Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कोल्हापुरी

Hitguj » Language and Literature » भाषा » मराठीची विविध रुपे » कोल्हापुरी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 30, 200235 01-31-02  4:40 am
Archive through April 10, 200335 04-10-03  1:35 pm
Archive through May 27, 200335 05-27-03  7:37 am
Archive through June 09, 200335 06-09-03  4:25 am
Archive through September 04, 200335 09-04-03  6:32 pm
Archive through September 12, 200335 09-12-03  7:37 am
Archive through October 06, 200335 10-06-03  12:55 pm
Archive through January 16, 200435 01-16-04  4:53 pm
Archive through May 29, 200720 05-29-07  4:52 am
Archive through June 11, 200720 06-11-07  11:58 pm
Archive through January 30, 200820 01-30-08  1:15 pm

Farend
Wednesday, January 30, 2008 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद झकास, पण सांगितले नाहीस येथे अजून टाकले आहेस, सहज लिंक बघितली म्हणून कळाले.

भाताची मला एक नेहमी गंमत वाटते... शेतात तो भात असतो, मग त्याचा तांदुळ होतो आणि घरी शिजवला की परत भात :-)


Hkumar
Friday, February 01, 2008 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'अनुभव' च्या २००७ दिवाळी अंकात 'कोल्हापूरकी' हा मल्हार अरणकल्लेंचा लेख आहे. त्यात 'बोला की, या की, बसा की' या खास बोलीचा उल्लेख आहे. कोल्हापूरकरांनी जरूर वाचावा.

Satishmadhekar
Friday, February 08, 2008 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापुरी जगातले सर्वात शिस्तशीर नागरिक आहेत. नेहमी बोलताना ते "शिस्तीत जा", "शिस्तीत जेवा" असा हुकूम देत असतात. "शिस्तीत जेवा" म्हणजे नक्की काय? कोल्हापुरी सोडून इतर सर्वजण बेशिस्त आहेत अशी कोल्हापुरकरांची समजूत आहे का?

Gajanandesai
Friday, February 08, 2008 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो शिस्तीत म्हणजे सावकाश जेवा, सावकाश जा. :-)
(पाहुण्यांसाठी वगैरे "शिस्तीत जेवा" अशी आदब दाखवली जाते. नाहीतर "घिसाड-घाई करू नको!" असं सणसणीत वाक्य येतं.)


Vinaydesai
Friday, February 08, 2008 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेतात असते तेव्हा 'तें भात'.. घरी आल्यावर 'तो तांदुळ' आणि शिजल्यावर होतो 'तो भात'....


Chhatrapati
Saturday, May 17, 2008 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीश, तो हुकूम नाही तर प्रेम व्यक्त करण्याची "क्वोल्लापुरि स्टाय्ल" आहे. "शिस्त" हा शब्द कोल्हापुरात निष्कारण आणि अनावश्यक रित्या जास्त रूढ आहे. पण नेमका कोणता माणुस बोलतोय आणि त्याचा बोलण्याचा सूर कसा आहे, हे जाणून घेतले, तर "शिस्त" या शब्दाचा अर्थ "शिस्त" असा न राहता, गजानन-देसाईंनी लिहिल्याप्रमाणे, "सावकाश" किंवा "मनापासून, आनंदाने" किंवा "परिस्थितीसाठी योग्य" असा आहे, हे समजते. कोल्हापूरकरांनी "शिस्त" या शब्दाचे cliche या प्रकारात परिवर्तन केले आहे. "शिस्त" या शब्दाचे भाऊ-बहीण : व्यवस्थीशीर, शिस्तीनं, पद्धतशीर, बेशीस्त; वगैरे.

Raviupadhye
Sunday, May 18, 2008 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिस्त या शब्दाचा दुसरा उगम जवळ असलेल्या कानडी भाषेच्या प्रभावातून आअहे.
"शिस्त" झाले म्हणजे व्यवस्थित झाले,"शिस्त" आहे म्हणजे छान आहे,असा अर्थ त्या भागातील कानडीत होतो.
या "शिस्त"चा व discipline चा सम्बन्ध बरेचदा नसतो-सतिशराव


Chhatrapati
Saturday, May 24, 2008 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी उपाध्ये, आपण एकदम झकास सांगितलेत !

कोल्हापूर जिल्हा दक्षिण महाराष्ट्रात "मोडत" असल्यामुळे कानडी भाषेचा मोठा पगडा कोल्हापूरकरांवर पडला आहे. पु. ल. देशपांड्यांनी लिहिल्याप्रमाणे, "ताई", "आक्का" आणि "आण्णा" या सर्वात जिव्हाळ्याच्या लोकांना मराठीमध्ये स्थान देण्याचे श्रेय कानडी भाषेला जाते.

मला आठवते त्याप्रमाणे, कोल्हापूरात कोणत्याही अनोळखी स्त्रीला "आहो ताई" असे संबोधण्याची रीत आहे.




Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators