Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics

Archive through December 07, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » विनोदी साहित्य » कुजबुज » Archive through December 07, 2006 « Previous Next »

Hawa_hawai
Wednesday, December 06, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

KUJBUJ

06 december 2006
संपादकीय
नमस्कार वाचकहो,

हितगुजवरील थंडगार निश्पोस्ट वातावरणाबद्दल एक जुन्या हितगुजकर सशल यांनी न राहवून दुःखातिरेकाने काल आपल्या हक्काच्या ठिकाणी जोरदार टाहो फोडला. सध्या सुरू असलेल्या कडकडीत हिवाळ्या प्रमाणेच हितगुज सुद्धा गारठले आहे, सगळे BB ओस पडले आहेत, पूर्वी सारखे हितगुज राहिले नाही अशी खंत त्यांनी तिव्रतेने व्यक्त केली.

सशल यांनी मांडलेल्या मुद्द्याचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केल्यावर असे आढळून आले की काही दिवसांपूर्वी अचानक पणे duplicate आणि multiple ID विरोधात आंदोलन पेटल्याने सर्व Du and Mu आयडींनी हितगुजवरून काढता पाय घेतला. हे Du and Mu ID नसल्याने हितगुजवरिल मनोरंजनात मोठ्या प्रमाणात घट झाली या मनोरंजनास मुकलेले हितगुजकर मोठ्या आशेने विरन्गुळ्या साठी गुलमोहरकडे वळतात तर तिथे एकामागोमाग एक हळव्या स्त्री कथांचे पेव फुटलेले दिसते. कथांच्या पूराबरोबर सर्वत्र वाचकांचे सुस्कारे आणि ढाळलेल्या अश्रुंचा महापूर. अशा या दुःखी वातावरणात बिचार्‍या हितगुजकराने मनोरंजन करायचे तरी कसे?

सशल आणि ईतर हितगुजकर यांच्या या दुःखा वर एक प्राचीन मायबोलीकर आणि हितगुजचिंतक श्री पेशवे यांनी " कोपरखळ्या मारायला सुरूवात करा सगळे पूर्ववत येईल. " असा सल्ला दिला आहे. श्री पेशवे यांचा हा सल्ला तात्काळ अमलात आणून निश्क्रिय निश्प्राण ई. ई. झालेले हितगुजकर पुन्हा खेळीमेळीत येण्यासाठी सादर करित आहोत कुजबुजचा हा नविन " क्रिडा विशेषांक " . यातील खेळ आणि हा अंक दोन्ही आपण सगळे तितक्याच खिलाडू वृत्तीने घ्याल अशी आशा.


************************************

duplicate आणि multiple ID मधील हितगुजकरांचा ईन्टरेस्ट लक्षात घेऊन बहुतांश खेळ हे dup ID चा अंतरभाव असलेले आहेत याची वाचकांनी नोन्द घ्यावी.

सायकिऍट्रीस्ट

हा गेम खेळायला किमान २५-३० हितगुजकर हवेत. तर सर्वात पहिले हितगुजच्या दहा माॅड्स ना वेगळे करून त्यांना बाजुच्या एका खोलीत न्यावे. हे माॅड्स म्हणजे या खेळातील सायकिऍट्रीस्ट. त्यांना खेळाचा एकच नियम नीट समजावून सांगावा तो असा की बाहेर जे १५-२० हितगुजकर बसले आहेत ते सगळे मनोरुग्ण आहेत. त्या सगळ्यांना एकच रोग झाला आहे आणि तो रोग काय आहे ते हुडकून काढायचे काम या माॅड्स रूपी सायकीऍट्रीस्ट लोकांचे. ते त्यानी हितगुजकरांना वेग वेगळे प्रश्न विचारून हुडकून काढायचे.
मग बाहेरच्या खोली मधे बसलेल्या हितगुजकरांना एका वर्तुळात बसायला सांगायचे आणि मग या सर्व हितगुजकरांचा common रोग म्हणजे they think that the person sitting to his right is a duplicate ID! त्यामुळे mods येऊन जेन्व्हा प्रश्न विचारायला सुरूवात करतील तेव्हा ज्याला प्रश्न विचारला तिने त्याने स्वत सारखे नं बोलता आपल्या उजव्या बाजूच्या ID च्या बोलण्याची नक्कल, हावभाव करत उत्तरे द्यायची.
म्हणजे समजा जर का या वर्तुळात दीपांजली तिच्या उजवीकडे मनस्विनी मग अर्च आणि तिच्या शेजारी लिंबुटिंबू बसले आहेत असे या लोकांना वाटत असेल आणि mods नी दीपांजली ला विचारले
" आज कसे हवामान आहे तुमच्या इथे? "
तर DJ ला यावर आपले मत न देता तिच्या शेजारच्या मनस्विनी ची नक्कल करावी लागेल. मग यावर ती सांगु शकेल,

" शी बाई, फ़ारच की बोर होतय आजच्या दिवशी.
पाउस पडणार असं वाटतय पण घरी जाई पर्यंत पडेल नं पडेल.
कुणाला आवडतो का पाऊस इथे? आगदीच वेडा असतो, कधी पण येतो.
माझी एक मैत्रीन पोरगा बघयला गेली नेमका तेवाच इतका पाऊस झाला...तिचा make up n all सगळे खराब झाले.
मग काय दिला त्या मुलाने नकार.
atleast one should meet 3-4 times in such cases and make face to face talk
पण हे पोरगे फक्त रूपरंगाला महत्व देतात. "

किंवा मग arch ला एखाद्या mod ने विचारले,
" तुम्ही सर्वात आवडीने कुठला पदार्थ खाता? "
तर यावर " भरपूर केशर घातलेला कुठलाही पदार्थ मला आवडतो.... अगदी केशर घातलेले थालिपीठसुद्धा. " अशी आपली आवड अर्च ने नं सांगता बाजुला लिंबूटिंबू आहे या guess वर arch स्वगत सुरू करेल,
" तसे तर जेवायच्या टायमाला माह्या बायडीने ने जे पण कोरडे सुके चार घास समोर टाकले ते गोड मानुन म्या खातो पन एर्वीचे विचाराल तर पब्लिक च्या शिव्या, बोलणी सगळे काही म्या खाल्ले हे. निसतेच खाल्ले नाही तर तवा आलेला राग बी गिळला हे अन कुणी अनुल्लेख केला तर त्यो पण पचिवला हे... फ़क्त एक गोष्ट कधी जल्मात नाय खाल्ली आन कधि खानार पन नाय...ते म्हन्जे पैशे.. या पैशे खान्यापायीच या हरामखोरांनी देश ईकायला काढला हे. पन ते आत्ता राहुदे ते मी V and C वर योग्य वेळ येताच लिहिन. (हां पन आत्ता इथे यावरून हमरीतुमरीवर आलात तर तुमच्या हातचे चार ठोसे नाय कधी खाणार! काय समज्लात मिश्टर!! "

आता या नकला करत असतांना बाजुच्याला जर का ही नक्कल पटली नाही तर त्याने ज्यानी नक्कल केली त्याकडे बघून जोरात " psycho psycho " म्हणून ओरडायचे आणि मग सगळ्यांनी पटापट खुर्च्या बदलायच्या अशाने पुन्हा बाजुला नवीन ID येऊन बसला असतो आणि मग सर्वांचा फार मजेशीर गोन्धळ उडतो. आणि जाम मज्जा येते.सन्खली
हा खेळ प्रामुख्याने विदर्भात खेळला जातो त्यामुळे विदर्भातील लोक हा खेळ खेळण्यात जास्त वाकबगार असतात. (उदा : हवा_हवाई)
तर संखली म्हणजे साखळी. हा खेळ हितगुजवर खेळायचा असेल तर एका मागोमाग एक multiple ID बनवून त्यांची एक साखळी तयार करावी आणि प्रत्येक ID ने भरपूर पोस्ट टाकून प्रतिस्पर्धी पक्षाला नामोहराम करावे.
तुमचा original ID कुठला आहे हे समोरच्या गटाने ओळखले तर त्यांची जीत आणि तुम्ही कोण हे प्रतिस्पर्धी गट ओळखू शकला नाही तर तुमची जीत. या खेळात रेफरी म्हणून लालभाई यांना बोलवावे. योग्य वेळी शिट्टी फुंकून रेड कार्ड दाखवण्याचे काम ते चोख पणे पार पाडतात आणि सामन्याचा नेमक्यावेळीच निकाल लागतो.


कानगोष्टी
हा खेळ हितगुजकरांच्या GTG मधे करण्यासाठी राखीव आहे. कानामधे बोलण्याशी याचा काहिही संबन्ध नाही. GTG ला उपस्थीत असलेल्यांनी GTG ला उपस्थीत नसलेल्या आणि आपल्याला हव्या त्या हितगुजकरांविषयी पाहीजे तितक्या " गोष्टी " करायच्या. फक्त गोष्टी काय काय झाल्या हे या कानाचे त्या कानाला कळणार नाही हा एकच नियम पाळावा. काही हितगुजकर हा खेळ याहू मेसेन्जर वर देखील खेळतात पण हा खेळ GTG मधे खेळल्यास अधिक मजा येते.

who तु तु
या खेळातील संकल्पना तशी सन्खली खेळाशी मिळती जुळती आहे. समोरच्या गटातील duplicate ID चा मूळ मालक कोण? हे ओळखून काढणे हे संखलीतल्या सारखेच समान उद्दिष्ट इथे पण आहे. खेळाडुने आपल्या अक्कलहुशारीचा वापर करून समोरच्या duplicate ID च्या लकबी, शाब्दीक कसरती कुठल्या ID च्या आहेत ते जुळवून त्या द्वारे मूळ ID ओळखून काढायचा असतो. हा शोध घेत असतांना खेळाडूंनी समोरच्याला " who तु तु? " म्हणजे तू कोण? आसे सतत विचारायचे असते. हा खेळ खेळणे येरागबाळ्याचे काम नाही. यासाठी हितगुजवर सगळीकडे बारीक लक्ष, अनेक हितगुजकरांचे वागण्या बोलण्याचे तपशील, हितगुजचा इतिहास या सगळ्या गोष्टींची माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे.

डबा ऐस पैस
हा खेळ प्रामुख्याने पार्ले परिसरातील मुलांना आवडेल असा आहे. आपल्या डब्यात असलेला ऐसपैस मेन्यु ईतरांना ओळखायला सांगायचा. नुसता guess मारून ओळखता आला नाही तर दोन options मिळतील. भोन्डल्यातील खिरापती प्रमाणे डबा वाजवून आतला पदार्थ ओळखता येईल. किंवा झाकण नं उघडता वासावरून पदार्थ ओळखता येईल. नुसत्या आवाजावरून पदार्थ जमला आहे का बिघडला आहे हे सांगणार्यास १ गुण जास्त मिळेल. वास दाखवून समोरच्याला जळवण्याचे आॅप्शन सगळ्या सुगरण मुली घेउ शकतात. खेळतांना घ्यायची खबरदारी म्हणजे रोज रोज डब्यात पास्ता, subs , फ़्लाॅवरबटाटा भाजी ई. तेच ते पदार्थ आणु नये.


मी कोण?
एका कागदावर हितगुजवरील एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिचे नाव लिहून तो ज्याच्यावर राज्य आहे त्याच्या पाठीवर चिकटवावा. राज्य देणारा सोडून ईतरांना तो कागद दिसेल असा हवा. आणि मग राज्य देणार्‍याने आपण कोण आहोत त्या विषयी ईतरांना प्रश्न विचारायचे आणि ईतरांनी फक्त " हो " किंवा " नाही " मधे उत्तर द्यायचं.
या खेळात प्रश्नोत्तरे कशी घडू शकतील त्याची ही झलक

समजा पिनाझ वर राज्य आहे आणि तिच्या पाठीवर चिकटवले आहे " हवा_हवाई " तर मग पिनाझ पहिला प्रश्न विचारेल
" मी पुरुष आहे का? "
हितगुजकर म्हणतील " माहीत नाही "
पिनाझ पुन्हा विचारेल " मी बाई आहे का? "
हितगुजकर म्हणतील " माहीत नाही "
आणि मग लग्गेच पिनाझ ओळखेल की ती हवा_हवाई आहे.


रास्-क्रिडा
हा खेळ सगळ्या नवरा - बायकों साठी असुन हा ज्याने त्याने आपपल्या घरी खेळावा. घरी नवर्‍याने अथवा बायकोने केलेली " त्रास - क्रिडा " हितगुजवर येऊन सांगू नये हा याचा एकमेव नियम आहे.इतक्या सगळ्या खेळांसोबत ईतरही काही खेळ आहेत जे हितगुजवर आवडिने खेळले जातात. तसेच या खेळांमधे duplicate ID नसले तरी चालते.
Admin elevan Vs hitgujkar elevan असे cricket चे सामने. तसेच V and C विभागातील शिवा " शिवी " आणि कबड्डीच्या matches , तसेच सहकारनगर मधील पिंगा ई. ई.

सर्व हितगुजकरांसाठी अनेक खेळ झाले तेव्हा आता सर्वात शेवटी हितगुजचे सर्वेसर्वा असलेले admin यांच्या साठी पण आम्ही एक खेळ सुचवीत आहोत तो म्हणजे " statue " .
(आमच्या सारख्या) एखाद्या user ने जास्त टिवटिव करायला सुरूवात केली की Admin नी लगेच हा खेळ खेळायला सुरूवात करावी.


-----------------------------------------------------Asami
Wednesday, December 06, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डबा ऐस पैस >>

खि खि खि

Vinaydesai
Wednesday, December 06, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह. ह. ह. पू. वा.

चला हितगूजची मरगळ दूर होईल...Peshawa
Wednesday, December 06, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चोक्कस... तुला साके पठवतो ग

Sandyg15
Wednesday, December 06, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भरपूर केशर घातलेली पाठव रे

Paragkan
Wednesday, December 06, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khi khi khi khi ... :0))

Sashal
Wednesday, December 06, 2006 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message
Disha013
Wednesday, December 06, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्झ्श्द्ध म्म्म म्ज्व्स्ग म्म्म्म्म

Asmaani
Wednesday, December 06, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह ह पु वा (हसून हसून पुरेवाट), ह. ह. डो. पा.(हसून हसून डोळ्यांत पाणी), ह. ह. पो. दु.(हसून हसून पोट दुखले.)! =))

Chinnu
Wednesday, December 06, 2006 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवा शिवी हा हा हा! अस्मानीला अनुमोदक!! :-) डबा ऐसपैस, स्टॅच्यु भन्नाट!!

Ashwini
Wednesday, December 06, 2006 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hh, Hg च्या दुरावस्थेला खर तर तुझी अनुपस्थितीच कारणीभूत आहे. :-)

Robeenhood
Wednesday, December 06, 2006 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा, ह. ह. पुनरागमन with a bang !
'खवट'या महांकाळ बद्दल काहीच नाही लिहिले?


Kedarjoshi
Wednesday, December 06, 2006 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HH PV .. ... .. .

Ajjuka
Wednesday, December 06, 2006 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hee hee hee hee hee hee hee hee hee hee hee hee hee hee hee..........

Abhi_
Wednesday, December 06, 2006 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this messageBadbadi
Thursday, December 07, 2006 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही!!! gr8 comeback HH ... माझे अश्विनी ला अनुमोदन...

Athak
Thursday, December 07, 2006 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

who तु तु :-) नक्की कोण पुरुष की ईस्त्री ? :-)

Psg
Thursday, December 07, 2006 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हह, ROM मधे चांगलेच लक्ष ठेवून आहेस की हितगूजवर.. :-)

Raina
Thursday, December 07, 2006 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांनी लवकर वाचून हसून घ्या. नायतर अवंदाच्यालापन कोनीतरी कायतरी आब्जेक्षण घ्येतलं तर मंग उडवावं लागल....


Kmayuresh2002
Thursday, December 07, 2006 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी.. ह. ह. लै भारी बरं का..:-)
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions