Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
पाश

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » कथा कादंबरी » पाश « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 15, 200620 10-15-06  4:27 am

Sharyu
Sunday, October 15, 2006 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान लीहीले आहे. पुढचे वाचायची उच्छुकता लागली आहे खुप.

Manuswini
Monday, October 16, 2006 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना
खरेच छान गं

मला सुद्धा हेच वाटते जीव गुंतवण्याचा, जीव ओतून टाकण्याचा स्वभाव हा वाईटच........
खुप त्रास होतो स्वःताला. आणी त्यात जर समोरची जवळची व्यक्ती कोरडी असेल तर आणखीन त्रास होतो कारण आपली मनाची आंदोलने त्या व्याक्तीला खरोखरच समजत नाही की जाणुन बुजुन ती व्यक्ती जाणुन घेत नाही हाच एक आणखी मोठा त्रास असतो :-(

काही म्हण आपल्या आई वडीलांना हेच वाटते जेव्हा आपण त्यांना सोडुन इथे येतो


Princess
Monday, October 16, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, खुप सुरेख लिहिलयस तू... स्त्रिया भावनेला महत्त्व देणार्‍या तर पुरुष practical हे छान मांडता आलय तुला.
संवाद तर अगदी सहजपणे उतरलेत. जणु काही आपल्या आजुबाजुला घडतेय ही कथा असेच वाटले मला.



Maudee
Monday, October 16, 2006 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना ख़ूप सुरेख़....
प्रियाला अनुमोदन:-)


Bee
Monday, October 16, 2006 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, माझी प्रतिक्रिया वाचून नाराज नको होऊस. मला नाही ही कथा, नाही तिचा आशय, नाही एकमेकांमधले संवाद, नाही कथेचा प्रवाह की नाही शब्दकळा.. कथेत नाविन्यता नाही! कुठल्याच कोनातून मला तुझी ही पहिला कथा असावी जी भावली नाही. एकतर अवी आणि वैदेही मधला अरेतुरेपणा खटकला. आजची पिढी जशी बिनधास्त आहे -- बायको एकमेकांना नावाने हाक मारते, अरेतुरे करते आणि नवरा तिला हो गं, नाही गं असे म्हणतो.. हे सर्व आत्ताच्या काळात चालणारे आहे. दुसरे म्हणजे, तू जो हळवेपणा दाखविला वैदेहीचा तो खूप common झाला आहे. त्याहून वेगळं काहीतरी अपेक्षित होतं. वडीलांचे त्यावरची उत्तरही तशीच..

कथा सो सो वाटली पण तू नियमित लिहिते त्याचे मात्र नित्यनेहमीप्रमाणे कौतुक :-)


Milindaa
Monday, October 16, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'पाश सुटत नाहीत' हेच थोडे पुढे नेले तर सगळ्या सासवा सुनांची भांडणे का होतात हे पण त्यात सहज कव्हर होईल :-)

चांगली मांडणी आहे!


Priya
Monday, October 16, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुझ्या प्रतिक्रियेवरची माझी प्रतिक्रिया वाचून नाराज नको होऊस.

'मला नाही ही ... ' हे जे दुसरे वाक्य आहे त्यात 'आवडली' हे क्रियापद विशेष कारणाने गाळले आहे का?

नाविन्यता म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काय? नावीन्य हा शब्द माहीत आहे पण नाविन्यता या शब्दाचा अर्थ कळत नाहीये.

आणि हो - कुठल्याही कोनातून असा शब्दप्रयोग कधी ऐकल्या - वाचल्याचं आठवत नाहीये. 'दृष्टी'कोनातून माहीत आहे. इंग्रजीमध्ये from any angle हेही माहीत आहे.

आई - वडिलांच्या वयाच्या नवरा - बायकोने एकमेकांना अरे - तुरे म्हणणे यात न पटण्यासारखे काय आहे? मुळात यात बिनधास्तपणाचा काय संबंध आहे? म्हणजे तुझे 'आजची पिढी जशी बिनधास्त आहे' हे विधान या संदर्भात असावे असे गृहीत धरले आहे. बरं, नवर्‍याने हो गं, नाही गं करणे यात काय वेगळे आहे? माझे वडिलही माझ्या आईला 'अग' म्हणतात आणि कल्पना कितीही ताणली तरी कुठल्याच निकषावर ते 'बिनधास्त' नाहीत. नवर्‍याने बायकोला 'अहो' म्हणणे निदान शहरी - माझी माहिती ब्राह्मणी कुटुंबातली आहे - कुटुंबात तरी केव्हाच बंद झाले असावे.

हळवेपणा common झाला आहे म्हणजे काय? आणि आधी कधी नव्हता का? कुठे कॉमन झाला आहे? आणि तो जर कॉमन आहे तर तो कथेत आला तर त्यात आश्चर्य ते काय? कलाकृतीत माणसाच्या मनाचा, तत्कालीन समाजाचा संदर्भ येणं यात खटकण्यासारखे काय आहे? मुळात कथेची सुरूवात ज्या प्रकारे झाली होती त्यावरून वैदेहीची व्यक्तीरेखा लगेच लक्षात येतेच, मग 'त्याहून वेगळं' काय अपेक्षित असणार? ती हळवी असेल याचा अंदाज सुरूवातीसच येतो की!

कथा अजिबात सो सो वाटली नाही, पण तुझी प्रतिक्रिया मात्र कथा समजून न घेताच लिहीलेली वाटली. प्रत्येक कथेत काही नवीन प्रयोग असणं आवश्यक आहे का?

मिलिंदा - तुझं म्हणणं अगदी पटलं. हाच धागा पुढे नेला तर सासू झालेल्या स्त्रीला let go करणे अवघड होत असेल हे खरं तर सून असलेल्या स्त्रीला सहज समजायला हवे.


Sharyu
Monday, October 16, 2006 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षमस्व मी 'अहंकार कथेची प्रतीक्रीया ईथे टाकली. (पुढचे वाचायची उच्छुकता)
पण मला ही कथा ही खुप आवडली हं. खरेच स्त्री मन किती गुंतणारे असते ना.


Sanghamitra
Tuesday, October 17, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना छान आहे गं गोष्ट नेहेमीसारखीच.
बी फा. बु. वि. तु. :-)


Savani
Tuesday, October 17, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, खूप आवडली तुझी कथा. छानच.

Milindaa
Tuesday, October 17, 2006 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय बी, तुझी आजची तिखट प्रतिक्रिया उडवलीस वाटतं?

Prajaktad
Tuesday, October 17, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना छान आहे कथा..


Kshipra
Tuesday, October 17, 2006 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, कथा आवडली. ..

Arch
Tuesday, October 17, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना नेहेमीप्रमाणे छान. तुझी style शैलजा राजे किंवा जोत्सा देवधरांसारखी आहे. थोडक्या शब्दात मनाची पकड घेणार.

Rachana_barve
Tuesday, October 17, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप thanks सगळ्यांचे. गोष्ट वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया टाकल्याबद्दल :-) मनापासून आभार..

Lajo
Tuesday, October 17, 2006 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, तुझी रचना अगदी उत्तम! डोळ्यात पाणी आले. आईँची आठवण आली. माझा नवराही एकुलता एकच. आई सुद्धा अश्याच हळव्या होतात आम्ही परत जायला निघालो की आणि पपा एकदम शांत होतात..

मी पहिल्यांदाच तु लिहिलेली कथा वाचली. छानच आहे. अशीच लिहीत रहा. तुला अनेक शुभेच्छा.


Sharyu
Wednesday, October 18, 2006 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो तु औस्त्रेलीया त कुठे आहेस? मी मेलबर्न मधे आहे.
विशयांतरासाठी साॅरी. मराठीत लीहीणे बरेच अवघड आहे. सगळ्या कथा लीहीण्यार्रांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.


Lajo
Thursday, October 19, 2006 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय शरयु, मी कॅनबेराला आहे. ९ वर्ष झाली मला इथे येउन. तु कधी आलीस मेलबर्नला?

Gs1
Thursday, October 19, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, सहजसुंदर कथा. प्रियाला अनुमोदन...
>>>>>नेहमीच तुझ्या कथांमध्ये तू मनाची आंदोलनं अगदी अचूक पकडतेस आणि अतिशय साध्या, सुंदर भाषेत पण अगदी नेमकेपणाने मांडतेस. एकवेळ म्हातारीचा कापूस हातात येईल पण मन - तेही स्त्रीचं मन हे असं चिमटीत पकडणं फार अवघड आहे आणि तुला ते अगदी छान साधतं.



Giriraj
Thursday, October 19, 2006 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना,उत्तम! अगदी लहानसहान वाक्यांतून कथा अगदी जिवंत केली आहेस!

Upas
Thursday, October 19, 2006 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा खूप आवडली.. खूप जवळची वाटतेय.. छान टीपलेयस आणि मांडलेयस मनं संवादाच्या माध्यमातून..

Nilyakulkarni
Thursday, October 19, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना एकदम छान मस्त लिहिले आहेस

Sharyu
Thursday, October 19, 2006 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो आम्हाला इथे येऊन ६ महीने झाले. मी सध्या घरीच असते. त्यामुळे मायबोली वरच पडीक असते. मला तुझा फोन नं. देउ शकते का?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators