Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 05, 2006

Hitguj » Health » लहान मुलांचे आजार » Archive through December 05, 2006 « Previous Next »

Lalu
Tuesday, June 20, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असिरा, तू जनरल प्रश्न टाकलास म्हणून लिहिते आहे. तुला आयुर्वेदातला उपाय हवा असेल तर अश्विनी सांगेल.

तू नवीन काही introduce केले नाहीस म्हणते आहेस, तुझी मुलगी हेच पदार्थ गेले महिनाभर खाते आहे म्हणून एक शंका येते की तिला दात येत आहेत का? ती इतर वस्तू तोंडात घालते आहे का? इथे तशी धूळ वगैरे नसते, पण तरी observe कर. पोटात दुखत असेल तर काही काळ गाजर देऊ नको. पाण्यात चिमूटभार ओवा घालून कोमट पाणी पाजून बघ. तिला constipation होत नसेल तर prunes पण देवू नको काही दिवस. अजून त्रास थाम्बला नसेल तर Doc कडे घेऊन जा.
इथे बर्‍याच अनुभवी आया आहेत. मुलांच आजारपण म्हणजे सगळ्यांचा काळजीचा विषय त्यामुळं ज्याना जी माहिती द्यायची आहे ती देऊ देत. कशाचा, कोणाला कधी उपयोग होईल सांगता येत नसतं. इथे माहित असल्याशिवाय कोणी डॉक्टरी उपाय सुचवणार नाही. वाचणारेही सूज्ञ असतात. त्याना मिळलेल्या माहितीतलं काय घ्यायचं काय नाही ते कळतं. इथे सगळ्यांची एकमेकाना मदत होते हे खरंच आहे. त्यामुळे "दिनेशनीच सांगावे" म्हटले तरी १० जणी post करतात, तस्संच पाहिजे!


Asira
Tuesday, June 20, 2006 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks :-)
गेले २ दिवस मी तिला फ़क्त फ़ॉर्मुला आणि दिवसात १ चमचा rice cereal मनुका भिजवलेल्या पाण्यात कालवून देत आहे. सध्या तरी थोडा फ़रक पडला आहे असे जाणवत आहे. तुमच्या सल्ल्यांप्रमाणे करून बघते आता. ईतर पोस्ट्स पण वाचल्या. त्याप्रमाणे काल मूग डाळ भिजवून वाळवून आणि भाजून ठेवलीय. तिच्यात मेथीदाणा घालुन कूकर मधून काढून त्याचे पाणी देईन आता तिला १-२ दिवसात.


Milindaa
Wednesday, June 21, 2006 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lalu .. .. .. :-)

Bee
Wednesday, June 21, 2006 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू कधीपासून बोलायला शिकलीस ऐवढी.. पूर्वी नव्हतीस अशी :-)

Ashwini
Thursday, June 22, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असिरा, वरती लालुने म्हंटल्याप्रमाणे दात येत असण्याची शक्यता असू शकते. एखाद्याला लवकर येऊ शकतात.
मूडी, thanks ग ती link शोधून दिल्याबद्दल.
असिरा, मूडीने दिलेल्या लिन्कमध्ये पोटासाठी आणि दातासाठी दोन्हीचे उपचार आहेत. ते जरूर बघ.
त्याशिवाय आणखी उपाय असेः
पोटाला गरम कापडाने हलका शेक दे. आधी स्वतःच्या हाताला लावून बघ म्हणजे उष्णतेचा अंदाज येईल.
गुटी देत असशील तर सागरगोटा, काकडशिन्गी आणि नागरमोथा जरा जास्त उगाळून दे.

तिच्या खाण्यात काही बदल नाही म्हणतेस तर (nursing करत असशील तर) तुझ्या खाण्यात काही बदल झाला आहे का ते पाहा. जड, शिळं, हरभरा डाळ, आंबवलेलं असं काही खाऊ नकोस.


Asira
Thursday, June 22, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks .

सध्या तरी दात येत आहेत असे काही वाटत नाहिये.
पण आता उतार वाटत आहे; चिडचिडही कमी करत आहे


Aashu29
Friday, June 23, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi all माझा मुलगा ८ महिन्यान्चा आहे तो छान खातो सर्व दिलेलं, त्याला तुप देउ का आता वरण भातात कालवुन?
आणि अजुन एकहि दात नहीत तर मिक्सर मधुन काढुनच खाउ घालते मी सगळे काही.
तसेच continue करू का आता मिक्सर बन्द करावे?


Storvi
Friday, June 23, 2006 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग तुप द्यायला काही हर्कत नाही. मला तर डॉ. नीच सांगितलेले भरपुर तुप घाला, ते त्याला गी म्हणतात घी नाही :-) त्यंची बायको भारतीय आहे, सो त्यांना चांगले माहित आहे आपले खाणे. आणि मिक्सर हळु हळु कमी कर. नाहीतर मुलं मग वेगळी consistency असलेले पदार्थ तोंडातच घेत नाहीत. म्हण्जे मौ करुन दे, पण एक्दम पुरी न करता हळू हळू introduce करावंस असं मला वाटतं. बाकीची जाणकार मंडळी सांगतीलच

Aashu29
Sunday, June 25, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks haa shilpa !!

Adtvtk
Thursday, August 10, 2006 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी. माझी मुलगी आश्लेषा ४ वर्षाची आहे. एक महिन्यापुर्वी तिला बरे वाटत नव्हते म्हणुन डॉक्टर कडे नेले तर त्यांनी सांगितले कि pnemonia आहे आणि तिला hospital मध्ये दाखल करावे लागले. २ दिवसात तिला सोडले. मागच्या आठवड्यात तिला थोडी सर्दि झाली होती व परवा day care मधुन ताप आला म्हणुन डॉक्टर कडे नेले तर ते सांगतत की asthma attack आला आहे आणि एक महिन्या पुर्वी पण asthmaa attack होता. म्हणजे हॉस्पिटल म्हणते pnemonia आणि pediatrician म्हणतो asthma आता ४ वर्षात हे असे आताच तिला झाले. pediatrician चे म्हणणे आहे कि तिला fall and winter साठी हे पुन्हा होउ नये म्हणून औषध चालु करुया. मला फारच काळजी वाटते आहे. कोणी काही मार्गदर्शन करु शकेल का?

Vk2006
Friday, October 27, 2006 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगा ४ महीन्याचा आहे. गेल्या आठवड्यापासुन त्याच्या हातावर आणी द्न्डावर लालसर पुळ्या यायला लाग़ल्या आहेत. गालावर पण लालसर पणा आलेला आहे. इथे काही लोक म्ह्णतात की ही एक्झीमा ची सुरुवात आहे. आणी त्यावर काही उपाय नसतो. काही वरशानन्तर तो बरा होतो. याच्यवर कही घारगुती कीवा आयुरवेदीक उपाय आहे काय?
कुणाकडे माहीती असेल तर क्रुपया ईथे पोस्ट करा.


Miseeka
Wednesday, November 08, 2006 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आज हे post वाचले म्हणुन मग माहिति देत आहे.माझ्या पण मुलीला असाच Exima आहे त्यासठि मी तिला दिवसातुन ३-४ वेळेला Aquaphor लावते.आणि दुसरे म्हणजे घरगुति उपाय असा कि जर मुलाला रोज मसाज करत असाल तर "तीळ तेल" वापरावे त्यामुळे rash जायला मदत होते.मि मझया मुलीला johnson & johnson च्या तेलाने मसाज करते त्यात मी एक ते दिड चमचा तीळ तेल घालते.आणि ही rash/exima winter जास्त दिसतो पण warm weather मधे कमी होतो.शेवटचा एक सल्ला "मुलाला long pant घालणे म्हणजे सारखी बाकी लोकन कडुन पण विचारणा होत नाही.

Bee
Thursday, November 09, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात जे फ़िगारो तेल मिळतं ते चांगल नसत का मसाजसाठी बाळाच्या?

Miseeka
Thursday, November 09, 2006 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी US मधे रहात असल्यामुळे मला या तेलाबद्दल माहिति नाही.

Vk2006
Friday, November 10, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या गेल्या पोस्ट न्ंतर आम्ही काही उपाय करून पाहीले आणी त्याने बराच फ़रक पडला.

सगळ्यात महत्वाच म्हणजे ह्युमीडीफ़ायर लावला.

तसेच इन्टरनेट वर आणी नातेवाईकांकडून काही उपाय मीळाले ते करुन पाहीले. त्याम्धल काय लागु पडल ते नक्की सांगता येत नाही.

त्याला आम्ही दीवसातून ४ वेळा तीळ आणी नीम तेल लावुन मसाज केला. जीथे त्वचा लालसर होती तीथे कोकम (कीवा अप्प्ल सायडर व्हीनेगार कीवा दही) आणी लसुण लावली. (ते करताना बाळ रडते).

तसेच हीतगुज वरचा हा:
"त्वचेवरचे पुरळ, रॅश - हळकुंड, नागरमोथा, वावडिंग " उपाय पण केला.

स्नानपुर्वी ओटमील लावले. अजून त्यला दररोज स्नान करयचे थाम्बवले. आता त्याला दर दोन दीवसानी स्नान घलतो.

हे सर्व केल्याने त्वचेच्या खपलय जाउन एक्झीम जवळजवळ बरा झाला आहे.

Jagu
Friday, November 24, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक वर्शा नतर च्या मुलाला खाण्याचे शेड्युल द्या.

Anupama
Saturday, November 25, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़िगारो ह्या ब्रॅड्चे olive oil असेल तर ते चांगले आहे.

Avv
Monday, November 27, 2006 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलांच्या ख़ाण्याच्या आणि एकंदरीतच आहाराबद्दल मालती कारवारकरांचे वंशवेल पुस्तक वाचावे.

Jagu
Tuesday, December 05, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक वर्षाची मुलगी आहे. तिला सर्दी झाली आहे. सध्या शिंकते आणि नाकतून पणी येते. प्लिज उपाय सुचवा.

Avv
Tuesday, December 05, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सितोपलादी चूर्ण १४ चमचा, भिजेल एवढा मध असे जर बशीत घेऊन घोटावे दिवसातून तिनदा. आलं, तुळस, काळी मिरी यांचा काढा गुळ घालून पाजावा. नाकात एक एक थेंब घरी केलेले साजूक तूप सोडावे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators