Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 11, 2008

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through April 11, 2008 « Previous Next »

Swaatee_ambole
Wednesday, April 09, 2008 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे अननसाची माहिती पहा.

इंग्रजीत ऍपल हा शब्द बरेचदा ' फळ' अश्या generic अर्थी वापरलेला दिसतो. उदा : सीताफळाला Custard Apple म्हणतात.
झुडुपावर येण्यार्‍या लहान फळांना बेरीज ( ब्लूबेरीज, ब्लॅकबेरीज इ.) म्हणतात, तर वेलींना यणार्‍या मोठ्या फळांच्या नावात सहसा ' मेलन' वापरलेलं दिसतं. उदा : वॉटर मेलन, हनी ड्यू मेलन.


Shendenaxatra
Wednesday, April 09, 2008 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अननस हा शब्द मूळ अमेरिकन इंडियन भाषेतला आहे असे दिक्षनरीत सापडले.
अनेक युरोपियन भाषांनी हा शब्द उचलला आहे आणि तो भारतातही आला आहे.

अमेरिकेत ग्रेपफ्रुट नावाचे फळ असते ते पपनसासारखेच असते असे वाटते.
कुणाला नक्की माहीत आहे का की पपनस म्हणजेच ग्रेपफ्रुट?

तसेच अमेरिकेत कधी मोसंबे पाहिले नाही. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? आणि ते अमेरिकेत का आढळत नाही?


Zelam
Wednesday, April 09, 2008 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं उत्तर अमेरिकेत मोसंबं म्हणजे orange आणि संत्रं म्हणजे tangerine .

Swaatee_ambole
Wednesday, April 09, 2008 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, माझ्या माहितीप्रमाणे पपनस म्हणजेच ग्रेपफ्रूट. आणि मोसंबी इथे पाहिलेलीच नसली कधी तरी त्यांना sweet oranges म्हणतात. Tangerine, Clementine, etc संत्र्यांच्याच जाती आहेत.

Chafa
Thursday, April 10, 2008 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पपनस म्हणजेच ग्रेपफ़्रूट. यात निगेटिव्ह कॅलरीज असून (ते पचवण्यासाठी कॅलरीज खर्च होतात) त्यामुळे ते अति खाणे आरोग्यास अपायकारक असते असे म्हणतात.
स्पॅनिशमधे देखिल अननसाला अननसच म्हणतात. इथे मिळणार्‍या मेक्सिको, स्पेन वगैरे देशांमधून आयात केलेल्या अननसांवर Ananas असे लेबल असते. (स्वाती, तू दिलेली विकी ची लिंक हे सगळे लिहील्यावर वाचली. :-) )


Bee
Thursday, April 10, 2008 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोसंबी, जांभूळ, आवळा, करवंद ही फ़ळ खूप देशात पिकत नाहीत की काय.. इथे लोकांना ही फ़ळं माहितीच नाहीत.

Asami
Thursday, April 10, 2008 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

venetian orange म्हणजे मोसंबे

Zakasrao
Thursday, April 10, 2008 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टावराण ह्या शब्दाचा अर्थ काय आहे???
मी पु ल यानी अर्नेस्ट हेमिन्ग्वे यांच्या " old man & see" च्या भाषांतरात हा शब्द वाचला.


Shendenaxatra
Thursday, April 10, 2008 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संत्र्याचे असंख्य प्रकार जिथे मिळतात त्या कलिफोर्नियासारख्या राज्यात मोसंबे उगवणे इतके अशक्य नाही असे वाटले होते.
करवंदे व जांभळांचे नसणे समजू शकतो पण मोसंब्याचे नाही.
बघू अजून शोधतो. कदाचित सापडेलही.

हनी ड्यू हा कलिंगडाचा भाऊ भारतात उगवतो का असल्यास त्याला काय शब्द आहे?


Mrinmayee
Friday, April 11, 2008 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, मूळ शब्द ईंग्रजीतला टॅवर्न आहे. त्याचं मराठीकरण पु. लंनी 'टावराण' केलं असावं (गावराणच्या चालीवर?)

Tavern : 1)An establishment licensed to sell alcoholic beverages to be consumed on the premises.
2)An inn for travelers.


The old man and the sea वाचायला ही लिंक:
http://www.scribd.com/doc/21616/The-Old-Man-and-the-Sea

Bee
Friday, April 11, 2008 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करवंदांचं अनेकवचन, करवंदे होतं का? वाचायला चुकीचं वाटतं आहे.

Bee
Friday, April 11, 2008 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हनी ड्यूची पाठ ही खरबूजासारखेच असते पण पोटातील गर मात्र फ़िकट हिरवा असतो. भारतीय खरबूज आतून कशाय रंगाचे असते. कशाय हा भगव्या रंगाचाच एक शेड आहे.

कषाय म्हणजे काढा. कशाय म्हणजे भगवा रंग. दोन्ही ष / श नक्की कुठले आहेत सांगता येईल का?


Satishmadhekar
Friday, April 11, 2008 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"भद्र" या शब्दाचा नक्की अर्थ काय? अभद्र शब्दाचा अर्थ अशुभ असा आहे. त्यामुळे भद्र म्हणजे शुभ असा अर्थ होतो का? दळभद्री या शब्दाचा अर्थ "कमनशिबी" असा होतो. त्यामुळे भद्रचा अर्थ नशीबवान असाही होऊ शकतो का? काही लोकांची नावे वीरभद्र, मणिभद्र अशी असतात. या नावांचा अर्थ काय? तसेच भद्रलोक म्हणजे नक्की काय?

Manjud
Friday, April 11, 2008 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका ठिकाणी बसवलेले देव हलवून त्याच वास्तूत पण दुसर्‍या जागी बसवायचे ह्याला एक मराठी शब्द आहे. कोणाला माहित आहे का?

Zakasrao
Friday, April 11, 2008 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी धन्यवाद माहितीबद्दल :-)
,, .. ..


Swaatee_ambole
Friday, April 11, 2008 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहितीनुसार टरबूज म्हणजे Honeydew Melon आणि खरबूज म्हणजे Cantaloup .

टरबूजाची साल नितळ आणि फिक्कट हिरव्या रंगाची असते आणि गर हिरवा. खरबूजाची साल खरबरीत असते आणि गर केशरी रंगाचा असतो.


Bee
Friday, April 11, 2008 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टरबूज म्हणजे Water melon होते ना..

Asami
Friday, April 11, 2008 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही कलिंगड म्हणजे water melon . बाकी स्वाती सांगतेय ते बरोबर आहे

Shendenaxatra
Friday, April 11, 2008 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टरबूज म्हणजे कलिंगड हे नक्की. हिंदीत कलिंगड हा शब्द नाही. त्याला तरबूजा म्हणतात. त्यावरूनच टरबूज आले आहे.
जुन्या काळात मराठी अंकलिपी असे तेव्हा ट टरबूज असे वाचले आहे. आणि तक्त्यावर चित्र कलिंगडाचे असायचे. हनिड्यूचे नाही.


Bee
Friday, April 11, 2008 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तेच लिहिणार होतो की टरबूज आणि कलिंगड एकच फ़ळ आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators