Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 15, 2008

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through January 15, 2008 « Previous Next »

Badbadi
Wednesday, November 28, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजिगीषु म्हणजे काय? ..... ....

Zakasrao
Wednesday, November 28, 2007 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी नेमका अर्थ नाहि मला सांगता येणार पण हार न पत्करणे किंवा खुप जिद्दिने एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडणे ह्याला विजिगीषु वृत्ती म्हणतात.
कोणी अजुन नेमकेपणाने सांगेल तर बर होइल. माझ्याही ज्ञानार भर पडेल :-)


Anilbhai
Wednesday, November 28, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजिगीषा म्हणजे विजयाची इच्छा.

Vishee
Wednesday, November 28, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्लीच पुलंच्या पुस्तकात एक भन्नाट शब्द वाचला. "मुत्र-शर्करा योग" ( for diabetes )....
अर्थात हा काही खरा मराठी शब्द नव्हे, असच गमतीत. पण नाहीतरी हल्ली सोप्या english शब्दांचे उगाचच मोठे मोठे आणि कठिण मराठीकरण करतातच, मुख्यत: शास्त्रीय शब्दांचे.


Maanus
Wednesday, November 28, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज नव्याने कळालेला शब्द

sabbatical leave: A leave usually taken every seventh year


एकाने गुडबाय मेल टाकले त्यात लिहीले की तो sabbatical leave वर जातोय.

Farend
Wednesday, November 28, 2007 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस तो कदाचित शब्दश: अर्थ असेल पण येथे त्याचा उपयोग 'सद्ध्या नोकरी करणार नाही (किंवा केली तर येथे कोणाला सांगणार नाही :-) )' असा होतो.

Ameyadeshpande
Wednesday, November 28, 2007 - 11:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंड, तू म्हणतोस तसं असेलही पण, इथल्या बर्‍याच स्कूल्स मधे हा शब्द त्याच्या खर्‍या अर्थासाठीच वापरला जातो.

Badbadi
Thursday, November 29, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो.. माझ्या आधीच्या कंपनीत पण sabbatical leave चा अर्थ 'सद्ध्या नोकरी करणार नाही' असाच असायचा... बायका नवर्याबरोबर मस्त २ वर्ष बाहेर राहून परत जॉईन होउ शकायच्या :-)

Dineshvs
Thursday, November 29, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सूर्याचे एक नाव मार्तंड चा अर्थ आहे. मृत अंडे.
आर्यांच्या धृवीय प्रदेशातील भटकंतीमधे, ज्यावेळी त्याना
दिर्घ कालावधीच्या रात्रीनंतर सूर्य दिसत असे त्यावेळी तो निस्तेज असे व
तो उकडलेल्या अंड्यातील बलकाप्रमाणे दिसत असे म्हणुन हे नाव.

आमच्या ऑफ़िसमधे एक मुलगा आहे त्याचे नाव पिंकेश. सरकारी मराठीमधल्या एक्टान्वये किंवा डिटेलवार या शब्दांसारखी फ़ोड केली तर ठिक. ( तरी पिंक सिटीसारखा गुलाबी देव कुठला, हा प्रश्न उरतोच !)

जर पिंकचा मराठी अर्थ घेतला तर ? आणि त्याचा देव !!!????



Akhi
Thursday, November 29, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर पिंकचा मराठी अर्थ घेतला तर ? आणि त्याचा देव !!!????
ह ह पु वा

Gajanandesai
Thursday, November 29, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, एक्टान्वये, डिटेलवार हे शब्द खरेच सरकारी मराठीत ( कागदोपत्री ) वापरले जातात, की तुम्ही तसे गमतीने म्हणताय?

Dineshvs
Thursday, November 29, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन, पुर्वी असे शब्द खरच असायचे. आता मराठीकरण झाल्याने प्रपत्र आणि विवक्षित असे भयानक शब्द आलेत.

Shonoo
Thursday, November 29, 2007 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sabaath हा Day of rest मानला जातो. प्राध्यापकांना शिकवणाच्या कामापासुन रेस्ट अन पर्यायाने स्वत:च्या संशोधनाला वेळ मिळावा या दृष्टीने अशी रजा देतात. अधून मधून एक सेमिस्टर काहीही न शिकवता आपल्या संशोधना वर लक्ष केंद्रित करता येतं. काही Tech कम्पन्या पण अशी सुट्टी देतात्- सहा वर्षे नोकरी झाल्यावर सहा ते आठ आठवडे पगारी रजा मिळते. Netcape, Cisco मधे अशी सुट्टी मिळत असे.

Hkumar
Saturday, December 22, 2007 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही शब्दार्थ काळानुसार कसे बदलतात बघा:
'भंगार' चा ज्ञानेश्वरकालीन अर्थ होता 'सोने'!


Maitreyee
Wednesday, December 26, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहितीप्रमाने बंगारु हा कन्नड शब्द आहे कन्नड मधे त्याचा अर्थ सोने.( अजूनही तोच अर्थ आहे :-) ) मला वाटत नाही की मराठीमधे पूर्वी त्याचा अर्थ सोने हा असेल..

Lalu
Wednesday, December 26, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'बंगारु' हा शब्द तेलुगु मध्ये आहे. अर्थ तोच आहे. cbdg

Hkumar
Friday, December 28, 2007 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, तो अर्थ मला डाॅ. मृणालिनी गडकरी ( प्रख्यात अनुवादकार ) यांच्या लेखात मिळाला.

Gsumit
Friday, December 28, 2007 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सूर्याचे एक नाव मार्तंड चा अर्थ आहे. मृत अंडे. >>>

दिनेशजी, तुमच्या या पोस्ट्वरुन एक कुतुहुल म्हणुन प्रश्न विचारावासा वाटतो... आपल्या जेजुरीच्या खंडोबाला 'मार्तंड' का म्हणतात... देवाच्या नावाचा इतका विचित्र अर्थ???

Ameyadeshpande
Sunday, January 06, 2008 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुषृप्ती ह्या शब्दाचा अर्थ काय आहे?

Ameyadeshpande
Wednesday, January 16, 2008 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिळाला अर्थ. सुषृप्ती म्हणजे deep sleep . जागणे, स्वप्न आणि सुषृप्ती अशा मेंदूच्या अवस्था असतात, त्यातली एक. आणि हा शब्द सू - सुप्ती ह्या शब्दांनी तयार झालाय.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators