Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
माझिया मना

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » माझिया मना « Previous Next »

Shrini
Friday, March 09, 2007 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिग्नल लाल झाला आणि तिची आलीशान, वातानुकूलित गाडी चौकात येऊन थांबली.
दिवसभरात करायच्या कामांची मनात उजळणी होत असताना तिचे लक्ष सहज डावीकडे गेले.
तिथे एका 'धूम' बाईकवर बसलेला, तगडा, अतिशय देखणा तरूण, काचेतून थेट तिच्याकडेच रोखून पहात होता.
ती क्षणभर गोंधळली. आपला काळा रंग, सामान्य चेहरा तिच्या पूर्ण परीचयाचा होता. तिच्या तल्लख बुद्धीमुळे जरी ती यशस्वी झाली असली, तरी तिच्याकडे दुसर्यांदा पाहण्याचे कष्ट एखादा सामान्या मुलगाही घेत नसे. आणि आज तर हा देखणा तरूण आपल्याकडे अगदी टक लावून पहात आहे...

तिने त्याच्याकडे दुर्‍लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण तो अर्थातच फोल ठरला.

पुन्हा जेव्हा तिची नजर त्याच्या चेहर्याकडे वळली तेव्हा तो तिच्याकडे पाहून हलकेच हसला. तिच्याही नकळत त्याचे हास्य तिच्या चेहर्यावर शतवर्धित झाले. कदाचित या युवकाला अंतर्दृष्टी असावी, आणि त्याने आपल्या बुद्धी - मनाचे सौंदर्य पाहीले असावे, असा एक विचार तिच्या मनाला चाटून गेला...
आपल्याला आतापर्यंत आलेले कटू अनुभव, झालेली उपेक्षा, पचवलेली दारूण निराशा, हे सर्व तिने बाजूला सारले आणि त्या युवकाकडे पहात हात हलवला.

इतक्यात सिग्नल हिरवा झाला. आपल्या बाईकला धूम वेग देत तो युवक क्षणार्धात निघून गेला.

आणि मग तिला आठवले, आपल्या गाडीच्या काचा 'टीटेड' आहेत!


Princess
Friday, March 09, 2007 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान सुरुवात आहे. पुढच्या भागाची वाट पाहत आहे.

Shrini
Friday, March 09, 2007 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Princess, गोष्ट एवढीच आहे. :-)

माझा हा देखील प्रयत्न फसला म्हणायचा... अस्तु!


Princess
Friday, March 09, 2007 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-)))))))))))
गोष्ट एवढीच असली तरी छानच आहे. पण तु समाप्त लिहिले नाहीस त्यामुळे कळले नाही. प्रयत्न फसला नाहीये.


Nandini2911
Friday, March 09, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटलंच होतं की एवढीच गोष्ट असेल.. श्रीनिच्या आधीच्या कथा वाचून... :-)
खूप सुन्दर आणि मनाला स्पर्शुन जाणारे गोष्ट..
लघुकथा हा तुमचा हक्काचा प्रांत आहे..


Ajjuka
Friday, March 09, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी गोष्ट वाचतेय असं वाटलं मला.. :-)

Bee
Friday, March 09, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे संपली देखिल ही कथा. मला वाटलं श्रिनिनी आता कादंबरी लिहायला घेतली. तर ही सुक्ष्मकथा निघाली. कथा लय आवडली श्रिनि.

Psg
Friday, March 09, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रिनी, सही पंच आहे! मस्त!

Shyamli
Friday, March 09, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मग तिला आठवले, आपल्या गाडीच्या काचा 'टीटेड' आहेत!>>>
माझा आवडता प्रकार शेवटच्या ओळीत पंच :-)
आवडेश :-)


Shrini
Friday, March 09, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्र्तिक्रियांबद्दल सगळ्यांचे आभार! .. :-)

Ashwini
Friday, March 09, 2007 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधूनच धूमकेतूसारखा काय उगवतोस रे? जरा नियमीत लिहीत जा की. :-)
बाकी लघुकथा मस्तच आहे.


Savyasachi
Friday, March 09, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shrini, uttam ahe katha. short and sweet.

Asami
Friday, March 09, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भंते घेतलेल्या break चे सार्थक करताहात

Chinnu
Friday, March 09, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रिनी मस्त! ... ...

Maitreyee
Friday, March 09, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही कल्पना, श्रीनि!
सुरुवात वाचताना मला बेटीची कथा आठवत होती 'इदं न मम'..


Ana
Friday, March 09, 2007 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रिनी
खास, आवडेश.. ..!


Supermom
Friday, March 09, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच. शेवट एकदम अनपेक्षित अन सुरेख

Disha013
Friday, March 09, 2007 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे 'इटुकली गोष्ट'. शेवट खासच.

Jayavi
Saturday, March 10, 2007 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीनी..... खूपच सुरेख!! शेवट Terrific !!

Manuswini
Saturday, March 10, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

poor thing तिला बिचारीला तेव्हढाच आंनद

जोर का धक्का धीरे से होता पण :-)


Pendhya
Saturday, March 10, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीनि, छान " प्रसंग " घेतलास. ( प्रसंग, म्हणण्याला, तुझा आक्षेप नसावा, असे गॄहीत धरुन ) . असेच छोटेछोटे, वेगवेगळे प्रसंग, सर्वांच्या दैनंदिन जीवनात नेहमी घडत असतात.

Shrini
Monday, March 12, 2007 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिसादाबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद! :-)
अश्विनी, 'नियमितपणा हा प्रतिभेचा कर्बवायू आहे...'
:D




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators