Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पद्मा गोळे

Hitguj » Language and Literature » पद्य » पद्मा गोळे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 06, 200635 02-06-06  12:38 pm

Kshipra
Tuesday, February 07, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इरा, ' ज्यात असतं निखळ मन
मनालाच शोधणारं, पुजणारं ' एकदम मस्त. धन्यवाद


Iravati
Friday, February 10, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Iravati
Friday, February 10, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message




Iravati
Friday, February 10, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message




Bee
Friday, February 10, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इरावती, एक एक कविता हृदयात शिरली ग!!! तुझे आभार कसे मानावे मज कळेना.

तू कृपया मला चाफ़्याच्या झाडा ही कविता रविवारच्या दुपारपर्यंत देऊ शकलील का? मला एका काव्यवाचनाला जायचे आहे तिथे वाचून दाखवीन कारण आमचा विषय आहे झाड.


Supriyaj
Monday, April 17, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पद्मा गोळेंची 'चाफ्याच्या झाडा' ही कविता कुणी देईल का?

Iravati
Friday, May 26, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आषाढातला सूर्यसुद्धा

आषाढातला सूर्यसुद्धा हसतो कधी कधी
ढगातून बाहेर येऊन आणि अस्ताला जाताना
असे काही रन्गलाघव उधळतो झाडावर की
त्याचे ते सोनसळी हिरवेपण
मनात शिरते खोल खोल
आणि अंधाराचे पडदे बाजूला करीत करीत
व्यापून टाकते मनाचा अथान्ग गाभारा पूर्ण
पण हळूहळू त्यातली सोनसळ हरवत जाते
हिरवेपण अंधारात मिसळून जाते
आणि मग आषाढ.... अंधार...... ओली तगमग
एकटेपणाची हक्काची मिरास
अथान्ग गाभा-यातली






Iravati
Monday, May 29, 2006 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message





Iravati
Monday, May 29, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Iravati
Monday, May 29, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Iravati
Monday, May 29, 2006 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्याच्या झाडा

चाफ्याच्या झाडा....
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा....
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा....
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय.... कळतंय ना....
चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना


Moderator_2
Monday, November 13, 2006 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amolt,
तु तुझ्या स्वतःच्या कविता खालिल ठिकाणी पोष्ट करु शकतोस.

/hitguj/messages/75/118433.html?1163411086

Bee
Tuesday, February 19, 2008 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू / असामी, पद्माताईंची 'उत्तर' इथे लिहा.

Bee
Tuesday, February 19, 2008 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेट वर मला पद्मा गोळेंची ही एक सुंदर कविता मिळाली. ती कुणाला पुर्ण करता येईल का?

मी घरात आले


आता सोंगं पुरे झाली
सारी ओझी जड झाली,
उतरून ठेवून आता तरी
माझी मला शोधू दे
तुकडे तुकडे जमवू दे
विशाल काही पुजू दे


Eksamanyamanus
Monday, August 03, 2009 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ढोंगं चालू झाली
सारी ओझी हलकी झाली
जबान माझी बोलकी झाली.
जन हो, मला जमवू दे
बंडलेच्या बंडले नोटांची
नि तिजोरी माझी पुजू दे!

Anandi
Tuesday, August 04, 2009 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"एक सामान्य माणूस" ह्यांची वरची छोटी विडंबन कविता आचार्य अत्रेंच्या "झेंडूची फुले"मधल्या विडंबन कवितांसारखी झकास आहे!



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators