Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 19, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through March 19, 2007 « Previous Next »

Dineshvs
Saturday, February 24, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि चुंग वा फ़ा नि ठु चा अर्थ काय दिलाय ?

Pooh
Saturday, February 24, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,

ते शब्द "चुंग वा ता नी ठू" असे आहेत.

अर्थ तुम्हाला महिती आहेच. "चिनी माती".



Bee
Monday, February 26, 2007 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंशुक म्हणजे नुसते वस्त्र नसून 'रेशमी वस्त्र' असा त्याचा अर्थ आहे.

Bee
Tuesday, February 27, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन्योन्याने किती झोकले
गेले ते दीन गेले..

वरील ओळीत 'अन्योन्याने' ह्या शब्दाचा अर्थ कुणाला माहिती असेल तर मलाही ज्ञात करुन द्या :-)


Bee
Tuesday, February 27, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समरप्रसंग, समरनाट्य असे समर शब्दाशी निगडीत शब्द मला माहिती आहेत. एका कुठल्या तरी राष्ट्रगीतात 'समर धुरंदर लाटालहरी' अशी एक ओळ आहे. बहुतेक 'हिमालयाची शिखरे गाती..' मधेच ही ओळ आहे. तर समर म्हणजे नक्की काय?

Raadhika
Tuesday, February 27, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समर म्हणजे उन्हाळा

समरप्रसंग: खूप कडक उन्हाळ्याची वेळ

समरनाट्य: उन्हाळ्यात सादर करण्याचे नाटक


Bee
Tuesday, February 27, 2007 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधिका मस्करी करतेस का :-) मी summer नाही विचारत आहे. समर विचारत आहे. उच्चार जरी सारखे असले तरी दोन वेगळ्या भाषेतील एकाच उच्चारांचे भिन्न शब्द आहेत ते :-)

Mrunmayi
Tuesday, February 27, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समर प्रसंग म्हणजे युध्दाचा प्रसंग., समर धुरंधर म्हणजे युध्दामधे निष्णात असा असावा.

Bee
Tuesday, February 27, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण ह्यावरुनही नक्की अर्थ लक्षात येत नाही Mrinmayi...

Zakki
Tuesday, February 27, 2007 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागच्या पुढच्या दोन तीन ओळी वाचल्यावर कदाचित् लक्षात येईल.

बाकी आजकाल काय, सा रे ग म प वर महायुद्धे चालू असतात. अमेरिकेत कुणि साधे आजारी पडतच नाहीत, ते सर्दीशी किंवा जखमेशी युद्ध करत असतात!

तेंव्हा ह्या शब्दाचा अर्थ जरा संदर्भावरून ठरवायला पाहिजे.


Yuvrajshekhar
Tuesday, February 27, 2007 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणीतरी माझ्या प्रशाचं उत्तर पण द्या की.

Bee
Wednesday, February 28, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे युवराज सध्या ती मैत्रेयी आणि रॉबीनहूड नाहीयेत इथे. अन्यथा धडाधड उत्तरे मिळाली असती त्यांच्याकडून :-)

Vinayak
Tuesday, March 13, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Genetics या साठी मराठीत काय शब्द आहे?

Maitreyee
Tuesday, March 13, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वंशशास्त्र, बहुतेक. genes ला जनुक असा शब्द पण वापरला जातो.

Bee
Wednesday, March 14, 2007 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही वंशशास्त्र असेच वाटते आहे.

Robeenhood
Wednesday, March 14, 2007 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जनुक विज्ञान अथवा जनुक शास्त्र म्हणतात.

Yuvrajshekhar
Sunday, March 18, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी आणि रॉबिनहूड मला सांगा ना जरा की 'सांध्यपर्वातील वैष्णवी' चा अर्थ काय होतो?

Bee
Monday, March 19, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराज, मला वाटतं हे दोन्ही नाम आहेत. म्हणजे सांध्यपर्वत आणि वैष्णवी. त्यांचा संदर्भ तिथे आला असेल. तुम्ही जिथे हे दोन नाम वाचलेत त्या ओळी इथे लिहू शकलात तर त्यावरून काही अंदाज बांधता येईल.

Milindaa
Monday, March 19, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांध्यपर्वातील <<< म्हणजे सांध्यपर्वत <<<

बी, पर्वातील आणि पर्वत यात काय काय साम्य आहे हे उदाहरणे देऊन स्पष्ट कर पाहू :-)

Shonoo
Monday, March 19, 2007 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सांध्य पर्वातील वैष्णवी हे ग्रेस यांच्या पुस्तकाचं नाव आहे.

पर्व म्हणजे कालाचं एक Unit of Measurement जसे युग, तप, वगैरे. माझ्या मते युगा पेक्षा लहान आणि वर्षा पेक्षा मोठं.

सांध्य मला वाटतं संध्याकाळ शी सम्बंधित असणार.

वैष्णवी नावाच्या तीन मुलींच्या आयांना मी अर्थ विचारला तिघींनी दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी असा अर्थ सांगितला. आता हे literal अर्थ झाले.

ग्रेस च्या कुठल्याही शब्दसमूहाचे figurative अर्थ सांगायला जर मला जमलं असतं तर मी कोड्-कारकूनगिरी का केली असती पोटापाण्यासाठी :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators