Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

सर्दी, कफ, खोकला, ताप ...

Hitguj » Health » आयुर्वेद » सर्वसामान्य तक्रारी व उपाय » सर्दी, कफ, खोकला, ताप « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 11, 200622 01-11-06  7:38 pm

Moodi
Thursday, January 12, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता मी पण आश्विनीच्या उत्तराचीच वाट बघतेय. पण सध्या तुझ्या सासुबाईना जागरण, कोरडे पदार्थ म्हणजे कोरड्या नुसत्या तेलात परतलेल्या भाज्या, कच्ची कडधान्ये किंवा त्याच्या कोशिंबिरी हे कमी करायला सांग. सध्या तुरीपेक्षा मुगाचे वरण, आमटी, रस असलेल्या भाज्या खायला सांग. लोणचे कमी अन जर चटणी कोरडी खात असतील, म्हणजे वर कच्चे तेल घालुन तर तसे न करता त्या चटण्या भाजीच्या रसाबरोबर खायला सांग.

रात्री झोपताना साजुक तुप घातलेले दुध घ्यायला सांग, रोज घेतले पाहिजे असे नाही,साखरही १ चमचा बास. आंबट अन खारट पदार्थ कमीच घेणे.
त्यांच्या वयानुसार ज्येष्ठमध १ टीस्पुन दुधातुन घ्यायला सांग, नाहीतर ते १ लिटर पाण्यात उकळुन घेऊन गाळुन प्यायला सांग जमेल तसे. सगळे पाणी त्याच दिवशी प्यायले पाहिजे असे नाही.

अडुळश्याचा काढा किंवा तुळशी युक्त अडुळसा औषध घ्यायला सांग. जर कफ नसताना ते कमी करणारे औषध त्यानी घेतले असेल तरी त्याना त्या औषधाचा त्रास होईल. तेव्हा जपुन. बोलणे पण कमी करणे. अन वेळेवर जेवायला सांग.


Zelam
Thursday, January 12, 2006 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, मी जाणकार नक्कीच नाही पण घरी कुणालाही खोकला असेल तर मी आळशी जवस), खडीसाखर, जेष्ठ्मध, २ लवंगा आणि २ मिरे टाकून काढा करते १ कप पाणी घेतले असेल तर अर्धा कप होइपर्यंत उकळायचे सर्व जिन्नस टाकून). दिवसतून दोनदा थोडाथोडा घ्यायचा. सर्वांना खूप फायदा झालेला पाहिलाय.
पण मी doctor नाही, अश्विनी, मूडी सारखी जाणकार नाही. परत हा उपाय कफ नसेल तर करता येईल की नाही माहीत नाही कारण जवस कफनाशक आहे.


Prajaktad
Friday, January 13, 2006 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी,झेलम चांगला सल्ला दिलात तुम्ही,बोलणे कमि करणे हास्यास्पद वाटले तरि related असावे कारण त्या बर्‍याच बडबड्या आहेत.
त्यांना वैद्याने २-३ पुड्या चवनप्राश,गरम पाणी,मधाबरोबर दिल्या होत्या.
पथ्य म्हणुन लोणचे आंबट पदार्थ,केळी बंद सांगितलेय


Moodi
Friday, January 13, 2006 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम तुझा उपाय चांगला आहे, पण जवस कफनाशक असल्याने ते न घेतलेले बरे.
दुसरी गोष्ट वयानुसार प्रतीकार शक्ती कमी पडते तेव्हा गरम औषधे जसे की पिंपळी, लवंग, गुळवेल हे जपुन घ्यावे लागते. अन जर हे कमी प्रमाणात दुधातुन घेतले तर बरे. म्हणजे पिंपळी ही दुधातुन चालते. तसेच खडीसाखर चघळणे, तुळशीची पाने चहात वापरणे हे ठिक.

जास्त बोलण्याने घश्यावर ताण येऊन गिळणे वगैरेला पण त्रास होतो. सुपारी, बडीशेप पण जास्त खाऊ नये कारण त्याने घशात थर जमुन गिळता येत नाही.


Prem869
Saturday, May 06, 2006 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडीताई,

आपण मला थोडे मार्गदर्शन कराल का?

मी मुम्बई ला राहतो. सध्या कडक उन्हाळा चालु आहे. सहसा मी थंड काहिही खात व पीत नाही (आवडते तरीही) पण उष्णतेमुळे व असिडीटी होती म्हणुन परवा रात्रि मी घरगुती कोकम सरबत (थंड पाण्यातुन) घेतले. दुसर्‍या दिवशी सकाळी लगेचच ईफ़ेक्ट जाणवला व माझ्या नाकातुन पाण्यासारखा पातळ कफ़ पडू लागला आणि ताप व अंगदुखी सुरू झाली. मला वरचेवर हा अनुभव नेहमीच येतो की मी थोडेसे जरी थंड पाणि किंवा सरबत घेतले किंवा ए.सी. मध्ये बसलो तरी मला लगेच कफ़ होतो व तापही येऊ लागतो. त्या कफ़ावर कोणतीही अलोपथी ची औषधे उपयोगी पडत नाहीत.

मला असे वाटते की माझी रोगप्रतिकार शक्ती कमी कमी होत चालली आहे. मला ईतर कुठलाही आजार नाही. फ़क्त हा कफ़ व ताप फ़ार फ़ार सतवतो.

तर तुम्ही यावर काही आयुर्वेदिक उपाय सांगु शकाल का? की जेणे करून माझी रोगप्रतिकार शक्ती वाढेल.

-प्रेम


Hemant_patil67
Tuesday, July 04, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कसे काय थांबबावे कोणी सांगेल का? मी हेमंत वय ३९, परदेशात एकटाच राहतो. ईकडे आयुर्वेदाची नामचीन औषधे उपलब्ध नाहीत.
गेला एक आठवडा मला खोकला आहे सुरुवतीला ताप पण होता डॉक्टरने प्यारासिटामोल दिले त्याने ताप बरा झाला पण खोकला कमी नाही.
दुधात हळद टाकुन प्यायलो, साध्या मधाचे आल्या सोबत चाटण घेउन झाले, हळद मिठाच्या गुळण्या करुन झाल्या पण तसा फारसा फरक पडलेला नाही. खोकला सुका आहे.

हेमंत

Maudee
Tuesday, July 04, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कफ़ावर उत्तम उपाय म्हणजे सुर्यनमस्कार.
रोज सुर्यनमस्कार घतल्याने कफ़ावर control रहातो.
प्रथम जेव्हा हा उपाय मला सांगण्यात आला होता तेव्हा मलाहि शंकाच वाटत होती पण it worked . scotland मध्ये मी काही दिवस होते तेव्हा फ़क्त यावर control केलेला कफ़.(यामागचे कारण अश्विनीच सांगू शकेल)
पण त्या बरोबर थंड पदर्थ टाळणे, व्यवस्थित जेवण घेणे हे उपाय करावेच लागतात जेणेकरून प्रतिकारशक्ती कमी होत नाही.

कफ़ ख़ूप झाला असेल तर मी गरम पाण्यातून हळद मिठ सुध्हा घेते ज्याने कफ़ पातळ होतो आणि नाकावाटे बाहेर पडू शकतो


Prem869
Thursday, July 06, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅक्स माऊ,

बरेच दीवसांपुर्वी केलेल्या पोस्टला उत्तर तरी मिळाले.

मी जरूर तु सांगितलेले उपाय करील व प्रयत्न करेन वेळेवर व व्यवस्थित जेवण घेण्याचा.

जर अश्विनीला वेळ असेल तर तिनेही मार्गदर्शन करावे. ही विनंती.

- प्रेम


Chandrika
Friday, July 07, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hemant,

Just now saw it on TV. Take a slice of onion, add 1-2 tsp.of honey over that and let it sit for 4-5 hours. After that just eat that honey to get rid of dry cough. She didn't say what to do with that onion though.

Moodi
Wednesday, August 02, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम बर्‍याच दिवसांनी मला तुझ्यासाठी हा उपाय मिळालाय. तू मुंबईत रहात असल्याने तेथील दमट हवेत स्वतची काळजी घेणे हा तर सर्व सामान्य उपाय पण हा पण लेख वाच.

http://www.pudhari.com/Archives/july06/27/Link/P-arogyaB.htm

Prem869
Thursday, August 03, 2006 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शतश: धन्यवाद मूडीताई, _/\_

मी ही अनेकानेक उपाय व उपचार केले परंतु काहीही फ़रक पडला नाही.

तुमच्या या माहीतीमुळे मला कदाचित काहीतरी उपाय मिळेल व थोडी तरी सुटका होईल असे वाटते.

पुनश्च धन्यवाद!

-प्रेम


Chinnu
Thursday, August 03, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्दी खुप त्रासिक असल्यास आणि नाक पुन्हा पुन्हा गच्च होत असल्यास adenoids -म्हणजे नाकातले लहान गोळे आहेत का ह्याची डॉक्टरकडुन तपासणी करुन त्वरीत ते काढुन टाकावे. ह्या ऑपरेशनला १० मिन. लागतात अस ऐकुन आहे. ज्या लोकांचे नाक लहान असते, अश्या लोकांनी जरूर खात्री करुन घ्यावी.

Rupali_county
Tuesday, August 08, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या ३ वर्शाच्या बाळा ला कफ़ खूप होतो, कोनि उपाय सान्गू शकाल काय?

रूपाली


Aandee
Saturday, August 12, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली एक चमचा मधात चिमुट भर ह्ळद थोडी जेष्ट्मधची पुड दोन थेब आल्याचा रस किवा सुन्ठ पुड सगळ एक करुन द्याव त्याला तिख़ट वाट्ल्यास आल सुन्ठ नाही दिली तरी चालेल हेच औषध मोठ्यानाही चालेल

Aandee
Saturday, August 12, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती वेळा ते सागायच राहील दिवसातुन दोन वेळा मोठ्या साठी तीन ते चार वेळा

Ashwini
Tuesday, November 07, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूपाली,
हे मी दुसर्‍या bb वर लिहीलं होतं पण तुला पण उपयोगी आहे म्हणून इथे परत टाकते.
केशर आणि हळद घालून दुध द्यायला हरकत नाही. पण सतत देत असशील तर उष्णता वाढत नाही ना हे पाहा.
खोकल्यावर मधातून सुंठ, दालचिनी पूड, लवंग पूड, ज्येष्ठमध दिलीस तरी बरं वाटेल.

खोकल्यासाठी ज्येष्ठमधाची काडी अधुनमधून चोखायला दिलीस तरी चालेल.

पाणी गरम प्यायला देत जा.

छाती गरम कापडाने शेकत जा.

रात्री झोपताना vicks चा वाफारा देत जा.


Deeps
Thursday, December 06, 2007 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Has any body tried Dabur Madhuvaani?
If it can be used for kids with mild asthma.My six years old is suffering from Asthma..not so severe .but sometimes it is trigerred. usually once cold winter season begins.Is it advisable to give him Dabur Madhuvani?

Sahi
Tuesday, May 13, 2008 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या नवर्याला सतत खोकला होत असतो....सिझन बदलला कीहोतो थन्डीमुळे होतो आणि जाता जात नाही
घश्यात फ़ीलिन्ग असते आता अलर्जी स्पेश्लीस्ट कडे जाणार आहे
काही होमिओपथिचे उपचार क्रुपया सुचवता का?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Add Your Message Here
Post:
Username: Posting Information:
This is a private posting area. Only registered users and moderators may post messages here.
Password:
Options: Automatically activate URLs in message
Action:

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions