Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Disk crash..!

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » कथा कादंबरी » Disk crash..! « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 28, 200620 12-28-06  11:22 am

Adm
Thursday, December 28, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिथून बाहेर पडल्यावर देखिल काही वेळ राज ला काय चाललय, आपण कुठे चालालो आहोत हे कळतच नव्हतं... Downtown मधे स्टेशन वर जाऊन सरळ Brooklyn bridge ला जाणार्‍या गाडीत तो बसला.. संध्याकाळच्या निवांत वेळी Brooklyn bridge वर जायला त्याला खूप आवडत असे... तिथून दिसणारी sky line , हडसन नदी, त्या पूलाचं ते अजस्त्र रूप अआणि वाहणार वार..मनाचा शिण कुठल्याकुठे निघून जात असे... आज ही तो पूलावरच्य त्याच्या नेहमीच्या ठिकाणी आला आणि जरावेळ शांत बसल्यावर भानावर आला.. त्याची नेहमीची अभ्यासू व्रुत्ती जागी झाली आणि John च्या ऑफ़र मधली एक एक गोष्ट आठवून त्याच्यावर विचार चालू झाला... ऑफ़र मुळे होणारे फ़ायदे आणि तोटे आणि स्वत:ह च्या आवडी निवडी दोन्हींच गणित मांडून अखेर Infocom Onfotech सोडायची असाच निष्कर्ष निघत होता.. काही प्रश्न असे होतेच ज्याची उत्तर jonh कडून मागायची होती.. ते त्याने खिशातल्या diary मधे लिहून ठेवले.. सुमारे दोन तास तिथे बसल्यावर परत घरी येऊन त्याने लगेच John ला सविस्तर email पाठवून त्यात आपल्या सार्‍या शंका विचारल्या.... घडलेलं सगळं इतक अनपेक्षित होतं की त्याला रात्र्भर धद झोप लागलिच नाही...
दुसरा दिवस तसा घाईत सुरू झाला... नेहमिच्या Meetings, calls , लोकांच्या शंका ह्या सगळ्यात २ कधि वाजले ते कळल देखिल नाही.. John चा दुपारी reply आला आणि त्यात राज सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं होती... पुढच्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात काम सुरु होणार होतं आणि त्याधी शिकागो ला जायचं होतं... दोन महिन्यां.इ म्हणजे नताळ्च्या सुमारास त्याला २ आठवडे सुट्टी देखिल मिळू शकणार होती जेव्हा तो भारतात जाऊन येऊ शकला असता.. खूप खोलात शिरून विचार करून देखिल त्याल हि ऑफ़र नाकारायचं कहीही कारण सापडत नव्हतं... अखेर निर्णय झाला होता.. त्याने लगेच आई बाबां ना फ़ोन लावला.. खरं तर भारतात ६६:३० च वाजत होते पण राज ला धिर धरवत नव्हता..
त्याने सगळं भरभर निशाला सांगितलं आणि अर्थातच त्याचा निर्णय देखिल...
"अरे पण Inofcom मधे तूला problem काय आहे... आताच्या घडीला तर तू मागशिल ते मिळेल एथे.. आणि त्यांनी भरवशाने तूला तिकडे पाठवलं आ णि तू आता सोडनार.." निशाला हे हे सगळ पसंत पडलं नाही आणि पहिल्यांदाच ती उघड नाराजी दखवत होती..
"आतातर तुझ्या carrier ची सुरुवात आहे... इथे तुला च.गल अनुभव मिळतोय.. मला तरी वाटतं तू खूप घाई करतोयस.." सुरेश देखिल समजावत होता...
"आभाळाएव्हडं यश मिळात अस्ताना कशाला सोडायचं आता..." निशा पुन्हा सांगत होति...
"आई, sky is not my limit..its my destination... "
"ठिके..तुला हवं ते तु कर आम्हाला ह्यापुढे कुठचिही गोष्ट विचारू नकोस.. नविन जॉब बद्द्ल तुझं अभिनंदन आणि all the best "
निशा आज खारच चिडली होती..


Santosh172
Friday, December 29, 2006 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sky is not my limit..its my destination...

मस्त

Adm
Saturday, December 30, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निशा ने त्यावेळी फ़ोन लवकरच ठेवून दिला... राज ला ही जरा आईने अश्या पध्दतिने दिलेली प्रतिक्रिया पाहून आश्चर्यच वाटलं.. पण नंतर सुरेश ने त्याला फ़ोन करून त्याचा निर्णय न पटल्याचं पण त्याल जे योग्य वाटत असेल ते करायल सांगितलं....
राज ने दिलेला राजिनामा हा Infocom Infotech मधे मोठा धक्का होता.. सुशिल पासून सगळ्यांनी कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याला काही ऑफ़र द्यायचाही प्रयत्न केला पण Better Prospects हे एकच कारण असल्याने ते ही विषेश काही करू शकले नाहित...
राज चा infocoam मधला शेवटचा दिवस झाला आणि तो शिकागो ला shift झाला... नविन घर घेणं, गाडी शोधणं, सामान जमवणं ह्यात दिवस कसे गेले कळलच नाही... शिकागो डाउनटाउन मधलं त्याचं ओफ़िस फ़ार्च सुंदर होतं.. जवाबदारी बरोबरच हातात अधिकारही असल्याने तो काम ही खूप enjoy करत होता... शिवाय जिम ला जाणं, वाचन करणं ह्या बरोबरच त्याके college मधला त्याचा guitar वाजवायचा छंद देखिल पूढे चालू केला होता... एकूणच दिवस आनंदात चालले होते..
आधि ठरल्याप्रमाणेच डिसेंबर मधे त्याला सुट्टी मिळनार होती.. आणि त्याने भारतात जाण्याची तयारी चालू केली.. जवळजवळ दिड वर्षाने तो भारतात जाणार होता.. निशा आणि सुरेश देखिल अतिशय खूष होते... निशाची देखिल तयारी जोरात चालू होती...
"आई, तू उगाच फ़ार काही कार्यक्रम ठारवून ठेवू नकोस... आधिच मला सुट्टी कमी आहे आणि त्यात कोणी येणाअर असेल तर आपल्याला वेळच नाही मिळणार जरा बोलाबसायला.." राज निशाला फ़ोन वर सांगत असे...
"नाही रे, कोणाला नाही बोलावलय..."
"राज, तूला एक विचारायचं होतं.." निशाने घाबरत विषय काढला.. "मझ्या लग्नाबद्द्ल ना?" राज हासून म्हणाला... "तुला कसं कळलं? बाबा म्हणाले का तुला काही?"
" Bachelor Engineer अमेरिकेतुन सुट्टीवर येणार्या मुलाला त्याची आई एव्हड्या Seriously अजून कशाबद्द्ल विचारणार? " राज अजून हसतच होता..
"खरय तुझं, मग काय ठरवलयस? तुझं तू ठरवलं असशिल तरी आमची काही हरकत नाही... सांगून टाक आम्हाला.."
"नाही माझं मी ठरवलेलं नाही.. आणि एव्हड्यात ठरवायचा विचार पण नाही.. अगं हीच तर वेळ आहे carried करायची.. पूढे काय आहेच सगळं"
"अरे मी काय म्हणते.. माझी मैत्रीण आहे ना शिला ती डॉ. रानड्यांच्या मुली बद्दल विचारत होती.. मी पण पहिलय तस तिला शिलाच्या घरी.. दिसायला छान आहे.. Interior Designer आहे.. तू येणाराच आहेस तर बघायचं का?"
"ंई तूला काही ठरवू नकोस असं सांगतोय आणि तू एकदम
बघायचेच program ठरवायला लागलीस... "
"अरे.. एकदा भेट ना फ़क्त.. मी काही आग्रह नाही करते की आत्ता लग्न कर म्हणून"
हो नाही करता करता अखेर राज भेटण्यासाठि तयार झाला..
"मी सर्‍अळ तोंडावर नकार दिला तर चालेल का तिला?" राज नी विचारलं.. "ती आवडेल तूला.. आणि राज जरा जनून बरका.. हल्ली च्या मुलीॅह काही सांगता येत नाही ती च तूला नकार द्यायची.." निशा त्याला चिडवत म्हणाली..
अराज अखेर भारता पोचला... तिघांनाही भेटल्यावर खूप आनंद झाला...२३ दिवस खूप गप्प झाल्या... राज आवडीचे पदार्थ करून झाले...
राज चा Jet lag पुर्ण गेल्यावर अआणि आराम झाल्यावर निशाने शामल रानडे चा विषय काढला.. "अरे.. वा लक्षत आहे वाटत तुझ्या मला वाटलं विसरली अससिल आता"
" नाही नाही विसरेन कशी.. उद्या संध्याकळी भेटशील तिला.?"


Indradhanushya
Saturday, December 30, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरदस्त महत्वाकांक्षी राज डोळ्यां समोर उभा आहे... Adm पहिला प्रयत्न उत्तम :-)

Adm
Saturday, December 30, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेटायच्या ठिकाणी राज अगदी वेळेवर पोचला आणि बघतो तर शामल त्याच्या अधिच येऊन पोचली होती... जो काय निर्णय असेल तो आधी एकमेकांना सांगायचा हे त्यांनी फ़ोन वर ठरवून घेतलं होतं Casual derss मधली, रानडे आडनावाला शोभेल अशी शामल पटकन नजरेत भरणारी होती..
" sorry खूप वेळ थांबाबं नाही लागल ना?"
" नाही नाही Its ok .. मी आत्तच आले..मझा घर जवळ आहे..तुम्हालाच लांबुन यायच होतं.."
"तुम्ही वगैरे नको... We are not that old to be called 'तुम्ही' " राज म्हणाला आणि दोघही हसली..
Cofee आणि खाण्याबरोबरच त्यांच्या गप्पाचलू होत्या...
" Interior Design मधे काही specific करतेस की सगळच.."
"आम्ही design आणि Decoration ठरवून मग लोकं hire करून त्यांना conract देतो.. थोडक्यात लोकंआ काय हवय ते जाणून आम्ही आमचा Artistic view वापरतो.. "
" Artistic view बपरे... Art चा आणि माझा तसा दूर पर्यंत संबंध नाही.. "
" software मधे पण art असेलच की थोड्या प्रमाणात.."
"हो असेलही कदाचित पण I prefer technology more than art "
त्यांच्या भरपूर विषयांवर गप्पा झाल्या... काही ठिकाणी मतं जूळली कही ठिकाणी अगदी टोकाची निघाली..
शामल बोलायला तशी मोकळी होती... खरं तर राज ला मनातून ती आवडून गेली होती.. पण त्याच्या स्वभावानूसार खोलात शिरून विचार करणं चालू होतं आणि अजूक एक दोन वेळा विचार भेटायचं असं तिला सांगायचं त्याने ठरवलं होतं...
सुमारे तास दोन तास गप्पा झाल्यावर त्याने विषय काढला..." So.. whatz next? परत कधी भेटायचं?"
" Any time तू बोल.. तुलाच परत जायच्या अधि बरीच कामं असतिल आणि अजून 'कोणाकोणाला' भेटायचं पण असेल.. "
" I don't think मला अजून 'कोणाला' भेटावं लागेल.."
" well राज.. आपण as friends भेटू शकतो.. पण I don't think we should go ahead with the relationship.."
"काय?" आपण काय ऐकतोय ह्यावर राज ला विश्वासच बसत नव्हता.. "पण का?"
"माझी नवर्‍याबद्दलची जी काही कल्पना आहे त्यात तू बसत नाहीस.. "
"पण काय कमी आहे माझ्यात.. शिक्षण आहे, पैसा आहे, नोकरी आहेत.. दिसायला ok आहे. अजूक काय आहे तुझ्या नवर्याबद्द्लच्या कल्पनेत.. "
"आपल्या streams वेगळ्या आहेत.. तू तुझ्या मतांबद्द्ल फ़ार आग्रही वटतोस.. आपण एकमेकांशी कामाबद्द्ल कधीच चर्चा करु शकणार नाही आणि afterall its personal choice "
" I don't agree Your reasons are not convincing "
" May be पण I don't think I need to give any justification "
"पण.."
"तुला कधि वेळ मिळेल जायच्या अधि तेव्हा फ़ोन कर.. see you " आणि एव्हडं म्हणून ती निघून पण गेली..
घडलं ते इतक अचानक आणि अनपेक्षित... राज ने कल्पना च केली नव्हती असं काही होईल.. आणि मुख्य म्हणजे त्याल नकार मिळेल..
सैर भैर मनाने राज एकटाच समुद्राकाठी फ़िरत होता. जणू पराभूत आणि हरवल्या सारखा.. नकाराचा एक Virus मनाची disk crash करून गेला होता आणि ह्यावेळी कोणतीही back up system पण नव्हती..

- Adm


R_joshi
Saturday, December 30, 2006 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच फार सुंदर कल्पित कथा. राजची डिस्क अशी क्रश होईल अस वाटलच नव्हत. अतिशय सुरेख अन अनपेक्षित कलाटणि दिलिस कथेला. फारच छान:-)

Swasti
Saturday, December 30, 2006 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह !
मला पहिल्यांदा वाटल एखादी thriller sci-fi असेल
पण मस्त .. एकदम घाटातलं वळणंDisha013
Saturday, December 30, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा!पोपटच करुन टाकला की राजचा!क्लायमक्स मस्तच.

Marathi_manoos
Sunday, December 31, 2006 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good one. The disk crashed really too fast.

Adm
Monday, January 01, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रीयां बद्द्ल धन्यवाद..! :-)
बाकीच्या कथा वाचून असं वाट्टय की climx फ़ारच लवकर संपवला मी... अजून पाणी घालून ताणायला हवा होता.. ;)

anyways शिकेन हळूहळू.. :-)


Shyamli
Monday, January 01, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा कथा ओळ्खीची वाटता वाटता अनोळ्खी झाली की...
असो
चांगली आहे लेखनशैली
अभीनंदन


Sakhi_d
Tuesday, January 02, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Adm छान आहे कथा...... पण शेवट जरा घाई घाईत केल्यासारख वाटतो. पण प्रयत्न छान आहे.
आणि हो धन्यवाद ......... कथा पुर्ण केल्याबद्दल....Psg
Tuesday, January 02, 2007 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

adm मस्तच! :-) करीयरमधे इतका यशस्वी असलेला राज नकार पचवू शकण्याच्या मन:स्थितीतच नव्हता.. वा.. मस्त climax .. पण राजच्या करीयरची background कशी रंगवलीस, तसच त्याची नकार मिळाल्यानंतरची मन:स्थिती पण सांगायला हवी होतीस अजून विस्तारानी! मस्त कथा आहे..

Jhuluuk
Tuesday, January 02, 2007 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ADM कथेचा end नावाला पुरक होता. राजला मिळालेला अनपेक्षित धक्का disk crash व्यवस्थित symbolise करतो.
पण मलाही असे वाटले की शेवटचा भाग अजुन रंगवला असता तर अजुन सुंदर झाली असती कथा... त्या दोघांची चर्चा, त्याचे विचार..
कदाचित असे लिहिणारे आम्ही सर्व कथेत गुंतुन गेलो होतो, म्हणुन असे वाटले.. This thinking goes to your credit


Radhadeshpande
Tuesday, January 02, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

adm छान जमलीय कथा. राजच्या career and office मधील environment वगैरे सुंदर लिहिले आहे. शेवटचा भाग अजुन खुलवता आला असता... पण climax मात्र छानच.
आगामी लेखनाला खूप शुभेच्छा!!


Kedarjoshi
Tuesday, January 02, 2007 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ADM सही. मस्त आहे शेवट.

Adm
Tuesday, January 02, 2007 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hey all, Thanks a lot for those nice words. That was very much encouraging... :-) शुभेच्छा आणि प्रोत्साहनाबद्दल मनापासून धन्यवाद...
Your feedback is noted and will be taken care in due course.. :-) I also felt same about the climax.. Any ways Thanks Again..
-Adm


Lopamudraa
Wednesday, January 03, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे कथा शेवट तर मस्तच... एकुणात आवडली..!!!

Ajjuka
Wednesday, January 03, 2007 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथेच्या शेवटामुळे कथा आवडली..
हे लक्षात येतंच आहे की तुम्ही स्वतः या क्षेत्राशी जवळून संबंधित होता किंवा आहात..
आणि तरीही..
|"पण काय कमी आहे माझ्यात.. शिक्षण आहे, पैसा आहे, नोकरी आहेत.. दिसायला ओक आहे. अजूक काय आहे तुझ्या नवर्याबद्द्लच्या कल्पनेत.. " |

या विचारसरणीवर कुठेतरी काहितरी चुकतंय या पद्धतीने क होईना एक statement केलेत.. हे फार धाडसाचे आणि rare वाटले..
कारणे अनेक असोत पण IT / Software वाल्यांचे हे असे narrow vision माकड झालेले असते (अपवाद असतातच). ते व्यक्त झाले हे आवडले.


Marathi_manoos
Wednesday, January 03, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

absolutely rite Ajjuka...IT wallyancha Narrow mind wala Makad zalela asata

Nandini2911
Friday, January 05, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

adm , मला कथेचिए idea खूप आवडली. राजची महत्वाकांक्षा जितक्या तडफ़ेने आली तितक्याच तडफ़ेने शामलची मते यायला हवी होती. कारण कुणीही आत्या काकू वगैरे बाई.. शामललाच आगाऊ ठरवून मोकळी होईल. :-)


Prajaktad
Tuesday, January 09, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

adm पहिलाच पण,स्तुत्य प्रयत्न आणखी लिखाण येवु द्या.

Suvikask
Wednesday, January 10, 2007 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिखाण छानच झाले आहे. विशेषत्: लिखाण करताना स्थळ्-काळाच्या बारकव्यानीशि केले गेले आहे. त्यामुळे वाचुन चित्र डोळ्यासमोर उभ राहतं!!! keep it up!!! waiting for another disk!!!
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators