Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
व्याकरण

Hitguj » Language and Literature » भाषा » व्याकरण « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 20, 200525 12-20-05  11:02 am
Archive through June 27, 200620 06-27-06  9:48 am
Archive through September 21, 200720 09-21-07  4:35 am
Archive through October 12, 200720 10-12-07  6:44 am

Slarti
Friday, October 12, 2007 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात अरेरे, अबब इ. उभयान्वयी अव्यये (आणि, व, पण, परंतु) नाहीत, ते भावनाप्रदर्शक उद्गार आहेत. च्यायला ही शिवी. ते 'तुझ्या आयला' चे अपभ्रष्ट रुप असावे.

Gajanandesai
Saturday, October 13, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'अबब!', 'अरेरे!' ही केवलप्रयोगी अव्ययं आहेत.

Badamraja
Monday, October 15, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत "च्यायला" अस आपण वैताग आल्यावर सुद्धा बोलतो आणि त्या वेळेस कुणाच्या तरी आईचा उल्लेख आपण नक्कीच करत नसतो.

Slarti
Monday, October 15, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती मूळ शिवीच, आता त्या शब्दाचा तो संदर्भ नाही राहिला एवढेच. आता हा शब्दही अबब, अरेच्चा यांसारखा झाला आहे. या शब्दाचे 'मायला' असेही एक रुप प्रचलित आहे.

Badamraja
Monday, October 15, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला ही शिवच पण कीती सहज हल्ली वापरली जाते.
अश्याच जर बाकीच्या शिव्या सुद्धा वापरल्या गेल्या तर?
बापरे आपली भाषा किती भयंकर होईल.
कल्पना न केलेलीच बरी.


Dineshvs
Monday, October 15, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Slarti या शब्दाचे मूळ कोल्हापुर भागात दिल्या जाणार्‍या एका लांबलचक शिवीमधे आहे.
खरे सांगायचे तर मला हा संदर्भ माहित असल्याने, हा शब्द लिहितानाही मला अवघडल्यासारखे होते.


Bee
Tuesday, October 16, 2007 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलीभाषेत आलेले 'च्यायला' सारखे शब्द मला कधीच घृणास्पद वाटलेले नाहीत. आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त होतात असे वाटते..

Badamraja
Tuesday, October 16, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी सुसंस्क्रुत मराठीत अजुन तरी च्यायला चा वापर असभ्य मानला जातो.
पण च्यायला म्हटंल्या शिवाय आपला दिवस सपंत नाही.(भावना मुक्तपणे व्यक्त करण्याच स्वातंत्र्य)


Hkumar
Wednesday, October 17, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'च्यायला' ही शिवी नाही असे वपुंनी त्यांच्या एका लेखात म्हटले होते.

Maanus
Tuesday, January 08, 2008 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शहर हे पुल्लीगी असले तरी काही वेळेस त्याला स्रीलींगी का संभोदतात?

उ.दा.

पुणे हे पुरातनकालीन शहर आहे.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.


Vinaydesai
Tuesday, January 08, 2008 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maanus

'ते शहर' हा शब्द आहे..(नपुंसक) तो पुल्लिंगी नाही (तो शहर)...

आणि 'राजधानी' स्त्रिल्लिंगी म्हणून 'ती राजधानी'....Maanus
Tuesday, January 08, 2008 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म. वेळ लागेल समजायला.

ल ला दुसरी विलांटी दिल्यामुळे विनय ने तिकडे डेस्क वर डोके आपटुन घेतले असनार :-)


Shraddhak
Wednesday, January 09, 2008 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शहर हे पुल्लीगी असले तरी काही वेळेस त्याला स्रीलींगी का संभोदतात?>>>
माणसा, योग्य शब्द ' संबोधतात ' असा आहे रे. :-)

Vinaydesai
Wednesday, January 09, 2008 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'माणूस' च्या बाबतीत बर्‍यात गोष्टी जरा समजून घ्याव्या लागतात तो'बी' (तो पण) जरा हरवलेला असतो... :-)

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators