Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
वाक्प्रचार

Hitguj » Language and Literature » भाषा » वाक्प्रचार « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 19, 200620 05-19-06  1:02 pm
Archive through June 18, 200720 06-18-07  6:43 am
Archive through June 20, 200720 06-20-07  8:04 pm

Mahesh
Thursday, June 21, 2007 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणी पाठलाग मधे असलेले गाणे आहे.
नको मारूस हाक, मला घरच्यांचा धाक,
भर बाजारी करीशी खुणा,करू नको पुन्हा हा गुन्हा


Zakasrao
Thursday, June 21, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पडलेली वस्तु परत घेता येते ना उचलुन. पण तिची बुगडी हरवली आहे आणि ती पुढे हे ही म्हणते कि माझ्या म्हातार्‍याला संगु नका. अर्थात चु. भु.दे.घे. कारण मला नीट गाण आठवत नाहिये.

Gajanandesai
Thursday, June 21, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही या लावणीत 'सांडली'चा अर्थ 'हरवली' असा वाटतो.

Imtushar
Thursday, June 21, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पडलेली वस्तु परत घेता येते ना उचलुन. पण तिची बुगडी हरवली आहे

>> सातार्‍याला जाता जाता माझे एक कर्णफूल पडले. कृपया ते माझ्या तीर्थरूपांना सांगू नका.

येथे पडली हा अर्थ व्यवस्थित बसतो... आणि तसेही सांडली चा अर्थ पडली असाच आहे... गावाकडे हा शब्द सर्रास वापरला जातो.


Vinaydesai
Thursday, June 21, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे 'सांडली' हे 'हरवली' या अर्थाने वापरलेलं आहे...

आणि वापराचे म्हणाल तर कोकणात 'सांडणे' हा शब्द 'हरवणे' या अर्थीच वापरला जातो..

फक्त 'पडली' असं असतं तर तिला ती उचलता आलीच असती... :-)


Kedarjoshi
Thursday, June 21, 2007 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,

"बुगडी माझी ..." हे गाणे १९५९ साली बनविलेल्या "सांगत्ये ऐका" ह्या चित्रपटातील असून. "झुमका गिरा रे ..." हे गाणे १९६६ साली बनविलेल्या "मेरा साया" ह्या चित्रपटातील आहे.

तेव्हा कोणी कोणाचा अनुवाद केला>>>>>>


सुनील झुमका गिरा रे ही लिहीलेल गाण नाही तर लोकगीत आहे. त्या गाण्याचा वापर फक्त त्या हिंदी पिक्चर मध्ये केला गेला आहे. त्यामुळे जरी तो पिक्चर १९६५ मध्ये आला तरी त्याचा उगम आधीचा आहे.

शांता शेळक्यांनी देखील ही आठवन सांगीतली आहे. (ती नक्षत्र्यांचे देने हया कार्यक्रमात). जरुर बघ. त्या शिवाय अनेक गाण्यांचा अनुवाद त्यांनी केला आहे.

तेच नाही तर मंगेश पाडगावकर हे देखील गाण्यांचा अनुवाद करायचे पण तो अनुवाद देखील अस्सल मराठी वाटायाचा. ( उदा. कबीराचे दोहे).
Farend
Thursday, June 21, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गदिमांचं "विकत घेतला श्याम" हा मीरेच्या "माई री मै तो लियो पिया मोल" चा अनुवाद आहे ना?

Dineshvs
Thursday, June 21, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्णपणे नाही. गदीमानी, तोच तुक्याचा विठ्ठल आणि दासांचा श्रीराम, अशी मराठी फ़ोडणी दिलीय.

Kedarjoshi
Thursday, June 21, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गाण्याची थिम तिथलीच आहे.
दिनेश बरोबर त्यांनी आपला विठ्ठल त्यात घातला. हाच तर ग्रेट नेस की ते अगदी ओरीजीनल वाटत.

ईंद्रायनी काठी हा मला बरेच दिवस कोन्यातरी संता ने लिहीलेला अभंग वाटायचा पण तो गदिमांनी लिहला आहे.


Pancha
Thursday, June 21, 2007 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मांडवली" चा अर्थ काय? हा मराठी शब्द आहे का?

Zakasrao
Friday, June 22, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन गुंड किंवा टोळ्या यांच्यात भांडणं झाले तर जो समेट व्ह्याय्चा त्याला मांडवली म्हणतात अस माझ हिंदी फ़िल्म्स बघुन वाढलेल (??) ज्ञान सांगतं. अजुन डीटेल्स माहित नाहित पण धोबळ मानाने त्याचा अर्थ समेट असाच आहे.
विनय मी हि तो शब्द दोन अर्थाने वापरलेला ऐकलाय. पहिला पडणे,लवंडणे. उदा. पाणी सांडले.
दुसरा अर्थ हरवणे. हा शब्द मी गावी ह्या अर्थाने ऐकलाय. माझ गाव कोकणात नाही पण तरीही ह्याच अर्थाने देखिल वापरतात. उदा. माजं पैसं सांडलं. आता हा शब्द ह्याच अर्थाने वापरणारी मंडळी फ़ार कमी उरली आहेत.


Sayuri
Wednesday, October 10, 2007 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलिकडे बर्‍याचदा 'रागीष्ट' असा शब्द ऐकला. उदा. यांचा स्वभाव जरा रागीष्ट आहे वगैरे..
असा शब्द मराठीत आहे का? माझ्या ऐकण्यानुसार 'रागीट' आणि 'कोपिष्ट' असे शब्द आहेत...


Amruta
Thursday, October 11, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रागीष्ट हा शब्द मी तरी पहिल्यांदाच ऐकला :-)... बाकी रागीट आणी कोपिष्ट हे शब्द बरोबर आहेत.

Sayuri
Saturday, October 13, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना अमृता.
मी होम मिनिस्टर मध्ये अनेकदा ऐकला 'रागीष्ट' हा शब्द!


Hkumar
Monday, October 15, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'दिवे घ्या हो' या काही मायबोलीकरांकडून वापरल्या जाणार्‍या वा. चा अर्थ काय?

Slarti
Monday, October 15, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही ???!!! काही जण वापरत नसतील...
दिवे घ्या = ~D = पणती वगैरेचे चित्र = take it lightly


Hkumar
Wednesday, October 17, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दिवे घेतले हो! पण, उगम काय या वा. चा?

Slarti
Wednesday, October 17, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

take it lightly चे मराठीकरण आहे ते.

Hkumar
Thursday, October 18, 2007 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त आहे हो हे मराठीकरण :-)Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators