Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics

एक सॉफ्टकथा

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » कथा कादंबरी » एक सॉफ्टकथा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 29, 200620 11-29-06  11:26 pm
Archive through January 08, 200720 01-08-07  12:06 am

Sanghamitra
Monday, January 08, 2007 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" हॅलो "
" काय म्हणाला सलील ?" नाव सांगायची गरज नव्हतीच.
" ऑनसाईट चे विचारले. "
" ओह. सही है. " फोन कट. मी विचार करायच्या आत माझ्या क्युबिकल मधे हजर खळीतल्या स्माईलसकट.
" मग तू काय सांगितलंस? जातेयस ना ?" त्याच्या आवाजात कुठेतरी हलल्याची जाणीव होतेय का हे मी शोधत होते.
पण अगदी तसा भास सुद्धा नाही झाला मला.
" मी विचार नाहीये केला अजून. "
" का घरचा प्रॉब्लेम आहे का ?"
" नाही रे तसं काही नाही. माझं मलाच "
" रसा तुला वेड लागलंय का? किती चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. लगेच सांगायचे ना हो म्हणून "
" अरे जायचे आहेच मला एक अनुभव म्हणून. पण लॉन्ग टर्म आहे ना. इतक्या लांब इथलं सगळं आयुष्य सोडून एकटं रहायचं. माझी सगळ्याच गोष्टींशी अटॅचमेंट जरा जास्तच असते. "
" ते सगळं सोड रसा. चार दिवसात सवय होईल. आणि इतकी माध्यमं आहेत की संवादासाठी. फोन्स, मेल्स, व्हॉईसचॅट्स. "
हे मला मान्य होतं पण तरीही.
" आणि काय ठेवलंय इथं? या देशाचं काहीही होणार नाहीये आणि इथं रहाणार्‍यांचंही.
मी तर पहिला चांस मिळाला की पळणार इथून. पैसा, लाईफस्टाईल काही नाहीये इथं. "
" अरे इथंच राहून आपलं हे इतकं सगळं चांगलं झालंय की.
एक ते दीड वर्ष आणि अजून पुढे किती काय माहित? इतके दिवस? मी जर तिथे ऍडजस्ट झाले तर मलाच ते नकोय.
मला इथेच रहायचंय. "
" why r u being filmy? मागच्या वीकेंडचा RDB डोक्यातून उतरला नाहिये का अजून? I wonder तू सॉफ्टवेरमधे आलीसच कशी?
सीमेवर जायचे ना लढायला. एवढे आहे ना तर चल राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा म्हणून दाखव पूर्ण. "
इतके caustic remarks आणि ते खळीतलं हसू तसंच. फक्त त्यात आता स्पष्ट उपहास मिसळलेला.
ही चेष्टा असेल तर मला ती आवडली नव्हती.
" हे बघ प्रश्न राष्ट्रगीताचा आणि प्रतिज्ञेचा नाहीये. ते तर मला आठवतं आहेच पूर्ण. पण तू माझी व्हायवा घ्यावीस
इतकं तुला ते आठवतंय का? आणि ते येण्याचा मला मनापासून इथंच राहू वाटण्याशी काय संबंध आहे?
खरंतर ही उत्तरं मी तुला द्यायची मला काही गरज नाहीये.
तरीही तू अगदी software generation ला represent करण्याचा आव आणतोयस ना म्हणून बोलले."
माझा आवाज खालीच होता पण चेहरा नेहमीप्रमाणे लालबुंद झाला असणार. तो एकदम गप्प झाला आणि निघून गेला.
थोडा वेळ मला काहीच सुचले नाही. आता मला जाणवले की जरा जास्तच सिरियसली घेतले हे मी.
ती नजर माझ्यावर रोखलीय हे मला जाणवलं. पण आता ती उतारावरून अपरिहार्यपणे खालीच धावणार्‍या पाण्याची
ओढ नव्हतीच माझ्या नजरेत. मी वर पाहिलंच नाही.
थोड्या वेळाने लक्षात आलं की माझे दोन्ही प्रॉब्लेम्स संपलेत.
मी चिमणीकडे गेले. त्याला सांगितलं. मी आत्ता सहा महिन्यांपर्यंत नक्की जाऊ शकेन असं दिसतंय. पुढचं नाही सांगता येत.
अशी requirement असेल तर मला interest आहे.
" ठीक आहे. मग तू या मॉड्युलच्या integretion आणि deployment साठी तरी जाशील ना.
खरं सांगायचं तर तू तिकडे असशील ना तर तू मॅनेज करशील गं. आणि क्लायंट मला रात्रीबेरात्री उठवणार नाही.
मला इथे शांतपणे झोप लागेल. "
हा काय कौतुक करतोय की काय माझं? मी हवेत जाण्यापूर्वीच
" म्हणजे आता इतके दिवस हेच काम केलेल्या कुणालाही मी हेच म्हटले असते. " हा आहेर.
" And by the way you are better than the lot, these people are asking me to drive the project with. "
त्याच्या चेहर्‍यावर पुन्हा ते मेंढरं हाकणार्‍याचे भाव आले. मी निघाले.
आणि दुसरं म्हणजे आता कुठलेही निगेटिव्ह पॉईंट्स शोधायची गरज नाही हे कळलं होतं.
जायचे सगळे सोपस्कार संपत आले होते. कागदपत्रं, बांधाबांध, खरेदी.
आईच्या मते माझ्या लग्नाच्या खरेदीची रंगीत तालीम होती ही.
शुक्रवार माझा या ऑफिसातला शेवटचा दिवस होता.
मला कळलं नाही तो कधी माझ्या शेजारी येऊन उभा राहिला ते.
" रसा मला बोलायचं होतं तुझ्याशी. "
" बोल ना "
" मी बोललो ती माझी प्रामाणिक मतं होती. तुला दुखवण्यासाठी नाही म्हणालो मी.
आणि आता शेवटी तू चालली तर आहेसच. ते बोललो नसतो तर काहीतरी बदललं असतं असं वाटतंय मला. " उत्तराच्या अपेक्षेने त्याने पाहिलं.
मी काहीच बोलले नाही. एक अख्खं मिनिट.
"You know something rasA? You are a nice girl. And somehow I have realized that I have lost you without any fault of mine."
शब्द डोक्यात शिरायच्या आत तो गेला होता.
खरं सांगू दिविश? तू मला नाही मीच तुला गमावलंय. पण तेच बरंय.
आधी मी प्रयत्न करत होते तुझ्यात काहीतरी वाईट शोधायचा. मला आवडत नाही असं काहीतरी. जे मी स्वतःच जस्टीफाय करू शकत नव्हते.
पण आता ही तुझी मतं ऐकली ती न आवडण्याचा प्रश्न नाहीये पण माझ्याशी न जुळणारी आहेत हे नक्की.
तेंव्हा एकत्र येउन दुःखी रहाण्यापेक्षा थोडे दिवस हृदयातली कळ सोसावी आणि एक छोटीशी छान आठवण जपून ठेवावी कायमची.
माझं मन एकदम निरभ्र झालं होतं.
नवीन मेल चा ऍलर्ट आला. दोन क्युट छोटी मुलं शाळेत चाललेली. त्यावर "Friends?" एवढंच लिहीलेलं.
मी समोर पाहिलं. तो प्रसन्न हसला. जणू त्याच्या मनातलं जाळं फिटून तोही माझ्यासारखाच निरभ्र झाला असावा असा.
समाप्त.


Sakhi_d
Monday, January 08, 2007 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा छान आहे........ आणि थंक्स कथा पुर्ण केल्याबद्दल.........Rupali_rahul
Monday, January 08, 2007 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्र, खुपच छान आणि एक वेगळ शेवट, नेहमीसारखा पचपचीत नाही.

Psg
Monday, January 08, 2007 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी, हे आधी लिहिलं असतस तर? :-) :-)
मी दोन्ही भाग खूप भराभर वाचले आणि वाटलं की घाईघाईनी संपवलस.. पण पुन्हा नीट वाचले आणि सगळं पटलं.. छान लिहिलं आहेस.. goes with your flow too.. keep writing! :-)


Dineshvs
Monday, January 08, 2007 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा खुप छान कथा आहे. पण सलग वाचायला मिळाली असती, तर फार छान झाले असते. लिंक तुटली नसती.

Maitreyee
Monday, January 08, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे! माझं काही मिस झालं का? ती संयु आणि दिविश चं काय होतं मग? ते कळलं नाही!!

Prajaktad
Monday, January 08, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा! मलाही लिंक तुटल्याने आटोपल्यासारखी वाटली कथा...तरिही सलग वाचल्यावर आवडलिय..

Asami
Monday, January 08, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे एक तर archive BB आहे फक्त. परत एकदा वाचा ना सलग. काहिहि link तुटली etc वाटत नाहि मग.

Jhuluuk
Tuesday, January 09, 2007 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय, मला शेवट खुप आवडला..
बर्‍याच दिवसांनी उत्तरार्ध आल्याने कथा सुरुवातीपासुन पुर्ण वाचुन काढली..


R_joshi
Tuesday, January 09, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा सॉफ्टकथा अगदि सॉफ्टली हाताळलिस. खरच छान लिहिलिस कथा:-)

Adm
Tuesday, January 09, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nice one. :-)
Thoda kahitari happening ghalayla hava hota end la asa vatala...
Bhasha khup chan ahe pan.. :-) Keep it up

Kandapohe
Tuesday, January 09, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा छान लिहीले आहेस. सलग वाचल्यामुळे संपवली असे वाटले नाही.

Sashal
Tuesday, January 09, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलही कळलं नाहि त्या संयु आणि दिविश च प्रकरण .. की ते चुकून लिहीलं गेलं? पण तसं असेल तर ही रसा त्या दिविश चे negative points कशाला शोधत होती?

Sanghamitra
Tuesday, January 09, 2007 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

epilogue
खरं म्हणजे गोष्ट लिहायला घेतली तेंव्हा ती संयुक्ता आणि दिविशचीच होती.
ती रसाच्या दृष्टीतून लिहायचं ठरवलं तेंव्हा लक्षात आलं की रसाची स्वतःची एक गोष्ट आहे. ती जरा वेगळी आणि आधी घडलेली होती म्हणून ती आधी लिहिली.
जी टिपिकल प्रेमकथा आहे ती संयु आणि दिविशचीच आहे. (ती मी लिहीणार नाही तेंव्हा काळजी नसावी. :-) )

- संघमित्रा


Gandhar
Wednesday, January 10, 2007 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे, छान!!, मस्त लिहिलीयस गं :-)

Meenu
Thursday, January 11, 2007 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा मस्तच झाली ही कथा .. बरं झालं वेळ काढलास ते ..

Ramani
Friday, January 12, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छन कथा! पुर्ण केल्याबद्दल धन्यवाद!!
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions