चंद्रकला पाउलजड वाटेवर दूरपणा थिजलेला झाकळणार्या क्षितिजावर झुरणारी चंद्रकला चमकल्या काजव्यांत हाक विरे अंधारी भरला ढग माथ्यावर दबलेला श्वास उरी. आर्त हंबरता सांज डोहात पाचोळा जुळेनाशी झाली धार दाटून उमाळा फाटलेल्या प्राक्तनाची व्यर्थ मिणमिण श्वास जिवंतपणाची नाममात्र खूण सरतीची सुरू रंगमावळण टिटवीची आर्त आली खडक उलून
|