न तू आज येथे न तू आज येथे न तो मंद वारा न ते चांदणे, लाजरे, त्या स्मिताचे न तो श्वास आरक्त न तो स्पर्श ओला न ते गंधही गोवलेल्या फुलांचे न ती रात्रयुवती न ती मेघवसने न डोकावणार्या शशीचेहि हसणे अबोला न तूझा तुझे नाहि खुलणे न ते लाजणे, साजणे, ते बहाणे न तू आज येथे न मी आज माझा मला लागले वेध त्या मीलनाचे -श्रीराम.
|