Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अनिल

Hitguj » Language and Literature » पद्य » अनिल « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 15, 200632 01-15-06  12:34 pm

Nitu_teen
Sunday, January 15, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक दिवस
__________________________
जीव लागत नाही माझा असा एक दिवस येतो
कधी अधुनमधुन केव्हा लागोपाठ भेट देतो
अशा दिवशी दुरावलेले उजाड सारे आसपास
घर उदास बाग उदास लता उदास फ़ुले उदास
वाटते आयुष्य अवघे चार दिवसांचेच झाले
कसे गेले कळले नाही हाती फ़ार थोडे आले
दोन दिवस आराधनेत दोन प्रतिक्षेत गेले
अर्धे जीवन प्रयत्नात अर्धे विवंचनेत गेले
आस हरपलेली असते श्वास थकले वाटतात
अश्रू बाहेर गळत नाहीत आत जळत राहतात.


Sagarghalsasi
Tuesday, January 31, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतीम ही कविता अप्रतीम आहे.

Muktasunit
Tuesday, February 07, 2006 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या कवितान्च्या आर्काईव्ह मधून स्वच्छंदपणे विहार करताना, कधी भूतकालाच्या गुहेत शिरल्यासारखे वाटते. जुन्या आठवणीन्च्या प्रदेशामध्ये पुन्हा आल्याचे वाटते. विस्मृतिमध्ये गेलेले एखादे लेणे अचानक समोर यावे तशा कविता भेटतात. मुख्य म्हणजे, ज्या आपल्या स्वत:ला वर्षानुवर्षान्च्या उलाघालीमध्ये आपणच हरवून बसलेलो असतो त्या स्वत्:ची अचानक भेट होते. आरशात अचानक भूतकाळातील चेहेरा समोर आला तर जसे दचकायला होईल तसा मी काही कविता वाचल्यानंतर आलेल्या स्व्त्:बद्दलच्या अशरिरी जाणीवेने दचकलो आहे.

ज्यानी ज्यानी इथे कविता उधृत केल्या आहेत त्यान्ची तुलना वैराण प्रदेशातील पाणपोईन्शीच करता येईल...तृषार्ताला तृप्त झाल्यावर जी कृतज्ञता वाटेल तशी काहीशी अवस्था इथे होते खरी... (मला वाटते कवि यशवंतानी आपल्या एका कवितेत असे म्हण्टलेदेखील आहे...)


Nitu_teen
Wednesday, February 08, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावसा पावसा किती येशील?
आधीच ओलेत्या रातराणीला
किती भिजवशील?

पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस
बांधु दे एकदा सैल अंबाडा

पावसा पावसा लप ढगात
सागफ़ुलांची कशिदा खडीची
घालु दे तंगशी चोळी अंगात

पावसा पावसा ऊन पडु दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसू दे

पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने
वेणीत घालाया केला गजरा

पावसा पावसा आडोश्यातुन
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्ह्याहाळ डोळे भरून...


Paragkan
Saturday, March 04, 2006 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुनी रुसून आहे, खुलतां कळी खुलेना
मिटले तसेच लोचन, कि पाकळी हले ना

समजुत मी करावी, म्हणुनीच तु रुसावे
मी हांस सांगताच, रडताहि तु हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटेना
धरिला असा अबोला, कि बोल बोलवेना

का भावली मिठाची अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या, जाणून दूर राहे
चाले अटीतटीने सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना

कि गुढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग
रुसवा असा कसा हा ज्या आपले कळेना
अजुनी रुसून आहे, खुलतां कळी खुलेना

Dineshvs यांच्या सौजन्याने

Yuvrajshekhar
Saturday, April 29, 2006 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी जाल का

कुणी जाल का सांगाल का,
सुचवाल का त्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
हार पूर्वीचा दिला तो श्वास साहून वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळीला.

सांभाळूनी माझ्या जीवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले
सांगाल का त्या कोकिळा ती झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली.
Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators