Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
दिल चीज क्या है आप मेरी ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » ललित » दिल चीज क्या है आप मेरी « Previous Next »

Farend
Tuesday, August 22, 2006 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


भालचंद्र नेमाड्यांच्या 'कोसला' मधे अशा प्रकारची एक कल्पना वाचली होती. सुमारे १००,२०० वर्षांनी त्यावेळचे लोक जर आत्ताच्या (पण बहुधा तेव्हा कालबाह्य झालेल्या) गोष्टींचे वर्णन एकमेकांना करू लागले तर कसे करतील म्हणून. पूर्णपणे आठवत नाही, पण मजेदार कल्पना होती. हा तशाच प्रकारचा एक उद्योग आहे.

पूर्वीपासून हिंदी चित्रपटांत हे 'दिल' फार बोकाळून राहिले आहे. आता मात्र प्रेमात पडले तरी दिल बिल च्या भानगडीत न पडता ' 24X7 I think of you ' असे इंग्रजीप्रचूर तरी म्हणतात किंवा गोव्यात राहात असले तरी 'अपुन बोला तू मेरी लैला' असे बम्बैय्या वगैरे भाषा वापरतात. त्यामुळे 'दिल' शब्द सुद्धा अजून १०० वर्षांनी कालबाह्य होईल (जसे सावरिया, पिया वगैरे आता बिछडलेत), आणि मग नंतरचे लोक जेव्हा ही 'जुनी' गाणी ऐकतील तेव्हा त्यांना प्रश्न पडेल की हे 'दिल' काय होते आणि त्यात असे काय होते की जे एव्हढ्या गाण्यांत एव्हढ्या वेगवेगळ्या पद्धतीने यावे?

'दिल चीज क्या है आप मेरी जान लीजीये' असे रेखाने आर्तपणाने आणि काही वर्षांनंतर जॉनी लिव्हरने 'तेज़ाब' मधे आणखी कळवळून म्हंटल्याने, त्याची माहिती काढण्याची उत्सुकता निर्माण झाली...

काही गाण्यांतून असे वाटते की हे 'दिल' म्हणजे घरासारखे काहीतरी असावे, कारण

 • मुझे रहना है तेरे दिलमे, किराया बोल क्या लेगी...
 • तेरे दिल मे अगर थोडीसी जगह मिल जाये...
 • दिल की गिरह खोल दो, चुप न बैठो...
 • भोली भाली लडकी, खोल तेरे दिलकी, प्यार वाली खिडकी...
 • ...दिल मे बस जाने दे मुझको, दिल के सब दरवाजे खोल...
 • दिल के झरोको मे तुझको बिठाकर...

एव्हढे सगळे दारे, खिडक्या वगैरे असणारी गोष्ट म्हणजे घरच असणार. आणि उदास झालेल्या व्यक्तींना झरोक्यात बसवल्यावर बरे वाटत असे ही नवीनच माहिती मिळाली. शिवाय 'दिल मे किसिके प्यार का जलता हुआ दिया, दुनिया की आंधियोंसे भला ये बुझेगा क्या' जो दिवा वादळात सुद्धा विझत नाही, तो नक्कीच घराच्या आत लावलेला असणार.

पण इतर काही गाणे ऐकल्यावर असे वाटते की हे 'दिल' कदाचित ऐकू, बोलू शकणारं काहीतरी असणार, हेच बघा...
 • मेरे दिल ने तडपकर जब नाम तेरा पुकारा...
 • ये दिल सुन रहा है तेरे दिल की जबॉ...
 • दिल की आवाज भी सून मेरे फ़साने पे न जा

किंवा
 • दिल बोले बूम बूम...

भौतिकदृष्ट्या हे 'दिल' कशापासून बनलेले आहे काही नक्की कळत नाही, पण बहुधा श्रीमंत लोकांचे दिल हे सोने, चांदी वगैरे पासून बनलेले असावे आणि इतरांचे काचेपासून. आणि या इतर सर्वांना ते तुटण्याची फार भीती वाटत असणार, कारण...
 • शीशा-ए-दिल इतना न उछालो ये कही टूट जायेगा, किंवा...
 • कोई सोने के दिल वाला, कोइ चांदी के दिल वाला शीशे का है मतवाले तेरा दिल...

आणि ते ज्वालाग्राही पण दिसते, कारण ते जळत असण्याचे उल्लेख आहेत. पण ती फारशी वाईट गोष्ट समजली जात नसावी, कारण बहुतेकांनी ते जळत असताना काही तक्रार केलेली नाही: "दिल जलता है तो जलने दे" किंवा "कहीं दीप जले कही दिल". काहींनी तर फारच निर्विकार चेहर्‍यांनी ही गाणी म्हंटलीत. तसेच ते हरवणेही चांगले समजले जात असावे. 'दिल खो गया' टाईपची गाणी बहुधा आनंदीच आहेत.

कही वेळा तर असे वाटते की या लोकांना दुसरा शब्द आठवला नाही की सरळ 'दिल' ठोकून देतात तिथे - 'दिल की किताब', 'दिल का भवर', 'मेरे दिल की घडी करे टिक टिक', 'दिल का खिलौना' काय, काय वाट्टेल ते या दिल पासून बनवता येते!

असो. अजून या विषयावर शोध चालू आहे. एकदा हे दिल काय आहे ते कळल्यावर मग त्यात भरून ठेवता येण्याजोग्या गोष्टींच्या बाबतीत शोध लावणे सोपे जाईल. त्यादृष्टीने दिल म्हणजे एक भांड्यासारखी वस्तू असावे असेही काही जणांचे मत आहे
 • ये प्यार भरा दिल तेरे लिये है
 • मै दिल हू एक अरमान भरा
 • देख ली तेरी खुदाई बस मेरा दिल भरगया


टीप: दिल चीज क्या है मधल्या जान शब्दाच्या अर्थाबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. म्हणजे मायबोली वरच्या एका एक्स्पर्ट शी माझे मतभेद आहेत :-). जान म्हणजे प्राण का जान म्हणजे समजणे याबद्दल.


Kandapohe
Tuesday, August 22, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जान म्हणजे प्राण का जान म्हणजे समजणे >>
अमोल, छानच. दोन्ही अर्थ बरोबर आहेत.

पण माझ्या मते

फक्त दिलच काय माझा प्राण पण तुझाच आहे हे बरोबर वाटते.
:-)

Giriraj
Tuesday, August 22, 2006 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वावा! पण हा 'बिद्वान' कोण आहे बरे?


Anilbhai
Tuesday, August 22, 2006 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे. दिलसे लिखते रहो. :-)

Kiru
Tuesday, August 22, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल.. झक्कास रे
अनीलभाई


Swati_patel
Tuesday, August 22, 2006 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राण बरोबर वाटते, कारण पुढची ओळ आहे
बस एक बार मेरा कहा, मान लिजिये

तु माझं ह्रदय च काय पण प्राण पण घे, पण एकदा तरी माझे म्हणणे ऐकुन घे


Kedarjoshi
Tuesday, August 22, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फरेन्डा,
मस्त. सही लिहिलेस.


Rachana_barve
Tuesday, August 22, 2006 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रेंडा मस्त लिहिले आहेस..

Kandapohe
Tuesday, August 22, 2006 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारण पुढची ओळ आहे >>
बस एक बार मेरा कहा, मान लिजिये >>
पुढची ओळ असे तर सुचवत नाही ना. दिल तर घेच, प्राण पण घे, वाटल्यास एकदा माझी मान पण घे.


Asmaani
Tuesday, August 22, 2006 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kp धिस इज म्हणजे अगदी टू मच हं.

Bee
Tuesday, August 22, 2006 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रेंड खूप विनोदी, थोडं उपरोधिक लिहिल आहेस.. पण छान लिहिलं आहेस. एकच कळल नाही की काही गाणी इतक्या छान कविता आहेत आणि कवितेत रुपक, प्रतिमा, विशेषणांचा कित्येकदा आपण वापर करतोच की.. उदा. 'करकरीत तिन्हीसांजा' असे आपण म्हणतो. तेंव्हा तिन्हीसांजा काही वहीचे पान नाही की शंभराची नोट नाही. तरी तिन्हीसांजा डोळ्यासमोर ठेवल्यात तर करकरीत विशेषण एकदम पटतं. तसेच तुम्ही इतकी छान गाणी इथे उदा. म्हणून दिलीत ज्यातील काही गाणी उत्तम कविता आहेत. काही निव्वळ कल्पना आहेत तर काहींचा आतला अर्थ खुप खोलवर आहे.. त्याचा तुम्ही विचार केला नाही का? की करुनही तुम्हाला ती गाणी विनोदीच वाटली..

Kmayuresh2002
Wednesday, August 23, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रेंडा,छान लिहीलयस रे.. ..

केप्या, खी खी खी.. भारीच इनोदी बुवा तू:-)


Itsme
Wednesday, August 23, 2006 - 12:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजेदार ...

Farend
Wednesday, August 23, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

अरे मला अरे तुरे केले तरी चालेल. आणि नाव मराठीत साधारण 'फार एन्ड' असे होईल. म्हणजे pavillion च्या विरुद्ध बाजूचा end .

मायबोलीवरची ती एक्स्पर्ट म्हणजे Rar . विद्वान शब्द मी स्वत्:बद्दल वापरून dilute केलाय, म्हणून एक्स्पर्ट.

Bee मलाही यातील बरीच गाणी आवडतात, त्यातल्या सुंदर कल्पनांची थट्टा करण्याचा उद्देश नाही. फक्त त्यातल्या ओळी संदर्भ सोडून 'एखादा रिसर्च करणारा अरसिक माणूस' कश्या बघेल तसे काहीसे आहे हे (किंवा "हिंदी चित्रपटांत दिल शब्दाचा वापर कसा केला आहे त्याची ८-१० उदाहरणे द्या"). काही काही गाण्यांतल्या कल्पना खूप छान आहेत हे मान्य.


Kandapohe
Wednesday, August 23, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल, तुला काय वाटते पण? समज की प्राण? ते तू शिताफीने लिहायचे टाळले आहेस.

BTW तू पेरूगेटचा का विमलीचा?


Psg
Wednesday, August 23, 2006 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारएंड, मस्त लिहिलेय, वेगळी कल्पना.. तुझ्या रंगीबेरंगी मधे का नाही लिहत?

मला वाटत 'जान'अचा इथे अर्थ 'समजून घे' असा आहे.. माझं 'दिल' काय आहे ते एकदा तरी समजून घे आणि एकदा तरी माझं म्हणणं ऐक.. या अर्थी..


Bee
Wednesday, August 23, 2006 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिल चीज क्या है
आप मेरी जान लिजिये

वरील ओळींमध्ये 'जान' चा अर्थ 'जीव', 'प्राण' असा आहे. जर 'समजून घे' असे म्हणायचे असते तर ती ओळ्-

आप मुझे जान लिजिये

अशी असायला हवी होती.

आप 'मेरी' जान लिजिये- ह्या शब्दरचनेवरून इथे तरी जान शब्दचा अर्थ 'जीव' असा अपेक्षित आहे.


Vinaydesai
Thursday, August 24, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee जरूरी नाही असं असणं... चीज हा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे 'दिल चीज क्या है मेरी' , 'आप जान लिजिये' असा पण अर्थ होऊ शकतो. लिहिणार्‍याने मस्त करामत केली आहे त्या तीन शब्दांवर... दोन्ही अर्थ त्याने सुचवलेत..


A_sayalee
Thursday, August 24, 2006 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याची पुढची ओळ "बस एक बार मेरा कहा मान लिजेई" अशी असताना, मला तरी त्याचा अर्थ
"दिल तर काहिच नाही, तुम्ही माझे प्राणही घ्या, पण एकदा तरी माझं म्हणणं मान्य करा" असाच वटतो. cbdg


Giriraj
Friday, August 25, 2006 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिल चीज़ क्या है आप मेरी जान लिजिए

माझं हृदय हा आहे तरी काय प्रकार एकदा तरी जाणून घे प्रिया,(यात तुझ्यासाठी प्रेमच प्रेम भरलय आणि तू मात्र असा माझ्याकडे दुर्लक्ष करतोस कायमच) इतकं एकदा तरी ऐक रे,एकदा तरी माझं हृदय जाणून घे!

बर्र... आता कुणाला काही शंका?
दुसरा अर्थ मला तरी फ़ारच भयानक वाटतोय.. जान घ्या,मान घ्या! :-)


Princess
Friday, August 25, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी,सध्या तरी तुला सगळ्या गाण्यातले छान छान अर्थ कळतील नंतर मात्र असे वाटेल की कधी एकदा जान घेउ आणि कधी एकदा मान घेउ :-)
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators