« | »





दिवाळीपूर्वीच दिवाळी!

दि. १३ ऑक्टोवर २००६ रोजी सेंसेक्स १२७३६. वा! दिवाळीपूर्वीच दिवाळी! ह्या लक्ष्मीपूजनाला एक वेगळाच आनंद असणार आहे. नेमक्या ह्या वेळी कॉमन गुंतवणुकदार ह्या सर्व चढीत कुठेही नाही. मे जून मध्ये हात पोळल्यामुळे सर्वांनी बाजाराला रामराम ठोकला होता. आता परत येतील पण तोपर्यंत उशीर झालेला असेल.

शेअर बाजारावर विश्वास ठेवल्यावर नक्कीच फायदा होणार. पण त्या सोबतच काही मुख्य सूत्रांचे पालन केले तर आपण केलेल्या गुंतवणुकीला नक्कीच उर्ध्व दिशा प्राप्त होईल.

२००६ च्या मे महिन्यामधील एक दिवस (खरे तर एक पूर्ण आठवडा) भारतीय investors ना फारच टेन्शनदायी व नुकसानीचा गेला. माझ्या मित्राने (ज्याला शेअर बाजारातील ओ की ठो कळत नाही) त्याचे दीड लाख रुपये गमावले. मागचे पूर्ण वर्ष तेजीचे होते त्यामुळे अनेक लोक जे शेअर बाजारात नवीन होते त्यांनी पैसे गुंतवायला सुरुवात केली होती. पण नीट अभ्यास नसल्यामुळे व ऐकीव माहितीवर वर भर दिल्यामुळे त्यांचे करोडो रूपयांचे न भरून येणारे नुकसान झाले. 'परकीय कंपन्यांनी पैसे काढून घेतले त्यामुळेच आमचे नुकसान झाले' असे त्यांचे म्हणणे होते. पण शेअर बाजार म्हटले की नफा व नुकसान होणारच. मी पण त्याला अपवाद नव्हतो. पण या सर्व धाकधुकीच्या महिन्यात माझे स्वतःचे फार नुकसान झाले नाही. झाला तो केवळ मी कमाविलेल्या पुस्तकी नफ्याचा तोटा. माझे भांडवल मात्र तसेच राहिले. मग माझ्यात व सामान्य गुंतवणुकदारात काय फरक? फरक इतकाच की मी माझा Finance Plan करतो व त्या प्रमाणे वागतो.

मी जे काही शेअर बाजाराबद्दल शिकलो व शिकतो आहे ते मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे.

कुठलाही व्यवहार करण्या आधी आपण स्वतः कसे आहोत हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली आर्थिक तब्येत कशी आहे? ती समजूतदार आहे की थोडा तोटा झाल्यावर पॅनीक होणारी आहे? Risk pro आहे की risk averse आहे? ह्या बाबी ओळखल्या पाहिजेत. नाहीतर व्हायचे असे की थोड्या नफ्या करता एक चांगली गुंतवणूक चुकून विकली जायची व थोडा तोटा झाला तर त्याचा मानसिक त्रास होऊन रोज घरात चिडचीड होईल. हे सर्व टाळण्यासाठी आपण कसे आहोत हे माहीत असणे आवश्यक आहे. एकदा का आपली "तब्येत" कळाली की असणारे पैसे किंवा मासिक बचतीचे पैसे कसे गुंतवता येतील हे पाहता येईल.

Allocation of High Risk taker -- ६० टक्के शेअर्स, २० टक्के म्युचुअल फंड्स, २० टक्के बॉन्ड्स व cash / FD

Allocation of Medium Risk taker -- ४० टक्के शेअर्स, ४० टक्के म्युचुअल फंड्स, २० टक्के बॉन्ड्स व cash / FD

Allocation of Low Risk taker -- २० टक्के शेअर्स, ४० टक्के म्युचुअल फंड्स, ४० टक्के बॉन्ड्स व cash / FD .

हा झाला आर्थिक गुंतवणूक कशी व किती करायची याचा तक्ता.
आता आपण आणखी काही गोष्टींवर लक्ष देवू.

जर शेअर बाजारात नवीनच पाऊल ठेवणार असाल तर कुठल्याही शेअर मध्ये गुंतवणूक करताना जो कालावधी निवडाल तो दीर्घ असावा, जेणे करुन short term volatility चा तुमच्या गुंतवणुकीवर फारसा परिणाम होणार नाही. उलट काळ तुमची मदत करेल. मागच्या मे व जून मध्ये निर्देशांक १२००० वरुन ८५०० पर्यंत खाली गेला पण आज ४ महिन्यांनी तो परत १२००० वर आहे. ज्या लोकांनी panic न होता बाजारावर विश्वास ठेवला ते आज परत नफ्यात आहेत. पण ज्यांनी लगेच शेअर्स व म्युचुअल फंड्स विकले ते तोट्यात गेले.

भागाची किंमत व त्याचा performance .
एखादा शेअर प्रथम दर्शनी महाग वा स्वस्त वाटू शकतो. पण प्रत्यक्षात तसे नसेलही. जसे TCS, L&T हे शेअर प्रचंड महाग आहेत पण ह्यातील गुंतवणूक ही फायद्याची आहे. या उलट काही शेअर अगदीच १० रुपयाला मिळतात पण त्यातून किती परतावा मिळेल याची खात्री नसते.

Diversification, Diversification, Diversification
शेअर बाजार हा मुळातच volatile असतो. आज हे क्षेत्र वर तर उद्या तेच खाली व दुसरेच क्षेत्र वर. तर अशा बाजारात पैसे कमवायचे असतील तर diversify करणे अत्यंत आवश्यक आहे.

Periodic review
दर २ ते तीन महिन्यांनी आपला portfolio review करायची सवय केली तर ती फायद्याची ठरेल.

बाजारातल्या टिप्स व अफवा.
'दुसर्‍यावरी विंसबला त्याचा कार्यभाग बुडाला' हे शेअर बाजारातही तंतोतंत लागू पडते. स्वतःचा अभ्यास असल्याशिवाय तो शेअर घेऊ नये.

लालच बुरी बला है|
असे म्हणतात की खरेदी करणे सोपे पण विक्री करणे अवघड. पण जर विक्री केली नाही तर नुकसान होऊ शकते म्हणून आधीच किती टक्के नफा झाल्यावर त्या भागांची विक्री करणार हे ठरविलेले बरे.

Systematic Investment Plans
शेअर बाजारातील काही कळत नसेल तर म्युचुअल फंडात पैसे गुंतवणे योग्य राहील. दरमहा कमी रक्कम ( अगदी १००० रु) एखाद्या फंडात गुंतवायची सवय लावून घ्यावी जेणे करून बाजारातील चढ - उताराचा काही फरक पडणार नाही.

वरील काही नियमांचे पालन केले तर घर बसल्या पैसे कमवायची संधी निर्माण होऊ शकते.

सर्वांना ही दिवाळी सुखाची, आनंदाची व भरभराटीची जावो.

- केदार जोशी