Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
मधुमिलन

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » मधुमिलन « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 14, 200720 03-14-07  6:53 am
Archive through March 16, 200720 03-16-07  6:43 am

Milindaa
Friday, March 16, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाद भरकटतो आहे. इथे प्रत्येकाने आपले मत मांडा, दुसर्‍याने (दुसर्‍या प्रतिक्रिया देणार्‍याने ) काय करायला पाहिजे होते ते सांगू नका

अज्जुका, तुला manutai सोडून कोणीही म्हणालं नाहीये की तू असं लिहू नकोस, तेव्हा तू तुला पाहिजे ते लिही ना.. :-)

बडे, वाचते आहेस ना सगळं? :-)


Tulip
Friday, March 16, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि वरवरची वाटली <<< अज्जुका, LOL . अजून काय काय लिहायला पाहिजे होतं? >> मिलिंदा मला वाटतं हे पोस्ट टाकलं नसतंस तर पुढची चर्चा बर्‍यापैकी आटोक्यात राहिली असती.:-).
अज्जुकाने तिचे मत अगदी योग्य भाषेत व्यक्त केलेले होते.


Milindaa
Friday, March 16, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा मला वाटतं हे पोस्ट टाकलं नसतंस तर <<<
मला असे अजिबात वाटत नाही. माझ्या पोस्टनंतर meenu ने तिचे न कथा न आवडल्याचे पोस्ट टाकले आहे. त्यानंतर अज्जुकाने बडबडीच्या पोस्टला उत्तर दिले आहे, आणि तेव्हा वाद चालू झाला नाहीये.

Manutai या सदस्याने गोष्टीवर प्रतिक्रिया देताना अज्जुकाला सल्ला देण्याचा प्रयत्न केला (आणि नंतर स्वतःचं पोस्ट उडवून टाकलं :-)) हे वादाचे कारण आहे.


Anyway, माझं पोस्ट राहिलं किंवा उडलं तरी मला फरक पडत नाही, पण माझी चूक नाही हे स्पष्ट करावसं वाटलं :-)


Savyasachi
Friday, March 16, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्ब्या, यापुढे काय त्यासाठी एवढा विचार? आता नव्याची नवलाई संपल्यावर संसार, धुसफ़ुस, रुसवा, एखाद पोर, मग अजून धुसफ़ुस, मग पोर परदेशी शिकायला, नोकरी आणि मग लग्न आणि मग पहिली रात्र ... :-)
बडे, तुला काही टोमणा नाही ग. गोष्ट छान लिहिली आहेस.


Asami
Friday, March 16, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कदाचित पुरेशी नाट्यमयता किन्वा उत्कण्ठा वाचकाच्या (म्हन्जे माझ्याच हो) मनात जाग्रुत होत नसल्याने तसे वाटत असेल! :-)
किन्वा वास्तव हे स्वप्नाहुन अधिक भीषण असते या उक्तीला धरुन असेल, वरल लिहिलेल मला वास्तव म्हणुन स्विकारणे "जड" जात असेल>> लिंब्या लेका तुला तरी कळते का तू काय लिहिलेयस ते ?

Lalu
Friday, March 16, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्र.. हनीमून संपला वाटतं इथला. :-)

बहुतेक सर्वांनीच आवडण्याची / न आवडण्याची कारणं लिहिली आहेत. ते चांगलं आहे. मलाही गुडी गुडी वाचायला आवडत नाही पण हे आवडलं त्याची अजून कारणं अशी असू शकतील -
अज्जुका म्हणते त्याप्रमाणे इथल्या हळदी कुंकू टाईप कथा वाचल्यावर हे जरा वेगळं वाटलं म्हणून, जे लिहिलं आहे ते प्रामाणिकपणे लिहिलंय, आव आणून नाही, असे मला वाटले म्हणून, (म्हणजे लिहायचे एक आणि हेतू वेगळाच असतो, असेही लेखन इथे असते.) पहिलाच प्रयत्न आहे तरीही लेखनशैली चांगली आहे म्हणून आणि शेवटी बडी ने लिहिले आहे म्हणूनही आवडले असेल. आता कथा, साहित्य म्हणून चांगले वाईट ठरवताना या गोष्टी विचारात घेऊ नयेत खरं तर, पण त्या आल्या. जे काही आहे ते आवडलं. :-)

विलोपले sss सर्वांनी दिवे घ्या. ~D

मी वर काय लिहिलंय ते मला तरी कळले. असाम्या तुला कळले का? ~D


Asami
Friday, March 16, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असाम्या तुला कळले का?> एक कार्यशाळा उघड बरे ~D

Asami
Friday, March 16, 2007 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

TP apart पण मला असे वाटतेय कि बडीकडून वेगळ्या हाताळणीच्या अजून गोष्टी मिळतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

Maitreyee
Friday, March 16, 2007 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हळदीकुंकवाच्या कथा लिहायच्या तर निदान NJ style हळदीकुंकवाच्या लिही गं :-O :-)

Rachana_barve
Friday, March 16, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडी शैली खरच चांगली आहे. लिहित रहा.

btw ह.कु. type कथा म्हणजे काय? :-)


Deepanjali
Friday, March 16, 2007 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडीची शैली चांगली असते .
तिने लिहिलेले ' माझी चप्पल ' आणि माझी सायकल हे लेख आवडले होते पण मलाही इथे अज्जुका , मीनु सारखेच वाटले .
Romantic scenes जरा जास्तच desperate वाटले .
शिवाय ट्युलिप च्या गाजलेल्या " एका केशरी संध्याकाळी " वरून कथा inspire झाल्या सारखी वाटली .



Ajjuka
Saturday, March 17, 2007 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exactly DJ, बडी एरवी चांगलं लिहिते म्हणून हा प्रपंच नाहितर बाकी अनेक कथा.. नव्हे गोष्टी आवडत नाहीत पण ती व्यक्ती त्या पलिकडे काही लिहू शकेल असंही नाही वाटत मग सोडूनच द्यायचं..

Badbadi
Saturday, March 17, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, मी शुक्रवारी ऑफ़िस मध्ये नव्हते.. म्हणून हे काहिच नाही वाचू शकले. आज बघितलं तर बरंच काहि नवीन आहे इथे.
DJ , अज्जुका मी विचार करेन.. नक्कि. पण हे काहि ट्यु च्या कथे वरून स्फुरलेलं नाही.

मीनू, detail मध्ये बोलू ग आपण!!!

प्रतिकिया देणार्‍या सर्वच जणांचे आभार!!! "आवडलं" / "नाही आवडलं" असं स्पष्ट सांगणार्यांना माझ्याबद्दल विश्वास आहे, त्यापलिकडे जाऊन जिव्हाळा वाटतो हे खरंच एक छान feeling आहे.

परवापासून नवीन वर्ष सुरू होत आहे... येत्या वर्षात नवीन काहि लिहिण्याचा प्रयत्न करेन... जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न असेलच पण काहि नावीन चुका होऊ शकतील. तेन्व्हाहि तुम्ही सगळे असेच इथे याल अशी अपेक्षा करतेय.

परत एकदा धन्यवाद!!!


Swaatee_ambole
Saturday, March 17, 2007 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर आवडली बाबा कथा! प्रत्येक कथेत काहीतरी ' जबरी' घडायलाच हवं असं कुठे आहे? लहान सहान प्रसंगांतून एखादी व्यक्ती समजत जाते त्यातही गंमत असतेच की.

बडे, तू लिही गं बिन्धास्त. :-)

* मिलिंदा, तुझी चूक नाही हे स्पष्ट झालं, पण कथेबद्दलचं मत नाही स्पष्ट झालं. :-)


Maku
Sunday, March 18, 2007 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kharech bade tu lihi kharech sahi lihates tuu mala tuze likhan aavadale ......





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators