Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
मी पाहीलेली हाडळ ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » ललित » मी पाहीलेली हाडळ « Previous Next »

Maanus
Thursday, April 06, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही एक सत्य घटना आहे, यातील एकाही पात्राचे नाव ठिकाण जागा यात काहीही फेरबदल केलेला नाही. कमकुवत हृदयाच्या व्यक्तींनी कृपया पुढे वाचु नये.

दोन आठवड्यापुर्वीची गोष्ट आहे. तारिखही मला आजुन आठवतेय, शुक्रवार २४ मार्च २००६.

9:40 PM चा सिनेमा बघायला म्हणुन समोरच्या Newport Mall मधल्या चित्रपटगृहात गेलो. फारच विनोदी सिनेमा होता, She is The Man स्त्रिप्रधान संस्कृती ज्यांना आवडते त्यांनी जरुर बघा. चित्रपटात एकपन हानामारीचा प्रकार नाही, भुत नाही, हाडळ नाही काहीच नाही. एकदम हलकाफुलका. त्यामुळे भुत पिशाच्च असला एकपन विचार मनात नव्हता.

रात्री सधारण ११:४० PM ला बहुतेक सिनेमा संपला... आणि खरी कथा सुरु झाली. मी restroom मधे गेलो. बाहेर येउन बघतो तर काय तिथले कामगार सोडले तर सगळे प्रेक्षक गेलेले पन. पाच मिनटात सगळे लोक कसकाय गायब झाले काय माहीत. बाहेर पडायचा रस्ता ओळखीचा होता म्हणुन मी न घाबरता चित्रपटगृहाच्या बाहेर जायला लागलो. दारत पोचतो तर काय त्यांनी मुख्य दरवाजा बंद केलाय. आता बाहेस कसे बरे जायचे? खालच्या मजल्याअवर macy's च्या ईथे एक छोटेसे बोळ आहे हे मला आठवले. मग तिकडे गेलो. नाही म्हटले तरी एकटा असल्यावर येव्ढ्या मोठ्या mall मधे कोणालाही भिती ही वाटनारच की. परंतु सिनेमातली नायीका येवढी सुंदर होती की तिचेच विचार अजुन माझ्या डोक्यात होते, त्यामुळे अजुनही भुत वैगेरे असले विचार डोक्यात शिरले नव्हते.

मी त्या बोळातुन जायला लागलो... अरे बापरे अजुनही माझ्या अंगावर काटा येतोय. बोळाच्या साधारण मध्य भागी पोचलो आणि काय विचारता, बोळाच्या त्या टोकाला मला एकदम एक आकृती दिसली. साधरण ५ फुट उंची असेल. तीचे पाय उलटे होते, हात पन उलटे होते, ती अंधारात उभी होती त्यामुळे मला चेहरा नीट दिसला नाही.... एका क्षणात मला दरारुन घाम फुटला. हे काय नविनच. आता घरी कसे जायचे. प्रत्यकक्षात कधी हाडळ पाहीली नसली तरी वाचन चिकार केलेय मी, त्यातले सर्व description त्या आकृती बरोबर match होत होते. उलटे पाय, उलटे हात. एवढे सगळे ध्यानात आल्यावर ती हाडळच आहे हे माझ्या तल्लख बुध्दीने एका झणात ताडले. हडळ उभी आहे समोर, हे कळाल्यावर मला काय करवे कळेणा. मी जागीच थांबलो.... बापरे, मला येवढी भिती बसली की मी आता ती शब्दात सांगु शकत नाहीय. तेवढ्यात ती आकृती माला हातवारे करु लागली.

तुम्ही कल्पना करु शकता का, भुत तुम्हाला बोलावतेय वैगेरे... विचार करा माझे काय झाले आसेल. आता आर वा पार, जींकु किंवा मरु, काहीही करुन घर गाठायचे, असा निश्चय मनाशी केला. रस्ता cross केला की पाच मीनटावरच घर आहे. त्यामुळे फक्त त्या हडळीच्या जवळुन निसटलो की घर.

प्रंचंड मोठी शक्ती एकवटुन मी तिच्या दिशेने एक एक पाउल उचलु लागलो, हळु हळु वेग वाढवला.... जसा जसा मी तिच्या जवळ जात होतो तसा तसा तिच्या खिंदळन्यानचा आवाज अजुन वाढु लागला आणि त्याबरोबर माझ्या घाम व पळण्याचा वेग.

ती आता काही फुटावर होती, daring नव्हते तरीपन मी एक क्षण तीच्या चेहर्‍याकडे पहायचा प्रयत्न केला.... ईईईईईई किती केसाळ चेहरा होता त्या हाडळीचा, डोळे, कान नाक तोंड काहीच दिसत नव्हते, संपुर्ण चेहराभर केसच केस yuks.... धुम.... पळा.... जो मी पळत सुटलो. तो घरी direct bed मधे आल्यावरच शांत झालो. शांत कसला, तोडांपासुन पायापर्यंत संपुर्णपने स्वतःला पांघरुणात झाकुण घेतले, room मधले सगळे दिवे चालु केले, आणि कसाबसा झोपण्याचा प्रयत्न केला.

दिवस २5 मार्च शनिवार ची सकाळ.

अजुनही भिती गेलेली नव्हती, घाबरुन मी bed मधेच होतो, दात पन नाही घासले, bathroom मधे एकट्याला बन्द करुन घ्यायला भिती वाटत होती. laptop उघडला, हितगुज वर आलो. तर नेमका तिथेपन भुताटकीचा BB सुरु झालेला. हे भुत प्रकरण काय माझा पिच्छा सोडत नव्हते.

लगेच त्या BB वर अनुभव लिहायला सुरवात केली.... तेवढ्यात माझा फोन खनानायला लागला. उडालोच मी, त्या आवाजाने. पहील्यांदा उचललाच नाही. परत फोन वाजला... मग मी जेवढे लिहीलेले तेवढे post केले आणि कुणाचा फोन आहे हे बघायला गेलो.

तेवढ्या वेळात हितगुज वरच्या चिकार मैत्रिनिंनी माझा अनुभव वाचला व मला धिर देण्याचा प्रयत्न केला.

मैत्रियी नी शंका काढली की एखादी बाई पाठमोरी उभी असेल व त्यामुळे मला तसा भास झाला असेल.
तीची शंका खरी ठरली. :-)

झाले असे की, शेजारच्या इमारती मधे माझा मित्र आणि त्याची बायको रहाते, मित्र काम करतो दुसर्‍या राज्यात आणि त्याला ह्या weekend ला ईकडे यायला जमनार नव्हते म्हणुन वहीनीसाहेब रागावलेल्या. त्यांचा राग कमी करायला म्हणुन मी त्यांना सिनेमाला घेउन गेलो.

मी restroom मधुन बाहेर येईपर्यंत, ह्या आधीच mall च्या बाहेर जाउन थांबलेल्या. मी त्या नायिकेच्या नादात विसरुन गेलो की त्या माझ्याबरोबर आहेत. ह्या ईथे बाहेर फोनवरती त्यांच्या नवर्‍याशी हसत-खेळत गप्पा मारत बसलेल्या. पाठमोर्‍या उभ्या होत्या त्यामुळे मला चेहरा कळाला नाही. उगाच घाबरलो मी.

सकाळी त्यांचाच फोन आला होता. तेव्हा त्यांनी विचारले मी असा त्यांना एकट्याला सोडुन का पळत आलो.

आता माझा मित्र आणि मी दोघांवर रागवल्यात.


Seema_
Thursday, April 06, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतके दिवस मित्राची बायको नुस्ती रागावली असेल कदाचीत , पण हडळीच पाठमोर वर्णन वाचुन नक्की सुड घेईल बघ आता ~d

Maitreyee
Thursday, April 06, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, २५ तारखेच्या सकाळी माझी मात्र सही करमणूक झाली बघ
हात उलटे पाय उलटे आणि चेहरा पण उलटा म्हणे
मी या किस्स्यावर जाम हसत होते तर( माझ्यावर टीका करण्याचे आजन्म व्रत घेतलेल्या) एका व्यक्तीने म्हटले कशावरून पाठमोरी, उलटा म्हणजे अपसाईड डाऊन चेहरा असेल :-O


Maanus
Thursday, April 06, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ते सगळे talks recover कराता यायला पाहीजे होते, इथे टाकायला मदत झाली असती :-)

Lopamudraa
Thursday, April 06, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायकांचा जास्त विचार करणे चांगले नाही बघ...!!!

Divya
Thursday, April 06, 2006 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, मला आश्चर्य वाटतय कि माणुस अस विसरुच कस शकतो आपण कुणाबरोबर तरी आलो होतो हे.
पुढच्या वेळेस जाशील तेव्हा लक्षात ठेव कोण बरोबर आहे ते. .
त्या दिवशी तु जेव्हा हे पोस्ट टाकले तेव्हा मि नुकतेच अमेयचे त्याच्या मैत्रीणीला आलेल्या भुताच्या अनुभवाबद्दलचे पोस्ट वाचले होते. आणि तु जे मला एक फ़ोन आला म्हणुन गेला ते नंतर काही कळेना पुढे काय झाले, तुझे पुढचे पोस्ट येइपर्यन्त तरी हडळ खरी असु शकते आणि ती दिसु शकते उलटे हात, पाय आणि तोंड हे खरे वाटल्याने मला ही जाम भीती वातली होती


Storvi
Thursday, April 06, 2006 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. ..

Manuswini
Thursday, April 06, 2006 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा काय रे थापा मारतोस??

आणी तुझ्या मित्राची बायको तुला पळताना काहीच नाहे म्हणाली?

तु शुद्धीत होतास ना?
राग मानु नकोस पण मला ही made up story वाटते आहे
तु ny चा पुर्ण रस्ता पळत घरी आलास?
उद्या बायकोला विसरुन म्हणशील चेटकीण पाहिली म्हणुन किंवा तिला असा short time memory loss अस्ले तर ती म्हणेल मला खविस दिसला म्हणुन
आता खविस कोण हे कळले ना
दिवे घे :-)


Maanus
Thursday, April 06, 2006 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेखक शिकावु आहे, कुठेतरी काहीतरी संदर्भ राहीला असेल. ९०% गोष्ट खरी आहे, उगाच १०% तिखट मीठ लावलेय. आता काय खरे, काय तिखट मीठ समजुन घ्या ;)

मी ny मधे रहात नाही. newport, nj मधे रहातो.


Ameyadeshpande
Thursday, April 06, 2006 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>कमकुवत हृदयाच्या व्यक्तींनी कृपया पुढे वाचु नये.

तिला पाहिलं तेव्हा कुणाचं हृदय कमकुवत झालेलं रे....Rupali_rahul
Friday, April 07, 2006 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा सही आहे रे.
अमेय तुला कोणाबद्दल बोलायच आहे त्या नायिकेबद्दल की हडळीबद्दल...


Deepanjali
Friday, April 07, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यावर टीका करण्याचे आजन्म व्रत घेतलेल्या) एका व्यक्तीने म्हटले कशावरून पाठमोरी, उलटा म्हणजे अपसाईड डाऊन चेहरा असेल
<<<
ए MT,
मी लिहिली होती ती comment


Maitreyee
Friday, April 07, 2006 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो का नाही गं मी ते दुसर्‍याच व्यक्ति बद्दल लिहिलय

Zelam
Friday, April 07, 2006 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा सहीच आहेस.
पुढच्या वेळेस cinema बघून झाल्यावर सत्यात येत जा, स्वप्नं बघू नकोस :-)


Zakki
Friday, April 07, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

storvi मी सांगू का, 'मी पाहिलेली हडळ'? दोन तीन वर्षापूर्वी सान होजे ला आलो होतो तेंव्हा??
,

नेमस्तक, जरा आणखी दिवे लावा, आपले 'तयार' करा. वर लिहिले आहे तसे लिहिल्यावर त्यांची गरज भासते.

Shyamli
Friday, April 07, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर.... हो रे हो...
मीपण वाचला होता तुझा किस्सा...
पण फोन आला....म्हणुन तु गायबच झालास...
आणि तुझा किस्सापण....
तुझ्या हडळीप्रमाणे


Kmayuresh2002
Friday, April 07, 2006 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी.. माणसा,ही कहाणी तुझ्या त्या मित्राच्या बायकोला वाचायला दिलीस का रे?मग खर्‍या हडळीचा अनुभव येईल रे तुला

Bhagya
Sunday, April 09, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा.....काय 'घेऊन' गेला होतास रे सिनेमाला?
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators