Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Naamdeva DhasaaL

Hitguj » Language and Literature » पद्य » Naamdeva DhasaaL « Previous Next »

Mayurlankeshwar
Monday, March 12, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढसाळांच्या काही कविता....
---------------------
काव्यसंगह:

गोलपिठा
तुही इयत्ता कंची
मूर्ख म्हाता-याने डोंगर हलविले
खेळ
मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे
गांडू बगीचा
या सत्तेत जीव रमत नाही
प्रियदर्शनी
तुझे बोट धरून चाललो आहे मीMayurlankeshwar
Monday, March 12, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यांना लगडलेल्या अंधाराच्या चिमण्या
उडून जाताहेत...
बेघर पोरांचे पाय कब्रस्तानमध्ये दिसताहेत.
आपण गाळू आपल्यातले शिया-सुन्नी दर्गे
गुडघे टेकून रडू कबरीकबरीवर...
अल्लाहू अकबर... अल्लाहू अकबर...
-------(गोलपिठा)-------------


Mayurlankeshwar
Monday, March 12, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाल्मीकीची कार्बनकाॅपी व्हायचे नव्हते मला
प्रपंचाच्या रगाडयाने केले मला पापाचे धनी
बायकोला म्हणालो--'घे यातले थोडेसे वाटून'
तिने कानांवर हात ठेवले!
मुलालाही हीच वाक्ये म्हणून दाखविली
त्याने तर अंगाला पान सुद्धा लावुन घेतले नाही
वाल्मीकीने पापाचे ओझे वाहत वाहत अजरामर
आर्षकाव्य तरी लिहिले.
आणि मी?
मी जगण्याचे ओझे येथपर्यंत वाहत आणले.
हे जगण्याच्या वास्तवा
आता तुच सांग मी काय लिहू?
(मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे)


Zaad
Monday, March 12, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा!! हे काम तूच करशील अशी खात्री होतीच.
जमल्यास ढसाळांची मुलाखत इथे टाकता आली तर पहा.


Mayurlankeshwar
Monday, March 12, 2007 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो अवश्य! येत्या काही दिवसात व्यवस्थित संकलन करून पोस्ट करतो.Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators