Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 10, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » ऊखाणे नवे आणि जुने » Archive through June 10, 2007 « Previous Next »

Pritisgin
Friday, December 15, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीकृष्णाची राधा, रामाची सीया,
_ चे नाव घेते _ ची प्रीया

Pritisgin
Friday, December 15, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरीकेत neyoyk, अमेरीकेत newjersey
_ रावांची माझ्यावर मर्जी

Robeenhood
Friday, December 15, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाकडी तिकडी बाभळ
तिच्यावर बसला होला,
सका पाटील मेला
म्हणून तुका पाटील केला.....


Robeenhood
Friday, December 15, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ह्यांच्यावर गुरकं अन ते माझ्यावर गुरकं>>>
नलिनी, फारच धमाल गं!!
जुगलबन्दीच जणू...


Pritisgin
Friday, December 15, 2006 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांदीच्या ताटात चांदीची वाटी
जन्म घेतला विवेकच्या प्रेमासाठी

Lopamudraa
Saturday, December 16, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ह्यांच्यावर गुरकं अन ते माझ्यावर गुरकं>>> nalini best.... काय रोबिनहूड हा उखाणा टाकुन झालाय.. आधी तुमचा पाटिल सोडुन नवा काहितरी आणा.. ..

Pritisgin
Wednesday, December 20, 2006 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नदी का सागर, धर्ती का अंबर
_ से नजरे मीलाके बढ गया चष्मेका नंबर

Mrinmayee
Thursday, December 21, 2006 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उखाणे घेताना...
मावशीला लग्नात कुणीतरी सटर फटर उखाण्यांची लांबलचक यादी दिली. अर्थात यादीत मावशीच्या पतीराजांचं नाव घातलं नव्हतं. मावशीबाईंनी उखाणा वाचला घेतला..
अन्नपूर्णेच्या कृपेनं दरवळतोय पंचपक्वांनांचा सुवास
'टिंबटिंब' ना देते जिलबीचा घास.


Swapnil_deshi
Saturday, January 13, 2007 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नदी उगम पावते पर्वतात अन जाउन मिळते सागराला
---ला माळताना आगळा गंध येतो नेहेमीच्याच मोगर्‍याला!


Swapnil_deshi
Saturday, January 13, 2007 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सार्‍या देशात प्रसिद्ध आहेत कोकणचे काजू
---चं नाव घ्यायला आता कशाला लाजू?


Sayuri
Saturday, February 17, 2007 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा 'होम मिनिस्टर' मध्ये हा उखाणा ऐकला.

'चांदीच्या ताटात चकाकती दही
xxच्या दिलावर केली मी सही'


Chhatrapati
Tuesday, May 22, 2007 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला चार श्लोकी रामायण आठवतेय का ? मी पूर्ण विसरलो. पण त्यात असे काही तरी होते.

आदौ राम तपोवनाधि गमनम् ?????
वैदेही हरणम् जटायू भरणम् लंकापुरी दाहनम्
पश्चात रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणम् ।

तर, जिथे प्रश्नचिन्ह आहे तिथले दोन तीन श्लोक मला आजिबात आठवत नाहीयेत. कोणी टि.म.वि. च्या संस्कृतच्या परीक्षा दिल्या होत्या का ? मदत !

Robeenhood
Tuesday, May 22, 2007 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छ्त्रपती, त्या तिथे पलिकडे न्यू जर्सीच्या बी बी वर गेलास तर तुला झक्की असा डुप्लिकेट आय डी धारण केलेली व्यक्ती दिसेल.
हे बोवा मायबोलीवरील आणि (मायबोली पुरतेच)प्रसिद्ध वैय्याकरणी आणि संस्कृतचे व्युत्पन्न पण्डित आहेत. ब्रम्हं सत्य जगन्मिथ्या असे ते सदैव पुटपुटत असतात.(कारण त्याना तेवढेच संस्कृत येते असे त्यांचे हितशत्रू म्हणतात आपण तिकडे लक्ष द्यायचे नाही. कदाचित ते खरेही असेल!)परमपूज्य भिडे गुरुजी हे त्यांचे संस्कृतातले गुरू.त्यांच्या कृपाप्रसादेकरोन झक्की साहेबाना(मी त्याना त्रिवार वन्दन करतो)थोडेबहुत संस्कृत (यातला बहुत शब्द त्यांचा, म्हणून थोडे शब्द आपला राहतो.) प्राप्त झाले.त्या विद्येत कालमानाने झीज होऊन अवशिष्ट विद्येच्या डाटाबेसात जे हे त्ते ते पुटपुटत असतात. तर तू त्याना तुझी शंका विचार! ते तुला विन्मुख पाठविणार नाहीत.म्हण्जे माहीत असेल तर सांगतील माहीत नसले तरी काही ना काही (किंवा काहीही)सांगतीलच!

ता.क.कधी कधी ते मुमुक्षुंच्या उद्धारासाठी विद्या वाटप करीत विविध बी बीवर संचार करीत असतात(त्यांचे हितशत्रू त्याला बोम्बलत फिरतात असे म्हणतात तिकडेही आपण लक्ष द्यायचे नाही.)कदाचित इथे प्रकट होऊन तुझा तो श्लोक पूर्णही करतील(त्यांच्या डाटाबेसात असेल तर)

त्यानी टि मवि च काय पण नूमविच्या सुद्धा परिक्षा दिल्यात काय समजलास?

Marhatmoli
Wednesday, May 23, 2007 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदौ राम तपोवनाधि गमनम्
हत्वाम मृगम कांचनम
वैदेही हरणम् जटायू मरणम् सुग्रिव संभाषणम
वालि निर्दननम समुद्र तरणम
पश्चात रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणम् ।

<p.S.> जटायु मरणम आहे माझ्या माहितिप्रमाणे

Chhatrapati
Thursday, May 24, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या श्लोकाबद्दल धन्यवाद !
एकच शंका आहे, वरच्या श्लोकात अजून काहीतरी असावे, कारण तो पूर्ण वाटत नाही. म्हणजे शेवटचे वाक्य अर्ध्यातच संपले आहे असे वाटते.

Chhatrapati
Thursday, May 24, 2007 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड, तुझ्या माहितीबद्दल आभारी आहे. हे ’झक्की-दादा’ कुठे भेटतील ? मी या बी.बी. वर इतका जुना नाही. त्यामुळे लोकांचे स्वभाव ओळखण्याची कसब अजून माझ्यात आलेली नाही. एक दोन ठिकाणी झक्कीचे लेख वाचले. पण त्यात अशाप्रकारची छटा चटकन दिसून आली नाही. तरीपण आपल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद ! मी जागरूक राहीन.

Chhatrapati
Thursday, May 24, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके, मला संपूर्ण रामायण मिळाले, तुमचे श्लोक आणि त्यात मी म्हटल्याप्रमाणे ’लंकापुरी दाहनं’ टाकून ते पूर्ण झाले.

आपले आभार ! :-)

आदौ राम तपोवनादि गमनम् हत्वा मृगम कांचनम
वैदेही हरणम् जटायू मरणम् सुग्रीव संभाषणं
वालि निर्दननम समुद्र तरणं लंकापुरी दाहनम्
पश्चात रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणम् ।


Swaatee_ambole
Thursday, May 24, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हूडा,
       

Chhatrapati
Monday, June 11, 2007 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वातीताई, हा "हुडा" काय प्रकार आहे बरे ?

Zelam
Monday, June 11, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजे अहो स्वातीने रॉबिनहूड ना केलेले संबोधन आहे ते.
आता स्वातीला रॉबिनहूड यांचे post वाचून हसू का आले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर थोडा वेळ द्या स्वतला मायबोलीवर नाहीतर मग बेलाशक विचारा.
काय पटली का ओळख? :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators