Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 17, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through August 17, 2007 « Previous Next »

Bee
Wednesday, July 25, 2007 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'स्फ़ुट' ह्या शब्दाचे ३ भिन्न अर्थ आहेत ते असे 'विकसित', 'स्पष्ट', 'किरकोळ'. मराठी साहित्यात 'स्फ़ुट' हा एक प्रकार आहे. कशाप्रकारचे साहित्य म्हणजे स्फ़ुट साहित्य असा जर प्रश्न केला तर वरील ३ अर्थांपैकी जे साहित्य किरकोळ आहे त्याला स्फ़ुट साहित्य म्हणता येईल असे मला वाटते पण खात्री नाही. असे साहित्य ललित मधे बसू शकेल असे वाटते पण नक्की माहिती नाही.
सध्या श्रिनीने 'नार्सिसस' म्हणून एक कथा लिहिली आहे. तिला स्फ़ुट म्हणता येईल असे वाटते.

तुम्हाला काय वाटते?


Slarti
Wednesday, July 25, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, मनस्वीचा अर्थ 'बंधने न मानणारा, लहरी' असा आहे. म्हणजे असे लोक केवळ मनाप्रमाणे वागतात असे नसून त्यांच्या मनात जी काय लहर येईल तिला समाज, काळ, चालीरिती वगैरे कशाचे बंधन नसते. तुसडेपण हे कधीच भावत नाही, परंतु, मनस्वीपणा मात्र भावणारा असू शकतो.

बी, 'स्फुट'चे पहिले दोन अर्थ बरोबर आहेत, पण तिसरा अर्थ मला बरोबर वाटत नाही. जर विकसित, स्पष्ट या अर्थाची टोकाची पातळी गाठली तर काय होईल ? उदा. फूल इतके उमलले की पाकळीन् पाकळी सुटी झाली. तर स्फुट चा अजून एक अर्थ म्हणजे वेगळे, विखुरलेले, काही समान सुत्राने न बांधलेले, कुठल्या संग्रहाचा भाग नसलेले असा होतो. उदा. "त्यांनी वर्तमानपत्रांमधून स्फुट लेखन केले आहे". तर त्या अर्थाने श्रीनीचेच काय पण मायबोलीवर प्रकाशित होणारे सर्व लेखन स्फुट होय. (ते मायबोलीवर प्रकाशित होते हे समान सुत्र नव्हे असे माझे मत.)


Pancha
Wednesday, July 25, 2007 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी स्फुट म्हणजे english "stray", something that wander from the direct course

Zakki
Wednesday, July 25, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जसे: रस्त्यावर बरेच स्फुट कुत्रे भटकत होते!


Bee
Thursday, July 26, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लर्टी पण पुस्तकरुपाने प्रकाशित झालेले स्फ़ुट लेखन मी वाचले आहे. जसे ग्रेस ह्यांचे स्फ़ुट लेखन केलेले पुस्तक आहे. असो.. पण तुम्ही दिलेला अर्थ खूप छान वाटला. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. पंचा तुझेही.

स्लर्टी, मी शब्दकोशात बघून ते ३ अर्थ लिहिले होते. किरकोळ हा अर्थ त्यातलाच एक.


Slarti
Thursday, July 26, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

welcome . शब्दकोषात दिलेला असेल तर तसाही अर्थ असेल मग.
ग्रेसचे जे पुस्तक तू वाचलेस ते त्यांच्या स्फुटलेखांचा संग्रह होता का ? म्हणजे आधी स्फुट म्हणून प्रकाशित झाले विविध ठिकाणी आणि नंतर एके ठिकाणी एकत्र केले गेले असे आहे का ?


Psg
Friday, July 27, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद स्लार्ती. हल्ली मुलीचं नाव 'मनस्वी' ठेवायची फ़ॅशन आलीये.. तेव्हा हा प्रश्न पडला होता :-) आता अर्थही समजला

Bee
Friday, July 27, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लर्टी, ते स्फ़ुटलेखांचे एक पुस्तक होते. ह्यातील स्फ़ुट, कधी केंव्हा आणि कुठे पुर्वी छापले गेले त्याची माहिती नाही. कुठे मिळाली तर नक्की तुम्हाला सांगेन.

'कौटिल्याचे अर्थशास्त्र' ह्या पुस्तकाला दुर्गा भागवतांची खूप लांबलचक आणि चांगली प्रस्तावना लाभली आहे. त्यात मी एक शब्द वाचला 'वांगमय संभार' :-)


Shonoo
Friday, July 27, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी वाङ्मय संभार असं लिही रे vaa~Nmay . उगाच वांगी घातलेल्या सांबाराची आठवण केलीस :-)


Bee
Wednesday, August 01, 2007 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मदत केल्याबद्दल 'उपकार मानणे', 'कृतज्ञ असणे' ह्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द माहिती आहे का कुणाला. जसे उर्दूमधे आपण 'ऐहसान फ़रामोश' म्हणतो तसे?

बेईमान, आभारहीन हे दोन शब्द मला ठावूक आहेत पण मला ते फ़ार चपखल विरुद्धार्थी शब्द नाही वाटतं.


Robeenhood
Wednesday, August 01, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला कृतघ्न नावाचा सणसणीत शब्द आहे. उर्दूत एहसान मन्द आणि एहसान फरामोश असे विरुद्ध शब्द आहेत...

Bee
Wednesday, August 01, 2007 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीन, धन्यवाद. पण कृतघ्न आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ ह्यांची एक गम्मत आहे. एकतर कृतघ्न हा शब्द खूपसा परिचित नाही दुसरे म्हणजे त्याचा उच्चार कृतज्ञशी मिळताजुळता आहे तेंव्हा ज्यांना हा शब्द माहिती नाही ते समजतील तुम्ही 'कृतज्ञ' हा शब्द वापरला आहे किंवा तुम्हाला वापरायचा आहे. शब्दकोशात पर्यायी शब्द 'हरामखोर' दिला आहे पण हा शब्द कमालीचा असभ्य वाटतो.

असो, मदतीबद्दल तुमचे आभार.


Pancha
Wednesday, August 08, 2007 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचा म्हणजे
आडनावाचा shortform , आडनाव काय ते तुम्ही ओळखा.
पंचा म्हणजे पाच
पंचा म्हणजे free in Spanish
पंचा म्हणजे कमरेला गुंडाळायचे वस्र, जे तुमची लाज राखते
पंचा म्हणजे a guy with guts, who can punch anyone
पंचा म्हणजे a guy who punches papers with punching machine
पंचा म्हणजे पंचक्रोशीत प्रसिध्द असलेला

पंचा म्हणजे अजुन काय ?

Mahaguru
Thursday, August 09, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचा म्हणजे आडनावाचा shortform:
Girish Pancha हे informatica ह्या कंपनीच्या EVP चे नाव आहे. त्यांचे पंचा(कि पंच) हेच आडनाव आहे.


Bee
Wednesday, August 15, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी भाषेत आपण बर्‍याचदा असे वाक्य म्हणतो जसे की 'अमूक गोष्ट काही तोंडाचा खेळ नाही'. इथे तोंडाचा खेळ म्हणजे नक्की काय? मला नक्की माहिती नाही पण तोंडाचा खेळ म्हणजे जिभेवर येईल ते बोलणे जी विचारहीन माणसाला सहजसाध्य होणारी गोष्ट आहे. आणखी एक की ह्या शब्दांचा दुय्यम अर्थ ( double meaning ) निघून बोलणारा किंवा ऐकणारा सुद्धा लाजिरवाणा होऊ शकतो.

Robeenhood
Wednesday, August 15, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी तुझा पहिला अर्थ बरोबर आहे. काही वेळा 'खायची गोष्ट नाही' असेही म्हणतात. म्हणजे सोपी अथवा सहजसाध्य बाब. बोलणे आणि खाणे या सोप्या बाबी असतात म्हणून.

यात कसला आलय डबल मीनिंग? उगीच आपले खाई त्याला खवखवे!:-)


Slarti
Wednesday, August 15, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचा, आडनाव पंचवाघ / पंचामृते आहे का ?

Mbhure
Wednesday, August 15, 2007 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद ह्या कृष्णाच्या नावाचा अर्थ काय आहे?

Bee
Thursday, August 16, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद हे विष्णुचे देखील एक नाव आहे, त्यांच्या सहस्त्र नावांपैकी एक नाव.

मुकुंद म्हणजे मोक्ष, निर्वान प्राप्त करून देणारा.

रॉबीनहूड धन्यवाद.

..


Shonoo
Friday, August 17, 2007 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुय्यम म्हणजे secondary, subordinate to the primary असा अर्थ आहे ना? डबल मीनिंग म्हणजे दुसरा अर्थ, किंवा छुपा अर्थ असा होऊ शकेल पण दुय्यम अर्थ मला बरोबर नाही वाटत.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators