« | »




अमृतशिंपण

गरगरा हि गिरक्या घेत
वार्‍याचा अवचित झोत
डोंगरामधुनी कसा सणाणत उठला
कडकडा कडाडुन गेली
माझा ऊर धडाडुन गेली
बिजलीचा लखलख प्रकाश उमटुन गेला

वळवाच्या पहिल्या अमीछाटण्यानंतर मदमस्त मातिचा गंध भणाणत उठला
वळवाच्या पहिल्या अमीछाटण्यानंतर माझ्या अंगणातला आसोपालव झुकला

कौलांवर रुमझुम अलगद नाचत थेंब
फांद्यातुन लपछप खेळतात प्रतिबिंब
हर्षाचा पाझर पागोळीला फुटला
सडसडा सडाडुन गेली
माझं वावर भिजवुन गेली
आशेचा लखलख प्रकाश उमटुन गेला

वळवाच्या पहिल्या अमीछाटण्यानंतर बागेत माझिया बोल अबोलिस फुटला
वळवाच्या पहिल्या अमीछाटण्यानंतर माझ्या अंतरातला आसोपालव फुलला

(गुर्जर भाषेत अमी- अमृत, छाटणा- शिंपण)

- आनंद जी.