मूळ गाणे : ऋणानुबंधाच्या.... विडंबन :- ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी साहेब लाभला घाटी तो कातरवेळी वागे कितीदा लहरी कामाचा बोजा हमखासच त्या प्रहरी कितीदा येतो, बघतो, म्हणतो "चुकल्यावाचुनी तुझियाकडुनी कधी न घडल्या गोष्टी" साहेब लाभला घाटी कधी क्षमा म्हणून ते हसणे खिजवून उगीच ते डसणे डसून ते अजूनच हसणे हसणे, डसणे, डसणे, हसणे हसण्याआडून डसण्यासाठी माझ्याच लागला पाठी साहेब लाभला घाटी "हवी रजा" म्हणूनी बघतो विक्राळ कसा तो हसतो किती गुरगुरतो, किती धुसफुसतो अर्जावरती क्रूरपणाने कोरून मारल्या रेघा कामासाठी जन्म जन्मलो, जन्मात मिळे ना सुट्टी साहेब लाभला घाटी - वैभव जोशी
|