Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तारुण्य, उतारवय आणि जोम!

Hitguj » Health » तारुण्य, उतारवय आणि जोम! « Previous Next »

Visoba_khechar
Thursday, February 15, 2007 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तारुण्यातील जोम उतारवयात हळूहळू कमी होतो असं म्हणतात. पण उतारवयातही तो कमी होत नसेल तर काय करावं? :-)

घाबरू नका मंडळी, मला हा त्रास नाही, कारण माझं अजून उतारवय झालेलं नाही! पण माझ्या ओळखीतील एका सद्गृहस्थांचे उतारवय होत चालले असूनही त्यांचा जोम दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यावर काहीतरी जालीम उपाययोजना आम्ही त्यांचे काही हितचिंतक शोधतो आहोत! :-)

यावर कुणी काही उपाय सुचवू शकेल का?

आपला,
(सळसळत्या तारुण्याचा!) तात्या.

Milindaa
Wednesday, February 28, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या, नक्की काय विचारता आहात ते जरा स्पष्ट कराल का?

Saavat
Wednesday, February 28, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा तात्यालाही सळसळत्या तारूण्यात म्हातारचळ लागलेल दिसतय! उपाय काय सांगणार!! हाच बर्‍याच रोगावर रामबाण उपाय आहे,'पोहचवल्या' शिवाय सोडत नाही.

Zakki
Wednesday, February 28, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो विसोबा खेचर, चांगले आहे की. उतारवयात जोम वाढला तर तुम्हाला काय त्याचा 'त्रास' होतो का?
आधीच भारतातले लोक महान आळशी! कुठलेहि काम धड किंवा वेळेवर होत नाही. असेल कुणाला उत्साह तर करू देत की त्यांना काय करायचे ते.


Kedarjoshi
Wednesday, February 28, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या, नक्की काय विचारता आहात ते जरा स्पष्ट कराल का>>>>मिलींदा तारुण्यातिल जोम या वाक्यात तुझे ऊतर दडले आहे.

Saavat
Wednesday, February 28, 2007 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,
वेळ, आळशासारखा फ़ुकट नको घालवू लेकाच्या! कामाच बोल, मनोगतवाल्या तात्यांनी 'उपाय' विचारलाय! तो, जोमाने नाहीतर उत्साहाने सांगायच बघ.विसोबांनी 'त्रास' अस ह्या रोगाच वर्णन केलय.

btw तूझ वय काय आहे,बरच आहे अस कानावर आलय. तात्यांचा सद्-गृहस्थ म्हणजे.....!(?)


Zakki
Thursday, March 01, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला, सावट, NY च्या भाषेत, 'Are you tAlking to me?'

कुठल्या कामाबद्दल बोलता आहात? काही वेळा काम हा बोलण्याचा विषय नसतो! तिथे सळसळत्या तारुण्याचा जोमच लागतो.

दुसर्‍या प्रकारचे काम असते तर बोललो असतो ना? खरे तर आता इथे लिहिणे, नि वाचणे हे एकच काम उरलय्! शिवाय विसोबा खेचरांसारख्या गुरुवत् व्यक्तिकडून काही शिकता आले तर पहावे असा विचार आहे! NY, NJ च्या भाषेत, you gotta problem with that?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators