26, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

How come some people's IDs dont show up on this page and their names do ? This used to be an old hitguj 'feature'. How did it come back ?


vaibhav joshi
Thursday, October 26, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nishaad,

First and foremost, I thank you for appreciating my poems and the encouraging comments.

I wouldn’t call my gazal ‘Prem’ an ANSWER/RESPONSE to the comments posted here, although I must confess it was INSPIRED from those. (That’s the reason the matalaa – first couplet – was in bold letters.. last one was in bold just to balance the 'look' of it.)

I’m sure you being an avid reader, will understand the subtle difference. From my personal experience, I have come to realize that a poem is nothing but a snapshot of the poet’s inner reflections of what goes on in his/her day-to-day life. You might want to call it his/her ‘loud thinking’. Any good poet can and must accept negativity as a part of life and hold no grudges, because ultimately it benefits him/her by providindg a new 'trigger' for writing.

This is why I am sincerely thankful for the 'trigger' which gave me the first two lines of this gazal.

Have I answered you? If not, I sincerely don’t think this is the platform for discussing these issues. If you want to discuss this any further, you can write to me. I would be more than glad to elaborate. My email address is in my profile, but am giving it here for your convenience :
vaibhav.joshee@gmail.com

Once again, thanks for communicating your concerns ! And belated Happy Diwali !!

स्वाती, तुझी विचार करण्याची पद्धत चांगली आहे, आवडली. धन्यवाद. पण इथे हे वाद घालणं मला योग्य वाटत नाही. बघ विचार करून. :-)


Milind Agarkar
Thursday, October 26, 2006 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, तुम्ही तुमच्या ID ने येथे पोस्ट करु शकता किंवा फक्त नाव देऊन पण. जे युजर नाहीत त्यांनी फक्त आपले नाव दिलेले चालते, अर्थातच त्यांचे ID दिसणार नाहीत.

Swaatee AmboLe
Thursday, October 26, 2006 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर मला दिवाळी अंकातलं काय काय आणि का आवडलं ते पुढे चालू... :-)
मी ' अलगूज' विभागात होते.

निळी वेलांटी ( परागकण) : यंत्रवत आयुष्यात एखादी अवचित येणारी आणि रेंगाळत रहाणारी उत्कट सौंदर्याची अनुभूती छान मांडली आहे. कविता एक प्रकारचा दृष्य परिणाम साधते.
उकल ( सखीप्रिया) : शेवटच्या कडव्यामुळे ही कविता खास होते. तृप्त असूनही उरणारी घालमेल नेमकी पकडली आहे.
देहमेणा ( सारंग) : देहमेणा ही कल्पना आवडली. कारण इतरांच्या खांद्यावरून तो जात असतानाची प्रतिमा त्याने जागी केली.

६. सुस्मित
हा ही विभाग पूर्ण वाचून झालेला नाही, पण जितका झाला त्यापैकी विडंबन - ऋणानुबंधाच्या ( वैभव), विडंबन - आताशा मी ( प्रसाद), एका जेवणाची गोष्ट ( रैना) आणि सुमाचं लग्न ( विनय) हे सही आहेत.
विशेषतः परदेशस्थ सर्वांनाच रैनाचा अनुभव जवळचा वाटेल.

७. चिंतन
एक पणती माझी ( ऋचा मुळे) : अस्वस्थ करणारं परिस्थितीचं वर्णन. या कार्यात उडी घेतल्याबद्दल ऋचाचं आणि तिच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल तिच्या घरच्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. एका नाजुक विषयावरचं अतिशय परिपक्व चिंतनशील, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे कृतीशील लिखाण.
बुद्धीमताम् वरिष्ठम् ( चाफा) थोडक्यात सुंदर माहिती. या विषयाबद्दल चांगलंच कुतुहल चाळवलं आता.
होश्शियार ( सई) आणि दिवाळीपूर्वीची दिवाळी ( केदार जोशी) : अभ्यासपूर्ण लेख. पण विषय माझ्या समजुतीच्या पलिकडचे असल्याने प्रतिक्रिया देता येत नाही.

हुश्श!! मृद्गंध वाचून झालं की त्याबद्दल लिहीनच.
तोवर पुन्हा एकदा सर्व लेखक, कवी आणि संपादकांचं अभिनंदन!


prajakta d
Thursday, October 26, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यंदाचा द्रुक्श्राव्य दिवाळी अंक खुप भावला.ई-दिवाळी अंक म्हणुन केलेले नविन प्रयत्न(रांगोळी,रिंगटोन,..ईत्यादी)अभिनंदिनय आहेत..
स्वातिने लिहलेली मायबोली व्रताची कहाणी आणि समर्पक चित्रे..दोन्ही उत्तम
जयावीच्या गोड आवाजातले तु माझी मायबोली आणी त्याला साजेसे पाश्र्व संगित खुपच मधुर आहेत.स्प्रधा विजेत्या म्हणुन दोंघिचे अभिनंदन.

भावशिल्प्:सर्वच वाचनिय आहेत मला विषेश भावले ते राजामणी,हैदियाल,आणी निरभ्र.श्रद्धाचि कथा उत्कठा टिकवुन ठेवते.

अनुभुति:दिपाचा लेख आवडला, रम्य भुतकाळात नेणारा.
कोकणातिल गणपती त्रोटक वाटला.बदल,चुटकिसरशी छोटेखाणी पण उत्तम आशय.
रचनाचा आणि कराडकरचा लेख माहितिपुर्ण,एक नविन कलादालन उघडणारे वाटले.कराडकर तु तयार केलेले white glajhy भांडी सुरेख आहेत.
र्हुषिदा,कणेकरांची मुलाखत वाचायचिय...
....पुढिल प्रतिक्रिया क्रमश्:





Rachana Barve
Thursday, October 26, 2006 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks प्रतिक्रियांबद्दल. माझा पण अंक अजून पुर्ण वाचून झाला नाही. पण तरी काही आवडलेल्या गोष्टी..

भावशिल्प

श्र ची गोष्ट सही आहे. बराच वेळ्पर्यंत उत्सुकता ताणली गेली माझी. मस्तच गं वातावरण निर्मिती झकास आहे. हैदी आवडली मला. छान शब्दचित्रण. राजामणी छान आहे गोष्ट. शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
गोधडी एकदम सही. मला सगळ्यात ही गोष्ट आवडली.
आधार : गोष्ट छान लिहिली आहे. पण ह्या गोष्टीचा मला निट शेवटच कळला नाही. :-(

अनुभुती

आर्च तुझा चुटकीसरशी खूप आवडल मला. एकदम शांता शेळकेंची आठवण
झाली. एका पुस्तकात त्यांनी लालभडक शब्दावर लेख लिहिला होता त्याची आठवण झाली.
deeps बालपणीच्या fashions मस्त गं. आधी वाचायला हवा होता मला एक
सही चित्र सुचल काढायला ह्याच्यावर.
स्वाती जीवेत शरद : मस्त. मी इतके दिवस हा शब्दप्रयोग नक्की का आला असेल विचारच केला नव्हता. छोटासाच आहे पण मस्त आहे.
आठवणी कोकणातल्या, बदल : छान आहे लेख. छोटेसेच पण चांगले लिहिले आहेत.
हृषिदा : गिरी मस्त परत एकदा. तु छान लिहितोस असे लेख. गाण घेऊन एखाद किंवा व्यक्तीमत्व घेऊन.
संवाद अजून वाचल नाही.
म्रुद्गंध
युधस्य : जयवी प्रसंग डोळ्यासमोर आले. एकदम छान वर्णन केलं आहेस.
आमच्या नजरेतून : हा लेख मी पुर्ण नाही वाचू शकले. जरा फ़ोटो हवे होते ह्या लेखात. खिळवून ठेवायला मदत झाली असती.ये कहा वगैरे अजून वाचल नाही मी.

अलगुज
मला खर तर कविता फ़ारशा कळत नाहीत. मला सगळ्याच कविता सही वाटतात. पण मला निळभुली आवडली. निळी वेलांटी पण आवडली. आणि अमृतशिंपण माझी सगळ्यात आवडती कविता ह्या section मधली.

सुस्मित
एका जेवणाची गोष्ट सही आहे रैना :-)
बाकी नाही वाचल अजून मी ह्या section मधल.

मी आणि मायबोली
स्वाती लेख उत्तम जमला आहे. छान वर्णन केल आहेस. जयवी तुझा आवाज तर मस्तच आहे. गाण, म्युझीक सगळच मस्त

प्रेमाचा रिंगटोन मस्त आहे. रांगोळी कल्पना आवडली. एकूणच अंक छान जमला आहे. फ़ च गोधडी चित्र मला खूप आवडल. निलुची सजावट देखिल खूप छान आहे.संपादक मंडळी अभिनंदन आणी धन्यवाद





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators