Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 22, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » . बंदिनी-उर्वरित भाग » Archive through February 22, 2007 « Previous Next »

Daad
Wednesday, February 21, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


suparmom , एक अतिशय सुन्दर कथा. तुमची विषय भरण्याची हातोटी अप्रतिम आहे.


Abcd
Wednesday, February 21, 2007 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amazzzing !!!! Aprateem…tuza lihina pan khoop oghavata ahe…purna chitra tayar hota dolyasamor

Manuswini
Wednesday, February 21, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ही गोष्ट खुप आवडीने वाचली पण मला शेवट कळलाच नाही.
मला मजा नाही घालवायची शेवट explain करायला सांगुन पण शेवटचा संदर्भ लागलाच नाहे.
कोणी मला सांगेल का.. रेवती का दचकते त्या सोनसाखळ्या उर्मिलाबाईंच्या पायात बघुन?

पहिला भागात असे लिहिलेय की पायात सोने घालु नये. ते अशुभ मानतात आणि ही गोष्ट खरी आहे हे मी जवळच्या relative चा exp बघुन माहीतीय.
पण इथे संदर्भ नाही लागला. कोणी सांगेल का?
Sorry Supermom , मला असा suspense kill नाही करायचाय पण कळले नाहीतर मजा कशी?



Arch
Wednesday, February 21, 2007 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़क्त राजघराण्यातल्या व्यक्तींनी, किंवा अतिशय भाग्यवान व्यक्तींनीच घालावं म्हणतात ग....'
मनु, माझ्यामते आता स्वतःला उर्मिलाबाई भाग्यवान समजत असतील. एक तर ते बाबासाहेब पुतळाबाईकडे जाऊ शकणार नाहीत आणि त्यांच्याकडे ओघाने सगळा control आला असेल म्हणून.

SM तू नेहेमीच छान लिहितेस. पुष्कळशा गोष्टी ह्या काळात घडत नसतील अस वाटत पण त्या घडत असतात. सगळे characters छान उभे केले आहेस.


Zakasrao
Wednesday, February 21, 2007 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom
मस्त कथा होती. सगळ डोळ्यासमोर घडतय अस वाटत होत. छान.


Maku
Wednesday, February 21, 2007 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिले आहे. पण माधवच्या आईचे वाईट वाटले. त्यांचा सगळा जीव नवर्यामधे ... खुप त्रास होउन पण त्या तिथेच राह्तात. मला थोडेसे पटले नाही.

चुकले असेल तर दिवा घ्या.

लोपा अग माज़े नाव मकु आहे.

Jhuluuk
Thursday, February 22, 2007 - 1:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला खुप आवडली कथा, प्रवाही असुन कुठेही कंटाळवाणी नाही झाली..
आणि शेवट तर मस्तच!!


Srk
Thursday, February 22, 2007 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, सुरेख कथा. मकु मी अशी अती चांगली माणसं बघीतली आहेत. इथे तर नवराबायकोचं नातं आहे.

Manuswini
Thursday, February 22, 2007 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh ho असे होय तर, thanks आर्च.
ह्म्म्म्म.... i am with mixed feelings. whole life person goes through terrible life and in the end tries to find happiness in something nothing compare what he deserves. she deserved the better life definitly..... I had read one article where its human tendecy to get trapped in something and let it get more trapped, so first its destiny then later its you who deny under the name of emotions, HABIT and lost confidence to face the situation. Let me stop here. it sounds too philosophical. but just wrote what I felt. anyways,


सुमॉ, छान वाटली गोष्ट. वाईट वाटते की खरेच असे होते? का हे पाश माणुस तोडु शकत नाही. मुलग शिकला असताना का नाही आईला त्यातुन बाहेर काढु शकत.
हे मला पडलेले प्रश्ण... असो.


Suvikask
Thursday, February 22, 2007 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम... खरोखरच मालिकेला शोभेल असे कथानक!!

Sanghamitra
Thursday, February 22, 2007 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम छान रंगवलीय हं. शेवट तर जबरदस्त.

R_joshi
Thursday, February 22, 2007 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम नेहमीप्रमाणेच अप्रतिम कथा. :-)
सुपरमॉम तुम्हि तुमच्या लघुकथेनच पुस्तक काढा. वाचायल खुप आवडेल ते. बर पुढची कथा लवकर पोस्ट करा.:-)


Lopamudraa
Thursday, February 22, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुंकावावर घाला वैगैरे?? परदेशी जाणारा मुलगा याधीही आईला तीथुन काढत नाही आणि नंतर सह्ज तु आता कायमची अडकली म्हणून निघतो.. थोड जड जाते समजायला..!!! मनुस्विनिला अनुमोदन..
असो लिखाणाची शैली मात्र चांगली आहे.


Vadini
Thursday, February 22, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom,कथा चांगली रंगली आहे. माधवच्या आईला एका परीने न्याय देण्याची तुमची कॢप्ती आवडली. ह्यालाच काव्यात्म न्याय असे म्हणतात ना? बाकी नवर्‍याने कितीही वाइट वागवले तरी त्याच्याविषयी मनात तिरस्कार नसणार्‍या ६०-७० च्या बायका आपल्या समाजात आजही बघायला मिळतात. अशिक्षित आणि सुशिक्षितसुद्धा!

Supermom
Thursday, February 22, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'परदेशी जाणारा मुलगा आईला तिथून काढत नाही आणि नंतरही तू आता कायमची अडकली म्हणून निघतो'...थोडे जड जाते समजायला....

लोपा, मनू,यात अशक्य काहीही नाही.स्त्रीमनाचे कप्पे फ़ार गुंतागुंतीचे बनलेले असतात. ही कथा जरी काल्पनिक असली तरी कथाबीज मुळीच काल्पनिक नाही. नव्र्याची दुसरी पत्नी सहन करून, स्वत ची मुले मोठी होऊन परदेशी सुस्थित झाल्यावरही नवर्‍याला न सोडणारी बायको मी पाहिली आहे.

शेवटी कुणालाही त्याच्या परिस्थितीतून काढायचे, तर त्या व्यक्तीची ती इच्छा हवी मुळात. अन नवर्‍याने कितीही वाईट वागवले, तरीही त्याच्याबद्दल तिरस्कार न ठेवणार्‍या अशिक्षित, सुशिक्षित दोन्ही प्रकारच्या बायका जगात आहेत हे वादिनीचे म्हणणे अगदी सत्य आहे.

अन सख्यांनो, शेवटी माझी विनंती अशी की केवळ कथा म्हणूनच बघा ग याकडे. मी काही प्रथितयश लेखिका नाही त्यामुळे माझ्या लेखनात त्रुटी असतील हे मी नाकारत नाही मुळीच.
अन mods यायच्या आत हा वाद थांबवूया प्लीज


Mrinmayee
Thursday, February 22, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सु मॉ. कथा जबरजस्त!!!!!! मांडणी आणि कथाबीज फुलवण्याची तुझी लकब तर सुरेख आहेच, पण शेवट मस्त म्हणजे मस्तच केला आहेस!


Kshitij_s
Thursday, February 22, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुन्दर कथा supermom. keep it up.

Savani
Thursday, February 22, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, आवडली कथा. प्रवाही, तरीही बांधून ठेवणारी, सहज सोप्या भाषेतली अप्रतीम कथा. खरच गं लघुकथासंग्रहाचं मनावर घे. तू आणि पूनम दोघीना ही कला छान साधलीये.

Megha16
Thursday, February 22, 2007 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम,
खुप च छान कथा लिहली आहेस.


Supermom
Thursday, February 22, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा आवडल्याबद्दल सर्वांचे आभार.
सावनी, विचार केला होता ग प्रकाशनाचा.माझ्या आधीच्याही काही कथा आहेत पेपरमधे प्रकाशित झालेल्या, ललना, सुवासिनी मधेही आलेल्या. या सार्‍या अन काही नव्या अशा काही कथा संकलित करून काढावा संग्रह असे वाटत होते. पण एकतर ते काय कॉपीराईट का काय असते ते आड येईल का माहीत नाही मला, अन दुसरे म्हणजे एकदा मी सहज एका प्रकाशकाला विचारले होते मला पुस्तक काढायचे आहे म्हणून. पण अतिशय खत्रुड चेहरा करून, कथा न वाचताच त्याने ' दहा हजार रुपये पडतील' असे ऐकवले होते.
हे सारे काय प्रकरण आहे ते मला न कळल्याने लोक एका उदयोन्मुख लेखिकेला मुकले बघ कोणाला काही माहिती असेल याची तर जरूर सांगा.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators