Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अशोक बागवे

Hitguj » Language and Literature » पद्य » अशोक बागवे « Previous Next »

Rajendra_borkar
Friday, September 13, 2002 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashok Bagwyanhya kavita mahiti asalyas krupaya ithe post kara

Paankaj
Saturday, September 14, 2002 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dear rajendra
kashala re havyat tula tya?
tula kay mahit ahe te lihi na adhi

Rajendra_borkar
Sunday, September 15, 2002 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

priya pankaj

hi site keval kavite madhlya dada lokansathi ahe ase mala watat nahi.kadachit i have used wrong words in asking for the kavita.
mala fakt kavita aikanyat ani wachnyat interest ahe.
please do not misundestand.
rajendra


i

Swaagat_samiti
Monday, September 16, 2002 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sausvaagatma\ !!!

Rajendra_borkar

ihtgaujavar Aaplao haid-k svaagat. ihtgaujatfo- Aaplyaalaa hI CÜTIXaI BaoT .

ihtgaujavarIla sava- ivaBaagaaMnaa AvaXya BaoT Va .

dovanaagarI laoKnaasaazI ]pyau> maaihtI yaoqao pha.
dovanaagarI


Iravati
Sunday, July 22, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दंश

खूपसा विखार ओतून
आपले शब्द जहरी करावेत
म्हणजे समोरच्याचा चेहरा काळा-निळा पडत जातो

मग आपल्या संशयाचं गिरमीट
हृदयावर रोखावं,
म्हणजे ते पोखरत जातं खोलवर
आणि थपाथप गळू लागतं सगळं गरळ तुमच्याबद्दलचं

नंतर लखलखत्या जिभेच्या सडेतोडपणे
सरळ दंश करावा वर्मावर
आणि जख्मी शेपटावर वारंवार लवलवत
वेटोळावा सर्प
तसा त्याच्या मनाचा काचमणी
लालपिवळ्या थारोळ्यात तडफडताना पाहावा
आपल्या समाधानाचं पित्त शमेपर्यंत



कमळे

तिने थरथरत माझ्या हातात
कमळे ठेवली.
म्हणाली, " जप यांना उन्हापासून
धग लागू देऊ नकोस ----"
असं म्हणून निघून गेली.

तेव्हापासून सावली घरटं बांधून
केव्हाचा बसलोय मी ही कमळं सांभाळीत.
बाहेरच्या सूर्योदय्-सूर्यास्ताचं भान नाही.
ती येईल की नाही पून्हा
माहीत नाही.

कंटाळून मी आता कमळं विकायला काढलीत.
घेणारानं फक्त एक करावं
तिला उन्हाची खात्री द्यावी,
वा सावलीचा भरवसा


Iravati
Tuesday, July 24, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा

हा खाजगीपणाचा मौसम :
प्रथम प्रिया यावी
आणि नंतर पाऊस.
प्रिया आली की ती पाऊस घेऊन येणारच आपणहून

प्रिया आली की
सगळ्या मित्राना सस्नेह निरोप आपण दिलेले
आणि त्यांनी स्वत:हून घेतलेले

मित्रा
प्रियेत आपण गुंतून पडलो की
आत्यंतिक खाजगी होत जातो.
डोकावत जातो स्वत:त तरी
संपूर्ण संदर्भासहीत उरतो पुन्हा प्रियेचेच.

दिवसभर जोपर्यंत बागेवर आकाश झुलत असते
तोपर्यंत बाग आकाशाची असते
आकाशाची सावली परती झाली की
बाग स्वत:त बुडते,
एकट्याशीच खाजगी होत जाते

एकदा तू बागेत बसला होतास एका अनोळखी झाडाखाली
प्रियेची आराधना करीत;
इतर मुली तुझी चौकशी करुन गेल्या
पण त्यात ती नव्हती;
तेव्हा तुझ्या डोळ्यांतला पाऊस
प्रियेच्या अगोदर आला होता.

पावसाने चुकुनही प्रियेच्या अगोदर येऊ नये.
आधी प्रिया
नंतर पाऊस


आलम मधुन



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators