Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

सई तांबे

Hitguj » Language and Literature » पद्य » सई तांबे « Previous Next »

Yuvrajshekhar
Monday, January 08, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्राच्या खांद्यावर मोकळेपणाने ठेवला हात तर,
ओळखीतली मैत्रीण हळूच विचारते,
'आजकाल कोणी नवा पकडला वाटतं'
तिच्या बाबांनीही म्हणे,
मला मित्रासोबत पाहिलेले हसताना...
आणि तिच्याकडे केलेली चौकशी,
माझ्या बॉयफ़्रेंड असण्यासंबंधी...
जाणवत राहते तिच्या नजरेतून

बाईला-
माणूस होता येणं-
खरंच इतकं कठीण असतं का?


Yuvrajshekhar
Monday, January 08, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


लहानपणी आईचं दूध सुटतं
तसं मोठेपणी घर सुटतं हातातून...
बालपणीच्या सावल्या अजूनही
लपाछपी खेळत असल्या भिंतीआडून
तरी हसून त्यांना पकडता येत नाही हातात

निसटून जाऊ लागते एकेक गोष्ट हलक्या पायांनी
आई-बाबांचे होतात महिन्याला
ठराविक पैसे पुरवणारे पालक
तेव्हा बालपणाला घट्ट मिठी मारून
-'अच्छा' करावा लागतो शेवटचा!


घरी परतण्याचे अटळ संदर्भ उलगडले की,
दिवसभरचे आनंद,खोड्या
मनाच्या पाठच्या कोपय्रात सारून
दार घट्ट बंद करून घ्यावं लागतं!

आपल्या असल्या निरर्थक गोष्टी जपायला,
घरातला एकही कप्पा मोकळा नसतो
आणि फुकटचा पसारा केला तर,
गोष्टी भिरकावल्या जातील
सरळ घराबाहेरच्या कचराटोपलीत
ही दहशत
बंद दाराबाहेर
कायमची दबा धरून...


'एकदा नक्की ये आमच्या घरी'
हे शब्द गेल्या कित्येक महिन्यांत
मी कोणासमोरच उच्चारले नाहीत
भिती वाटते-
कोणीतरी यायचं शोधत आणि त्याला 'माझं घर'
कधी सापडायचंच नाही...


आयुष्यातल्या स्वप्नांची गाठोडी
छतीशी गच्च धरून
मी तुझ्या घराच्या दिशेने
निघालेय मित्रा

पोहोचेपर्यंत या पावसात गारठून
किती स्वप्नं मरून जातील
मला माहित नाही
किंवा
पिल्लांच्या डोक्यावर उभ्या राहणाय्रा
माकडिणीसारखी,
स्वप्नांवर पाय देऊन
पुढे चालायचीही वेळ येईल
तेव्हा,
माझी वाट पाहू नकोस
कारण एकदा माकड झाल्यावर
माणसांसारखं घरात राहणं खूप कठीण असतं...


Neela
Saturday, January 13, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sundar kavita aahet.. Thanks for posting them.

Amolt
Tuesday, February 13, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

excellant and heart hunting poems.Add Your Message Here
Post:
Username: Posting Information:
This is a private posting area. Only registered users and moderators may post messages here.
Password:
Options: Automatically activate URLs in message
Action:

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions