Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 07, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » कथा कादंबरी » बेनजीर काय म्हणेल » Archive through August 07, 2006 « Previous Next »

Shonoo
Saturday, August 05, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेसिडेन्सी च्या वेळच्या मैत्रिणी नेहेमीच्या. एखादे वेळी हॉस्पिटलमधल्या इतर बायका ही येत. किंवा एखाद्या डॉक्टरणीची मैत्रीण, बहीण अशाही कोणी कोणी पाहुण्या येत. रेसिडेन्सी सम्पत आली तश्या या भेटीही तुरळक होऊ लागल्या. एकेकीचा संसार वाढू लागला त्यामुळे मग baby sitter शोधून मग गर्ल्स नाइट ठरू लागल्या. मुलं मोठी झाली तसं त्यांचे क्लासेस, प्ले ग्रुप इत्यादींमधून गर्ल्स नाइट करता वेळ काढणं आणखीन कठीण होऊ लागलं त्यामुळे ४-५ वर्षांपूर्वी कॅथीने सुचवलं की एक last thursday of alternate month या गर्ल्स नाइट साठी राखून ठेवायचा. आतापर्यन्त सर्व मैत्रिणी पण आपापल्या नोकरी धन्द्यामधे चांगल्या स्थिरावल्या होत्या काही चांगल्या नावाजलेल्या पण होत्या. वाढतं इन्कम आणि वाढतं वजन दोन्हींमुळी पिझ्झा पार्लर मधे न भेटता हॉस्पिटल जवळच एक मोठे होटेल आहे तिथे भेटू लागलो होतो. बाहेर गावच्या कोणी मैत्रिणी आल्या तर तिथेच रहायच्या सुद्धा.

अशी आमची गर्ल्स नाइट आता मागच्याच महिन्यात झाली होती. माझी चाळिशी म्हणून जावेने शॅम्पेन डिनर sponsor केलं होतं.

आता मधेच परत गर्ल्स नाइट? ती सुद्धा सोमवारी? माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह तिला कळलंच. पण तिने काही दखल घेतली नाही. नवरा म्हणाला कामावरून सरळ जा तू. मी मुलांच बघतो. सासूबाई पण म्हणाल्या "जा नं मग". मला अगदी राहून राहून लास्ट सपर ची आठवण येत होती. पण "आपल्या करताच करतायत येवढं सगळं. मग कशाला मोडता घाला?" असा विचार करून गप्प बसले.

आता फक्त उद्याचा दिवस आपल्या हातात. परवा सर्जरी. त्यापुढचे दिवस कसे असतील ते कोणी सांगावं? अगदी धडधाकट वाटणार्‍या पेशन्टची chemo therapy ने काय अवस्था होते हे अनेकदा पाहिलं आहे. आपण त्याला कसं तोंड देऊ शकू? समजा chemo यशस्वी नाहीच झाली तर?

माझ्या दोन्ही बाळंतपणाच्या वेळी सर्जन असलेला नवरा किती घाबरून गेला होता. दुसर्‍या वेळी तर गायनेकॉलॉजिस्ट ने त्याला दम दिला होता नी रूम मधून हाकलून लावायची धमकी दिली होती. अगदी आता मॅमोग्रॅम परत करायला सान्गितलं तेंव्हा देखील तो किती कावरा बावरा होता?





Mrinmayee
Saturday, August 05, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु, शब्द खरा केलास, अगदी वीकएंडला पण लिहून काढलंस! पुढे लिहीत रहा, वेळ मिळेल तसं. (सगळं एकत्र वाचावसं वाटतंय, अगदी शेवटपर्यंत! पण खरंच रात्री जागून वगैरे नको लिहूस. थीसीस पूर्ण करतानाचं टेंशन घेऊन! :-) आम्ही थांबु पुढच्या भागासाठी!)

Shonoo
Saturday, August 05, 2006 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आई मी ७-८ वर्षांची असताना वारली. अजूनही तिच्या विषयी बोलताना माझे डोळे भरून येतात. सावत्र तरी आई असावी असं फार वाटत असे मला. कोणी विधवा अथवा प्रौढ कुमारिका बाई दिसली की मी ती बाई आपली सावत्र आई झाल्याची स्वप्ने पाहात असे. एक दोनदा बाबांना तसं बोलूनही दाखवलं होतं. ते येवढे दुखावले होते माझ्या वागण्यामुळे. एकचदा म्हणाले "तुझ्या आईची जागा दुसरं कोणी घेऊ शकणार नाही. कधीच! यापुढे हा विषय बन्द." त्यानन्तरही माझं स्वप्न रंजन चालूच असे. पण परत त्यांच्याशी याबाबत बोलण्याचा धीर झाला नाही.

आम्हा दोघी बहिणींचा अभ्यास, जेवण खाण, कपडे यांच्या कडे व्यवस्थित लक्ष असे. कपडे नीटनेटके असावेत. केस व्यवस्थित असावे. कुठे समारंभाला जाताना ठेवणीतले कपडे घालावेत. एखादा दागिना अंगावर असाव यावर कटाक्षाने लक्ष असे. "आई वेगळ्या मुली" असं कधी माझ्या मुलींना ऐकावं लागू नये म्हणायचे.

मी रजिस्टर लग्न करणार म्हणून सांगितल्या वर म्हणाले "मला जमणार नाही असा विचार करू नकोस. आई असती तर रीतसर सर्व विधिवत लग्न लागलं असतं अस मनात आणू नकोस. तुझ्या सासरच्यांशी मी बोलतो हवं तर".

आता माझां काही बरं वाईट झालं तर नवरा काय करेल? त्याने खरोखर उरलेलं आयुष्य एकट्याने काढावं का? का काढावं? मुलं आणखीन थोड्याच वर्षात घरट्याबाहेर उडून जातील. मग त्याला जोडीदार कोण? लग्नाच्या वेळी म्हणाला होता 'Its not that I can live with you, I can not live without you.' मला भांडायला, वाद घालायला, हट्ट करायला तूच हवी. मग आता माझ्या माघारी त्याला कोण? त्याने जर परत लग्न केलंच तर तिची मुलं असली तर मग माझ्या मुलांना आई तर नसेलच, बाबा सुद्धा पुरता लाभणार नाही का.

असे विचार करण्यात सगळा सोमवार संपत आला. Autopilot वर असल्या प्रमाणे यान्त्रिकपणे हॉस्पिटलच्या कामाची सर्वांन विभागणी करून दिली. Filing cabinet सर्व नीट लावून ठेवले. शिकवायच्या विषयाच्या नोटसच्या प्रती काढून ठेवल्या. आतापर्यंतचे Grades सर्व नोन्दून ठेवले.

अजून एक कॉफ़ी प्यावी का असा विचार करेपर्यंत कॅथी आली म्हणाली ' चलो चलो' हिला कसे भारतीय रेसिडेन्टच भेटतात नेहेमी आणि हिन्दी शिकवतात हे कोडंच आहे. मी कॉम्प्युटर वरची नजर तिच्या कडे टाकली तर डोक्यावर भली थोरली हॅट! मी What's with the flower arrangement on your head?' विचारलं तर म्हणे protection . आता हॉस्पिटल पासून ते हॉटेल एक ब्लॉक दूर आहे. तेवढ्याकरता तिला एवढी मोठी हॅट कशाला? मी 'चक्रमच आहे' असा विचार करेपर्यंत मला म्हणाली ' Dont you go calliing me चॅक्रॅम'! आता तिला चक्रम शब्द मीच शिकवलेला. मग ऐकून घ्या गपचूप.


Shonoo
Saturday, August 05, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व स्टाफ़ चा निरोप घेऊन हॉटेल मधे येईपर्यन्त आम्हाला दोघींन जरा उशीरच झाला होता. अजून कोण कोण येणार आहे ते मला माहिती नव्हतं कॅथी ने फक्त एक दोघीन्चीच नावे घेतली. इतक्या short notice वर जास्त कोणी येऊ शकणार नाहीत. किंवा आल्याच तर थोडा वेळ डोकावतील, काही सल्ले देतील, मदत लागली तर सांग म्हणतील आणि कटतील.

Shonoo
Sunday, August 06, 2006 - 10:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताम्ब्यांची कविता गेले कित्येक दिवस मनात रुंजी घालतच होती. मेघ वर्षतील, शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील.... कसे काळजात रुतणारे शब्द आहेत. दुधारी तलवार जणू.
रिसेप्शन वाल्या सुन्दरीशी कॅथी पुढे होऊन काहीतरी बोलत होती. तिच्या खान्द्यावरून डोकावून त्या सुन्दरीने मला पण त्यांचं घोटीव हसू बहाल केलं आणि परत कॅथीशी काहीतरी बोलू लागली. तेवढ्यात तीन इतर मैत्रिणी पण लॉबी मधे आल्या. बघते तर त्यान्च्या पण डोक्या वर मोठाले 'फ़्लॉवर अरेंजमेन्ट'! कुठल्या तरी कॉन्फ़रन्स मधे मिळालेल्या असणार. नाहीतर सगळ्यांकडे एक सारख्या हॅट कशा येतील? या फार्मा कंपन्या काय काय वाटतील देवच जाणे!

कॅथी आली आणि म्हणाली की त्यांचे रेस्टॉरन्ट गजबजलेले आहे. तर आपल्यासाठी एक मीटिन्ग रूम दिलीये. त्या सुन्दरीच्या मागोमाग आम्ही जाऊ लागलो. मीटिंग रूम मधे चार सहा टेबले सेट होती. सर्व टेबलांवर माझ्या आवडत्या पांढर्‍या कॅला लिलीचे सेन्टर पीस. पांढर्‍या मेणबत्त्या. मन्द पियानो जॅझ चे सूर. सर्व जणी लगेच उठून आल्या आणि एकदम कलकलाट सुरू झाला. थोड्याफार फरकाने सासू सासर्‍यांशी झालेल्या संवादाची पुनरावृत्ती झाली. आम्हाला कल्पनाच नव्हती. मागच्याच महिन्यात भेटलो तेंव्हा तर तू ठणठणीत होतीस! इत्यादीची भर.

एक वेटर मागे पुढे घुटमळत होता. त्याला कॅथीने काहीतरी सांगून कटवले. What are we waiting for, Merry Christmas? म्हटल्यावर वैतागली. तुला सदाचीच घाई. आता आम्हाला सोडून जायची पण घाई वगैरे दम दिला. बया आता एकदम short fuse वर आहे. कुठल्याही क्षणी तिचा बांध फुटेल हे माझ्या लक्षात आले.

मी कोण कोण आल्या आहेत ते बघू लागले. जाऊ बाई कुठे दिसत नव्हती. कॅथी दोघी तिघींशी काहीतरी तावा तावाने बोलत होती. तिचं लक्ष वेधून घ्यायचा असफल प्रयत्न करून मी मोहरा दरवाजाच्या दिशेने वळवला तेवढ्यात दार उघडून जाऊच येताना दिसली. अरेच्या हिच्या डोक्यावर पण तीच हॅट. कधी साधी बेसबॉल ची टोपी पण घालत नाही ही. केस रचना बिघडते म्हणून. आज हे काय खूळ? तेव्हढ्यात कॅथीने ग्लासात चमचा घालून खणाखण वाजवला.


Shonoo
Sunday, August 06, 2006 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या जणी उठून उभ्या राहिल्या. आता ही काय बोलते म्हणून मी उत्सुकतेने तिच्या कडे पाहत होते तर तिने फक्त हाताने एक्-दोन्-तीन च्या खुणा केल्या आणि डोक्यावरची टोपी काढली.

मी कितीवेळ आ वासून उभी होते मलाच माहीत नाही. ती आणि तसल्या टोप्या घातलेल्या सर्व मैत्रिणी अगदी तुळतुळीत चकोट करून उभ्या होत्या. अरे हा काय वेडेपणा असं तिला सुनवायला मी तोन्ड उघडतच होते तेव्हढ्यात मला आठवलं की जाऊ पण तसलीच टोपी घालून आली होती. मी गर्रकन वळून तिच्याकडे बघितलं तर ती पण पर्सिस खम्बाटा! माझ्याही नकळत मी तिला म्हटले ' अगं तू पण? बेनझीर काय' - माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती जराशी बाजूला झाली. मागे बेनझीर! कडक इस्त्रीची जीन्स, पान्ढरा शर्ट. त्यावर Breast Cancer foundation ची गुलाबी पिन, हातात इतरांच्या सारखी मोठी हॅट आणि केस गायब.
मला म्हणाल्या ' बेनझीर म्हणते तुझ्या ह्या लढती मधे आम्ही सर्व जणी नुसत्याच तुझ्या पाठीशी नाही तर तुझ्या बरोबर आहोत'

त्या एका क्षणात त्या माझी पण आई झाल्या. आता मला कसलीच चिन्ता नाही. I don't know what tomorrow will bring, but I know everything is going to be alright in the end.'


Shonoo
Sunday, August 06, 2006 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुश्श! सम्पली एकदाची गोष्ट!

Arch
Sunday, August 06, 2006 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, छान लिहिली आहेस. शेवट तर खासच

Bee
Sunday, August 06, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, दरवेळी तुझे पोष्ट्स वाचून कितीदा आवंढे गिळले मलाच माहिती. whatever.. छान लिहिली आहेस ही दीर्घकथा. ह्यापुर्वी तू काही लिहिले आहेस का गुलमोहरावर ते आता शोधावे लागेल.. कथा जर पूर्णपणे काल्पनिक नसेल तर नंतर काय झाले ह्या बयेचे तेही लिही.. मला हे memogram वगैरे काहीच कळले नाही..

Karadkar
Monday, August 07, 2006 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee, there are search engines like Google. Maayboli is not your search engine. Please do your research before posting your queries.

Bee
Monday, August 07, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर, निदान शोनूच्या कथेबद्दल आधी तिला प्रतिक्रिया तरी द्यायची असती आणि नंतर माझे पोष्ट्स 'नीट' वाचायचे असते.

Manutai
Monday, August 07, 2006 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक नितांत सुंदर कथा. शोनू, लिहीत रहा ग. शेवट तर खुपच touching आहे.

Meenu
Monday, August 07, 2006 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा शोनू सुंदर .. आणी अप्रतीम शेवट अगदी unexpected फारच छान .. अशी जाऊ आणी सासु मिळावी सर्वांना

D_ani
Monday, August 07, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shonoo,
This is my very first post on Hitguj.
Hats off to Benzir.
Hats off to you too.

Moodi
Monday, August 07, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगला वेगळा शेवट केलास शोनू. आवडले ते. बेनझीरची व्यक्तीरेखा डोळ्यासमोर उभी राहिली( अशी बेनझीर सिनेमात असेल तर हे काम रेखा / रोहिणी हट्टंगडी / सुषमा सेठ छान करु शकतील)

Maudee
Monday, August 07, 2006 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतीम शोनू.
ख़ूपच सुरेख़.


Psg
Monday, August 07, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वॉव शोनू, सुंदर लिहिलं आहेस. तुझी शैली वेगळी आहे, हा विषयही.. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत रहावी अशी कथा..मस्तच..
असं म्हणू का, 'हॅट्स ऑफ़' :-)


Princess
Monday, August 07, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू खुप सुंदर लिहिलस. आणि शेवट ही छान केलास कथेचा.

Prajaktad
Monday, August 07, 2006 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु!खुप खुप आवडली कथा!
असच अजुन उत्तम लिखाण करत रहा.


Shonoo
Monday, August 07, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना धन्यवाद. आता थोडा ब्रेक घेऊन कथा लिहिण्याच्या अनुभवाबद्दल लिहीन :-)
बी- पूर्ण काल्पनिक कथा आहे रे





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators