Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 29, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through June 29, 2007 « Previous Next »

Chhatrapati
Friday, June 15, 2007 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर प्रतिशब्द सापडत नाही, तर आपल्याला प्रतिशब्द बनवता नक्की ये‍ईल. ’सहानुभूती’ अनुभूती प्रतीत करते. म्हणजे सहानुभूती मधला ’अनुभूती’ आणि दुसऱ्याचा जागी आपल्याला ठेवणे (दुसऱ्याबरोबर अनुभूती करण्याऐवजी). जर ’पर’ म्हणजे दुसऱ्या माणसाला उद्देशून असणारा ’परका’ हा शब्द घेतला, तर ’परानुभूती’ याचा अर्थ empathy होईल.

संस्कृतमध्ये अनेक शब्द दोन वेगवेगळ्या शब्दांची संधी करून होतात. एव्हाना मराठीमध्येदेखील अनेक शब्द असे तयार झाले आहेत. त्यात अजून एक म्हणजे ’परानुभूती’ !

(अर्थातच, चूभूद्याघ्या)

Slarti
Friday, June 15, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, अर्थ सर्वांनाच माहिती आहे या दोन्ही शब्दांचा. प्रतिशब्द सुचत नाहीये.
परानुभूती interesting वाटतो. परात्मानुभूती ?


Shrini
Saturday, June 16, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परानुभूति म्हणजे दुसर्‍याची (दुसर्‍याला झालेली) अनुभूति. उदा. स्वानुभूति, परानुभूति.

'भावनैक्य' (भावनेचे ऐक्य, एकाच प्रकारची भावना) कसा वाटतो ?


Slarti
Saturday, June 16, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भावनैक्य बराच जवळचा वाटतो. त्यालाच समांतर असा 'भावनातादात्म्य' कसा वाटतो ? (अगदीच तोंडभरून आहे )


Zelam
Thursday, June 21, 2007 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुंचा कोई तेरे नाम कर दिया
साकीने फिरसे मेरा जाम भर दिया

या गझलेतल्या 'गुंचा' चा अर्थ काय?


Kandapohe
Thursday, June 21, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर 'गुंचा' चा अर्थ गुच्छा सारखा वाटतो पण कळी असा अर्थ आहे.

Zelam
Thursday, June 21, 2007 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स KP .
४ पेक्षा कमी शब्दांचे messages कसे लिहायचे? Sorry , ही जागा नाहीये खरं तर हे विचारायची पण राहवले नाही.


Chhatrapati
Thursday, June 21, 2007 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही क्वचित कधीतरी मायबोलीवर येऊन आपल्या लेखनाने एखाद्दुसरा बी.बी. पावन करता, निदान चार शब्द तरी लिहा !

तुम्ही चार पेक्षा कमी शब्द लिहिणे म्हणजे इथल्या चार लाख वाचकांची निराशा करणे होय.



Zelam
Friday, June 22, 2007 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हे छत्रपती? आजकाल पडीक असते मी इथे.
अहो पण प्रश्नाचं उत्तर द्या ना.


Shonoo
Friday, June 22, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्लोकांचा बी बी सापडला नाही म्हणून इथेच विचारते

याम चिंतयामि सततम, मयि सा विरक्ता

हा पूर्ण श्लोक, त्याचा अर्थ, संदर्भ कोणी लिहेल का?


Swaatee_ambole
Wednesday, June 27, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च

भर्तृहरीच्या नीतीशतकातील श्लोक आहे. अर्थ शोधून सांगते.


Zelam
Wednesday, June 27, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, स्वाती net वरूनच मिळालेला अर्थ

The One upon whom I meditate perpetually is detached from me but
(She) desires another and the Other (desires) yet another
Thus it goes always, this desire to always desire another
Fie on her, on him, on Madana (God of Love), on all this and fie on me too!


Zelam
Wednesday, June 27, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याच site वर हा श्लोक कसा तयार झाला त्याची कहाणी पण आहे.
http://www.sandeepweb.com/2006/03/21/bhartruhari-king-poet-and-sage-par-excellence/

Swaatee_ambole
Wednesday, June 27, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, झेलम. छान माहिती आहे या साईटवर. :-)

Nakul
Thursday, June 28, 2007 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च

प्रत्येक वाक्यात संधीचा विग्रह करून:

यां [अहम] सततं चिंतयामि , सा मयि विरक्ता
मी जिच्याबद्दल सतत विचार करतो, ती माझ्यापासून विरक्त आहे [ माझ्यावर अनुरक्त नाही].
सा अपि अन्यम जनं इच्छति स जन: अन्यसक्त:
सा - म्हणजे ती सुद्धा [अपि] कुण्या वेगळ्यावर प्रेम करते, स जनः - तो इसम अजून वेगळ्याची - अन्यसक्त: - इच्छा करतो.
अस्मत कृते काचिद अन्या परिशुष्यति
मी जिची इच्छा करतो ती इतराची इच्छा करते - [परिशुष्यति चा अर्थ कुणी सांगू शकेल काय?]

धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च
धिक्कार असो, तिचा [ तां] आणि [च] त्याचा [तं] आणि मदनाचा आणि ह्या सगळ्यांचा आणि माझासुद्धा !!

Ravisha
Thursday, June 28, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"अस्मद् कृते काचिद् अन्या परिशुष्यति"-
माझी कोणा (अजून) दुसर्‍याला आसक्ती वाटते
(ही एक शृखंला आहे,जणु प्रत्येक जण कुणामागे तरी धावत आहे असा साधारण अर्थ)
वरील link वर श्लोकाची कहाणी आहेच.....


Shonoo
Thursday, June 28, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटच्या ओळीतलं इमांच मांच काल घाई घाईत वाचलं होतं आणि का कोण जाणे माझ्या डोक्या ' धिक्कार तिचा, त्यांचा मदनाचा आणि माझा, माझा' असा अर्थ बसला होता. पण मग लक्षात आलं की ते जरी इ मांच मांच असेल तरी त्या 'इ' चा अर्थ स्पॅनिश 'इ ग्रिएगा' अर्थात Y सारखा कसा होईल?

नकुल ने दिलेला अर्थ आज सकाळी पाहिला आणि त्या 'इमांच मांच' चा खरा अर्थ आत्ता कळला. सगळ्यांना धन्यवाद.


Swaatee_ambole
Thursday, June 28, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकुल, छान सांगितलंत. धन्यवाद.
परिशुष्यति म्हणजे त्या(/ति)ला इतर कोणाचातरी शोष(सोस?) आहे असं असेल का? आपण मराठीत नाही का ' कोणी सुकलं नाहीये तुझ्यावाचून' असं म्हणतो?


Robeenhood
Thursday, June 28, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परिशुष्यति म्हणजे कोरड पडणे..
रणांगणावर आल्यावर स्वत:ची अवस्था वर्णन करताना अर्जुन म्हणतो

'सीदन्ति मम गात्राणि,
मुखं च परिशुष्यति...

म्हणजे माझी गात्रे शिथिल झाली आहेत आणि तोंडाला कोरड पडली आहे असा आहे....


Cool
Friday, June 29, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात आपण नेहमी वापरत असलेल्या एका शब्दाचा अर्थ कळला. आपण 'निढळाचा घामा' असा शब्द नेहमी वापरतो पण त्याचा अर्थ काय होतो हे मात्र मला माहीत नव्हते. तर या 'निढळ' शब्दाचा अर्थ आहे 'कपाळ' ...

असेच नेहमीच्या वापरातील शब्द कुणाला माहीत असतील तर कृपया इथे द्यावेत.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators