Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics

Archive through June 23, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » विनोदी साहित्य » कुजबुज » Archive through June 23, 2006 « Previous Next »

Hawa_hawai
Thursday, June 22, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

KUJBUJ

22 june 2006


संपादकीय
नमस्कार वाचकहो,
अनेक वर्षांनी कुजबुज करत आहे. आज पण इतक्या तातडीनी कुजबुज केली नसती पण
" मायबोलीवर फक्तं TP करता, ईतरत्र योगदान काहीच दिले नाही " असे कुणी मुद्दाम बोलून दाखवण्या आधी कुजबुज केलेली बरी असा सुज्ञ विचार करून ही कुजबुज प्रकाशीत करीत आहे. भडक शब्दात असणारी कुजबुज वाचतांना डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून काळ्या रंगात छापली आहे याची वाचकांनी नोन्द घ्यावी. (तसेच आम्ही अतिव कष्टाने केलेल्या या कुजबुज वर दाद देण्याची साधी माणुसकी तुम्ही दाखवाल ही अपेक्षा आहेच!)

कुजबुज लिहायला घेतांना " कुजबुज तरी कशावर करायची? " हा एक (नेहमीप्रमाणेच) प्रश्न पडला. पूर्वी जसे दोघा मायबोलीकरांचे आपपसात लग्न ठरले की तो विषय वर्षभर तरी कुजबुजला पुरायचा. पण हल्ली आधी या लग्ना बद्दल ईतरांनी बोलायचे की नाही आणि बोलले तर किती बोलावे यावर पण BB उघडले जातात तेव्हा मायबोलीवरील लग्न या विषयावर तोंडातून " फ्र " सुद्धा काढायचा नाही असे आम्ही ठरवले आहे.

तर वाचकहो यावेळच्या कुजबुजचा विषय आम्ही " तेच ते " असा निवडला आहे. इतक्या वर्षांनी प्रकाशीत होत असलेल्या कुजबुज मधे सगळे " तेच ते " लिहिले आहे असे वाचल्या नंतर कुणाला म्हणता येऊ नये म्हणून आधीच केलेली ही उपाययोजना आहे हे चाणाक्ष कुजबुज वाचकांनी ओळखलेच असेल. ;-)

**************************************************

तेच ते

हितगुजवर सध्या नविन काहीच नसते सगळे तेच ते असते अशी तक्रार एक जुन्या हितगुजकर लालू यांनी केली आहे. एरवी सगळिकडे पोटतिडकीने लिहिणार्‍या लालूताईंना हितगुजवरील तेच ते पाहून यावेळी मात्र डोक्यात तिडीक आलेली दिसते. तर आपली तक्रार त्यांनी आमच्याकडे काव्यरूपात मांडली आहे.
मुळ कविता इथे पहा

सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते!! तेच ते!!
तोच BB तेच अंगण
तीच चक्की तेच वंगण
तीच गाणी तेच तराणे
तेच मुर्ख तेच शहाणे
सकाळ पासून रात्री पर्यंत
तेच ते तेच ते

BB सारे बदलून बघितले
कारण साईट बदलणं शक्य नव्हतं
पार्ल्यापासून एस. जी. रोड
सगळीकडे सारखेच बोर
दहीभात आणि लिंबू लोणचे
तुझ्या डब्यात पदर्थ कोणचे
तीच ती खवट बोलणी
तीच ती नाक मुरडणी

गुलमोहराच्या झाडावर साहित्याची वटवाघुळे
त्या साहित्याचे शिल्पकार
लेखन थोडे खुशामत फार
सीरिअलवरच्या माकड्चेष्टा
शिळा शोक बुळा बोध
शंभर धागे एक रंग
व्याभीचाराचे सारे ढंग.
पुन्हा पुन्हा तेच भोग,
लहान पोरांचे तेच रोग
त्याच स्त्रिया तीच मुक्ती
duplicate ID , देवनागरीची सक्ती.

करीन म्हटले हत्या!
TP करणार्‍यांची
फोटो काढणार्‍यांची
वाह वाह करणार्‍यांची,
आणि प्रवासवर्णने लिहिणार्‍यांची
पण डुप्लीकेट आयडी घेऊन येतील सगळी
तिच ती....तिच ती.हितगुज डाएट प्रोग्राम

हितगुजवर तोच तो पणा आला आहे असे वाटू लागले की हा डाएट प्रोग्रम सुरू करावा.
या डाएट चे वैषिश्ट्य म्हणजे तुम्ही किती बोलता आणि वाचता यावर निर्बन्ध नाही. अगदी पाहिजे तितके पोटभर बोला व वाचा. निर्बन्ध आहे ते कुठल्या दिवशी कुठे आणि कशावर बोलायचे अथवा वाचायचे यावर.

हा डाएट प्रोग्रम तुम्ही केल्यावर होणारे ईतर फायदे म्हणजे हितगुज वरील वजन ५-६ पौन्डाने वाढेल. किंवा " system " साफ व्हायला मदत होईल ई. ई.
धोक्याचा इशारा : हे डाएट वारंवार करण्या मुळे तुमचे हितगुजचे व्यसन कायमचे सुटू शकेल.

तर सात दिवसांच्या या डाएट प्रोग्रम ची साधारण रूपरेशा अशी आहे की प्रत्येक दिवशी हितगुजच्या फक्त एकाच विभागात जायचे आणि तिथे हवे तितके बोलायचे वाचायचे. त्या दिवशी ईतर दुसर्‍या कुठल्याही विभागात डोकावायचे सुद्धा नाही.

पहिल्या दिवशी पाहिजे तेव्हढ्या शुभेच्छा द्यायच्या. अगदी ज़ो दिसेल त्याला वाट्टेल त्या कारणासाठी शुभेच्छा देत सुटायचं. अगदीच काही आठवले नाही तर व्ययनाम संवत्सरारंभाच्या वगैरे शुभेच्छा देऊन टाकाव्यात. पहिल्या दिवशी पासूनच अशा चांगल्या गोष्टी मनात आणल्याने मनातील वाईट भावना कमी व्हायला सुरूवात होते.

दुसर्‍या दिवशी रंगिबेरंगी मधे जायचे आणि प्रत्येक BB वर जाऊन वा वा फारच छान सुरेख, अप्रतीम, मस्तच, जबरी यापैकी कुठल्याही प्रतिक्रिया आलटून पालटून द्यायच्या.

तिसर्‍या दिवशी my city . आज पार्ले, PP , NJ , SG road अशा चटोर बीबींच्या नादी न लागता सहकार नगर वर जाऊन " काय म्हणता सख्यांनो? " अशी प्रेमळ हाक मारायचा सराव करावा. किंवा मग श्रीवर्धन किंवा उदगीर वर येणार्‍या प्रत्येकाला सुहास्य वदनाने सुप्रभात करून यावे.

चौथ्या दिवशी आचार्य दिनेशदांच्या विविध कलाप्रकारांचे अध्ययन करावे. आजच्या दिवशी फक्त वाचन करायचे, बोलणे वर्ज्य.

पाचव्या दिवशी गुलमोहर. या दिवशीचे पथ्य दुसर्‍या दिवशीच्या रंगिबेरंगी सारखेच.

सहाव्या दिवशी V and C . आजचा दिवस अत्यंत कार्यशील. आधी अतिशय सर्वसाधारण टायटल असलेले आठ दहा BB एकदम उघडावे. जसे की
यात चुकले कुणाचे?
तर तुम्ही काय कराल?
हे असेच चालाणार का?
हा प्रश्न कधी सुटणार? ई. ई.
आणि मग प्रत्येक BB वर हितगुज वर कायम चर्चिले जाणारे चार विषय मांडावे. स्त्रीमुक्ती, सवर्ण-दलित, duplicate id आणि प्रेमातले problems . आजच्या दिवशी बोलण्यावर अजिबात बन्धन नाही. जे काय गरळ आहे ते पूर्णपणे ओकून टाकावे म्हणजे पोट कायमचे साफ होईल.

शेवटच्या दिवशी अंताक्षरी वर जाऊन गोड गाणि म्हणावीत आणि शेवटी आपल्याला आलेल्या फॉरवर्डेड मेल मधील एक विनोद PJ वर टाकून हे पथ्य सोडावे.

एकदा हा प्रयोग केल्या नंतर दुसरा प्रयोग ३ महिन्याच्या अंतराने करावा अन्यथा या डाएट प्रोग्राम मधे पण तोच तो पणा येईल.वर्षा विहार

उत्साही मायबोलीकरां द्वारे 23 july रोजी वर्षा विहार आयोजीत करण्यात आला आहे. संयोजन समिती ने वर्षा विहार भेट व्हायच्या आधीच इतका मजकूर लिहून पोस्ट केला आहे की हे GTG झाल्या नंतर येणारे वृतांत किती आणि मोठे असतील या कल्पनेनेच जीव दडपला आहे. ईतर सर्व समित्यां बरोबरच व.वी. संयोजकांनी एक " वृतांत लेखन समिती " पण बनवून टाकावी व या समितीने एकच वृतांत प्रकाशीत करावा अशी मागणी पुढे येत आहे. वृतांत लेखना बरोबरच my crushes वरील लिखाणात देखील अचानक वाढ होण्याचे संकेत आहेत.

(वि)संवाद

हितगुजवर हल्ली नविन सुरू झालेला आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेला उपक्रम म्हणजे संवाद. त्याला अनुसरून आम्ही देखील मायबोलीवरील काही संवाद प्रकाशीत करण्याचे ठरवले आहे.

" 23 july च्या वर्षा विहारात मला भाग घ्यायचा आहे पण या विहाराचे फोटो हितगुजवर जाहीररित्या प्रकाशीत होणार आहेत का? "


" व.वी चे फोटो प्रकाशीत करण्या बद्दल लवकरच वर्षा विहार प्रकाशचित्र प्रकाशन समिती कडून घोषणा करण्यात येईल. तोपर्यंत धीर धरा. तसेच फोटो संबन्धी चौकशी करणारी कुठलीही मेल तोपर्यंत आम्हाला पाठवू नका. "

" व.वी. प्र. प्र. समितीकडून सर्व हितगुजकरांना सुचीत करण्यात येते की वर्षा विहाराचे फोटो हे हितगुज वर प्रकाशीत करण्यात येणार आहेत. ज़्यांना आपले फोटो प्रकाशीत होऊ नये असे वाटते त्यांनी कृपया 10 july पर्यंत आम्हाला तसे खालील पत्त्यावर मेल पाठवून कळवावे. 10 july पर्यन्त कळविणे शक्य न झाल्यास खालील ३ भ्रमणध्वनीवर 20 july पर्यन्त sms पाठवून कळवावे. आणि तेव्हा पण कळविणे शक्य न झाल्यास 23 july ला प्रत्यक्ष भेट झाल्यावर तसे तोन्डी सान्गावे. "

" माझे तर मत आहे की व. वी. चे नुसते फोटो प्रकाशीत करू नये तर त्यावर constructive criticism पण व्हावे. हल्ली पोस्ट होणार्‍या सर्वच फोटों साठी ते आवश्यक आहे. "

" मी तर म्हणीन हे असे फोटो पोस्त करूच नये. internet वर अशा फोटोंचा गैरवापर होऊ शकतो. "

" अहो पण का नको ग्रूप फोटो? रोजच्या रोज त्या " फोटो BB " वर फक्त फुले फुले फुले!! कंटाळा नुसता. किती वर्ष सहन करायचे आम्ही लोकांनी? "

" येणारच कंटाळा फुले बघायचा तुम्हाला. तरी बरं महात्मा फुल्यांनीच या देशात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. सवर्णांचा हा दलित द्वेष म्हणजे कुत्र्याच्या वाकड्या शेपटा सारखा कायमस्वरूपी आहे. "


" हे पाहा उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका. हे डुप्लीकेट ID सन्धीच शोधत असतात चिखलफेक करण्यासाठी. *******!! "

" मला तोंड आवरा म्हणतांना स्वत चिखलफेक करताय त्याचे काय? फुले माहीत नाहीत पण फुल्यांची भाषा बरी बोलता येते! "

" वडाच्या सालीची चटणी कशी करतात कुणाला माहीत आहे का? खानदेशात ही फार प्रसिद्ध आहे. "

" मंडळी इथे विषयाला धरून बोला अन्यथा हा BB बन्द करण्यात येईल "

" हो हो! विषयाला धरून फोटो टाकले पाहीजेत. पण मी आता यापुढे फुलांचे फोटो अजिबात टाकायचे नाही असे ठरवले आहे. त्या ऐवजी हा पहा माझ्या मुलीचा फोटो. "

" व्वा सुरेख. कित्ती गोड गं आणि caption पण सही आहे " मुले म्हणजे देवाघरची फुले!! "

" पुन्हा फुलेच! AMEN !! "

**********************************************


Ninavi
Thursday, June 22, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह.

चिलखत घातलंयस का गं?


Manish2703
Thursday, June 22, 2006 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह. too good

" येणारच कंटाळा फुले बघायचा तुम्हाला. तरी बरं महात्मा फुल्यांनीच या देशात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. >>

थोडे दिवस तू बंकर मधेच जाऊन बस

Maitreyee
Thursday, June 22, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फुल्यांची भाषा बरी बोलता येते! "
डाएट प्रोग्रॅम सहीच! त्यातही ३,४, ६ व्ह्या दिवशीचे मेनू

Storvi
Thursday, June 22, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>मायबोलीवरील लग्न या विषयावर तोंडातून " फ्र " सुद्धा काढायचा नाही असे आम्ही ठरवले आहे.
>>

>>गुलमोहराच्या झाडावर साहित्याची वटवाघुळे>>

Divya
Thursday, June 22, 2006 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वडाच्या सालीची चटणी कशी करतात कुणाला माहीत आहे का? खानदेशात ही फार प्रसिद्ध आहे.

Milindaa
Thursday, June 22, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL HH

Lalu
Thursday, June 22, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this messageसंपादक कुजबुज,

आपला नवीन अंक वाचून धक्का बसला! लेखिकेने वैयक्तिक पातळी गाठली आहे. कारण नसताना माझे नाव का घेतले जाते कळत नाही. 'तोच तो' पणाबद्दल मी लिहिले असले तरी त्याला प्रभावीपणे उत्तर देता आले असते. आणि हेच वेगळ्या शब्दात सान्गता आले असते पण direct व्यक्तीगत पातळीवर येणे म्हणजे अतीच झाले!

पुन्हा ते काव्य, ते जे काय आहे ते, तेच ते! मी लिहिलेले नाही. आत्तापर्यन्त लोकान्चे साहित्य स्वतःच्या नावावर खपवण्याचे माहित होते पण साहित्यिक मूल्य वाढवण्यासाठी स्वतः लिहिलेले लोकान्च्या नावावर खपवण्याचा प्रकार प्रथमच पाहिला.

या प्रकाराबद्दल hawa_hawai या आयडीने ते काव्य मी लिहिले आहे हे सिद्ध करावे नाहीतर माझी बिनशर्त माफी मागावी अशी मी मागणी करते. यात तुम्ही मला सहकार्य करावे. आपल्याला या वादात नाईलाजाने ओढावे लागत आहे, माफ करा.

डाएट प्रोग्राम वरचे लेखन आवडले. बाके सगळे 'तेच तेच' आहे! ~D~D


Champak
Thursday, June 22, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इमानात बसायला जाता जाता कुजबुज वाचायला भेटली भो!

Dineshvs
Thursday, June 22, 2006 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HH बर्‍याच दिवसानी कुजबुज ऐकायला मिळाली. म्हणजे ती होतच असते फक्त ऐकायला मिळाली नाही.
लालु, लाईटली घे गं. अर्थात तुदेखील हे मजेने लिहिले असशील असेच वाटतेय.


Bee
Thursday, June 22, 2006 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) :-) :-) :-)

हवाहवाई थीम एकदम छान निवडलीस आणि भरपूर मनोरंजन केलेस त्याबद्दल सहस्त्रशः आभार.. :-)


Ameyadeshpande
Thursday, June 22, 2006 - 10:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>हवाहवाई थीम एकदम छान निवडलीस आणि भरपूर मनोरंजन केलेस त्याबद्दल सहस्त्रशः आभार
मी चुकून हे "सशस्त्र आभार" वाचलं :-)

hh , HH पुरेवाट

Maanus
Thursday, June 22, 2006 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लै लै भारी.... आधिचे कुजबुज कुठे वाचायला मिळेल.

Champak
Thursday, June 22, 2006 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधिचे कुजबुज कुठे वाचायला मिळेल. >>>>
गंगे च्या पाण्यावर गाथा तरंगत असतील बघ!


Kmayuresh2002
Thursday, June 22, 2006 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह ह, वा वा... फ़ारच छान.. सुरेख.. मस्त.. जबरी.. :-)

Arun
Thursday, June 22, 2006 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह. : मस्तच लिहिलयस ............ :-)

Rajkumar
Thursday, June 22, 2006 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HH ,फुल्टू लिहीलयंस.. .. ... ..

Abhi_
Friday, June 23, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HH जबरी लिहिलं आहेस..

Limbutimbu
Friday, June 23, 2006 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हह टच तो हह टचच! :-) काय पण निरिक्षण हे हिचे! केवढी मेमरी हे ना! येवढ कस ग लक्षात ठेवतेस तू? तुझ वाचल्यावर एकेक आठवुन खदा खदा हसायला होत हे! :-) आता अशीच पुन्हा पुन्हा लौकर लौकर येत रहा!

कविता जबरी! लालू, तुझी तक्रार पण खन्ग्राट.... आपल्याला या वादात नाईलाजाने ओढावे लागत आहे, माफ करा. .... अत्युच्च!
करण्ट अफेअर्स अन रिझर्वेशनने उठलेल डोक शान्त शान्त झाल!:-)


Meenu
Friday, June 23, 2006 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HH सही मस्तच लिहीलं आहेस ...
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions