Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
शांता शेळके

Hitguj » Language and Literature » पद्य » शांता शेळके « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 11, 200230 05-22-03  9:32 am
Archive through December 06, 200330 12-06-03  1:56 pm
Archive through January 31, 200635 02-01-06  1:31 am

Graceful
Wednesday, February 01, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तू वोगी मरता
पळतया तुका
जिवाक जपता हांव खंय लिपता
दोले उलैता

-- तु उगाचच मरतो/मरतेस
--तुला बघतो
--जिवाला जपते पण मि कुठे दडते?
--डोळे बोलतात

Kshipra अजुन Konkani कविता असल्यास पोस्ट कर ना, please


Kshipra
Thursday, February 02, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

graceful, thanks malaa vaaTata hota kee 'paLatayaa' haa shabda chukalaa kee kaay.. aaNi gaaNyaacha tyaachaa uchaara 'poLatayaa' asaa aahe. tyaamule ajunacha confusion hota hote. paLatayaa mhaNaje baghaNe...lol....aso. malaa shaantabaaiMchee evadheecha kokaNi kavitaa maahit aahe. :-(

Gajanandesai
Friday, February 03, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माजो लवताय डावा डोळा
जाई जुईचो गजरो माळता
रतन अबोली केसान फुलता
काय शकून... शकून गो सांगताय माका...

माझे कानार भवर भवता
माझे गालाक बाई भिडता
सगळ्या अंगार शिरशिर येता
माजे पदर वार्‍यावर उडता
मनचो बकुल गो परमळता
काय शकून... शकून गो सांगताय माका...

माझे डोळ्यात सपनाच्या वाटेर
कोन बाई येता न् जाता
माझे ओठार माझेच गाणे
कोन बाई येऊन गाता
माजोच बोल बाई हुलयता
काय शकून... शकून गो सांगताय माका...

-शांता शेळके

चू.भू.द्या.घ्या.


Chaitrapalvi
Friday, February 03, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गो माजे बाय तू माका जाय
तुजे ओंठार येवंदी व्हय व्हय व्हय , in which audio cassette will i get to hear this song?


Mitwa
Friday, February 03, 2006 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीधर फडके आणि पद्मजा फ़ेणाणी यांच्या:
हे गगना
ह्या २००४ मध्ये प्रसिध्द ज़ालेल्या ध्वनीमुद्रिकेत हे गाणे आहे. श्रीधर फडकेंनी अतिशय सुंदर चाल व संगीत दिले आहे.


Chaitrapalvi
Saturday, February 04, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i have heard it livein one of Shridhar Phadke's programme but didn't know about the cassette..thanks!

Manchali
Wednesday, May 24, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'भले बुरे जे घदून गेले
विसरून जाऊ सारे क्शन्भर
जरा विसावु या वलनावर ....'

हे सम्पुर्न गाने कुथे अहे?


Giriraj
Wednesday, June 07, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्रा,ते 'पळतया' नसून 'पळयतां' असे आहे!
आणि कोंकणीत 'ळ' चा उच्चार केला जातो मुंबईकडच्या कोळीगीतांत 'ळ' चा उच्चार नसला तरी!

त्यामुळे 'दोले' असे न म्हणता ते 'दॉळे' असे म्हणतात!

आणि दाद द्यायला हवी शांताबाईंना या कोंकणी आणि दर्यागीतांबद्दल.. मुळात मंचरकर असलेल्या शांताबाईचा या सगळ्यांशी तसा संबंध नव्हताच!



Giriraj
Wednesday, June 07, 2006 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू करंदीकरांनी आमंत्रण दिलेला कार्यक्रम कालच अनुभवला!शांताबाईंच्या विविध भावछटा असलेल्या प्रतिभेचा पुनःप्रत्यय आला! त्यतच म्हटलेले हे सुंदर नाट्यगीत..... या कार्यक्रमात अजित परब यांनी गायले. मुळात 'हे बंध रेशमाचे' या नाटकातील गीत पं.जितेंद्र अभिषेकी यांनी गायले आहे!संगितही अर्थातच त्यांचेच आहे!



काटा रुते कुणाला,आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे

काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे

हा स्नेह वंचना की काहीच आकळेना?
आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे



Giriraj
Monday, June 12, 2006 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message




ऋतू हिरवा, ऋतू बरवा
पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा

भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जूळवितसे सहज दुवा



Itsme
Tuesday, June 13, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Giri, ratrich parayan keles ki kay ? :-) ... me aaj sakalich kele ...

Giriraj
Tuesday, July 11, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाईन विचारीत रानफुला
भेटेल तिथे गं, सजण मला

भग्न शिवालय परिसर निर्जन
पळस तरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करीतील गर्द झुला

उंच पुकारील, मोर काननी
निळया ढगांतून भरेल पाणी
लहरेल विजेची सोनसळा

वाहत येईल पूर अनावर
बुडतील वाटा आणि जुने घर
जाईल बुडून हा प्राण खुळा


Swapnil_deshi
Monday, September 11, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी

ज्योत्सनेपरि कांती तुझी
मुख रम्य शारद चन्द्रमा
उजळे तुझ्या हास्यातुनी
चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे
नित वर्षू दे आमुच्या शिरी

विणेवरी फिरता तुझी
चतुरा कलावय अंगुली
संगीत जन्मा ये नवे
जडता मतिची भंगली
उन्मेष कल्पतरुवरी
बहरुन आल्या मंजिरी

स्पर्शामुळे तव देवते
साकारती रुचिराकृति
शास्त्रे तुल वश सर्वहि
विद्या कला वा संस्कृती
लावण्य काही आगळे
भरले दिसे विश्वांतरी


Swapnil_deshi
Sunday, January 21, 2007 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीननाथा दया सागरा
रूप डोळा तुझे पाहू दे
जीव पायी तुझ्या वाहू दे

दूर नेतात वाटा अशा
पावलांना कळे ना दिशा
श्रेय हाती खरे येऊ दे
जीव पायी तुझ्या वाहू दे

सागराच्या तुझा थेंब मी
चंद्रमा तू तुझे बिंब मी
मूळ रूपी मला राहू दे
जीव पायी तुझ्या वाहू दे

भाव काही नवा जागला
सूर आतून हा लागला
गीत अंती तुला गाऊ दे
जीव पायी तुझ्या वाहू दे


Iravati
Sunday, July 22, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी

अजूनही जेव्हा मन भरुन येते अनिवार
करावे वाटते स्वत:ला शब्दांपाशी मोकळे
वाटते, त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण
तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे

तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक
त्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ,
काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडा
ज्या अवचित करतात विद्ध, रक्तबंबाळ

मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे?
त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?


Iravati
Sunday, July 22, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न पटणारी अनेक सत्ये
स्वत:ला समजूतीने पटवून
मनाचे किती बहर तिने
घेतले आहेत आपल्यात मिटवून

आता निर्विकार डोळ्यांनी
ती निरखू शकते आसमन्त
अनेक मनोभंग पेलतानाही
नसतो खेद, नसते खंत

हवेमधून सरकतात ऋतू
उडतात पाखरे आभाळातून
हिरव्या निळ्या सावल्यांमध्ये
रंगीबेरंगी होते ऊन

पडतात किती प्रतिबिंब
ढवळत राहते आतले पाणी
समजुतदार उसासा टाकून
ती गुणगुणू लागते गाणी!


Iravati
Sunday, July 22, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत....

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!


Iravati
Sunday, July 22, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघ

मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धारा
उत्कट ओल्या आठवणींचा झरे अनावर पारा

खोल हृदयातळि साठून होते काहीसे सुकलेले
खळखळणा-या ओघातुन ते खिदळत खेळत आले

क्षितिजावरच्या निळ्या टेकड्या बालमैत्रीणी झाल्या
हात धुक्याचे पुढे पसरूनी मिठीत मिटाया आल्या

अवतीभवती भरून राहीला जुना अनामीक वास
चमचमणा-या तिमिरालाही फुटले अद्भूत भास

दहा दिशांतून वोळून आले गतजन्माचे पाणी
लहरींवरती उमटत गेली अशब्द सुंदर गाणी

दिन जे गेले, त्यांचे झाले गहनगूढ आभाळ
बगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ




Iravati
Sunday, July 22, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मैत्रीचे मी कोनेकोपरे धुंडाळून पाहिले
घट्ट नाती पुन्हा पुन्हा चाचपतच राहिले

मनात मने गुंफताना भरून आला जीव
वाटले आता दुराव्याची ओलांडली मी शीव

प्रत्येक भेटीत पण पुन्हा नवा परिचय
पुन्हा पुन्हा संदिग्धता आणि नवे भय

गहनगूढ अंधारवाटा पाताळविहिरी खोल
क्वचित कुठे तळाशी चुळकाभर ओल

स्पर्शातून जाणवणारे काही स्पर्शातीत
सूर तेच तरी सुद्धा उमगत नाही गीत

रेशीमगाठी काचणा-या, चरत जाणारे व्रण
निकराच्या अंतीम क्षणी निमूट होणारे मन




Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators