Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 28, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दखेळ » Archive through August 28, 2007 « Previous Next »

Nalini
Monday, June 11, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक आण्याचे तेल आणले, त्यात सासुबाईंचे न्हाणे झाले. मामाजींचे केस झाले. भावोजींची दाढी झाली. उरले तेल झाकून ठेवले. उडत्या गरुडाचा / घारीचा पाय लागला. तो ओघळ वेशीपर्यंत गेला, त्यात उंट पोहून गेला.
असे काहीसे होते. चु. भु. द्या. घ्या.


Dineshvs
Monday, June 11, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, मी लांडोरीचा पाय लागला, असे वाचले होते.

Chhatrapati
Tuesday, June 12, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्लेष आठवतोय का कोणाला ?
अर्थश्लेष आणि शब्दश्लेष ?



Zakasrao
Tuesday, June 12, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हि लांडोरीचा पाय लागला अस वाचल होत. असो नलिनी ठंकु. अजुन काहि उदाहरणे असतील तर येवुदेत.
छत्रपती श्लेष अलंकार का.
देवाला पुजले सुमनाने
ह्यात सुमन ह्या शब्दावर श्लेष आहे.
सुमन्= मुलीच नाव
सुमन्= फ़ुल


Imtushar
Tuesday, June 12, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवाला पुजले सुमनाने

मध्ये सुमन जर मुली चे नाव असेल तर सुमनाने व्याकरणदृष्ट्या चुकीचे ठरते.

सुमनाने चा दुसरा अर्थ इथे 'चांगल्या मनाने' असा होऊ शकतो.

Anyways , श्लेष दोन प्रकारे होऊ शकतो,

एक : शब्दांच्या मांडणीत फरक केला असता दोन वेगळे अर्थ निघतात (तो बहुधा शब्दश्लेष, उदा. 'औषध नलगे मजला').

आणि दुसरा जेव्हा एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ निघतात आणि त्यामुळे वाक्याचे दोन वेगळे अर्थ लागतात (हा बहुधा अर्थश्लेष).

यालाच English मध्ये pun म्हणतात


Mrinmayee
Tuesday, June 12, 2007 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न वरी


Chhatrapati
Tuesday, June 12, 2007 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, जेव्हा एकाच वाक्याचे दोन अर्थ होतात, तेव्हा श्लेष होतो, की दोन वेगळ्या वाक्याच्या शेवटी अथवा मध्ये येणाऱ्या अक्षरांचा वेगवेगळा अर्थ लागल्यामुळेसुध्दा श्लेष होतो ?

माझ्यामते वरचे ’नवरा मी नवरी’ आणि ’नवरा मी न वरी’ हे ’यमक’ या अलंकाराचे उदाहरण आहे ! (चूभूद्याघ्या)

वरील दोन वाक्यांपैकी एखादे वाक्य नुसते एकदाच लिहिले, तर श्लेष होईल.
किंवा श्लेष अलंकाराची ही दोन उदाहरणे आहेत असेही म्हणता ये‍ईल !! :-)


Mvelanka
Thursday, August 16, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


टिचक्या मारत सोडवायचे मराठी शब्दकोडे

टिचकीसरशी शब्दकोडे १

तेथल्या तेथे सोडवता आणि तपासता येते.
आवड असेल तर वाढेल - नसेल तर जडेल!


Bee
Friday, August 17, 2007 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, मी प्रयत्न करतो सोडवून बघण्याचा. माझी ती खूप जुनी आवड आहे. इथे मिळत नाहीत मराठी शब्दकोडे पेपरात. बाकी ही कोड्यांची कल्पना खूप आवडली.

Milindaa
Friday, August 17, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजा आली सोडवायला. धन्यवाद महेश!

Gajanandesai
Friday, August 17, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, खरेच खूप मजा आली सोडवायला. आणि ही ऑनलाईन शब्दकोड्याची कल्पना प्रत्यक्षात बघून खूप आनंद झाला. क्लूज् पण एकदम हटके वाटले नेहमीपेक्षा. धन्यवाद.

तुमच्या या शब्दकोड्याला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे!


Mvelanka
Wednesday, August 22, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, गजानन देसाई, मिलिंदा आणि इतर अनेकांचे सहभागाबद्दल आभार. आता ह्या शब्दकोड्याची उत्तरे तेथेच पाहता येतील. कळावे.

Bee
Thursday, August 23, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतकूसे कोडे पण महाकठिण होते बुवा :-) मजा आली महेश.

Madhavm
Tuesday, August 28, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामाच्या दू
कानात ऊ
तम चिवडा मिळतो


Deemdu
Tuesday, August 28, 2007 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामाच्या दूकानात ऊतम चिवडा मिळतो :-)


Upas
Tuesday, August 28, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकादुचेण्यापकासके आठवलं     :-)

Slarti
Tuesday, August 28, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही टी. बी. आंबिले, टी. नारायण, डी. व्ही. कुलकर्णी, एस. नामा, लोबागंटि या लोकांबद्दल ऐकले आहे का ?

Madhura
Tuesday, August 28, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

slarti , :-)) यातले तुकाराम बोल्होबा आंबिले , ठोसर नारायण आणि ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी कळले हो , पण बाकिचे नाही लक्षात येत.

Madhura
Tuesday, August 28, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm, अजुन एक कळले नामदेव शिंपी , बरोबर ना?

Asami
Tuesday, August 28, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोबागंटि >>लोकमान्या बाळ गंगाधर टिळक




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators